Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through December 05, 2007 « Previous Next »

Sandu
Thursday, October 04, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Disha013
Thursday, October 04, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shoe parking !अगदी भारी! ह्ष ह्भ न्भ ह्भ ह्ह ह्ह्स

Anantawadhut
Sunday, October 07, 2007 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात
उपचारांना मात्र जागा नाही
-इति पु.ल.

Prajaktad
Tuesday, October 23, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Prajaktad
Tuesday, October 23, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message






Farend
Tuesday, October 23, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, ते '...तळेगाव बटाटे' वाला बोर्ड चितळ्यांचा आहे का? फॉंट तसाच दिसतोय.

Abhijit
Wednesday, October 24, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर तो आपल्या मायबोलीकर किरणचा " किरण फाॅंट " वाटला...

Prajaktad
Wednesday, October 24, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, ते '...तळेगाव बटाटे' वाला बोर्ड चितळ्यांचा आहे का? फॉंट तसाच दिसतोय. >>>
असेल असेल! दुर्गाचा बोर्ड MIT समोरचा असावा..

हि अजुन एक पाटी


Sherpa
Friday, October 26, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिक्शा वरची पाटी पुणेरी का बरे वाटते? मला तर ती बरोबर वाटते. कदाचीत मी पण पुणेरी आहे म्हणुन असेल .


Farend
Friday, October 26, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की वाक्य काय आहे?

Itgirl
Friday, October 26, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ए नाही अहो रिक्शावाले म्हणा' अशी पाटी आहे / असावी ती अमोल, CBDG

Monakshi
Friday, October 26, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलू, बरोबर गं तेच वाक्य आहे. :-)

Ajai
Friday, October 26, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती पाटी फक्त पुणेरि रिक्षावाल्यानीच वापरली अस नाहि तर भाजपा खासदार राम नाईकानी इलेक्षन च्या आसपास मुंबईत बर्‍याच रिक्षांवर हिंदि/ मराठीत स्टिकर्स बनवुन चिकटवली होती
"ए नाहि अहो रिक्षावाले म्हणा, रिक्षावाल्यांना सन्मान द्या- राम नाईक"


Hkumar
Saturday, October 27, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, puneripatya.com वर गेलात तर संपूर्ण उजळणी करायची संधी!

Kokani
Monday, October 29, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार. मी येथे नवीनच प्रवेश घेतला आहे. आधी नुसताच वाचक होतो, आज प्रथमच लिहित आहे.
तर मुद्दा असा कि पाट्या फ़क्त पुण्यातच नसतात.
मी सातारा तसेच कोकणात अशाच स्टाईलच्या पाट्या पाहिल्या आहेत.
सातारा येथे एका मन्गल कार्यालयात "पाहुणे आपलेच असल्याची खात्री करा." अशी पाटि आहे.
पण अश्या प्रकारे सुचना देण्याच्या पद्धतीला पुणेरी म्हणत असावेत. ( का सातार वरील हा पुण्यप्रभाव?)
अशा सुचना किती आवश्यक, तसेच यात स्पष्टपणा किती व उद्धटपणा किती हा वादाचा मुद्दा.
एवढे देवनागरी लिहून दमलो. तेव्हा कोकणातील पाट्या पुढच्या वेळी.


Sush
Tuesday, October 30, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशिच अप्पा बळवंत चौकातिल एका दुकानात पाटि आहे. ति बाहेरुनही दिसते.
"२०,५०,१०० रु. च्या नोटा असतिल तर क्रुपया आधि कल्पना द्यावी."
अजुन एक दुसरि पाटि,
"हाफ दुध, हाफ लस्सी." आणि या वाक्यावर काट मारलेली.


Sonalisl
Friday, November 02, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुळशीबाग मध्ये एका छोट्याशा गल्लीमध्ये एका पानाच्या टपरीवर एक पाटी वाचली. तेव्हा दुपार होती आणि ती बंद होती. त्यावर लिहिलं होतं कि, 'दुपारी १ ते ४ दुकान बंद राहील, पान मागायला घरी येवु नये '.

आता ती आहे कि नाही माहीत नाही कारण मी ती २-३ वर्षांपुर्वी वाचली होती.


Hkumar
Saturday, November 03, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वपुंनी असे म्हटले होते की पुण्यातल्या पुस्तकांच्या दुकानात पुस्तकांच्या संख्येपेक्षा पाट्यांचीच संख्या अधिक!

Uchapatee
Tuesday, November 06, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रसंग “उ” बरोबर घडला. तेव्हा ती नोकरी निमीत्ताने नुकतिच पुण्यनग़रीत रहायला आली होती. ऑफिस शिवाजी नगरला व रहायला कोथरूडला असल्याने रोज PMT चा प्रवास नशिबी आला होता. एक दिवस अशीच ऑफिस सुटल्यावर ती जंग़ली महाराज रोड वरिल बस स्टॉप वर आली. बराच वेळ गेला पण कोथरूडची बस काही आली नाही. “उ” ला ग़ेल्या 5-10 मिनीटापासुन एक बाई आपल्याकडे निरखून बघते आहे असे जाणवले पण तिने दुर्लक्ष केले. तेवढ्यात ती बाई पुढे झाली व त्यांच्यात खालील संभाषण झाले.
बा. – तुम्ही “XXX” सोसायटीत त्या “YYY” कडे येता ना?
उ – हो, ती माझी मैत्रीण आहे.
बा. – तरीच, मी तुम्हाला नेहेमी त्यांच्या कडे आलेले बघते.
उ – मी तुमच्या सोसायटीच्या जवळच जरा पुढे रहाते त्यामुळे बरेचदा तिच्या कडे येणे होते.
बा. – या बसेसचा काही नेम नाही. तुम्हाला स्टॉपवर येउन 15-20 मिनीटेच झाली आहेत, मी गेला तास भर उभी आहे पण एकही कोथरूडची बस आलेली नाही.
उ – हो का!
बा. – वाट पाहून पाहून अगदी कंटाळा आलाय. आपल्याला एकाच बाजुला जायचे आहे तर दोघी मिळुन रिक्षा करू या का?
इतका वेळ वाट पाहून “उ” पण कंटाळली होती. तिने होकार दिला. दोघीही रिक्षाने निघल्या. रिक्षात बाईंची अखंड टकळी चालू होती. बाईंचा उतरण्याचा स्पॉट आल्यावर त्यांनी रिक्षावाल्यांला बाजुला थांबण्यास सांगीतले आणी आपल्या पर्स मधे हात घातला.
रिक्षातुन उतरतांना “उ” च्या हातात काही तरी कोंबले व रिक्षावाल्याला “जाउ दे” असे फर्मावले. रिक्षा सुरु झाली, ‘उ” ने हातात काय आहे बघीतले तर ते जंगली महाराज – कोथरूड बसच्या तिकीटा एवढे पैसे होते. रिक्षाला “त्या” पैशाच्या 8-9 पट लागले आणी उ ला नोकरीच्या पहिल्या-दुसर्‍या महिन्यातच भुर्दंड बसला.

नंतर ‘उ” ने मैत्रीणीला या प्रसंगा बद्दल सांगीतले तर तिने “त्या या सोसायटीत रहातात पण आमची ओळख नसल्याचे सांगीतले. उ नंतर अनोळखी पुणेकरांशी फटकुनच असायची.


Zakasrao
Wednesday, December 05, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक आमच्या पुण्याला किती का उद्धट म्हणेनात स्पष्टवक्तेपणात कोणी हात नाही धरु शकणार.
हा घ्या पुरावा. अस स्पष्टं सांगण्याची हिमंत आहे का?? :-)




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators