|
Trish
| |
| Wednesday, December 12, 2007 - 10:38 am: |
| 
|
नकार! प्रेम, मैत्री, जॉब, संधि, लग्न, अश्या अनेक वेळा कुणाला ला कुणाला तरी नकार घ्यावा लागतो किंवा द्यावा लागतो त्याचे कारण हे प्रेतेक वक्ती च्या निर्णय स्वातंत्र्यावर अवलंबून असते ! पण हा नकार जितका सहजतेने दिला जातो तितक्या सहजते ने घेतला मात्र जात नाही. मग ज्या वक्ती ला हया नकाराचा सामाना करावा लागतो तो तितक्या सहजतेने तो पचउ शकतो कींव नाही या वरती त्याचे पुढील आयूष्य अवलंबून असते. काही वक्ती "टाकी चे घाव सोसणार त्याला देव देणार" ही उक्ति खरी करतात तर काही नकारात्मक आयूष्य घलवतात. अणि आयूष्य भर नकार देणारया वक्ती ला दोष देत बसतात. तर दोन्ही प्रकारचे आपले असे अनुभव आपण इथे संगावे ही अपेक्षा. कुठले ही वय्क्तिक मतभेद मांडू नए ही विनंती !
|
Trish
| |
| Wednesday, December 12, 2007 - 11:38 am: |
| 
|
नविन विषय सुरु करत आहे ! रिलेशनशिप मधे बनउ शकलो नाही मंहणुन इथे बनविला, जर याची जागा योग्य नसेल तर अधिकारी तो हवे तिथे टाकू शकतात ! खुप दिवसान पासून मनात विचार होता अणि कुणाशि तरी मन हलके करावे असे वाटत होते. "नकार" किती नकारात्मक शब्द आहे अणि तेवढाच भयानक एखाद्याचे आयूष्य उधावस्थ करून सोडतो तर एखाद्याला आयूष्य जगयाचे कसे ते दाखउन देतो. सहजिक च आहे माज्या ही बाबतीत असेच कही तरी घडले मंहणुनच तर लिहितो आहे. प्रेमाच्या सुंदर स्व्पनातुन जागा होतो नाही तोच आयुष्यआने त्याचे रंग दाखवायाला सुरवात केली. ज्या स्वप्नावर अत्ता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते, मनात नुसती चिडचिड होत होती. काही करून पण ती थाबयाला तयार होईल असे वाटत नव्हते. उलट काही केले तर अजुन बिगडून परीस्थिती हाता बाहेर जाउ शकत होती. कारण माजे सगळे बोलणे हे तिला माजे स्पष्टिकरण च वाटत होते, अणि माला नेमके याच वेळी काही शब्द फुटत नव्हते. माज्या डोळ्या समोर मात्र तोच दिवस दिसत होता... मी नविन कोलेज मधे नुकताच रुलू लागलो होतो, तोच एके सकाळी कूलर जवळ पानी पित असताना बाजूला काही तरी हालचाल जाणावली मंहणुन बघीतले, सडपातल, मध्यम ऊँची सावळसर पण उजळ रंगाची एक मुलगी भरभर चालत वर्गात चाललेली, माज्या कड़े बघून जरा तिला धीर आलेला पण तरी न थाबता सरल वर्गात घुसली, माला ही त्याच वर्गात जायचे होते पण मी उगाच टंगल मंगळ करत रहिलो अणि तिचे वर्गात गेल्या नंतर थोड्याच वेळात मी: "मे आई कम इन" करत वर्गात एंट्री मारली, तर पहिली नज़र त्याच मुलीवर थाबली अणि ती ही मलाच पाहत होती एका अशर्यचकित नजरेने ! मी मनातल्या मनात इतका सुखा उन गेलो होतो की पूर्ण lecture काय होत हे तर माला आजही आठवत नव्हते. आठवत होते ते फ़क्त तिचे ते निरागस रूप, तिने मला पाहने अणि मी तिला, क्षण भर मी कुठल्या दुनियेत हरवलो कुणास ठाउक. lecture संपले अणि मी भानावर आलो, अणि नज़र वळली ती थेट तिच्या कड़ेच. अणि मला प्रतय आला