Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through December 11, 2007 « Previous Next »

Manjud
Wednesday, September 05, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यामारी!!!! नंदिनी, तू असल्या गोष्टीनी दुखावतेस??? अगं तुझ्या फिल्डमध्ये अश्या गोष्टी किती common आहेत. यावर सोपा उपाय म्हणजे credit लाटणार्‍याला योग्य वेळी चार लोकांसमोर उघडं पाडायचं. असा प्रश्न विचारून कॉर्नर करायचं की ज्याचे in depth details फक्त तुम्हालाच माहीत आहेत. आपोआप त्याचं पितळ उघडं पडेल. आणि दाखवायचं असं कि तुम्ही gr8 . तुम्ही नसता तर हे project झालं नसतं वगैरे.......

आणि प्रमोशन वगैरेचं म्हणशील करणारा कोण तुझाच बॉस ना? त्याला तर माहित्ये कोणी काय केलंय ते...... कायम हातात एक पेपर तयार ठेवायचा राजीनाम्याचा


Farend
Thursday, September 06, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, बघ या माहितीचा काही उपयोग होतो का...

हे वाचून असे वाटले की तुमचे या प्रोजेक्ट मधले यश बॉस ला (व इतर महत्त्वाच्या लोकांना) कळण्यासाठी हे प्रेझेंटेशन हा एकच मार्ग होता. खरे म्हणजे प्रेझेंटेशन हे फक्त काम कसे झाले आहे ते बघण्यासाठी असले पाहिजे, कोणी काय केले ते आधीच सर्वांना माहीत पाहिजे आणि ते तसे व्हावे यासाठी काही गोष्टी तुम्ही पुढच्या वेळी करू शकता. commercial/professional कंपन्यांमधे होणारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि creative कंपन्यांत कसे चालते यात नक्कीच फरक असेल आणि हे सर्व तिकडे लागू पडेल असे नाही, पण १-२ गोष्टींचा जरी उपयोग झाला तरी पुन्हा असे होणे तुम्हाला टाळता येईल म्हणून हे...

असे समजू की पुन्हा तुम्ही दोघी असा ५-६ आठवड्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट करत असाल...

ईमेल हे तुमच्याकडे एकमेकांना ऑफिशिअल मेसेज पाठवण्याचे साधन आहे असे समजून हे लिहिले आहे, इतर काही वापरत असतील तर ते धरावे.

आधी प्रोजेक्ट ओनर कोण आहे हे सर्वांना कळवणे. हे काम शक्या तितक्या 'वरच्या' लेव्हलचा बॉस करेल असे बघावे. एक मेल सर्वांना पाठवून, आणि त्याच मेल मधे या प्रोजेक्ट मधे कोण काय रोल करणार आहे ते स्पष्ट लिहून ज्या इतर टीम्स काम करणार असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते ही त्यात असावे (हे एवढ्या formally होणे सर्वात उत्तम पण कंपन्यांच्या कल्चर प्रमाणे तुमचे नेहमीचे वापरातील शब्द वापरून informally झाले तरी चालेल). जर कोणाला ते मान्य नसेल तर आधीच ती सर्व चर्चा होते. आणि मुख्य म्हणजे हे high level ला होते. आता हेच उदाहरण घेतले तर त्या लोकांना हे सर्व स्वत:च करायचे असेल तर आधीच स्वत:चा रोल ते सांगू शकतात. आणि नाही सांगितले तरी पुढे काही गोष्टी अशा करता येतात की त्यांनी या वेळेस केले तसे सहजपणे होत नाही.

एकदा रोल नक्की झाले की मग ठरावीक दिवसांनी (आठवडा) तुमच्यापैकी या प्रोजेक्ट शी संबंधित सर्वांना त्याची प्रगती सांगणारा रिपोर्ट ( status report ) पाठवायचा. हा रिपोर्ट तुमच्याकडून जाऊ लागला की आपोआपच त्याबद्दल चे सर्व प्रश्न तुमच्याकडेच येतात. कंपनीत हा प्रोजेक्ट कोणाला महत्त्वाचा आहे ( stakeholder ) आणि त्याला ही प्रगती कोण सांगतो तुमचा बॉस की त्या लोकांचा बॉस यावर बरेच अवलंबून असते. त्यांचा बॉस सांगत असेल तर हा त्यांचा प्रोजेक्ट आहे हे लक्षात ठेऊन तशाच अपेक्षा ठेवा.

