|
Farend
| |
| Thursday, December 13, 2007 - 4:16 am: |
| 
|
यूट्यूब वर हे बघितल्यावर हा चित्रपट आता पाहायलाच हवा असे वाटले पाहिला नाही अजून, पण डॉन वरून काढलेला हा रजनी कांत चा १९८० चा तमिळ 'बिल्ला', ज्यावरून त्या अजित नावाच्या नटाचा रिमेक येतोय. म्हणजे मूळ अमिताभ चा डॉन (याची ही कथा थोडीफार आधीच्या 'कालिचरण' सारखी होती, फक्त तेथे बहुतेक शत्रुघ्न सिन्हा पोलीस असतो), त्याचा शाहरुख चा रिमेक हिन्दीत. तमिळ मधे रजनी ने केलेली व्हर्जन आणि आता त्याचा तमिळमधे च येणारा रिमेक. आता तमिळ चित्रपटांचे हिन्दीत रिमेक करणार्यांनी नीट न बघता याचा पुन्हा हिन्दी रिमेक केला तर काय मजा येईल ना? तर या रजनीच्या 'बिल्ला'तील काही गाणी सापडली आणि ती पाहताना प्रत्येक ठिकाणी डॉन सारखेच केलेले शॉट्स आहेत. 'मै हू डॉन' च्या जागी हे पाहा एस पी बालसुब्रह्मण्यम च्या आवाजातील My name is Billa ! यातील ते जास्त रागाने (किंवा रेकून) म्हंटलेले तेच वाक्य ऐकूनच अर्धे स्मग्लर्स पळाले असतील एकूण बिल्ला ला काहीतरी यल्ला वगैरे यमक जुळवून गाणे बसवले आहे. तोच पांढरे चौकटीचे डिझाइन असलेला काळा जाकीट सारखा बिन बाह्यांचा शर्ट, आधीचा वाघाचा मुखवटा, शॉट्स तसेच साधारण असले तरी नाचाची स्टाईल बहुधा रजनीसाठी बदलली, मधे एकदा तो पोरींबरोबर झिम्मा ही खेळतोय असे वाटते. प्रेक्षकात तो अरबही आहे. नारंग च्या जागी एक कोणीतरी विग लावलेला सत्तरीच्या दशकातील 'साउथ' चित्रपटांमधे जसे मेकप असलेले अभिनेते असत त्यापैकी वाटतो. एक टाईट टी-शर्ट पहिलवान पण आहे. तसेच ती तोंड बंद केलेली डॉन ची गर्लफ्रेंड आहे. यातील हीरॉइन चा नाच मात्र अफाट आहे. आणि हे गाणे डॉन च्या एखाद्या पार्टीच्या ठिकाणी न होता ६०च्या दशकातील एखाद्या रावबहाद्दूराच्या उंची हवेली मधे होते असे वाटते. हे तमिळ 'जिसका मुझे था इंतज़ार'. येथे मात्र ती हीरॉइन झीनत चे लुक्स देणारी त्यावेळची शबाना आज़मी वाटते (पाहा: 'परवरिश'). मूळ गाण्यातील ती निळा ड्रेस बोटांत पकडण्याची स्टाईल तशीच. कोठे त्या डॉन मधील गाण्यातील अमिताभ च्या dignified actions आणि कोठे येथे रजनी आणि त्या बयेचा नव्याने लॉन्च केलेल्या स्टार पुत्र आणि कन्येला गाण्यात जसे प्रत्येक सेकंदाला काहीतरी स्टेप देतातच तसा नाच! त्याप्रमणे ह्या 'इ है बंबई नगरिया' ची (बहुधा चेन्नई नगरिया झालेली) यात ही पहिल्या दोन मिनिटात ती एक बया कोठून उगवते कळत नाही! आता 'छोरा कावेरी किनारे वाला' कोठे दिसतो शोधतोय!
|
Chandya
| |
| Thursday, December 13, 2007 - 3:17 pm: |
| 
|
अमोल, ह्या चित्रपटाने रजनीला सुपरस्टार केले. अमिताभचे अनेक चित्रपट (दिवार, लावारिस) तमिळमध्ये रिमेक झालेत आणि त्यात रजनी होता.
|
Itgirl
| |
| Thursday, December 13, 2007 - 3:45 pm: |
| 
|
...यातील ते जास्त रागाने (किंवा रेकून) म्हंटलेले तेच वाक्य ऐकूनच अर्धे स्मग्लर्स पळाले असतील....
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|