आमिर खानचा नवीन पब्लिसिटी फ़ंडा नुकत्याच एका इंटरव्ह्युमधे त्याने "ब्लॅक" हा किती वाईट पिक्चर होता आणि त्यामधल्या सर्वानी किती over the top अभिनय केला होता हे सांगितलय. त्याला एखाद्या पात्राचा प्रेक्षकाना होणारा परिचय ही पद्धत जुनी वाटते. त्याला ब्लॅक मधे वापरलेला विSःअय हा insensitive वाटला होता. आणि त्याचा सर्वात मोठा आक्षेप आहे.. फ़िल्ममधे मिशेलचं पात्र पूर्ण वर्णन करतं त्याला.. ती आंधळी बहिरी मुकी असताना कसं काय "बोलते" हा प्रश्न पडलाय बिचरा भन्साली. दिवस वाईट आहेत त्याचे. म्हणून कुणीही उठुन तोंड सुख घेतय. ग.मत म्हणहे आमिरने स्वत" "दिग्दर्शित" करत असलेल्या चित्रपटासाठी creative directors ची एक टीम बाळगली आहे. एडीज नव्हे!!! म्हणजे एका आमिरसोबत तीन ते चार होतकरू दिग्दर्शक काम करतायत. फ़िल्म हीट झाली तर श्रेय कुणाचे. आणि फ़िल्म फ़्लॉप झाली तर कुणाचे. (लगान आमिर खानच.. गोवारीकरचा नव्हे आणी मंगल पाँडेमधे तर तो फ़क्त ऍक्टर होता ना... बाकीचा त्याचा पिक्चरशी संबंध नाही. ) आता तारे जमीन पर मतिमंद मुलाच्या आयुष्यावर आहे. बघूया आमिर किती sesitively हाताळतोय ते..
|
नन्दिनि, आमिरने त्याच्या ब्लॉगवर २ तासांपुर्वीच याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले आहे की त्या मुलीला प्रेमाने समजावण सोडून तिच्याशी फ़ाल्तु कडकपणा दाखवला आहे. हे चुकिचे आहे. शिवाय अमिताभ बच्चन सगळ्यात भारी आहे आणि मी स्वत्:ला त्याच्याबरोबर compare करुच शकत नाही हे लिहुन शाहरुखने केलेल्या दिडशहाणेपणा मी करत नाही हे indirectly दाखवले आहे. मायबोलिकर सौ. दिक्षीत (दिवाळी अंकवाल्या) यांनी स्पष्ट कराव की ब्लॅकमधील पध्दत बरोबर आहे का प्रेमाने समजावण्याची पध्दत बरोबर आहे. आमीरचे स्पष्टीकरण इथे पहा- http://www.aamirkhan.com/blog.htm ब्लॉगचा विषय Thanks for the drubbing on my smoking दुसर म्हणजे आमीर स्वत्: पिक्चरचा दिग्दर्शक आधी नव्हता. गुप्ते नावाचा आमीरचा मित्र(चित्रपटाचा लेखक) दिग्दर्शक करत होता. आमीरला स्टोरी आवडली चित्रिकरण सुरु झाले आणि नंतर दिग्दर्शक चित्रपटाला न्याय देउ शकत नाही असे आमीरला वाटल्याने त्याने दिग्दर्शकाला स्टोरी परत करित सांगितले की कुणाही दुसर्या हिरोला घेउन हा चित्रपट काढ. काही दिवसांनी दिग्दर्शक आमिरला म्हणाला की नाही तुच हा चित्रपटाचा नायक आहेस आणि तुच दिग्दर्शक हो. अशा प्रकारे आमीर दिग्दर्शक बनला.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:12 pm: |
| 
|
हे कोण ते ओळखा पाहु?

|
Prajaktad
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:16 pm: |
| 
|
उत्तर आहे
check for more stars and there pictures http://bollyfamily1.blogspot.com/
|
Dineshvs
| |
| Friday, November 30, 2007 - 3:06 am: |
| 
|
प्राजक्ता, फोटो अपलोड करताना नाव तेच राहिले की.
|
चिन्या, ब्लॅक जर पाहिलं तर तुला कळेल की मिशेल प्रेमाने "समजावण्याच्या" पलीकडे गेली आहे. communication हा भागच तिच्या आयुष्यात नाही. She cant expree herself तरी पूर्ण फ़िल्म ती वर्णन करते. तिचे लहानपणचे सीन हळूवर घेतले असते तर काय अर्थ राहिला असता? आणि दिग्दर्शनाबद्दल ह्त्त्प्://व्व्व.मिद्-दयओम्हित्लिस्त००७नोवेम्बेर६७३२४्त्म
|
Mandard
| |
| Friday, November 30, 2007 - 7:51 am: |
| 
|
ब्लॅक तसेच लगान बघायला भरपुर पेशन्स पाहिजेत. मला तर दोन्ही सिनेमे खुप हाइप केल्यासारखे वाटतात. लगान तर oscar परीक्षकांनी पुर्ण बघितला का नाही याचीच शंका येते. निद्रानाशावर दोन्ही सिनेमे तसेच सावरिया पण चांगले उपाय आहेत. side effect डोकेदुखी.
|
Giriraj
| |
| Friday, November 30, 2007 - 10:03 am: |
| 
|
black हा एका विदेशी चित्रपटाची फ़्रेम टो फ़्रेम कॉपी आहे असे मि ऐकले होते!
|
गिरी. ब्लॅकची कल्पना द मिरॅकल वर्करवरून घेतली आहे जो हेलन केलरच्या जीवनावर होता. पण तो फ़्रेम टू फ़्रेम कॉपी नाही आहे. टाईमने २००५ च्या सर्वोत्कृष्ट १० फ़िल्ममधे ब्लॅकला पाचवा नंबर दिला होता. (जगभराच्या फ़िल्म्समधे) आणि आमिर आता त्याविषयी बोलतोय २००७ मधे. दुसरं काही नाही त्याला फ़ैजल आणि किरण राव वादावरून लोकाचं लक्ष उडवायचे आहे आणि भन्साली सॉफ़्ट टारगेट आहे (भडकून काहीतरी बोलणारच.. ) पण झालं उलट भन्साली ऐवजी अमिताभ बोलला.. लगेच आमिरने शब्द फ़िरवले.
|
जर हेलन केलर्चे पुसत्क वाचले तर लक्षात येइल. तीने मिशेल जशी black मध्ये दाखव्ली आहे अगदी तसेच वर्णन केलय. आणि black मी पुर्ण पाहिला नाहिये पण मला लहान मिशेल चे काम फ़ार आवडले.
|
नन्दिनि, चित्रपटात जे दाखवतात ते सर्व खरच असत अस नाही आता लगे रहो मधे नाही का हॅल्युसिनेशन दाखवलय पण ते आपोआप कमी होत बिना औषधांच्या,भुलभुलैयातही तसच चुकिच दाखवलय. ब्लॅकमधे त्या मुलीला कुठला रोग झालाय हे आठवत नाही. तो जर सांगितला तर मी सांगु शकतो की ती खरच समजावण्याच्या बाहेर गेली होती का नाही. माझ्यातरी वाचण्यात अथवा बघण्यात आलेल नाहीये की दमदाटी, बळजबरी करुन असे पेशन्ट्स बरे होतात. पण समजाउन हळूवारपणे फ़रक पडतो हे नक्की. हळुवारपणे दाखवल्यावर अर्थच राहीला नसता हे चुकिचे आहे. तुम्ही ते कसे दाखवता हे महत्वाचे आहे. माझ्याही मते ब्लॅक हा चित्रपट बर्यापैकी कॉपी आहे. एकुणच चित्रपटातील वातावरण, इमारती,इंग्लिश बोलणे, रहाणीमान भारतीय परिस्थितले वाटत नाही. सगळ्यात महत्वाचा सीन म्हणजे जेवण करण्याचा सीन आहे. त्यात अमिताभ म्हणतो की हातानी खाण असंस्कृतपणाच लक्षण आहे. चमच्यानीच खाण सुसंस्कृत आहे. यावरुनच कळत की चित्रपट इंग्लिश चित्रपटाची कॉपी आहे. कारण भारतात रहाणारे हातानी खाण असंस्कृत आहे अस मानत नाही. आणि त्या मिड डेतल्या बातमीला काहीच अर्थ नाही. उगाच दुपारपर्यंत काही छापायला मिळाल नाही म्हणुन छापलय. जर अमोल गुप्तेला इतका आमीरचा त्रास होता तर त्याने स्वत्:ची स्टोरी त्याला डिरेक्ट करायला दिलिच कशाला??एका दिवसात चित्रपट बनत नाही. इतके दिवस तो गप्प का होता??लेखक आणि क्रीएटिव्ह डिरेक्टर अमोल गुप्ते आहे हे आमीरने २ महिन्यांपुर्वीच ब्लॉगवर लिहिलय आणि डिरेक्टर अमोल गुप्ते होता हेही लिहिलय. मग २ महिने काहीच का नाही झाल??अजुनही अमोल गुप्तेने स्वत्: काही स्टेटमेंट दिलेल नाही.
|
Asami
| |
| Friday, November 30, 2007 - 4:59 pm: |
| 
|
आणि त्या मिड डेतल्या बातमीला काहीच अर्थ नाही. >> LOL mid-day मधले cross words नि mid day mate सोडली तर बकीच्या पेपरला खरच अर्थ नसतो
|
Slarti
| |
| Friday, November 30, 2007 - 5:57 pm: |
| 
|
>>>उगाच दुपारपर्यंत काही छापायला मिळाल नाही म्हणुन छापलय.