या प्रोजेक्ट मधे त्या दोघांचा नक्की रोल काय होता ते नक्की कळले नाही, पण तुम्ही दोघींनी जे काम केले तेच जर हे दोघे इतर प्रोजेक्ट साठी करत असतील तर असे क्रेडिट लाटणे सहज शक्य होते, पण कोणाचे नक्की काय काम आहे या प्रोजेक्ट मधे ते आधीच जाहीर झाले तर नंतर अशी गडबड होत नाही. आणि जर ते लोक असे काम करतच नसतील तर आम्ही असे केले असे त्यांनी सांगितले तरी आधीच्या रिपोर्ट्स वरून कोण काय काम करत होते ते लोकांना कळत असते.

या प्रेझेंटेशन ला तुमचा बॉस का नव्हता? तो नसेल आणि इतर कोणताही सपोर्ट नसेल तर तोपर्यंत असे प्रेझेंटेशन होऊ न देणे तुमच्या हातात आहे का? असल्यास तसेच करणे चांगले. कारण सर्व चर्चा ( review of your work, discussion, conclusion ) वगैरे stakeholders समोरच झाली पाहिजे. तसे आधी झाले असेल तर तुमच्या बॉस ला माहीत असेल कोणी काय केले आणि मग एक दोघांच्या अशा क्रेडिट लाटण्याने फारसा फरक पडणार नाही.

म्हणजे समजा एखाद्या नवीन दिग्दर्शकाने एक चित्रपट काढला. तो प्रदर्शित व्हायच्या आधी पत्रकरांना मुलाखती वगैरे दिल्या. चित्रपटाच्या नामावली दिग्दर्शक म्हणून त्याचे नाव आले. हे सर्व असेल तर प्रिमियर ला एखादा एक्स्ट्रॉ कलाकार उठून बघा मी किती चांगला बनवलाय पिक्चर असे म्हणाला तरी फरक पडणार नाही तसे :-)

मी सुद्धा पूर्वी असे (या क्षेत्रात नाही, माझ्या क्षेत्रात) काही अनुभव घेतले होते की आपण दिवस रात्र काम करतो आणि इतर अनेक लोक असे असतात की ऑफिस ची वेळ संपल्यावर एक मिनीटही थांबत नाहीत, आणि त्या वेळेतही काही आपल्यापेक्षा फार smart काम करतात असे काही नाही, आणि तरीही 'कंपनी' दोघात फार फरक करत नाही जेव्हा rewards ची वेळ येते तेव्हा, एरव्ही बोलताना बरेच काही बोलतात. पण मग हळुहळू बर्‍याच गोष्टी लक्षात आल्या.


Yashwant
Thursday, September 06, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पन गेलोय यातुन. दुबई ला असतान्ना. शेवटी हा त्रास सहन न होवुन व्हेकेशन ला आल्यावर राजीनामा पाठवला. सरळ जॉब सोडुन आलो तर पासपोर्ट वर बॅन चा शिक्का मारतात. सहजा सहजी जावुन देत नाहीत. पन त्यावेळी जी एम नी परत बोलवुन घेवुन नवीन प्रोजेक्ट वर बदली केली. कालान्तराने प्रोमो आणि पगारवाढ दोन्ही मिळाले. जी एम नन्तर पर्सनली ओळखायला लागले. हा प्रॉब्लेम माहीत असल्यामुळे इथे लीड असतान्ना चान्गले लक्श्य ठेवुन ज्याचे त्याला योग्य क्रेडिट द्यायचो आणि कोन्ग्रॅट्स ची मेल २ लेवल अप पर्यन्त cc करायचो. सगळे खुश रहायचे.