की ती ही त्याच नज़रेने माज्या कड़े बघतआहे एका परिचित नजरेने. सगळे हलू हलू वर्गातुन निघयाला लागले अणि मी एका वेगळ्याच आतंरिक ओढी ने तिच्या कड़े चलला गेलो. तिला याची जनिव होताच थोड़े संभालूंन ती तिज्या मैत्रीनिच्या ग्रुप मधून मागेच राहिली. अणि मी तिच्या जवळ पहोचालो. तोडातुन शब्द निघाले "Hiiiii" ते ही दोघानच्या ही एकावेळीच. मी आजही अजुन पण इतका हळहळ तो की, त्या एका शब्दावर माज्या मनामधे खोलवर कुठे तरी असे काही तरी हलू लगते अणि वाटते जणू समुद्रा च्या त्या खळखळत्या लाटा माज्या मनाच्या किनार्यावर येउन विरून जात आहेत. तो दोन lecture मधला वेळ, वर्गाबहेर खुप वरदळ, कोणी तरी ओरडले "next lecture off" अत्ता वर्ग पूर्ण खाली पण मनात मात्र खुप प्रश्न तेच बाहेर पडत होते, नाव, गाव, कुठे राहते इत्यादी इत्यादी, मग त्या वर प्रतिक्रिया अणि त्यावर पुन्हा प्रतिक्रिया अश्या गप्पा चालूच एक-मेकां न बद्दल जाणुन घ्यायल दोघे ही उत्सुक, पुन्हा कोणी तरी ओरडले plz keep room vacant go to library there is another lecture in this room. मग आमची स्वारी बाहेर निघाली कुणी इकडे कुणी तिकडे सगळे विखुराले गेले, नविन ओळख जालेले माज्या कड़े वेगाल्याच नजरेने पाहू लागले, अणि मला थोड़े ओशालळ्या सारखे वातु लागले पण आम्हाला मात्र किती बोलू अणि किती नको असे जाले होते. नकळतच आम्ही पायरया उतरून खाली आलो अणि katta वर बसून उरलेल्या गप्पा पूर्ण करू लागलो. गप्पा संपताच नव्हत्या अणि माजे तिला अणि तीजे मला न्याहाळने देखील का कुणास ठाउक अनोळख्या जागी कोणी तरी ओळखीचे भेटले याचा आनंद होत होता की जणू ही ओळख खुप दिवासन पासून ची असल्याची जाणीव होत होती. त्या नंतर मला असे सुखद धकके मीळतच गेले अणि मी अणि ती जेवढे सुखावत गेलो तेवढेच जवळ ही येत गेलो. या नंताराचे सर्व काही एका स्वप्ना प्रमाने घडत गेले अणि त्या सुंदर क्षणान मधे मी इतका हरउन गेलो की मी मज़ाच न रहिलो अन मैत्रीच्या त्या नात्यामधे विरून गेलो. दोघानी मिलून कुठाली गोष्ट सोडली नव्हती की जी वाटून घेतली नसेल. lecture नोट्स, पासून ते घरून आलेल्या खाउच्या दब्ब्या पर्यंत, लहानपाना पासून ते अगदी अत्तापरयंत सर्व घटना अणि सर्व गोष्टी दोघ्नाच्या एक्मेकाना इतक्या पाठ जाल्या होत्या की विषय निघयची सुरवात पुढील सर्व संवाद अपोआप पूर्ण होत असे. माज्या मना सारखी मैत्रीण मीळयामुले मी इतका आनंदी होतो की य हुन् ही जास्त आनंद जर कुठे असतो असे मला जर कोणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. त्या मुले या पुढे जायचा मी कधी विचारच केला नाही. कारण... अगदी गौरव जोशिंच्या कविते सारखे मला ही वाटू लागले होते "मला वाटायचे तिचे मज्यावर जिवापाड प्रेम आहे, फ़क्त विचारायची देरी आहे..." क्रमश्:
|
Aktta
| |
| Wednesday, December 12, 2007 - 12:37 pm: |
| 
|
ट्रिश... सही आहे तो crush चा BB use केला असता कदाचीत... एकटा....
