|
Sheshhnag
| |
| Monday, December 10, 2007 - 10:43 am: |
| 
|
आमच्या शाळेला जाण्यासाठी बसभाडे २ पैसे होते, पण तेवढेही देणे परवडत नव्हते.
|
Dakshina
| |
| Monday, December 10, 2007 - 11:40 am: |
| 
|
कंपास पेटी ही माझ्या मते तेव्हाची सगळ्यात महागडी वस्तू होती. कंपास पेटीची तेव्हाची किंमत होती रुपये २१ /-
|
Amruta
| |
| Monday, December 10, 2007 - 3:10 pm: |
| 
|
शाळेच्या कंटीनमधे ५० पैशांना वडापाव मिळायचा. मग किंमत हळु हळु वाढत गेलेली पण पाहिली आणि नक्की आठवत नाही पण दहावीत असताना मला वाट्ट १रु. किंमत झाली होती. कंपास पेटी मला पण आठवत्ये २१रु
|
Maanus
| |
| Tuesday, December 11, 2007 - 3:47 am: |
| 
|
We all love it...

|
Hkumar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 4:44 am: |
| 
|
बसची तिकीटे ५ पैशापासून सुरू होत. एका stage नंतर १० पैसे तिकीट असे. आम्ही त्या stop च्या १ stop आधी उतरून ५ पैसे वाचवत असू!
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:37 am: |
| 
|
५ पैसे , ओह मी किती साठ्वायाचो ! अणि जमले की रोज मस्त श्रीखंड च्या गोल्या खयाचो...किती छान लगायाच्या त्या, अजुन ही अवडातात, पण त्या वेळिची मजा औरच!
|
Nkashi
| |
| Tuesday, December 11, 2007 - 11:35 am: |
| 
|
आमच्या शाळेत ५ पैशाला दुधाच्या गोळ्या मिळायच्या... एकदम मस्त चव असायची. आणि अजुन एक प्रकार होता गोळ्यांचा, लाल रंगाच्या आतमध्ये बहुदा शेंगदाणा असायचा. आम्ही त्या जिभेने ओल्या करुन मग ओठावरुन फ़िरवायचो (लिपस्टिक म्हणुन), हा उद्योग करताना एकदा आईकडुन धपाटा पण खाल्ला आहे...
|
Sheshhnag
| |
| Tuesday, December 11, 2007 - 1:19 pm: |
| 
|
श्रीखंडाच्या गोळ्या ही स्पेशल डिश होती. शाळेतली. कंपासपेटी मला आठवतेय ती ७ रुपयापासून.
|
Zakki
| |
| Tuesday, December 11, 2007 - 1:28 pm: |
| 
|
आमच्या वेळी, दादरला प्लाझा (आता ते थेटर गेले) समोर तृप्ति नावाचे रेस्टॉरंट होते. तिथे रवीवारी सकाळी १ रु. तीस पैशाला जेवण मिळायचे. जर आंबरस, किंवा श्रीखंड किंवा गोड पदार्थ हवा असेल तर ३० पैसे अधिक.
|
मी शळेत कधी पैसे न्यायची नाही पण मुली सुट्ट्टीत खुप खाउ घ्यायच्या तेव्हा मी ही हेव्याने एकदा २० पैसे घेउन गेली पण ते मधली सुट्टी व्हायच्या आतच हरवले. इतकी रडले होते माझ्या हिशोबाच्या वहीत लिहुन ठेवले हे पैसे हरवले ते मी पुढे कमवेल वैगैरे.. तीसरीत होते तेव्हा..
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:06 pm: |
| 
|
माझ्या गावी (परभणी) आणि आजोळी (नांदेड), आंबा १७ च्या पटीत घेत असत... भाव आठवत नाहीत पण तो आंबेवाला एक्क हो, दोन्न हो, तीन्न हो असं म्हणत १७ आंबे मोजायचा... भर दुपारी आम्ही (आजोबा अन् पोरं) आंबे घ्यायला जात असू. माझे आजोबा तीन चार १७ आंबे (४ x १७) घ्यायचे... आंबे आणल्यावर ते धुण्याचं काम माझं.. मग मामा ते धुतलेले आंबे घेऊन रस करायचा.. दुपारच्या जेवणात पानात मीठ, पोळी अन् रस एवढेच पदार्थ असायचे.. अंबेजोगाईला आजी कडे जायचो तर तिथे रस बिस प्रकार नाही.. सरळ आतल्या खोलीत जायचे (ही खोली गरम असायची. फार उकडायचं या खोलीत).. तिथले आंबे एका मोठ्या भांड्यात घ्यायचे, एक पेपर घ्यायचा अन् लादनीत जाऊन आंबे खायचे.. कोयी, साली पेपरावर जमा करायच्या अन् तिथेच ताणून द्यायची..(ही लादनी म्हणजे छोटं तळघर असतं. उन्हाळ्यात दुपारी इथे रग घेऊन झोपावं लागायचं.. इतकी ती थंड असायची. थोडा इतिहास्: हैद्राबादच्या निजामाने हिंदूंवर खूप जुलूम केले. रजाकार चळवळ त्यातलीच एक. या चळवळीत निजामाची माणसे हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर करत असत. निजामाची माणसे आली की बायका मुले या लादनीत जाऊन बसत. त्यामुळे अंबेजोगाईतल्या बहुतेक जुन्या वाड्यात या लादन्या अजूनही आहेत). मराठवाड्यावर निजामाचं राज्य असल्यामुळे उर्दू भाषेचा खूप वापर व्हायचा... त्यामुळे सगळ्यांवर या भाषेचा पगडा होता... माझ्या लहानपणी मी म्हातार्या व्यक्तींकडून "टप्पा आला का - टपाल आलं का?", "शाळेत / दवाखान्यात शरीक झाला - शाळेत प्रवेश घेतला किंवा दवाखान्यात भरती झाला." "बाराला ("बहरहाल"चा अपभ्रंश) आम्ही तिथे पोचलो" अशी अनेक वाक्ये ऐकली आहेत...