Nandini2911
Friday, September 07, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड... खूप धन्यवाद. खरंच तुमच्या माहेतीचा मला खूप उपयोग होईल. :-) तशात हे प्रेझेंटेशन आमच्या चेअरमनकडे होणार आहे. तेव्हा तरी आम्हाला "आमचे" श्रेय मिळायलाच हवे. कारण काल जेव्हा माझ्या बॉसचा बॉस मला म्हणाला की "ये होता है एक अच्छा काम" आणि त्याने देवांशुची पाठ थोपटली... तेव्हा मी बोलून गेले "हा.. यही होता है अच्छा काम, तीन रात एडिटिंग स्टुडिओ मे जागे हम, घरवालो की गालिया सुने हम और शाबासी मिले देवांशुको. जरा पूछना उसको.. कौनसा शॉट कहापे किसने लगाया है. "
अख्खी मीटींग अवाक झाली. (माझ्या बॉसने मला नंतर शाबासकी दिली).
पण यापुढे अशी वेळ येऊ नये म्हणून आधीपासुनच तयारे करणार आहे. (आताही ही घ्या तुमची फ़िल्म आणि पुढचं तुमचं तुम्हीच बघा हेही सांगितलय, :-))

सध्या आर या पार ही अवस्था असल्याने जो होगा सो देखा जायेगा. हे Corporate world असंच असतं. असं तर नहुतेकानी सांगितलं. पण मायबोलीकरानी मात्र हाकलून दे पासून राजिनामा दे पर्यंतचे सल्ले दिले. त्याबद्दल धन्यवाद.
अज्जुका आणि फ़ारेंडचे सल्ले तर सोनलला पण वाचायला दिले. आणि पुढच्या वेळी काय करायचे तेही ठरवतोय.


Alpana
Friday, September 07, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे नेहेमीचेच आहे... अश्या गोष्टी कार्पोरेट मध्येच नाही तर बाकीच्या फिल्ड मध्ये पण घडतात, पण अशावेळी फारेंडच्या सल्ल्याप्रमाणे वागुन खुप उपयोग होतो... बर्‍याच ठेचा खाउन आता मला पण अक्कल आली.

आमच्याकडे तर चक्क बॉसच श्रेय लाटते...सद्ध्या थोडी कामात आहे, थोड्यावेळानी टाकेन तो किस्सा


Yog
Saturday, September 08, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ma be thats why Harry Truman said:
It is amazing what you can accomplish if you do not care who gets the credit.
(key for a successful teamwork.)

Dakshina
Wednesday, November 14, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण माझा एक अनुभव लिहायचा आहे, पण माहीती नाही हा योग्य BB आहे की नाही ते, तरीही इथे लिहीते आहे. नेमस्तकांनी गरज भासल्यास तो योग्य ठिकाणी हलवावा..

रविवारी सकाळपासून माझं डोकं खूप दुखत होत, दुपारी जेवल्यावर मी गोळी घेतली आणि थोडावेळ झोपले, पण तरीही डोकं दुखायचं न थांबता, जास्तीच दुखायला लागलं. मी कसंतरी सहन केलं पण रात्री ११ वाजता अगदीच सहन होईना. एरव्ही जर मला acute headache झाला तर मला माझी रूममेटच इंजेक्शन देते कारण ती डॉक्टर आहे. पण ती नेमकी दिवाळीला घरी गेलेली. म्हणून मी धडपडत उठून जवळच्या (So called ) मोठ्या हॉस्पिटल मधे गेले.
रात्री ११ वाजता अर्थातच शिकाऊ डॉक्टर होता. इथे माझं डोकं ठणठाण बडवत होतं आणि तो मला मझया डोकेदुखिशी संबंध नसलेले प्रश्नं विचारत होता. इतकं करून त्याने मला ढिगभर गोळ्या लिहून देऊन एक priscription माझ्या हातात टिकवले आणि सांगितले, या गोळ्या घ्या.... मी चक्रावलेच. मग म्हणलं आता जी मी डोकेदुखी घेऊन आलेय त्याचं काय करू? मग तो काहीच बोलला नाही. वर मलाच विचारलं की Injection देऊ का? मी म्हणलं हो, Obiviously !

इंजेक्शन घेऊन घरी आले, रात्रीचे १२ वाजले, तरीही माझी डोकेदुखी काही थांबेना. विचार करून करून रडायलाच यायला लागलं. कारण त्या डॉक्टरने जेव्हा सिरिंज भरून आणलेली तेव्हा ती अशी लपवल्यासारखी धरलेली, आणि मग आठवलं की त्याने इंजेक्शन देताना सुई टोचल्याचं तर कळलं होत. पण ते इतक्या लवकर आटपलं होतं की शंकाच वाटावी. शिवाय सगळ्यात जास्त भिती वाटली ती हे आठवून की, त्याने नविन सिरिंज आणि सुई घेतली होती का हेच मी त्याला विचारलं नव्हतं..