|
Trish
| |
| Wednesday, December 12, 2007 - 12:46 pm: |
| 
|
एकटा, ही crush च्या ही पुढील गोष्ट आहे, लिहायला थोड़ा वेळ लागत आहे शमा असावी ! "नकार" हा विषय माला वाटते थोड़ा वेगलाच आहे.
|
Dakshina
| |
| Wednesday, December 12, 2007 - 12:57 pm: |
| 
|
अहो Trish जरा लवकर लवकर लिहा की, एकदा ऑफ़िसमधून गेलं की मायबोलीचा access डायरेक्ट उद्याच मिळतो...
|
Trish
| |
| Wednesday, December 12, 2007 - 3:58 pm: |
| 
|
आजही य ओळी वाचून मन अगदी भरून येत होते ! परन्तु आज मला best friend या शब्दावर चीड़ येत होती...का कुणास ठाउक पण माज्या मस्तकी पर्चंड आग होत होती, टेकडी वरच्या त्या गार वरायात पण नुसती आग आग होत होती. मी जळत होतो, पूर्ण पेटून गेलो होतो. माज्या स्वपनांची होळी मीच पाहत होतो. निमात्त होते ते फक्त एवढेच माजीच मैत्रीण आज माला सोडून चालली होती. अणि मी फ़क्त पचातापा शिवाय काहीच करू शकत नव्हतो. मध्यन्तरी पुला खालूंन खुप पाणी गेले होते, कोलेज संपून खुप दिवस जाले होते तरी आमच्या भेटी चालू होत्या नोकरी शोधताना नाकी नऊ येत होता तो काळ असा होता की साधी दोन तिन हजराची नोकरी पण सहजा मिलत नसे. मला माजेच वाईट वाटू लागले, अणि त्या मुले मी तिला काहीच सागुच शकलो नाही, पण ती माज्या मागे सदैव उभी राहिली. पण शेवटी माज्या हातातुन वेळ निसाटुन चालली होती. मी वेड्या सारखा नोकरीच्या शोधत वन वन भटकत होतो experience नसल्या मुले कोणीच उभे करत नव्हते. शेवटी मला ते शहर सोडून जाने भाग पडले अणि एका नवीन शहरात मी माज़े जीवन सुरु केले. मना मधे एकच स्वप्न , एकच आस्था, एकच निराशा पण त्या बरोबर एक धेय. काही करून स्वताला सिद्ध करून आपली सवप्ने परत मीळवयची, दिवसाची रात्र करून नविन नविन technology शिकू लागलो अणि मीळअलेल्या एका संधिचे सोने करायचे ठरवले. छोट्याश्या एका compani तुन सुरवात करून एक एक करत पायर्या चढू लागलो. जेव्हा एक चांगली नोकरी मिळाली तेव्हा पाहिले काम केले ते माज्या सखेला ही बातमी दिली तशी ती तेव्हा माज्या बरोबरच होती त्या interview ला. तिच्या चेह्र्यवाराचा तो आनंद मी पाहून खुप सुखावालो होतो! अत्ता मला कोणीच थामबऊ शकत नव्हते. माज्या स्वप्नान पासून ...अत्ता फ़क्त मी विचारायाची देरी आहे ... क्रमश्:
|
Akhi
| |
| Thursday, December 13, 2007 - 4:44 am: |
| 
|
वा येउ द्या लवकर लवकर
|
Aktta
| |
| Thursday, December 13, 2007 - 12:23 pm: |
| 
|
ह्ह्ह्म्म्म्म्म मला वाटक्ल मी चुकुन गुल्मोहर वर आलो...... चांगल आहे एकटा..