|
Ajjuka
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:07 pm: |
| 
|
माझ्या काळात (४थी ५वीमधे) कंपासपेटी १२ रूपये. मी १० वीत पोचेपर्यंत २५ झाले. आमच्या शाळेत चिक्की मिळायची मस्त. ५ पैशाला बोटभर (आख्खं बोट साधारण ५*१ सेंतीमीटर) वडी यायची. त्याची चव अजूनही आहे तोंडात. ती चिक्की अजूनही मिळते पण आता तो बोटभर तुकडा बहुतेक २ रूपयाला मिळतो.
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:18 pm: |
| 
|
कंपासपेटी, आम्ही हिची कीमत रुपयात न मोजता ती किती छान, किती चांगले कर्कटक, अणि किती जाड प्लास्टिक ची पट्टी अणि कपास असल त्या वर ठारवयाचो, मंजे मानायाचो. अणि गमत मंजे कन्पसपेती त देवाचे , किवा हीरो, विमाने, गाड्या असे फोटो अणि स्तिकरस लावयाचो ! अणि त्या मधे डबल खनाची पेटी असली तर अजुनच छान !
|
Zakki
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:25 pm: |
| 
|
आम्ही इंजिनियरिंगला Steadler कं नी ची " Tool Box " वापरायचो. त्याची किंमत जवळपास १५० रु. असायची. इंजिनियरिंगला गेल्यावर कंपास काय म्हणायचे? एव्हडी महागडी पेटी कशाला घ्या. GT मारून तर ड्रॉईंग काढणार!!
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:41 pm: |
| 
|
मी शाळेत असतानाच टेक्नीकल (शासकीय तांत्रिक विद्यालय) मधे जात असे व्होकाशनल ट्रेनिंग साठी तिथे ड्रॉईंग शिकताना खुप मज्जा यायची मज़ा तसा तो अवड़ता विषय अणि आमचे शिक्षक तर खूपच कड़क होते, ०.५ पॉइंट ची पेंसिल ड्रॉईंग अणि जी टी ड्रॉईंग लगेच पकड़ायाचे. तिथे आम्ही ओमेगा चे सेट स्वऐर वापरायचो, पण ते महाग होते त्या मुले कोणी तरी धापत असे !
|
Itgirl
| |
| Tuesday, December 11, 2007 - 3:09 pm: |
| 
|
माणसा, फोटो आवडले, मस्तच आहेत, विषेशत: पहिला
|
झक्की, तुम्ही इंजीनीअरींगला असताना १५० रुपयाचा सेट म्हणजे लैच महाग झाले.
|
Zakki
| |
| Tuesday, December 11, 2007 - 9:05 pm: |
| 
|
अस्सल जर्मन बनावटीचा स्टेनलेस स्टीलचा सेट होता तो. इतका छान की ज्यांना येत नाही त्यांनासुद्धा ड्रॉईंग काढता येईल, म्हणे.
|
झक्की तुमच्या वेळेला पण जी.टीच मारायची का जनता? मला वाटायचे की जुन्या काळातले इंजीनीअर्स खरेखुरे इंजीनीअर्स आहेत. म्हणजे आमच्या पिढीतल्या बहुसंख्यांसारखे खुर्मी-गुप्ता, मागच्या काही वर्षांचे पेपर इत्यादी मसाल्यावर पास व्हायचे नाहीत तर अभ्यास करुन पास व्हायचे.
|
Sunidhee
| |
| Tuesday, December 11, 2007 - 11:27 pm: |
| 
|
कसं ना?? आपल्या सर्वांना, वयाने कितीही वाढलो तरी कॉलेजपेक्षा शालेय वयातील आठवणीच जास्त जवळच्या वाटतात. झक्कि तुमच्या सुरुवातीलाच लिहिलेल्या २ आठवणी आवडल्या. माणसा तुला छान छान चित्रं बरी सापडतात रे नेहमी?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|