शेवटी मला अगदी राहवलं नाही म्हणून मी रात्री २.२० ला हॉस्पिटल मधे फोन केला, मला सांगण्यात आलं की त्या डॉक्टरची ड्युटी संपलेली आहे. मला खूप मनःस्ताप झाला, आणि चिडचिड पण.
एकतर स्वतच्या मूर्खपणावर आणि ते भलंमोठं हॉस्पिटल चालवणार्‍या डॉक्टरवर पण.

माझ्या चूका :
* मी त्या शिकाऊ ला उगिच entertain केले.
* नविन सिरिंज आणि सुई घेतली का ते विचारलं नाही.
* सिरिंज घेऊन आल्यावर कोणतं painkiller देतोय ते ही विचारलं नाही.
* शिवाय न थंबणार्‍या डोकेदुखीसाठी आणि वेगळ्या विकत घेतलेल्या मनस्तापासाठी १०० रुपये फ़ी दिली ती निराळीच.

दुसर्‍या दिवशी मैत्रिणिने सांगितलं की शिकाऊ लोक पेन किलर चे इंजेक्शन द्यायल घाबरतात. त्यामूळे सोप्पं पडतं त्यामूळे चक्कं गंडवून vitamin चं देतात. मी पण अशाच गोष्टीला बळी पडले आणि इतका त्रास भोगला.

खरंतर मोठ्या हॉस्पिटल्मध्ये अशा गोष्टींची खूप काळज़ी घेतली पाहिजे, कारण हॉस्पिटलच्या रेप्युटेशनची शिकाऊ डॉक्टरना कितपत फ़िकिर असेल?

तुमचं मत जरूर सांगा.


Ajjuka
Thursday, November 22, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेली मार्केटींग नावाच्या घाणेरड्या आणि निर्दय प्रकाराबद्दल

पुण्यात घरी फोन आला ७-८ नोव्हेंबर ला.
आई गेली ४ तारखेला.

- May I speak to Mrs Madhavi Patwardhan?
- no. not possible
- when is the good time to call?
- none. she is no more.
- can i get her mobile number please?
- what? I just told you that she is no more meaning she passed away. 3 days ago.
- oh sorry! may I know who am I talking to?
- I am her daughter
- oh then its ok! I can tell you about our health insurence plan!

यानंतर तोंडात फक्त शिव्याच येऊ शकत होत्या. त्यातल्या त्यात सभ्य शिव्या दिल्या तिला आणि फोन बंद केला.
दुर्दैवाने कुठली कंपनी ते काही कळलं नाही नाहीतर तक्रार केली असती.

ह्या tele marketers ना स्वतःला काही family वगैरे नसते का? इतकंही तारतम्य नाही की घरातलं माणूस जाऊन ३ दिवस जेमतेम झालेत आणि तर असं काही करू नये!
ठिके त्यांचं काम असतं, म्हणून फोने केलात पण कळलंय ना आता तरी आपलं घोडं पुढे दामटत रहायचं?


Prajaktad
Thursday, November 22, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका! तुझा अनुभव वाचुन वाईट वाटल आणी संताप ही आला..

Prajaktad
Thursday, November 22, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा!झाला प्रकार वैताग आणणाराच झाला,,तरी हे सगळ तुझ्या नेहमिच्या डॉक्टरला सांगितले का?त्यांचे काय म्हणणे पडले यावर?..

Dineshvs
Friday, November 23, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, त्या लोकाना टार्गेटचे खुपच प्रेशर असते शिवाय वय लहान असल्याने समजही कमी असते. त्यांच्यापेक्षा त्यांच्या टीम लीडरला हे समजायला हवे.

दक्षिणा, हा प्रकार अत्यंत धोकादायक होता. डोके दुखायला सुरवात झाल्यावरच, ताबडतोब उपाय करायला हवे होते. नेहमीच्या सवयीच्या इंजेक्शनचे नाव लक्षात ठेवायचे वा लिहुन घ्यायचे. ते जर फ़्रीजबाहेर टिकण्यासारखे असेल तर जवळच ठेवायचे आणि एखादी डिस्पोजेबल सिरिंजही जवळ ठेवायची.
शक्यतो डॉक्टरचे त्या इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन जवळ ठेवायचे. म्हणजे कुठल्याही डॉक्टरला ते द्यायची विनंति करता येते. या सर्व गोष्टी अगदी सहज पर्समधे मावण्यासारख्या आहेत.
भूक नसावी पण शिदोरी असावी. हो ना ?


