Ajjuka
| |
| Wednesday, December 05, 2007 - 2:52 am: |
| 
|
DCH , रंग दे मधे त्याच्या व्यक्तिरेखा जरूरीपेक्षा जास्त glorified नव्हत्या असं म्हणायचंय का? आता हा सीन मला नको बिको हे सांगणं ह्याला damage control म्हणेन मी. असो. मी आपली माझी माहिती सांगितली. याहून जास्त माहिती काही इथे देणं योग्य होणार नाही. आणि आमिरला एकट्यालाच दोष देणंही योग्य नाही कारण असे सगळेच जण करतात. आमिर हा त्यांचा राजा आहे त्याबाबतीत असं म्हणायला हरकत नाही.
|
Deepanjali
| |
| Wednesday, December 05, 2007 - 3:53 am: |
| 
|
DCH मधे मला अक्षय खन्नाचा role जास्त interesting वाटला . रंग दे मधे length wise कदाचित सिध्दार्थ ला जास्त काम असेल , पण अर्थात भाव खाउन आमिर च जातो दोन्ही movies मधे . 
|
चिन्या, मीडीयावाले शाहरूखला विकले गेलेले नाहीत. शाहरूख स्वत्: मास कॉमचा स्टुडंट आहे त्यामुळे त्याला मीडीया सांभाळता येतो. HT च काय सर्व पेपरमधे पानभर जाहिरात दिली आहे. याला म्हणतात आपलं नाणं स्वत्:च वाहवून दाखवणं. पेपरला रेव्हेन्यु मिळाला म्हणून ते खुश. पिक्चरची टीम खुश (सर्व तंत्रज्ञाचे फोटो आहेत) आणि मिड डेने कुठली खोटी बातमी छापली आहे? आमिर शहाणपणा मारायला गेला आणि तो त्याच्या अंगलट आला. आता त्याआ अमिताभला भेटायचं आहे.. आणि गैरसमज दूर करायचे आहेत. अजूनही तो ब्लॅकवर ओलतोच आहे कारण त्याला भन्सालीचे भडकणं अपेक्षित आहे. आणि आतापर्यंत मीडीया आमिरविरुद्ध लिहिताना मी तरी पाहिलं नाही. याच मिड डेने फ़ैजलची कस्टडी आमिरकडेच का द्यावी म्हणून फ़्रंट पेज स्टोरी केली होती.. आणि कुणीही लग्नाच्या वेळचा सूड घेत नाहिये पण त्याचबरोअब्र आमिर स्वत्ळ्:चे काम असेल तेव्हाच मीडीयाला जवळ करतो आणि गरज नसली की लक्ष देत नाही ही बाब मीडीयावाले ओळखून आहेत. कुठलाही दिग्दर्शक आमिरबरोबर परत काम करण्यासाठी उत्सुक नसतो किंवा करत नाही.. आशुतोश, फ़रहान, राकेस मेहरा. आणि अजून बरेच असतील. अज्जुका म्हणते तसं तो एडिटिंग टेबलवरती पण बराच dominating असतो. त्याचे चित्रपट यशस्व्व होतात त्याचं कारण म्हणजे कुठला चित्रप्ट करायचा हे त्याला बरोबर कळतं. तरी घोडचुका होतातच त्याच्याकडून (कोण "मंगल पांडे" म्हणतोय??) असो मी अजून एक गॉसिप देते... आमिरचा घटस्फ़ोट का झालेला माहीत आहे? किरण रावमुळे नाही.. जेसिका हाइन्स आणि तिच्या जानमुळे.
|
Asami
| |
| Wednesday, December 05, 2007 - 2:36 pm: |
| 
|
त्याचे चित्रपट यशस्व्व होतात त्याचं कारण म्हणजे कुठला चित्रप्ट करायचा हे त्याला बरोबर कळतं. >> Isn't that bottomline in all this nonsense ? कला etc म्हणून ठिक आहे पण शेवटी कुठली गोष्ट कुठपर्यंत न्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का
|
Chinya1985
| |
| Wednesday, December 05, 2007 - 2:57 pm: |
| 
|
अज्जुका, DCH आणि रंग दे त त्याच्या भुमिका जास्त ग्लोरिफ़ाईड आहेत अस मला वाटत नाही कारण तोच तर पिक्चरचा हिरो होता ना!!!कमर्शिअल पिक्चरमधे हिरोच्या भुमिका जास्त ग्लोरिफ़ाईड असतातच ना!!शिवाय KANK मधे K3G मधे शाहरुखच्या भुमिका बच्चन,हृतिक पेक्षा जास्त ग्लोरिफ़ाईड नव्हत्या का??? दीपांजली, DCH मधे काहींना अक्षय आवडला पण जास्त लोकांना आमीरनंतर सैफ़चा रोल आवडला होता. चिन्या, मीडीयावाले शाहरूखला विकले गेलेले नाहीत नन्दिनि,मिडिया शाहरुखच्या चित्रपटांना नेहमीच झुकत माप देते. त्याच्या चित्रपटांची quality चांगली नसली तरी त्यांना भरपुर स्टार्स देतात. शाहरुखच्या जागी जर दुसरा हीरो असता तर याच लोकांनी त्यांना कमी स्टार्स दिले असते. जब वी मेट अथवा हम दिल दे चुके हे चित्रपट जर शाहरुखचे असते तर मिडियावाल्यांनी त्यांना पाचपैकी पाच स्टारही दिले असते. या चित्रपटांपेक्षा K3G , OSO , KANK ,देवदास इत्यादी चित्रपटांना जास्त स्टार्स मिळाले होते. खालिद मोहम्मदनी तर K3G ला ५ स्टार्स दिले होते. नंतर प्रत्येक अवॉर्ड मिळाल्यानंतर या लोकांनी त्याचे आभार मानले. तरण आदर्शनी OSO ला साडेचार स्टार्स दिलेत. खरच सांगा हे चित्रपट इतके चांगले आहेत का??शाहरुखचे फ़ॅन्स पण मानतात की हे चित्रपट इतके चांगले नाहीत. जर मिडिया विकली गेलेली नाही तर या सर्व अवॉर्ड फ़न्क्शन्सला शाहरुख,चोप्रा कॅम्पमधल्यांना झुकत माप आणि जास्त अवॉर्ड्स का मिळतात???मोहोब्बतें या चोप्रा गटाच्या चित्रपटातील विनोदी अभिनयासाठी अनुपम खेरला फ़िल्मफ़ेअर मिळाल होत जेंव्हा परेश रावळला हेरा फ़ेरीसाठी मिळायलाच हव होत. दुसर म्हणजे HT वाल्यांनी दिल्ली एडिशनमधे पहिल्या पानावर पुर्ण पानभर जाहीरात दिली आहे. मोठमोठ्या कम्पन्यांच्या जाहिरातीही पहिल्या पानावर पुर्ण पानभर नसतात. आता हळुहळू शाहरुखबद्दल गोडगोड लिहुन येईल HT त. हे विकल जाणच आहे. रिव्हेन्युसाठी काहीही करणार असाल तर ते विकल जाणच म्हणतात. हां तुम्ही विकल जाण काय चुकिच असा मुद्दा उठवू शकता पण विकलो गेलोच नाही अस म्हणु नका. मिडडेतल्या तू दिलेल्या लिंकबद्दल मी लिहिल होत. त्याच्या घटस्फ़ोटाबद्दल मला माहीती होती. त्याचा तो मुलगा जान त्याच्यासारख्याच दिसतो.
|
Prajaktad
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:43 pm: |
| 
|
आमिर्-किरण राव लग्नाच्या वेळची त्याच्या वडलांनी झीला दिलेली मुलाखत इतकी विनोदी होती... सारख ते it's all in family रिना आणी आमिर्-किरण मधे फ़्रेंडली रिलेशन आहेत..मुल किरणशी फ़्रेंडली आहेत..(ति असु देत) पण रिना सुद्धा सपोर्टिव आहे..तिला काही ऑबजेक्शन नाही वैगरे म्हणजे जरा अतिच होत होते...मला तर वाटल पुढच्या क्षणी ते म्हणतिल.. रिनाच आमिर्-किरण च्या लग्नात करवली म्हणुन उभि राहाणार आहे... बाकी शाहरुख पक्का निर्माता आहे शिवाय नशिबवान सुद्धा... अर्थात राजेंद्रकुमार वैगरे सारखे रद्दड हिरो ?? पासुन हे चालु आहे.. नाहितर सारख रडुन ४ स्टार मिळवणे काय साधि गोश्ट नाही..
|
Tiu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:46 pm: |
| 
|
शाहरुख वर चर्चा चालु आहे आणी खाली ebay ची जाहिरात येते अहे... $450.00 TRIMURTI SHAHRUKH KHAN RARE ORIG PRINT POSTER BOLLYWOOD $399.00 OM SHANTI OM SHAHRUKH KHAN ORIGIN POSTER # 4 BOLLYWOOD $400.00 DIL TO PAGAL HAI SHAHRUKH KHAN POSTER # 3 BOLLYWOOD $590.00 OM SHANTI OM SHAHRUKH KHAN ORIGI POSTER # 7 BOLLYWOOD ४०० डॉलरचं पोस्टर???
|
चिन्या, आमिरच्या पिक्चरला किती स्टार्स मिळतात आणि किती पब्लिक स्टार्स बघून ओइक्चरला जातं ते ही महत्वाचं नाही का? मी आधीच लिहिलय की शाहरूखला मीडीया सांभाळता येतो. हम दिल दे चुके ला पाच स्टार मिळाले होते.
|
Ajjuka
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:37 am: |
| 
|
चिन्या, बरं बाबा तुझं खरं!! ओके? खुश?
|
चिन्या, २००० सालचा बेस्ट कॉमेडीयन परेश रावललाच मिळाला होता. अनुपम खेर नॉमिनी होता. मला एक कळत नाही. आमिर खानच्या लफ़ड्यांबद्दल बोलत असताना तु त्याल शाहरूखबरोबर का कंपेअर करतोस? अजिबात फ़िल्मी बॅकग्राऊंड नसताना त्याने किंग पदापर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आहे. मी शाहरूख फ़ॅन बिल्कुल नाही पण तरीही त्याच्यामधे पब्लिक जमवण्याचा फ़ंडा आहे हे मान्य करावंच लागतं. तो पक्का व्यावसायिक आहे यात वादच नाही. त्याने फ़क्त HT Delhi ला पानभर जाहिरात दिलेली नाही. अख्ख्या मीडीयाला जाहिरात दिली आहे. पण फ़क्त पैशाने मीडीया विकला गेला असता तरी पब्लिक त्याचे पिक्चर बघायला जातेय हे खरं आहे ना???? आमिरला ऍवॉर्ड्स मिळत नाहीत कारण त्याला अकेले हम अकेले तुम साठी ऍवॉर्ड न मिळाल्याने राग आला होता. (पिक्चर फ़्रेम टू फ़्रेम कॉपी असल्याने त्याच्यावर केस चालू होती.) राजा हिंदुस्तानीसाठी ऍवॉर्ड मिळाल्यावर त्याने मला "गरज नाही" हे सांगितलं. पण आता प्रकरण भल्तंच तापलय. आमिरला बच्चन भन्साळी कपूर आणि चोप्रा एस आर के या सर्वाबरोबर दुश्मनी भारी पडेल त्यामुळे त्याने निरवानिरव करायचा प्रयत्न चालू केला आहे. बच्चनची एक कमेंट मला जाम आवडली.."कदाचित ब्लॅकचे परफ़ॉर्मन्सेस आमिरच्या "डोक्यावरून" गेले हे बरोबर आहे." आमिर आणि शाहरूख ही तुलना मला मान्य नाही. आणि हो हा V&C चा बीबी नाही याचे जरा भान ठेवल्यास बरे होईल. प्राजक्ता, माझा एक कलीग लगानच्या वेळेला रीनाला भेटला होता. अशा बाईला घट्स्फ़ोट देण्यापेक्षा मी आत्महत्या केली असती असं तो म्हणाला.. रीनाने घर सोडलं कारण जेसिका प्रकरण भलतीकडेच गेलं. आमिरने तिला पैसे देऊन गप्प करायचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही आणि बत मीडीया पर्यंत पोचलीच. इतके दिवस रीनाने आमिरच्या लफ़ड्याबद्दल बर्न्च सहन केलं होतं पण यानंतर तिने घर सोडलं. त्यामुळे आमिरने किरण रावबरोबर "लग्न" केलं. नाहीतर "थेवून" तर घेतलिच होती त्याने. इतकं होऊनही रीनाने कधी तोंड उघडलं नाही किंवा पोटगी मागितली नाही. अजूनही ती जॉब करते. आज जो माणूस लहान मुलाच्य मनावर होणारे परिणाम प्रेम काळजी या गोष्टी करतो त्याच्या स्वत्:cया मुलावर काय परिणाम झाला असेल या गोष्टीचा???
|
Ajjuka
| |
| Thursday, December 06, 2007 - 7:55 am: |
| 
|
नंदीनी, एक सल्ला. नाही पटला तर सोडून दे. तू लिहिते आहेस त्यातल्या रणबीर बद्दलच्या नाही पण बाकी बर्याचश्या गोष्टी मझ्या कानावर पण आल्या होत्या खूप आतल्या गोटातल्या माणसांकडून. अर्थात त्यातलं किती खरं खोटं यात मला कधी रस नसल्याने मी फारसं लक्ष दिलं नाही. पण तू एवढं सगळं उघडपणे लिहिते आहेस. यातून problems होऊ शकतात. गोष्टी तुझ्यावर शेकू शकतात याचा विचार केलायस ना? तू इथे काय लिहावंस किंवा लिहू नयेस हे मी मुळीच सांगत नाहीये. माझा काही संबंध नाही हे मला माहितीये. पण यातून घोळ होण्याची शक्यता दिसली म्हणून फक्त एक एक suggestion . इतकंच.
|
मी विषय बदलायचा प्रयत्न करते.. आरकेने मला बर्थडे गिफ़्ट म्हणून परफ़्युम दिलय. तीन वर्षापूर्वी सोनम ९० किलो वजनाची होती. आता मात्र एकदम ५० किलोवर आलिये आणि मला म्हणे तुझ्या इतकं बारीक व्हायचय..
|
चिन्या, बरं बाबा तुझं खरं!! ओके? खुश? हाSSSSSSSS हाSSSSSSSS हाSSSSSSSS!!!!!!!मोगॅम्बो खुष हुआ स्टाईलनी चिन्या खुष हुआ!!!!!अस म्हणाव लागेल काय आता???? २००० सालचा बेस्ट कॉमेडीयन परेश रावललाच मिळाला होता फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड नसेल मग तो. स्क्रीन वाला अवॉर्ड असेल. पण एक अवॉर्ड अनुपमला मिळाला होता तेंव्हा. आमिर आणि शाहरूख ही तुलना मला मान्य नाही. मलाही मान्य नाही. आमीर हा शाहरुखपेक्षा कितीतरी भारी आहे. बाकी शाहरुख,बच्चन यांच्या तुलनेबद्दल तुला काय म्हणायचय?? त्याला मीडीया सांभाळता येतो. शाहरुखच्या शब्दात सांगायचे तर तो मिडिया सांभाळत नाही,तो मिडीयाला use करतो. HTsummit ला आल्यानंतर त्याला प्रश्न विचारला होता तर तो म्हणाला की 'मी इतके वर्ष मिडियाला use करत आहे पण आजकाल मिडीयाही मला use करु लागलिय.' त्याला काही वर्षांपुर्वी अस विचारल होत की तु फ़िल्मफ़ेअर जिंकणार का तर तो म्हणाला फ़िल्मफ़ेअर मलाच मिळणार मला नाही दिल तर मी ते विकत घेईल. अजिबात फ़िल्मी बॅकग्राऊंड नसताना त्याने किंग पदापर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आहे असे बर्याच स्टार्सबद्दल म्हणता येईल. तरी पब्लिक त्याचे पिक्चर बघायला जातेय हे खरं आहे ना???? पब्लिक आमीरचे चित्रपट बघायला जाते हेही खरय ना???? बच्चन ब्लॅक मधे असल्याने आणि तु मिडियात असल्याने तुम्ही त्या त्या लोकांना अन क्षेत्रांना चांगलच म्हणनार(बच्चन निशब्दला पण चांगल म्हणाला होता आणि आगला पण,त्याच कामच आहे ते) पण उघड्या डोळ्यांनी पहाणार्यांना हे सरळ दिसुन येते की मिडीया शाहरुखला झुकत माप देते. अनुराग कश्यप,घई वगैरे व इतर अनेक फ़िल्ममेकर्सनी क्रीटीक्स ला शिव्या दिल्यात पण हे लोक क्रीटीक्सच्या चोप्रा कॅम्पला झुकत माप देण्याबद्दल बोलत नाहीत कारण साध आहे कोण चोप्राशी पंगा घेणार???पण जनतेला तशी भिती नसल्याने आम्ही सत्य बोलु शकतो. आणि हो हा V&C चा बीबी नाही याचे जरा भान ठेवल्यास बरे होईल हे बरोबर आहे पर ईस गुनाह का भागिदार मै अकेला नही हुं (फ़िल्मी डायलॉग,फ़क्त फ़िल्मच आठवत नाही). तुम्हीही लोक याला V & C सारख बनवण्याचे भागीदार आहात. नंतर कधीतरी V & C वर शाहरुख का आमीर अशी चर्चा करु. तू इथे काय लिहावंस किंवा लिहू नयेस हे मी मुळीच सांगत नाहीये. हे नन्दीनीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आहे म्हणुन सुनिलटी उपोषणास बसणार आहेत. बरं सरकार २ कधी येणार आहे???धुम येणार आहे का??? बाजीराव मस्तानीचे काय???
|
ऍश च्या latest ramp walk चा star news मधे cover केलेलं gossip " कोई good news है क्या " बद्दल सगळीकडे चर्चा झाली का फ़क्त star news वर ?
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:32 pm: |
| 
|
शोएब अख्तर फ़िल्म मध्ये काम करणार असे न्युज चॅनेल वाले दाखवत आहेत ब्रेकिंग न्युज. सोबत त्यानी त्याच्या पदार्पणापासुनची आता पर्यंतची हिस्टरीच सांगिअतली की. आणि त्याने टाकलेला एखाद्या दुसर्या बॉलची क्लिप ज्यावेळी त्याला विकेट मिळाली आहे असा. ह्यावर २ तासाचा धंदा फ़ुल्ल असेल नाहि
|
>>जेसिका हाइन्स आणि तिच्या जानमुळे ही लोक कोण आहेत?
|
Badamraja
| |
| Friday, December 07, 2007 - 5:00 am: |
| 
|
शोएब अख्तर चा एक जोक आठवला. महेश भट्ट ने त्याला फील्म offer केलेली पण त्याने ती नाकारली. तेव्हा मीडीया ने त्याला अस का केल विचारल? शोएब : महेश भट्ट चहाते थे कि मै उन्के फिल्म मे कीस सीन दु. मीडीया : तो कीस सीन देने को आपने क्यो इन्कार किया? शोएब : महेश भट्ट चहाते थे कि मै इम्रान हाश्मी को कीस करु
|
चिन्या, मला शाहरोख पैसे देत नाही आमिर देत नाही. मी त्याची पेड पी आर नाही. त्यामुळे विषय बंद माझ्याकडून. संजय लीला भन्साली हीरा मंडी नावाचा लाहोरच्या रेड लाईट वर आधारित चित्रपट बनवत आही. हीरॉईन रानी आहे, बाईराव मस्तानी परत एकदा बाजूला फ़ेकला गेला आहे. क्रिश धूम २ आणि अकबरचे स्टंट ह्रितिकल चांगलेच बारी पडए आहेत. त्याच्या गुडघायाला वारंवार दुखापत झाल्याने तो आता नीट नाचू शकत नाही. (अरेरे!!!) ट्रीटमेंटसाठी तो सिंगापूरला गेलाय लवकर बरा होऊन खडखडीत नाचू देत रे देवा..
|
Slarti
| |
| Monday, December 10, 2007 - 4:26 am: |
| 
|
अकबरमध्ये स्टंट ? दिग्दर्शक आता वीरू देवगण आहेत का ?
|
लाहोरच्या रेड लाईट वर आधारित चित्रपट बनवत आही. हीरॉईन रानी आहे, <<<<<अरे देवा .. या राणीला गायब करा जरा कुणी तरी . सगळ्या movies मधे ती च आज काल दिसते पण किती boring ! आणि acting पण तेच typical!!
|