|
Trish
| |
| Thursday, December 13, 2007 - 12:57 pm: |
| 
|
अजचा दिवस खासच होता! मला एका बरयापैकी चांगल्या compani तुन interview call आलेला, मी टेलीफोन बूथ वर जाऊन फ़ोन फिरवला अणि पहिली बातमी सांगितली ती तिला, तिला ही खुप आनंद जाला अणि सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा की मी पुन्हा त्याच शहरात जात होतो. त्या निमिताने आमची खुप दिवसानी भेट होणार होती. हे नशीब पण कधी कधी इतके चांगले वागु लगते की अपलाच त्याच्या वर विश्वास बसत नाही. जसे विचार केले तेच घडत होते अगदी तसेच मला माजी संधि मिलत होती अणि ती पण त्याच शहरात! कित अदभुत होते ते सगळे. काही तरी कारण काढून ती पण माज्या बरोबरच येणार होती तेव्हाढाच जास्त वेळ सहवास! शेवटी तो क्षण आला होता तिच्या हातात माज़े oppointment letter अणि मी तिच्या समोर उभा! काय बोलावे कुणालच काही सुचत नव्हते. खुप वेळ असाच गेला आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर परतालो अणि त्या नेहामिच्याच पायरय वर बसलो. ती मला सांगत होती जा घरी फ़ोन कर पण मी मात्र तसाच तिच्या बाजूला बसलो होतो. मला काही तरी सगायाचे होते अणि तिला पण काही तरी एकयाचे होते, दोघेही स्थब्ध. इथले तिथले विषय निघत होते पण मूळ मुद्दा मात्र बाजूलाच रहत होता. अणि मग तिने संगयाला सुरवात केली. तिच्या घरी तिच्या साठी स्थळ बघत होते. पण काही अजुन जुलत नव्हते. तिला हे दुख खुप दिवासन पासून सगायाचे होते अणि ती बोलतच राहिली. एका क्षणी मी तिला अड़उन तिचे डोळे फुसू लागलो, तिचा हात हातात घेउन तिला सागुं लागलो. ते सर्व जे इतके दिवस मनात होते, ते सर्व जे नेहमी अगदी ओठावर येउन हवेत विरून जात होते. ते सर्व काही जे मी तिच्या साठी फ़क्त तिच्या साठी करायचे ठरवले होते. ते माज़े स्वप्न मी तिला शब्द नि शब्द सांगत होतो. पण ... पण ती मात्र एका वेगळ्याच विचारत मग्न होती. जशी ती माज्या पासून खुप दूर गेली होती. क्षणअत भानावर येउन तिने तिचा हात माज्या हातातुन दूर केला. अणि मानावर दगड ठेवल्या प्रमाणे तिने संगयाला सुरवात केली मला काहीच कळत नाहव्ते तिचे वाक्य अणि वाक्य मला टोचत होते. मन्हे तिला माज्याशि लग्न करणे कधी जमलेच नसते हे तिने फार पूर्वी जणाले होते पण एका मैत्री ने तिला अत्ता पर्यंत रोखले होते. ती ही आजच्या च दिवसाची वाट पाहत होती. ती मला समजवत होती पण मी मात्र काहीच समजून घेण्याच्या मनसस्थितित नव्हतो. मला फ़क्त एवढेच कळत होते माज्या रंगवलेल्या स्वपनावर लाल रंगानी ओढलेल हा एक नकार होता! दुसर्या दिवशी सकालिच तिचा फ़ोन आला "हेलो त्रिश" अगदी सहजते ने विचारपुस करून तिने मला धक्काच देला होता जणू काही घडले नाहीच अश्या थाटात बाईसाहेब मज्याशी बोलत होत्या. मी नुकताच उठालो होतो पण सवारालो मात्र नव्हतो. काय बोलावे काहीच कळत नव्हते! संध्याकाली यायला सांगून तिने फ़ोन ठेउन दीला. जाग येउन खुप वेळ झालेला, का झोपलोच न्हवतो! आदल्या रात्रि कधी झोप लागली होती माहित नव्हते अणि आज कधी उठालो तेहि माहित नहव्ते. काहीच कळत नव्हते...कळत होते ते इतकेच की काही तरी तुटले होते का माझ्या हृदायाचा एक मोठा तुकडाच पडला होता. प्रेमाच्या सुंदर स्व्पनातुन जागा होतो नाही तोच आयुष्यआने त्याचे रंग दाखवायाला सुरवात केली होती. ज्या स्वप्नावर अत्ता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते. मी सगला दिवस तसाच अथ्रूणात घलावल दुपराचा डब्बा पण तसाच पडून होता. कशाचिच इच्छा होत नव्हती. डोळ्यान समोर पुन्हा पुन्हा तोच क्षण! काय चुकले ? काय कमी राहिले ? का एवढा उशीर झाला मला ? का मी तिला समजायला चुकालो ? का तिने मला समजून नही घेतले ? असे असंख्य प्रश्न, अणि त्या मधे गुरफटलेला मी रूम वर तसाच पडून होतो. वेळ तर खुप निघून गेलेला पण माझा मलाच वैताग आलेला. थोड़ा फ्रेश होऊं आरश्या समोर तोंड फुसत असताना स्वताचिच नज़र चुकवत होतो. अणि जेवा ती भीडली तेव्हा फक्त वहिली पाणी होऊंन... पुन्हा फ़ोन वाजला तू येतो आहेस ना ? बापरे सात वाजले होते मला काही समजलेच नव्हते! मी: हो येतोय. मग ये लवकर का मी येऊ?, नको मी येतो थोड़ा वेळ लागेल बस मिळे पर्यंत पण येतोच. सांगून मी फ़ोन ठेवला. अणि पटापट कसे तरी अवरून निघालो. अत्ता मात्र मन शांत होते. कसलाच विचार नव्हता. ती बस स्टॉप वरच वाट पाहत होती. पुन्हा थोड़े मागे चालून आम्ही तिथेच फोचलो. ती मन्हे आज इथे नको टेकडिवर जाऊ छान ठंड वारा असतो. ठंड वारा मण्हे, मी एवढा तापलोय अणि ही एवढी ठंड! काय झाले आहे हिला हा हिचा कुठला अवतार आहे? अत्तापर्यंत मी हिला समजावयाचो, हिची समजूत मीच काढायाचो, हिचे कोणाशी बिनासले की मीच हिचा आधार अगदी घराच्यानचा पण राग मला भेटल्यावर शांत! अणि आज ही एवढी ठंड जसे काही हिला हे सगळे अपेक्षितच! क्रमश्:
|
ठंड वारा मण्हे, मी एवढा तापलोय अणि ही एवढी ठंड! अरे तु तापलेला होतास म्हणुन तुला थंड करायला थंड वार्यात घेऊन गेली असेल!!!! दिवे घ्या!!!
|
Uday123
| |
| Thursday, December 13, 2007 - 5:05 pm: |
| 
|
त्रिश, काही (ऋदयाचे!) ठोके चुकतात, म्हणजे लिखाण खुप छान आहे, क्रमश: थोडा अंत पहातो... पुढच्या लिखाणाची वाट पहात आहे.
|
Akhi
| |
| Friday, December 14, 2007 - 4:05 am: |
| 
|
ललीत मधे टाकल असते ना तरी सुध्दा चाललं असते
|
Trish
| |
| Friday, December 14, 2007 - 11:32 am: |
| 
|
ह्ह्ह्म्म्म्म्म तिला हवे तसे सगळे घडत होते, मला मात्र हे सर्व अनपेक्षितच होते तिने माझ्या बद्दल एवढा विचार आदिच करूँन ठेवलेला होता तर! हा विचार माला खुप नंतर पटला. तो पर्यंत खुप दिवस निघून गेले होते. आमचे तसे अधून मधून भेटने होत होते, काहीच नाही तरी फ़ोन वर बोलणे तर नक्कीच. अणि माझी ही अधून मधून चिड चिड चालूच होती. तिने माला अगदी पूर्ण वेळ दिला होता जेवढा ते देऊ शकत होती. त्या दिवशी चे ते बोलणे माझा अगदी कानात अजुन वाजत होते! "मंहजे माझे प्रेम व्यर्थ ? मी जिच्या वर जिवापाड प्रेम केले तिला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही." "वाटत नसते तर आज मी तुझ्या बरोबर इथे असते का ??" या पुढे मी काहीच कारण विचारू शकतच नव्हतो. कारणे, स्पष्टिकरणे देणे हे तिला अत्ता पर्यंत कधी पटलेच नव्हते. अयुष्या च्या परीक्षेत सगळे च प्रश्न "कारणे द्या" अश्या स्वरूपात नसतात. काही प्रशनाची उतरे ही चुक की बरोबर अशीच द्यायची असतात. तिचे मात्र साधे सोपे सिधांत होते जे आहे ते असे आहे, उगाच उलटे सुलटे काही तरी करून सिधांत सोडावाणे कधी पटलेच नव्हते. ते शेवटचे दिवस इतके भर भर निघून गेले होते जसे पुराचे पाणी झप झप ओसरत जाते. अणि मागे सोडून जाते ते विखुरले अणि आस्था वस्था पसरालेल्या आठावानीचे सामराज्य! अणि मी मात्र काहीच करू शकत नव्हतो. वपुंचेच खरे "सुखाचे क्षण हे पारया प्रमाणे असतात हातात आलेसे वाटतात तेव्हा निसटून गेलेले असतात" आज तिचा मेल आला होता मला बर्थडे विश करणारा "Wish you a very Happy Birthday" या वतिरिक्त दूसरे काहीच लिहिले नव्हते कारण अत्ता ती तेवढेच देऊ शकत होती! या लेखात तांत्रिक दोष असू शकतात अणि हा योग्य जागी सुद्धा नसेल. माझा हेतु कुठलेही ललित लिहन्याचा नसून एक अनुभव कुणाला तरी सागायाच होता. कदाचित माझे ओझे थोड़े हलके करायचे होते. अणि हे ऐकून घेतल्या बद्दल मी आपला आभारी आहे! त्रिश.
|
Kshanik
| |
| Friday, December 14, 2007 - 4:25 pm: |
| 
|
साधारण असे अनुभव सर्वच मुला/मुलिन्ना येतात, काहि वर्षांनी तुझा विश्वास बसनार नाहि कि आपण एका मुलिसाठी वेडे झालो होतो. तिला विसरणे अवघड जाईल पण अशक्य मात्र नक्किच नाही. मला वाटत मुली जे विचार करतात ते मुले कधिच करु शकत नाहित, तेव्हा तिच्या नकाराचा आदर कर. एखाद्याला नकार देवुन सुद्धा मुलि त्या मुलाशी मैत्रिचे नाते सहसा तोडत नाहित ( का ते मुलिन्नाच माहित)
|
Uday123
| |
| Friday, December 14, 2007 - 4:30 pm: |
| 
|
त्रिश महाशय्: आपला (नकार) अनुभव मनाला थोडा चटका लावुन गेला, तुम्हाला लवकर हलके वाटावे आणी जीवनाची गाडी पुर्वत: रुळावर यावी म्हणुन लाख शुभेच्छा. जसा नकार हा घेणार्याला कठीण जातो, जाऊ शकतो, त्याच प्रमाणे तो देणार्यालाही सोपा असतोच असेही नाही. त्यालाही तितकाच त्रासदायक ठरु (असु) शकतो. जे होते ते चांगल्याच साठी असे मानुन पुढे चालायचे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली; तुमची लेखणी (key board) वाचकांना मंत्रमुग्ध करते, खीळवुन ठेवते. पुनश्च शुभेच्छा.
|
Aktta
| |
| Friday, December 14, 2007 - 7:31 pm: |
| 
|
असच आठवल मह्नुन...... Going to Propose a Girl ? Here are the top most reply of a girl, when you propose her... 1) Nahi........ ......... ??? 2) Chiiiii..... Kitne gande vichar hain tumhare..... .. 3) Maine tumhe sirf ek acche dost ki nazar se dekha hai .... 4) Mera pehle se ek boyfrnd hai.... 5) Main in baton pe vishwas nahi karti, apne padhai pe dhyaan lagao... 6) tum abhi tak mujhe jaante kahan ho ?Yeh shayad infatuation hai.... 7) Tumhara bank balance kitna hai…?? 8) Magar last year to Maine tumhe raakhi baandhi thi ..hai naa..bhaiyya. .?? 9) Mein abhi is relation ke liye mentally prepared nahi hoo.... 10) Mein apne dady se pooch ke tumhe kaal answer karu…?? 11) Itni is baat kehne ke liye itni der lagaa di?? 12) Ye donon ke dil me hai na, to phir kya kehna!! 13) Sorry 14) "……Apna chehra kabhi aayine me dekha hai….. L…………………………… " 15) "Main toh tumhe apna Bhai maanati hu" 16) "Yes .. I too like you … (but hope you don't cheat on me ) " … (Which we guys most oftenly do ) 17) Phele kyon nahi bataya AB tum late ho gaye .. 18) Tum agar pehle mile hote to sochti. 19) Tumhari himmat kaise hui mere baare mein aisa sochne ki… (probably followed by a slap) 20) Girl: mujhe sochna ka wakt do… Guy: kitna wakt???(with hope) Girl: saat janam 21) Mai ek shaadi shuda ladki hu ;-) 22) Mein tumhare chotte bhai se pyaar karti hoon… 23) Now that's a real tragedy…. Girl: Hee hee ……hee hee hee…..hee ….hee……hee…… Hee hee ……hee hee hee…..hee ….hee……hee…… 24) Boy: I love U! Gal: I don't think ABT all this before marriage. 25) Keep loving I don't care. 26) Tum mere liye kya kar sakte ho… 27) Kaun as number hai mera tumhare proposals ki history mein. Ha ha ha ha…. 28) tumhe is nazar se kabhi dekha nahi 29) tumhare barre mein kabhi aisa socha nahi 30) mummy se pooch kar bataungi 31) mere bhaiyya se baat kar lo , who hi tumhe samajhayenge 32) Knyo, Tina NE "No" bola? 33) Lekin tum to Mina ke piche pade the, Kya usne thappad mara? 34) Kitne time ke liye -??? 35) Worst one-- Jo bhi bolna hai jaldi bolo mera beta school se aata hoga.. 36) Thanks. I love you, too. 37) Boy :- Sonya, I love U….. Gal :- Sorry , Next 3 Months tak Waiting List chal rahi hai…. 38) "What?" 39) "Let's just stay away from this" 40) My friend in college got one classic reply … "I THINK I'M ENGAGED" 41) "I think, I will have better options in future ..." 42)Mujhe tumse is baare mein koi baat nahi karni, then she starts ignoring, phir bhi nahi sudhare then she threatens via some common friends. 43) My Boy friend is very short Tempered. Beware of it. 44) like you as a friend but I never thought about us like this…cant we be just good friends for ever 45) Actually my younger sis likes you a lot. .. 46) My mummy does not like your family (if the family knows each other.) .. 47) "Why me?..Tumne mere meih essa kya dekha?..."she wants you to list down all the Good qualities that you even might have not seen in her. ... 48) SLAP !! ACTIONS SPEAK LOUDER THAN WORDS....it is said .. 49)hehe I didn't expect that from you.... 50)nice joke ... 51)tum ladke kuchh or nahi soch sakte jaha ladki dekhi fisal gaye..... 52)achha tum bhi meine socha sirf harsh,nikhil, ravi, etc etc ko hi mujhme interest hai ..... And then walks on.......... ... 53)tumhe to purpose karna bhi nahi aata.... Peheli bari hai kya?? Koi baat nahi mein batati Hun ???...