Manjud
Friday, November 23, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, माझा अनुभव :

५ - ६ वर्षापुर्वी आईचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं ठरलं. हॉस्पिटल दोन बिल्डिंग सोडून, त्यामूळे आदल्या दिवशी ऍडमिट व्हा वगैरे भानगड न करता ऑपरेशनच्या दिवशी सकाळीच आई ऍडमिट झाली. ऍडमिट करतानाचे सगळे सोपस्कार, म्हणजे मुख्यत्वे BP चेक करणे, टेम्पेरेचर तपासणे वगैरे एका OnDuty RMO , लक्षात घ्या, RMO ने केले. दोन तासानी ऑपरेशन होतं. आईला हाय BP चा त्रास आहे. पण तिची दोन सिझेरियन्स झाली असल्यामूळे ति ऑपरेशनसाठी बरीच कूल होती. हॉस्पिटलची सदस्य, त्यातून डॉक्टर घरगूती जिव्हाळ्याचे ह्या सगळ्यामूळे तिची मन:स्थिती एकदम छान होती. ऑपरेशन थिएअटरमधे आपल्या पायानी चालत गेली. अनेस्थेटीस्टशी छान गप्पा मारत होती. पण १५ मिनीटातच डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले ऑपरेशन नाही होऊ शकणार. काकुंचं BP भयंकर वाढलय. एकदम २२० - १८० झालय. आम्ही तीन instruments बदलून चेक केलं. अनेस्थेटीस्टने पण नकार दिलाय. आत्ता ऑपरेट केलं तर रक्ताच्या अक्षरश: चिळकांड्या ऊडतील. आपण ऑपरेशन कॅन्सल करूया. आम्ही म्हटलं, तुम्ही म्हणाल तसं.
पण आम्ही जरा चक्रावलोच. तिला ऍडमिट केलं तेव्हा तिचं BP एकदम नॉर्मल होतं. कितीही टेन्शन आलं तरी दोन तासात एवढं शूट होणं शक्यच नाही. डॉ. नी धावाधाव करून लगेच ऍडमिशन रीपोर्ट्स मागवले. त्यात तिचं BP एकदम नॉर्मल दाखवलं होतं. मग त्यानी ते BP instrumenT मागवलं. तर चक्क त्यात फॉल्ट निघाला. आमच्याकडून रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि त्या RMO ला आणि Housekeeper ला ३ महिन्यासाठी सस्पेंड केलं.
ह्या प्रकाराचा आम्हाला खुपच मनस्ताप झाला. आईचं ऑपरेशन एका आठवड्यासाठी पुढे ढकललं. ओळखीचे लोक म्हणून इतक्या त्वरेने कारवाई झाली पण अशी ट्रीटमेंट सगळ्याच पेशंटना मिळेल का? ह्या प्र्श्नाने अस्वस्थता आली.


Ajjuka
Friday, November 23, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|अज्जुका, त्या लोकाना टार्गेटचे खुपच प्रेशर असते शिवाय वय लहान असल्याने समजही कमी असते. त्यांच्यापेक्षा त्यांच्या टीम लीडरला हे समजायला हवे.|

माफ करा पण यातलं कुठलंच कारण या प्रकाराचे समर्थन करण्यालायक नाहीये. ह्या मुलींना १० १२ वर्षाच्या वयाला नोकर्‍या नाही देत तिथे. निदान २० तरी असतीलच ना यांची वयं? मग त्या वयाला ज्याच्या घरात २ दिवसांपूर्वी मृत्यू झालाय त्यांच्याशी कसं बोलावं हेही कळत नाही? यात टीम लीडरचा काय संबंध? हे स्वतचं स्वतच कळायला हवं. आणि असेल प्रेशर.. मग? प्रत्येक कामातच प्रेशर असते. म्हणून काहीही बोलाल की काय?


Dineshvs
Friday, November 23, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर्थन नाहीच. पण अक्षरशः बारावी पास मुली असतात त्या. बर्‍यापैकी इंग्लिश आलं कि नोकरी मिळते. आणि त्यानाही फ़क्त पगाराचेच आकर्षण असते.
त्यांचा परफ़ॉर्मन्स मॉनिटर होत असतो. आवाज चढला किंवा राग आला तर त्यांचे पॉईंट्स कमी होतात आणि हे सगळे टीम लीडर बघत असतो.

त्यांच्या ट्रेनिंगमधे त्याना बोलावे कसे हे शिकवलेच जात नाही. फक्त मार्केटिंग करा एवढेच त्यांच्या डोक्यात भरवलेले असते.

अर्थात समर्थन नाहीच.


Dakshina
Thursday, November 29, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, नेहमीचा डॉक्टर म्हणजे माझी रूममेटंच, तिला पहाटेच सगळं सांगितलं. दुर्दैवाने ती घरात नव्हती, पूण्याकडे परतत होती. मी शेवटी औषधाचा डबा उघडून बसले आणि फोनवर तिला एकेक गोळीचे नाव सांग़त राहीले. योग्य गोळी आल्यावर तिने सांगितले की आत ही घे म्हणून.

दिनेश : डॉक्टर घरातच असल्याने माझ्याकडे सिरिंज, गोळ्या, पेन किलर हे सगळं अगदी कायम उपलब्ध असतंच. पण त्या दिवशी मी घरात एकटीच होते आणि माझी डोकेदुखी इतकी टोकाला पोचली होती की मला त्या सर्वं गोष्टी विचारण्याचं भानच राहीलं नाही. मला फ़क्त माझी डोकेदुखी ताबडतोब आटोक्यात आणायची होती. बास.... पण तुम्ही सांगितलेले पुढच्यावेळी नक्की लक्षात ठेविन.

मंजू : तुझा अनुभव ऐकून तर अंगावर शहारा आला. हे लोक हॉस्पिटल चालवतात की कत्तलखाना? Instrument मधे fault ? किती हा निष्काळजीपणा? एखाद्याच्या जीवाशी इतकं खेळतात? आणि त्यांना त्याची काडीमात्रं जाणिव नसते. मैत्रिण डॉक्टर असल्याने तिच्याकडून रोज नवनविन अनुभव ऐकायला मिळतात. नाईट शिफ़्टमधे काम करणारे डॉक्टर्स तर चक्क झोपतात आणि BP एक एक तासाने चेक केलय अस खोटाच रिपोर्ट पण लिहीतात. आणि day वाले खातात शिव्या..

मी ज्या हॉस्पिटलचा उल्लेख केलाय ते आमच्या एरियातलं फ़ेमस हॉस्पिटल आहे. त्यामूळे तिथे बरेच शिकाऊ doctors असतात. कधी पण जा, नविन चेहरा दिसेल. Seniour Doctor पेशंटला, अगदी झोपवलं की तपासायला येतात. अन्यथा बाकी सगळ्या सूचना juniors ना च. मग मागच्या वेळी कोणतं औषध दिलं होतं हे ही ते ज्युनियरलाच विचारणार. जरा सुद्धा पर्सनल अटेन्शन नाही.


Dakshina
Thursday, November 29, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुझा अनुभव वाचून पण खूप वाईट वाटलं ह्या टेलिमार्केटींग वाल्यांना खरंच दयामाया नावाचा प्रकार नसतो. भयंकर चिकट असतात हे लोक. एक नाही तर दुसरी योजना, योजना नाही तर स्किम, हे नाही ते, हजार गोष्टी सांगून अगदी भंडावून सोडतात. आणि हे सगळे फोन कॉल्स भर दुपारीच करतात. दुसरं माणूस झोपलं असेल, अजारी असेल, याशी त्यांना काही देणंघेणं नसतं.
खरंच तूझा अनुभव ऐकून खूप वाईट वाटलं. मी तुझ्या जागी असते तर खरोखरी शिवीगाळ केली असती, कदाचित त्या कंपनीला स्यू पण केलं असतं. पण मी समजू शकते, घरात अशावेळी अशा गोष्टी सूचणं अशक्यं आहे, आणि नेमकं तेच या टेलिमार्केटींग वाल्यांच्या पथ्यावर पडतं.


Dakshina
Monday, December 10, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कंपनीत एका विशिष्टं लेव्हल (थोडक्यात Higher Designation ) च्या एम्प्लॉईजना पूण्याबाहेर ट्रॅव्हल करायचं असेल तर गाडी मिळते. अशाच एका सिनिअर माणसाची बायको पण आमच्याच कंपनीत आहे. ती गाडीसाठी इलिजिबल नाही. तिच्या बॉसकडून तिला कन्फ़र्मेशन यायचं होतं कारण तिला ट्रॅव्हल करायचं होतं. तिचं अनिश्चित होतं, म्हणून या माणसाने (तिच्या नवर्‍याने) ३ वेळेला गाडीची रिक्वेस्ट केली आणि ३ वेळेला कॅन्सल केली. (त्यासाठी स्वतःच्या जाण्याचा खास प्रोग्रॅम बनवला होता.) अखेर एके दिवशी रात्री फोन करून गाडी अखेर ठरवून घेतली, बायकोला घेऊन तिकडे जाऊन आला.

२ दिवसांनी मला बायकोचा फोन, मला माझे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस क्लेम करायचे आहेत.. कसे करायचे? मी आचंबित... तरीही धाडस करून मी म्हणलं अगं पण तू तर कार ने गेलेलीस ना? ती म्हणे तूला काय करायचं आहे?

इतका गैरफ़ायदा घ्यायचा कंपनीचा? दोघांना मिळून ऊतू जाईल इतका पगार तरी असेल. बरं मी म्हणते नवर्‍याबरोबर जायचंय तर जा... पण वर ट्रॅव्हल एक्सपेन्सेस क्लेम कशाला करायचे? त्यात नवर्‍याने पण गैरफ़ायदाच घेतला होता.. अस्तित्वात नसलेला मुंबईचा कार्यक्रम बनवून....


Zakki
Monday, December 10, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तुम्ही स्पष्ट बोललात तर ति बया नवर्‍याला तुमच्याबद्दल नाना तर्‍हेच्या खोट्यानाट्या गोष्टी सांगून तुम्हाला नोकरी सोडण्याशिवाय पर्याय ठेवणार नाही!

माझे असे तीनदा झाले नोकरीत, बायकोवरून नाही पण इतर कारणांवरून. सुदैवाने आमची कं जगभर पसरली असल्याने मला इकडे तिकडे बदली मिळाली.


Dakshina
Tuesday, December 11, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, समजा मी जर स्पष्टं काही बोलले तरी माझी नोकरी जाईल असं मला नाही वाटत, कारण माझं आणि त्या माणसाचं डिपार्ट्मेंट वेगळं आहे. असो.. हा तर झाला एक किस्सा, खरंतर दररोज असे अनेकानेक किस्से घडत असतात. rather रोज बोचणारेच किस्से घडतात असं म्हणालात तरी चालेल. काही लोकांना आवडणार नाही, पण तरीही मी ऑबझर्व्ह केलेली एक गोष्ट म्हणजे सॉफ़्टवेअर कंपनीतल्या लोकांना ढिगाने पगार असून सुद्धा ते दहा आणि पाच रुपयांसाठी रडतात. परवा एक सिनिअर असाच (जो आमच्या सिटी ऑफ़िसमध्ये बसत नाही) आला, त्याला कार पार्क करायला जागा मिळाली नाही. मला म्हणतो, पॉलिसी नाही का काही? आता पार्किंगला कसली डोंबलाची पॉलिसी? (उद्या वाॅशरूम पोलिसी मागतील, काही नेम नाही ) तर.... त्याला पे अँड पार्क मधे गाडी लावावी लागली, तर संध्याकाळी माझ्याकडे येऊन अर्धा तास भांडला की माझे ३० रुपये रिएंबर्स कर म्हणून. मी म्हणल देत नाही जा, एव्हढं होतं तर कार कशाला आणयची? टू व्हिलर वर यायचं होतस.

Aktta
Tuesday, December 11, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कधी कधी वाटत की (आनी ऑबझर्व्ह पन केल आहे ) admin आनी HR ही dept. फ़क्त emp. ला त्रास द्यायला आहेत...... कमीत कमी माझ्य co. त तरी :-)
एकटा...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators