|
Itgirl
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:53 am: |
| 
|
अरे माणसा, देवनागरीत लिही की जरा!! "मायबोली"वर लिहितोस ना??
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:31 pm: |
| 
|
दहावीत असताना आम्ही सगळे मित्र मिळून ट्यूशनला भल्या पहाटे ५:३० ला जायचो.. जाता जाता मध्ये एक लेन लागायची.. ती लेन आली की आमच्यातला एक जण हटकून "दूऽऽऽऽध" अशी आरोळी ठोकायचा.. हमखास एक तरी काकू दूधवाला आलाय असं समजून भांडं घेऊन धडपडत बाहेर यायच्या.. (सायकलींच्या आवाजामुळे तर त्यात आणखीनच भर पडायची.) दहावीचे पेपर लिहित असताना दूरवरून "हीरो" ची गाणी ऐकू यायची.. (त्यावेळी "हीरो" ची गाणी खूप फेमस होती आणि लग्नसराईचा सीझन असल्याने रोजच कुठे ना कुठेतरी ही गाणी लागलेली असायचीच) literally ती गाणी ऐकतच सगळे पेपर्स लिहिले अन् चक्क चांगल्या मार्कांनी पास झालो.. नंतर त्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत औरंगाबादला तो सिनेमा पाहिला होता.. आजही हीरो ची गाणी लागली की मला माझी दहावीची परिक्षा आणि ते औरंगाबाद आठवतं..
|
Gsumit
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:18 pm: |
| 
|
माणसा, खुप चांगलं काम केलस "पुरानी जीन्स और गिटार" गाणं लिहुन... धन्स हे गाणे BE ला असतानी मी अन माझ्या रूमीनी म्हणले होते, कॉलेजचे ते शेवटचे दिवस सुद्धा कधीच विसरु शकत नाही, फुल फेमस झालतो आम्ही कॉलेजमधुन जाता जाता शेवटचा पेपर संपला तेव्हा बाहेर येउन रस्त्यावर नाचलो होतो, civil च्या पोरांनी ढोल्-ताशावाले पण बोलवुन ठेवले होते, पाच हजारची लढ लावली होती... पेपर कसा गेला याचे कुणालाच काही नव्हते, कॉलेज संपल्याची खुशी, अन आता तेच कॉलेज मिस करतोय...
|
Gsumit
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:40 pm: |
| 
|
कॉलेजच्या दिवसांवर अजुन एक खुप छान मेल आलीये माझ्या एका फ्रेंडकडुन, ती टाकतो इथे. sorry ITGirl , एवढे सगळे मराठीत करुन लिहिणे जरा अवघडच आहे... तसेच टाकतो... भावना महत्त्वाच्या (ही सोपी पळवाट... ) The Last Class of College… I walked with my best friends across the campus......... towards my class... my final year engineering class. The hour hand at the watch said ... it was ten minutes past 5.... And there was not even a single trace of any life in the college........ Except for we three.... me and my best pals........... Another ten steps… and there was our class with the doors shut...!!! We were on the third floor... and the sun setting down in the valley with its orange rays was creating a magical scene. Had a wish that the time stops at that very moment... but it never happens... the seconds hand ticked heavily… and we opened the doors of the class for one last time................... Wished I cud ask my teacher..."may I come in.... “And wanted to hear her shout.... "You late again... no attendance..." But there was no one there... just empty desks... And we three.... Looking at the walls.... and the desks... all empty... with quotes we wrote ... and the raised platform... where the torture classes were held... and the last benches... where we had fun.... laughed .... Kicked out.... hiding from the teachers... pleading for attendance............ million memories rolled like a movie into our minds... and there was complete silence for a moment... and we smiled ... laughed!!!!! Walked like heroes from the medieval times.... jumped over the benches... Had a look at the bench... where the so called babes of our class used to sit.... Drifted to our place... ... sat there..... Side seats... Dint feel like the last day.... don’t remember how we met.... How we came to such a stage... feels like I know my friends from ages... feel like as if I was born in this college..... Feel like I was always here... The entire class was still there alive.... the last benchers sleeping.......... the gals chatting amongst themselves........... The teacher in her own world...... Ravi sitting besides me.... Cribbing about something.... Dilip sitting on first bench taking down notes.... And Abhi smiling at the babes.... Rakesh... trying talking to the gals... and we laughing about something of the other..... Me occasionally scribbling something on my notepad............ making some sketches... or bullshit poetry............ Ahh.. Sita asking me to look outside... for some gals from bio-med... Standing there....... and I without even a word...looked outside... It was an unsaid communication.... chandu pinged me... and I, with the same enthu... looked outside... but today there wasn’t anybody there................ just the deserted corridor.......... and i cud see the mechanical department at the end... no one there.................. Looked back..... But there was vinay... In his dream world.... not scribbling anything in his notebook... not laughing this time.... not sayin anything this time........... Just sitting there... and there was varun... and there was me..... "Roll number 23..........” "Roll number 23............ varun.... u sleeping again........ " "Ok fine............. roll number 24" "....................... Hey... present ma'm............ " "You sleep dear...!!! No attendance for you................." No attendance.... the class has ended... and my friends... chatting and laughing.... going for a chai... aur a samossa..... aur a lemon juice... And we sat there..... Sat there all alone ......... closed our eyes, for the entire world outside the walls of the campus was calling us.............. Wanted to attend one last lecture........ But this time there was no one to take that last lecture.............. And there was that door... open... and we wished all the time... to run away.... to bunk... but this time it wasn’t..... One last time.... One last time............ attended the class.... with no one... just we three...
|
Amruta
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:40 pm: |
| 
|
शाळेचे दिवस काहि औरच होते. आमचा ५ जणींचा ग्रूप होता. शाळा सुटली कि आम्ही चालत निघायचो मग पहिल्या मैत्रीणीचा रस्ता किंवा घर आल कि थांबलो तिथे पुन्हा पुढे जाउन वेगळ व्हायची वेळ आली की पुन्हा थांबायचो. गप्पा मुळी संपायच्याच नाहीत. किती बोलायचो आम्ही वर्गात असताना पण चालुच असायची चुपचाप बड्बड
|
Divya
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:52 pm: |
| 
|
LOL अमृता, अगदी सेम. मी पण फ़ार बडबड करायचे, शाळेत असताना बडबड करते म्हणुन बर्याचदा बाहेर बर्गाच्या. मला हसु अजिबात आवरायच नाही, महा कठीण काम. कधीकधी त्यामुळे फ़ार फ़जिती व्हायची नको तिथे हसण्याने. ओरडाही खाल्ला आहे खुप. मी कॉलेजमधे असताना आइ पपा गावाला गेले तेंव्हा माझ्या मैत्रीणी घरी झोपायला आल्या होत्या. मग काय रात्रभर गप्पा, ३ वाजता sandwitch करुन खाल्लेल भुक लागली म्हणुन. त्या रात्री आम्ही झोपलोच नाही, अगदी सुर्य उगवताना बघीतला. बोलुन आणि हसुन तोंड दुखायला लागलेल. गप्पांचे विषय तर काय भन्नाट ना. 
|
Tiu
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:55 pm: |
| 
|
अरे माणसा, देवनागरीत लिही की जरा!! "मायबोली"वर लिहितोस ना?? >> 'माहिती तंत्रज्ञान मुलगी' अगदी बरोबर बोलतेय! फक्त देवनागरीत लिहिणंच नाही तर "मायबोली"वर लिहिणार्यांचे आयडी सुद्धा मराठीच असायला हवे... आयटी...
|
Divya
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:14 pm: |
| 
|
LOL माहीती तंत्रज्ञान मुलगी. मला आधी कळलच नाही पटकन. 
|
Sashal
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:23 pm: |
| 
|
english ची सकाळी साडेपाच वाजताची tusion लावली होती >>> 
|
Sonalisl
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:37 pm: |
| 
|
माहीती तंत्रज्ञान मुलगी dkj djkksjd jds
|
Itgirl
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:42 pm: |
| 
|
.. माहीती तंत्रज्ञान मुलगी. मला आधी कळलच नाही पटकन.... म्हणून तर सुटसुटीत आयडी घेतला होता, आयटीगर्ल असा, कळले का टिउ आता??
|
Dakshina
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:28 am: |
| 
|
महेश, तुमची पोस्ट खूप आवडली. आणि मला पण माझ्या दहावीच्या परीक्षेची आठवण आली. मी गणितात अतिशय धड्ड होते. आणि घरच्या सगळ्यांना शंका होती की माझी बहूतेक बोर्डाच्या परीक्षेत दांडी उडणार. बाबा शाळेतच नोकरी करत असल्याने, पूर्वपरिक्षेतले माझे (विशेष करून गणितातले) रंग बघून त्यांनी त्यांच्याच शाळेतल्या एका शिक्षकांशी माझी गाठ बांधून दिलेली. अता ते शिकवणार मूलांना.. म्हणजे मारत पण असणार... पण मी हूं का चूं केलं नाही. मूकाट क्लास जॉईन केला. वेळ कमी असल्याने त्यांनी माझ्याकडून भराभर नुसते पेपर्स सोडवून घ्यायला सुरवात केली. पहील्या पहील्यांदा मला जाम झोप यायची. आणि तो क्लास काही थोडाथोडका नाही ४ / ४ तास असायचा. गणित हा विषय कोणी निर्माण केला असेल? असा विचार मी तेव्हा वारंवार करत असे. सुदैवाने परिक्षा जवळ येईपर्यंत माझे भूमितीचे ऑलमोस्ट सगळे प्रमेय पाठ झाले होते. त्या सरांनी मला वेगवेगळ्या यूक्त्या सांगितल्या होत्या ते लक्षात ठेवण्यासाठी. पूर्वपरीक्षेपर्यंत माझा नंबर माझ्याच शाळेतच (पद्माराजेत) होता, सुदैवाने बोर्डाच्या परीक्षेला पण तोच वर्ग आगदी तोच बेंच. गणिताचा पेपर उत्तम (माझ्या मानाने) गेला. नाचत घरी आले, आणि ताबडतोब शरदकाकांकडे (सरांकडे) गेले. आणि त्यांना तोच पेपर परत सोडवून दाखवला. त्यांनी साधारण मार्क किती पडतील ते सांगितलं (ते काही इथे देत नाही कारण अगदीच सूमार आहेत) निकालात फ़क्त ६ मार्कांचा फ़रक होता. (म्हणजे त्यांनी भाकीत केलेल्या मार्कांहून ६ मार्क कमी होते) असो, पण त्यावेळी जर त्यांनी माझं गणित (निदान तेव्हापूरतं तरी) पक्कं करून घेतलं नसतं तर आजतागायत कदाचित मी दहावी पासच झाले नसते. झकास कदाचित तूला न्यू हायस्कूलचे शरद कुलकर्णी माहीती असतील, हे तेच.
|
Hkumar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 7:55 am: |
| 
|
जुन्या दिवसांमध्ये 'गोट्या' खूप खेळायचो. विविध रंगांच्या गोट्या व तो मोठा 'हंटर' अजूनही आठवतो.
|
Dakshina
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:21 am: |
| 
|
हेमंत, त्या मोठ्या गोटीला मुलं वाट्टेल ती नावं देत.. 'टोंब्या', 'वड्डू'.... आणखी बरीच.. आता आठवत नाहीत..
|
Hkumar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 10:19 am: |
| 
|
दक्षिणा, ही नावे ऐकून मजा वाटली. मी नव्हती ऐकली ही.
|
Anaghavn
| |
| Wednesday, December 05, 2007 - 11:05 am: |
| 
|
महेश औ.बाद ला तुम्ही कुठे होतात?आणि कधी? अनघा
|
हेमंत, दक्षिणा आम्ही त्याला 'लडदू' म्हणायचो.
|
Manjud
| |
| Wednesday, December 05, 2007 - 12:05 pm: |
| 
|
आम्ही 'डफ्फर' म्हणायचो. एकदा मी खेळत असताना कोणीतरी पत्ता विचाराय्ला आलं. त्याला पत्ता समजावून देताना कावळा माझा डफ्फर घेऊन ऊडून गेला. त्याला ती त्याची अंडी वाटली बहुतेक... मी जाम भोकाड पसरून घरी गेले होते कारण माझ्या पिगी बॅंकेतले सगळे पैसे मी तो डफ्फर घेण्यासाठी वापरले होते. आणि त्या वेळेला त्याची किंमत असायची २५ पैसे....
|
Pillu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 12:57 pm: |
| 
|
वा दक्षिणा छान खरच बरे वाटले हा बिबि पाहुन आता मीही थोडेसे सांगतो तसे लहान पणी आमच्या घरी अठराविश्व दारिद्र्य काय बिशाद आम्हाला ४ दिवस सलग जेवायला मिळेल ५ दिवसा नंतरच आम्हाअला अन्न दिसायचे पण तेही पोटभर मिळ्याल्याचे आजही आठ्वत नाही. याकरीता शाळा कॉलेज हे सगळे काय आहे ते माहीत नाही. कॉलेज विश्व हे आत्ता पुस्तकात किंवा सिनेमात पहाला मिळते. असो तर या मुळे मी मामा कडे गावी गेलो हेतु हा की शेतात काम करुन गुरे राखुन जे काही मामा देईल त्यावर किमान घरी जेवाय्ला नक्की मिळेल. इथेच माझ्या गमती जमती आहेत आणी हेच माझे शाळा कॉलेज विश्व मी गुरे सांभाळ्त असताना माझ्या मित्राचा आणी माझा नेम कधी चुकायचा नाही. गाय म्हैस चुकुन दुसरी कडे गेली अन ऐकत नाही तर ती कितिही लाम्ब असली तरीही आम्ही जवळ न जाता शिंगाचा ने धरत असु बरोबर शिंग दगडाने असे उडवायचे की ते जनावर मागे फिरलेच पाहीजे( आता हे लिहिताना वाईट वाटते पण शेवटी हे लहान पणच ) आंबा हा एका दगडातच खाली पडला पाहीजे हा आमचा दंडकच पण यामुळे आम्हाला घाण सवयही लागली की दिवसा मधे एक तरी शिकार केल्या शिवाय घरी जायचे नाही. एकदा असे झाले की मला झाडवर चढायचा जाम कंटाळा आणी एका झाडाला भरपुर आंबे लागले होते आणी ते झाडावरच पिकले होते त्यामुळे दगड मारुन ते पाडणे शक्य नाही म्हणुन माझ्या मित्राला चाढायला सांगितले तो वरुन आंबा फेकायचा अन मी खाली झेलायचो त्याने एक असाच पिवळा धमक आंबा फेकला आणि तो माझ्या कडे न पडता झाडाखाली असलेल्या शिन्दाडीच्या फडात पडला त्याचे काटे लागतील म्हणुन मी मान वाकडी करुन लांब हात करुन तो खोडातुन काढायला लागलो पण झाले भलतेच त्याच वेळेस एक भाला मोठा नाग त्या खोडातुन पाठिमागुन आला आणी नेमका माझ्या हातात. मला वाटले कि मी आंबाच घेतला आहे म्हणुन मी तो ओढला आणी आंबा नसुन काहीतरी विचित्र पकडले याची मला जाणीव झाली. मी मग बघीतले की आपल्या हातात काय आहे तेव्हा कळले की तो नाग आहे आणी त्याच्या तोंडाचा मागचा भाग मी पकडला आहे. न गडबदता मी माझ्या मीत्राला संकाटाची जाणीव करुन दिली आणी तो प्रचन्द नाग मी ओढु लागलो त्याला काहीच करता येत नव्हते कारण झाड्याचा विचित्र भागात तो होता आणी मला तो शेपटी कडुन काही करु शकत नव्हता. मी त्याला सोडुन न देता तसाच ओढला आणी बाहेर काढला ओढल्या मुळे त्याला भयंकर काटे टोचले होते आणी तो चिडल्याचे स्पष्ट दिसत होते. एव्हाना माझ्या मित्राने झाडावरुन खाली ऊडी मारली होती. मी मग तो नाग लांब फेकला आणी तो नाग माझ्यावर चाल करुन आला मला काही करण्या अगोदर माझ्या मित्राने त्याला मारले होते.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, December 05, 2007 - 1:56 pm: |
| 
|
अरे बापरे पिल्लु तुम्ही खरच great आहात. महेश तु लिहिलेली दुधवाल्याची गम्मत
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|