Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 26, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » तारे ज़मीन पर » Archive through December 26, 2007 « Previous Next »

Ankyno1
Friday, December 21, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तारे ज़मीन पर


काय लिहू....

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून आलोय...
जरा स्थिरावतोय...


सर्वान्ग सुन्दर सिनेमा
डोकं बाजूला नाही... डोकं बरोबर घेउन पहायचा...
पहाता पहाता आपल्या भूतकाळात जायचा...
जुन्या आठवणीत रमायचा...
कथेशी समरस होउन जगायचा सिनेमा
प्रत्येकानी एकदातरी अनुभवण्याचा सिनेमा
वेगळ्या विषयाला हात घालणारा..
वेगळ्या पातळीवर मनोरंजन करणारा...
मुलान्नाच नव्हे तर मोठ्यान्मधल्या मुलालाही आपलासा वाटणारा...

किती लिहू...

असा सिनेमा काढण्याचं धाडस केल्याबद्दल आणि त्यात तितकाच उत्क्रुष्ट अभिनय केल्याबद्दल आमिर खान चं कौतुक करावं तेवढं थोडंय...
आणि केवळ आमिरंच नाही तर मुख्य भूमिकेतील दर्शील सफारीही सुन्दर काम करून ईशान ची भूमिका जगलाय...

अनेक सिनेमे घोस्ट डिरेक्ट केल्यावर आमिर नी दिग्दर्शक म्हणूनही कमाल केली आहे. नवखेपणाचा लवलेश ही कुठे दिसत नाही. संपूर्ण सिनेमा खूप सहजतेनी हाताळलाय. शंकर्-एहेसान्-लाॅय चं संगीत कुठेही बोजड वाटत नाही. सर्व गाणी ही कथेबरोबर जातात.

लहान मोठे कोणीही असाल तरीही किमान एकदा हा अनुभव स्वतः घ्या


(हे झालं मझं मत तुमच्या मताचं ही स्वागत आहे)


Ladtushar
Friday, December 21, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अत्ता तर बघीतलाच पाहिजे !

Jhuluuk
Friday, December 21, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! Anky ताजा ताजा रिपोर्ट दिला अगदी! पहायचा आहे हे तर ठरवलचं आहे, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले :-)

Amruta
Friday, December 21, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर पहाणारच होते पण रीव्हु मुळे आता आणखिन जोरात पहायला जाईन

Lopamudraa
Friday, December 21, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बघणार्च होते आणि आता नक्कि बघेल:-)

Panna
Friday, December 21, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Anky !!
४-५ ठिकाणी याचा रीव्हु वाचला. सगळीकडे एकच नारा आहे की प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांबरोबर बघवा असा आहे!


Tulip
Friday, December 21, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. खरंच अप्रतिम सिनेमा आहे. हॅट्स ऑफ़ टू दर्शिल सफ़ारी ऍन्ड आमिर खान.

Prajaktad
Friday, December 21, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिरची सकाळमधली मुलाखत ऐकल्यावर वाटत होतच बघावा...आअता नक्किच बघणारच

Lopamudraa
Friday, December 21, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी इथे वाचुन लगेच online tickets book करायला गेले उद्याची तर कळले इकडे leicesture ला नाहीये.. तो welcome लागलेला आहे


Swati_rajesh
Friday, December 21, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Tare Jamin Par"
Just too Good Movie No other word
Go And see

Nakul
Friday, December 21, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातले " मा " गाणे तर इतके हळवे आहे काय सुरेख म्हणले आहे

Dineshvs
Saturday, December 22, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे कसे आपल्या माणसांचे रिव्ह्यु आहेत. आता बघायलाच पाहिजे. तसा आमिरचा एकही सिनेमा मी सोडलेला नाही. ( मेला आणि मंगल पांडे सुद्धा )

Lopamudraa
Saturday, December 22, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्दा, राख पण बघितला का??:-)

Swati_rajesh
Saturday, December 22, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Taare Zameen Par is a story of a kid suffering from dyslexia. To create awareness about this disorder an example of Abhishek Bachchan is used in the film, who also suffered from this disorder. Aamir Khan took prior permission from the Bachchans to make this reference and use Abhishek’s name and picture as an example of success in spite of suffering from dyslexia at a young age. Abhishek is among the crème de la crème of Bollywood today. The disorder did not stop him from creating a place for himself in the film industry and become a successful star. That’s the message Aamir gives to the kids in the film. Like Abhishek, many known personalities fall in this category, which include the likes of Leonardo Da Vinci, Thomas Alva Edison, Alexander Graham Bell, Winston Churchill, Keanu Reeves, Albert Einstein and Tom Cruise. Taare Zameen Par is all set to release on December 21 and marks the directorial debut of Aamir Khan.


Above info. is copy & paste Khamaswa!

Sayuri
Saturday, December 22, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या पोस्ट्स वाचून लागोलाग नाझ ला तारे जमीनपर जाऊन पाहिला. इतका सुंदर सिनेमा लवकरात लवकर बघितल्याचा आनंद झाला (एर्व्ही मी पिक्चर रिलिज होऊन तो जुना झाल्यावर बघणार्‍यातल्या लोकांपैकी मी एक :-))
प्रत्येकाने आवर्जून पहावा असाच आहे.
गाणी सुंदर...प्रसून जोशींचे शब्द खूप भिडतात...
चित्रकार समीर मॉंडलचे नाव सुरुवातीस बघितल्यावर त्यांची पोर्ट्रेट्स चित्रपटात कधी दिसणार ही उत्सुकता मला लागलेली....त्यांनी काढलेलं ईशानचं पोर्ट्रेट तर....
Hats off to him!बाकी आमिरखान हा एक स्टार फेस सोडल्यास बाकी अपरिचित लोक (ईशान, त्याचा भाऊ, आईवडील पासून त्याचे शिक्षक वगैरे) असल्याने आणि त्यांनी चोख कामे केल्याने एरवीचे तेच तेच स्टार फेसेस नसल्याचा खूप छान परिणाम जाणवला.

एकंदरीत वेगळा विषय बॉलिवूडमध्ये हाताळला गेला याचा आनंद निश्चितच आहे!


Kedarjoshi
Sunday, December 23, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर चित्रपट. standing ovation to Amir khan
प्रसुन जोशी काय सुंदर लिहीतो. शेवटची डॉक्युमेंट्री पण सुंदर. शन्कर ऐहसान लॉय चे संगीत जबरी.

एक अतिशय सुंदर चित्रपट पाहन्याचे समाधान.
दिग्दर्शक म्हणून पहीला चित्रपट वाटत नाही ईतके सुंदर दिग्दर्शन.

( फक्त एक दोन त्रुटी जानवल्या, खासकरुन त्याचा बाबाचे वागने कधी कधी खरे वाटत नाही. )


Ankyno1
Monday, December 24, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तारे जमीन पर' पहाण्याचा एक अप्रतीम अनुभव घेउन दुसर्याच दिवशी 'वेलकम' नावाचा तद्दन भिकार सिनेमा पहून आलो.

अक्षयकुमार नी गेल्या वर्षात 'नमस्ते लंडन' 'हे बेबी' 'भूलभुलैय्या' असे मनोरंजक सिनेमे दिल्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा होत्या. सोबतीला नाना पाटेकर, अनील कपूर असल्याने त्या वाढल्या होत्या.... पण सर्व फोल ठरल्या.
नाना पाटेकर चं असणं आणि कॅतरीना कैफ चं दिसणं यामुळेच हा सिनेमा चालला तर चालेल (एकूण अवघडच दिसतय)
अनीस बज्मी चा 'नो एन्ट्री' मला तित्कासा आवडला नव्हता... पण 'वेलकम' तर आणखीनच गया गुजरा आहे.

मी पस्तावतो आहे....
तुम्ही बोध घ्या...

बघायचीच इच्छा दान्डगी असेल तर थोडी कळ काढा...
टीव्ही वर लागेलच ४-५ महिन्यात....


Deepanjali
Monday, December 24, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तारे जमिन पर : उत्कृष्ट !
त्या लहान पोराला Best Actor चं prize द्यायला हवं !
आमिर च्या teacher ला पहाताना थोडी दहावी फ़ मधल्या अतुल कुलकर्णी ची आठवण झाली मला :-) .. Must watch !


Jhuluuk
Wednesday, December 26, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण पाहिला, पाहिला :-)
खुप मस्त आहे.. आवर्जुन पहावा असा...
'मां' गाणे तर अप्रतिम आहे.. दर्शिल (छोटु) च्या अभिनयाने डोळ्यातुन पाणी काढले आहे..
काही त्रुटी ज्या जाणवल्या (वर लिहिल्याप्रमाणे) त्याच्या बाबांचे कॅरेक्टर आणि आमिर पण काही वेळा जराSS जास्त हळवा वाटतो...
अर्थात हे individual मत.. आणि 101 % चांगल्या चित्रपटाला तीट! :-)
ज्यांना लहान मुले आहेत अशानी तर जरुर पहावा..


Manuswini
Wednesday, December 26, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण ह्या long weekend ला तारे जमीन बघून आले. इथले वाचून पण ज्यास्त माझी भाची म्हणाली aunt, you must watch it ,सुंदर मूवी. आवडला. हा 'आमीर' स्वःताच्या मुलांना कीती समजावून घेतो हा आपला 'उगीच' प्रश्ण पडला मूवी पाहील्यावर.
असो.

मी पण आणि आजच तद्दन भीकार मूवी वेलकम पाहीला.

आचरटपणा कीती तो अक्षयकुमारचा. तसे पण मला hey baby पण पांचट वाटला होता. त्यातल्यात्यात भूलभुलैय्या ठीक पण काही यश मिळायच्या लायकीचा न्हवता.
असो.
हा BB special तारे जमीन वर आहे. ओघात लिहिले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators