काल कुठल्या तरी सिनेमाचा थोडासा भाग पहिला, त्यात हेमामालिनी उसासे सोडत अमिताभला शोधतेय सोबत प्राण त्यांना रस्त्यावर "खुन" दिसते.. ती प्राणला म्हणते... " ये तो उसका ही खुन लगता है, मै उसके बिना रह नही सकती वैगैरे वैगैरे.." आणि प्राण मै तुम्हारे लिये उसे धुंड लाउन्गा  
  : 
 
  | 
Mrdmahesh
 
 |  |  
 |  | Tuesday, December 11, 2007 - 2:21 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लोपा,  हेमामालिनी, प्राण आणि बच्चन म्हणजे... "नास्तिक"... 
 
  | 
Dineshvs
 
 |  |  
 |  | Tuesday, December 11, 2007 - 4:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
  कसौटी, नसीब मधेही ते दोघे होते. प्राणही कसौटी मधे होता.  
 
  | 
Chchotu
 
 |  |  
 |  | Tuesday, December 11, 2007 - 6:06 pm:    |  
 
 
 |   
  |   
 त्यात हेमा च्या आसपास जर काळा कुत्रा दिसत असेल तर तो नास्तीकच. 
 
  | 
Lopamudraa
 
 |  |  
 |  | Wednesday, December 12, 2007 - 8:21 pm:    |  
 
 
 |   
  |   
 नस्तिकच मग तो   पण नुसते  khunchaa  रंग पाहुन ते अमिताभचे आहे ओळखणे म्हणजे कलाच हवी माणासजवळ..  
 
  | 
Ankyno1
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 7:41 am:    |  
 
 
 |   
  |   
 एक मराठी कन्टिन्युइटी एरर    चित्रपट्: अग बाई.... आरेच्चा    सन्जय नार्वेकर आणि त्याची बायको जत्रेहून परत मुम्बई ला येतात त्या वेळी घराच्या दारात पोहोचेपर्यन्त सन्जय चा पयात पान्ढ्रे बूट आहेत. आणि बायकान्च्या मनातले ऐकू येते हा साक्शात्कार झाल्यावर तो जेन्व्हा पटान्गणात जातो तेन्व्हा बुटाच रन्ग लाल आहे.....  चमत्कार  
 
  | 
Ankyno1
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 7:49 am:    |  
 
 
 |   
  |   
 आषुतोश गोवारिकर चा स्वदेस अठवा    २७०V पर्यन्त वीज तयार होत नाही  आणि जेन्व्हा होते तेन्व्हा ही ती पाईप मधून पाणी वाहात तशी तारान्मधून वाहाते आणि शेवटी (एकदाची) दिव्यात पोचते....    अठवा..... "बिजली !"  म्हन्जे.... आली रे एकदाची.....    पण... हा अपवाद सोडला तर बाकी पिक्चर सही आहे.... 
 
  | 
Zakasrao
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 8:43 am:    |  
 
 
 |   
  |   
 स्टार गोल्ड, झी सिनेमा, सेट मॅक्स असले चॅनेल असतील तर काहिही अचाट चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी असते नुसती.    काल परवाचं स्टार गोल्ड.  चित्रपटाचे नाव माहीत नाही.  अक्षय कुमार आणि रविना (म्हणजे हा बराच जुना असेल जेव्हा त्यांच लफ़ड होत त्या काळचा.)  सीन असा पाहिला मी. अक्षय ने रवीनाच्या कुठल्याश्या डान्स प्रोग्राम मध्ये तीचा भलताच पचका वै केला असेल कारण मी पाहिल त्यावेळी तरी ती त्याला मै तुम्हे देख लुंगी असा काहितरी डायलॉग मारते. मग त्यावर स्मार्ट बॉय अक्षय म्हणतो मी रोज अमुक वेळी पोलिस अकॅडमीतुन बाहेर पडतो तिथे येवुन बघ.  दुसरा दिवस. पोलिस अकॅडमीच्या बाहेर एक आणि एकच मोटरसायकल आहे (पुणेकराना असल्या गोष्टी म्हणजे स्वप्नाहुन सुंदरच ना ). ती अर्थात हिरोची. तो हेल्मेट घालतो आणि दुचाकी सुरु करुन आपल्या रस्त्याला लागतो. (बहुतेक विसरला असेल रविनाला दिलेला ऍड्रेस आणि ती येइन अस बोललेल. चालायचच. तो तरी किती जणीशी कुठे कुठे भेटायच हे कस लक्षात ठेवणार नै का  आणि त्यातल्या त्यात रवीनाला लक्षात ठेवण म्हणजे......  )  मग लग्गेच कॅमेर्यात एक एस्टीम किंवा मारुती १००० दिसते. त्यात रविना आणि डायवरच्या जागी मोहनीश बहल (बिचारा काय काय भुमिका कराव्या लागल्यात त्याला. म्हणजे तो आहे तिचा मित्रच. पण आता गाडी चालवावी लागणार नै का??  )  आणि रवीना उवाच हाच तो कमीना वै.  त्यावर त्याच उत्तर अब मै उसको जान से मार दुंगा नही तो मै भी पोलिस कमिशनरका बेटा नहि वै..   (ह्याचा बापुस पोलिसात हाये हे आपल्याला कळण्यासाठी ओ हा डायलॉग  )  मग सुरु पाठलाग.  ही पोलिस अकॅडमी गावाबाहेर आहे बर कारण अजिबात ट्रॅफ़िक नाहिये.(परत एअक्दा माझ्यासारख्या पुणेकराच तिकडेच जास्त लक्ष  )  शिवाय अक्षय भाउच घर सुद्धा गावाबाहेरुन अजुन गावाबाहेर असाव. कारण रस्ता निर्मनुश्य आणि गावाबाहेर घेवुन जातोय हे स्पष्टच दिसतय. पुढे गेल्यावर एक घाट येतो. म्हणजे पुढे छोटीशी दरी वै सुद्धा बर.    मग लग्गेच पाठिमागुन ती मारुती धक्का देते जोरात. इतक्या जोरात की गाडी आणि त्यावरील स्वार दोघेहि उडालेले दिसतात. गाडी खाली जावुन पडली आहे पण तो कुठे दिसत नाहिये. म्हणुन त्याच्या हाडाचा तुकडा घेवुन येतो अस मोहनीश बहलच मत. ती ओ के म्हणून गाडीत बसते तर ड्रायवर सीट वर अक्षयभाउच.   हे कस काय असा प्रश्न पडतोच तो अक्षय भाउ पुढचे सीन पार पाडत जातो ज्यात तो अचाट प्रकारे गाडी चालवुन त्या गाडीत चार चाकं, सीट आणि इंजिन एवढेच भाग ठेवुन बाकीचे भागाची वाट लावतो. तो केवळ बघणीय सीन आहे. लिहिनीय नाही    आणि हो अजुन एक राहिलच की. हा सगळा कारनामा बघायला अरुणा इराणी आहे बर. आणि ती येते कशी तर सुरवातीला त्या अकॅडमीपासुन पळत मग एका दुधवाल्या भय्याच्या ३ चाकी मालवाहतुक रिक्शा मधुन    (तरी बर रिक्षाच घतली आहे. तिच्या जागी तो असता तर कोणी लघु शंका आटोपत असलेल्या माणसाची सायकल सापडली असती आणि त्या बिचार्या सायकलला मग जोर जोरात धावाव लागल असत.  )  ते ही त्याचे मागे ठेवलेले दुध सांडुन वर त्यालाच दम देवुन की चल ह्या गाड्यांचा पाठलाग कर.  तीच्या पळण्याचा, अक्षय भाउच्या दुचाकीचा,मागोमाग मारुतीचा आणि नन्तर त्या दुधवाल्या भय्याच्या ३ चाकी रिक्षाचा स्पीड एकच ठेवलाय हो.    मी फ़ार धन्य झालो तो सीन पाहुन.  मग कृथार्थ होउन  TV  बंद करुन झोपण्यासाठी गेलो.    
 
 
  | 
Manjud
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 9:28 am:    |  
 
 
 |   
  |   
 झ, थोडक्यात रीकामा वेळ सत्कारणी लावणं चाललंय तुझं....... 
 
  | 
Ankyno1
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 10:47 am:    |  
 
 
 |   
  |   
 हीरो नम्बर १ मधे शेवटी कादर खान गोविन्दा चा बर्थ डे सेलेब्रेट करयला येतो तेन्व्हा घराचे दार बन्द करायचे रहाते  परेश रावल गोविन्दाला नाव ठेवत दार बन्द करतो, ज्यामुळे कादर खान ला तिकडेच रहाव लागत  सकाळी जेन्व्हा चोरी झाल्याच लक्श्यात येत तेन्व्हा दार उघड आहे की बन्द याची कोणालाही फ़िकीर नाही  रावल गोविन्दालाच पोलिसान्ना बोलाव अस फ़र्मावतो  तो (गोविन्दानी बोलावलेला) पोलीस त्यालाच नडतो  (एवढा रईस गोविन्दा, ज्याची 'शिक्शामन्त्री' शि ओळख अहे, तो ओळखिच्या पोलिसाला का बोलावत नाही?)  कादर खान ला घरातिल लोक चोर समजतात, पण तो गोविन्दाचा चाचा आहे हे त्यान्ना माहिती असल्याचे आधी दखवले आहे, वफ़ादार नोकराचा चाचा चोर आहे कि नाही हे बघायला त्याची झडती ही घेतली जात नाही.    करिष्मा च्या घरी गाड्या तरी किती आहेत....  परेश रावल ची मर्सिडीज  बाकि लोक एन्ड ला घेउन येतात त्या २ मारुति ८००  मधेच कधितरी करिष्मा चे दोन्ही काका एका बाबा अदम कालीन गाडीतून उतरतात  तरीही टीकु तल्सानिया प्रिन्सिपल ला सान्गत असतो कि त्याला ३-३ बस बदलून याव लागत म्हणून उशीर होतो........ 
 
  | 
Amruta
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 3:43 pm:    |  
 
 
 |   
  |   
 झकास,  LOL  मस्त लिहिलयस.. पण तसे अक्षयचे सिन अचाटच असतात.  काल असच  TP  करत असताना कुठल्यातरी  online channel  वर अक्षयचा भाउ सुनिल शेट्टीचा सिनेमा चाललेला. काय एकसे एक अचाट सिन होते त्यात. ३०,३५ माणस त्याला मारायला येतात तेव्हा आधी उगिचच तो धाव धाव धावतो. का तर म्हणे त्यांना दमवण्यासाठी.. हा जसा स्वत्: सुपरमनच...मधे तो त्यांच्या तलवारीचे वार पण खातो. मग मधेच तो एकदम एका खोलीत घुसतो तिथे काहि बायका मिरच्या कुटत बसलेल्या असतात. आता आपल्या सारख्या पामरांच्या मनात काय येणार सांगा पाहु.. बरोब्बर तेच.. आपल्या काय त्या गुंडांना पण तसच वाटत तर ह्या पठ्याने काय कराव?? तर खुळ्यासारख ओरडत तो ती मिरची पावडर स्वत्:च्याच अंगावर चोळतो. इथे आपण काय तर ते गुंडपण हक्केबक्के होतात आणि तो 'वेडा झाला वेडा झाला' अस ओरडत पळत सुटतात. मग मगाच पेक्षा उलटा सिन. किती म्हणजे हे अचाट काम???     नंतर मग बस्तीत लिगल दुकान झाली पाहिजेत म्हणुन म्हणे २ क्रोडची जमिन तो मालक ह्या बस्ती वाल्यांना १ करोडला द्यायला तयार होतो. अभि ५० लाख दो और नंतर बचेहुये ५० लाख. आपला हिरो बस्ती वाल्यांना समजावतो. 'भाइ लोग हमे ५० लाख जमा करना है. ठेलेवाले १० हजार देव और दुकान वाले २५ हजार देव.' वा बस्तीवाले खुश... लगेच ५० लाख जमा नंतर दुकान बनवायला सुरु मग मधे त्यांना कळत कि ज्याला आपण ५० लाख दिले तो असली मालक नव्ह्ताच मुळी अब हमारे पैसे किधर है?? मग सुनिल शेट्टीवर हल्लाबोल...   हे एवध अचाट आणि अतर्क्य पाहात असताना जुईला शाळेतुन आणायची वेळ झाली आणि माझा एवढा अचाट सिनेमा हुकला.....  
 
  | 
 झकास भारीच!!!पण अक्शय कुमारची ऍक्शन भारी असते.     K3G  चित्रपटात शाहरुख आणि हृतिक लंडन का अमेरिकेत एकमेकांना मिठी मारायसाठी जवळ येतात आणि भारतात जया बच्चनच्या घरी वादळ सुटत,ती जाडी म्हातारी कुठेतरी पळायला लागते...त्यानंतर हृतिक आणि शाहरुख एकमेकांना मिठी मारतात आणि तेव्हढ्यात दार उघडते आणि जया बच्चन थांबते मागुन लतादीदी 'आ.. आऽऽऽ.आअ...कभी खुशी कभी गम'... आणि तेव्हढ्यात वार्याची झुळुक (लंडनवरुन आलेली) जया बच्चनच्या अंगावर येते आणि ती शांत होते. 
 
  | 
Farend
 
 |  |  
 |  | Thursday, December 13, 2007 - 9:51 pm:    |  
 
 
 |   
  |   
 झकास सही रिपोर्ट आहे त्या चित्रपटाचा, पण तू थोडाच बघितलेला दिसतोय. हे लोक रिपीट करतात ना असे "सुपरहिट" , "महासिनेमा" वगैरे? मग उरलेला पाहा आणि लिही   कारण एकूण अचाट प्रकारांचा भरणाच दिसतोय यात. 
 
  | 
Ankyno1
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 6:54 am:    |  
 
 
 |   
  |   
 अक्षयभाउ विषयि इतके काही लिहिले आहे म्हणून त्याच बाबतीत त्याची एन्डीटीवी च्या वाॅक द टाॅक मधे त्यानी स्वतः दिलेलं उत्तर    माझ्या बहुतेक अचाट आणि अतर्क्य सीन मागची प्रेरणा मला "टाॅम जेरी" पहून मिळते.....    आवाक़ झालो हो हे ऐकून  ब्रह्मरहस्य कळाल्याचा आनंद झाला 
 
  | 
Ankyno1
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 7:39 am:    |  
 
 
 |   
  |   
 डेव्हिड धवन हा इसम तर जगातलं सगळ्यात अतर्क्य लाॅजिक घेउन जन्माला आलाय    त्याच्या बडे मियाँ छोटे मियाँ मधला सीन्-    पोलिस इन्स्पेक्टर असलेले अमिताभ्-गोविन्दा टेम्पोवाल्याकडे चौकशी करत असतानाच त्यान्चे चोर हमशक्ल त्याच टेम्पोवाल्याकडे येतात    दोन्ही जोड्याच्या मध्ल अंतर फार फार तर ५०फूट... तरीही ते एकमेकान्ना दिसत नाहीत....  टेम्पोवालाही दोन्ही जोड्या बघूनही अवाक्षर बोलत नाही....    आणखी एका सीन मधे अनुपम खेर (पोलीस कमिशनर कसला हा... हवालदार सुद्धा वाटत नाही..) 'सुन्दर काला' नामक नामचीन गुन्डाला पकडायला निःशस्त्र जातो (आहे कि नाही हवालदार व्हायच्या लायकी चा) आणि वर त्याच गुन्डाला १ पिस्तूल मला दे की अशी विनन्ती ही करतो.... अवरा रे यान्ना....    चित्रपटाच्या शेवटी तर कहर आहे....  पोलिसाना मदत केली या कारणास्तव चोर जोडी चे सर्व गुन्हे माफ... वर त्यान्ना इन्स्पेक्टर ची नोकरी...  आणि खरी इन्स्पेक्टर जोडी... जी त्या हलकटान्मुळे अडचणीत आली... ते दोघं डायरेक्ट ट्रॅफिक हवालदार....... का हो...? 
 
  | 
Zakasrao
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 8:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 अमोल अरे तोच भाग सुद्धा मी इथे लिहायला मस्त आहे म्हणुन पाहिला.  अख्खा पिक्चर काय पाहु शकतओय मी    बाकी मला आधी अशा फ़िल्म्स चा राग यायचा. आता आसुरी आनंद होतो.   
 
  | 
Satishbv
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 8:29 am:    |  
 
 
 |   
  |   
 अमर, अकबर मधला अजुन एक प्रसंग सगळे कसे विसरले   निरुपा राय खलनायकापासुन पळुन जाताना वाटेत तिला एक वाघ मदत करतो. त्याचे ति हात जोडुन आभार मानते. इथ पर्यंत ठिक आहे हो. तिने कृतज्ञतेपोटी केले असेल, पण तो वाघ देखिल हात जोडतो. आणि आपण सारे हात कपाळावर मारुन घेतो.  
 
 
  | 
Shraddhak
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 9:43 am:    |  
 
 
 |   
  |   
  satishbv  तो सीन अमर अकबर ऍंथनीमधला नाही,  ' मर्द '  मधला आहे.    AAA  मध्ये तिला साईबाबांच्या मंदिरात गेल्याबरोबर साईबाबांच्या डोळ्यांतून निघालेल्या ज्योतींनी डोळे येतात. :-P
 
  | 
Satishbv
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 10:25 am:    |  
 
 
 |   
  |   
 बरोबर तो सीन मर्द मधलाच आहे  मर्द मध्ये लक्षात राहण्यासारखे काम घोड्याचे होते    या चित्रपटात एक उडु पाहणारे विमान दारासींग दोरीने पकडुन ठेवतो 
 
  | 
Supermom
 
 |  |  
 |  | Friday, December 14, 2007 - 12:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 ही निरूपा रॉय म्हणजे ना... माझी बहीण तिला केयरलेस मॉम म्हणते. कारण कायम तिची मुलं सिनेमात हरवतात. 
 
  |