|
Preetib
| |
| Friday, December 14, 2007 - 9:22 pm: |
| 
|
Every situation might be different. Sometimes Trish we just get involved with other person and we thought we really know that person. But some aspects, some thoughts about him/her we don't know. When people say NO, its difficult for them to give the reason rather I would say a Logical Reason. Sometimes we are not in a situation to accept the reason, or our mind doesn't accept it. Thats why we go through pain and we asked ourselves why it happens to us. I think it happens to everybody. Time is solution as everyone says.It just reduces the intensity of pain but somewhere down the pain remains as it is.
|
Tiu
| |
| Friday, December 14, 2007 - 9:49 pm: |
| 
|
त्रिश, आवडलं... छान लिहिलंय वगैरे प्रतिसाद देणार नाही. पण तुझं दुख्: आत कुठेतरी पोहोचलं! :-(
|
एकटा,आमच्या जुनिअर मुलीने एका मुलाला अगदी मुंबईया उत्तर दिले होते. त्या मुलिच्या मागे ३ मुलं होती. एकाने तिला propose केल तर ती म्हणाली 'तुला जर आत्ता उत्तर हवय तर उत्तर आहे 'नाही',पण काही महिन्यांनी हवय तर सांगता येत नाही'. म्हणजे त्याला धड नाही पण म्हटल नाही आणि होय पण म्हटल नाही नुसतच लटकत ठेवल. बिच्चारा दिड वर्ष झुरत होता.
|
Manuswini
| |
| Saturday, December 15, 2007 - 6:39 am: |
| 
|
नकार देणे नक्कीच कठीण असते असे मला वाटते, जसे प्रीतीने लिहिले आहे, logically बघितले तर असे काही होत असते, नकार देणारा सुद्धा बराच विचार करून ही step घेतो त्यामुळे तो सुद्धा सर्वात आधीच ह्या दोलानमाय त्रासातून जातो. आणि जेव्हा निर्णय होतो त्याचा तेव्हा त्याची एक प्रकारे तयारी झालेली असते नी मनाने ही accept केलेला असतो हा change , शेवटी काय असते its all in mind च असते. आपण एखादी गोष्ट Accept करतो तेव्हाच गोष्टी सहजपणे स्वीकरल्या जातात.( acceptance theory ). मग तो त्यामानाने थंडच असणार(किंवा समोरच्याला वाटणार ना) ना जेव्हा निर्णय declare करणार दुसर्याला. दुसरा माणुस हा तोपर्यंत एका वेगळ्याच विश्वात असतो किंवा जरासा बेसावध असतो / र्अहातो. कुठलीही गोष्ट साधी पडताळून घेण्याच्या बाहेर 'स्वतहून' गेलेला असतो किंवा झालेले असते मग ते प्रेम असो वा ज्या गोष्टीत भावना गुंतल्या असतात. मग त्याची तयारी नसतेच नी अंदाज ही नसतो की काय possible घडू शकते. मग जेव्हा मनाला रुचेल असे एकु येत नाही तेव्हा हा एक 'आकस्मीक' धक्का बसतो वा वाटतो त्याला. उगीच त्याला समोरच्याने फसणवूक केली असे वाटते(इथे 'जाणून बूजून केलीली फसवणूक नाही अपेक्षीत). logical mind तर कधीच सोडून गेलेले असते. फक्त आपल्याला हवे ते झाले नाही हीच जिद्द असते. आणि थोडासा किंचीत 'अहंकार' दुखवलेला गेला असतो(जो आधी Accept केला जात नाही की आपला अंहकार दुखवला गेला म्हणून आपण चिडलो). पण थोड्य्श्या काळाने सारासार विचार केला तर बर्याचश्या गोष्टी कळतात. बर्याचदा 'योग्य' च वाटतात. तेव्हा त्रीश, बघा तुम्हाला काय पटतेय ते. मी आपले सहज माझ्या मनाला वाटले ते मत लीहिले. बाकी काही काही मुले 'गळेपडूपणा' पण उगाच करतात, ते म्हणतात ना मुलगी जरा हसली तर लागले 'बाजीराव' समजायला की प्रेमात आहे माझ्या.(दिवे घ्या तिकडच्या बाजूने)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|