|
Ajjuka
| |
| Friday, November 30, 2007 - 6:51 pm: |
| 
|
आमिर दिग्दर्शकाला overpower करतो, स्वतःची व्यक्तिरेखाच सगळ्यात जास्त highlight व्हावी, सगळे लक्ष आपल्याकडेच असावे यासाठी खूपच interfere करतो. अगदी editing मधे सुद्धा हे जगजाहीर आहे. यात काही नवीन नाही. अमोल गुप्तेने कुठेतरी आमिरच्या domination ला हरकत घेतली त्यामुळे हे घडलंय. पेपरमधे यायच्या आधीच हे सगळं काही 'जवळच्या' सूत्रांकडून मलाही माहीत होतं. अजून काही गमतीशीर गोष्टी पण माहीतीयेत. तार्यांच्या insecurities हा असाच गमतीशीर विषय आहे. याच insecurity पायी editing मधे नाक खुपसणारे तारे कमी नाहीत. आणि काही डबे expose झालेले असताना ते discard करणं शक्य नसतं. दुसरं म्हणजे.. नावाला असलेलं वजन.. आमिरने अर्ध्यातून सोडलेला सिनेमा कितीही उत्तम झाला असता तरी एकाही distributor ने उचलला नसता हे नक्की. अरे हो त्याच्या त्या भावाचा काय प्रकार चालू आहे नक्की? मी नेहरू सेंटरसाठी एक प्रोजेक्ट केलं होतं फैजल बरोबर... निर्बुद्धपणा, arrogance , शून्य talent या सगळ्या गोष्टी ठासून भरलेलं रसायन होतं ते. इतके senior लोक होते तिथे आणि हा सगळ्यांचा बाप असल्याच्या थाटात वावरत होता. परत श्वासचा पुणे रिलीज होता त्यामुळे मी actual show ला थांबू शकत नव्हते, असिस्टंट वर सगळं सोडून जाणार होते त्यामुळे तो माझ्यावर अजूनच भडकला होता. तसंही मी असले काय नी नसले काय तो आपल्या मनाप्रमाणेच कपडे चढवणार होता. तरी मला सांगे तुम यहा सीखने आयी हो.. शेवटी मी म्हणलं की बाबारे या नेहरू सेंटरमधे मी faculty आहे तर तोंडं वेडीवाकडी करत निघून गेला. बाकी ब्लॅकबद्दल म्हणायचं तर... शेरनाझ सोडता irritating अभिनय हे नक्की.
|
Farend
| |
| Friday, November 30, 2007 - 8:07 pm: |
| 
|
अमिताभ बद्दल कायम असे ऐकले आहे की तो त्याचे काम सोडून इतर कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ करत नाही (हे त्याला दिलेले आणि त्याने हौसेने केलेले काही महामठ्ठ रोल बघता खरे वाटते ). हे खरे आहे का?
|
Chandya
| |
| Friday, November 30, 2007 - 8:55 pm: |
| 
|
अमिताभ दिग्दर्शकाचा अभिनेता म्हटला जातो त्याअर्थी तो त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नसावा. मात्र त्याचे काही पिक्चर्स पाहून असे जाणवते कि त्या सिनेमाचे कथानक अमिताभलाच डोळ्यासमोर ठेऊन लिहिले असावे (किंवा त्याने तसे लिहून घेतले असावे?). multi-starrer सिनेमात त्याने इतरांचे फुटेज़ खाल्ले नाही असे जाणवते (उदा. अ. अ. ए., शान, शोले, नसीब)
|
अरे काय????हा BB तर एकदम थंड पडलाय
|
गेला. काल एकदाचा आरके माझा क्लायंट म्हणून गेला. माझ्यापेक्षा जास्त त्याला वाईट वाटलय... (नवीन आलेल्या पोरीला भेळपुरी आणि पाणीपुरी खायला बिल्कुल आवडत नाही. ) बाय द वे, ओम शांती ओमच्या यशानिमित्त शाहरूखने सर्व मीडीयाला पर्सनल लेटर पाठवून धनवाद दिले आहेत. आणि चिन्या, मिड डे आमिरकडे मुलाखत मागायला गेले नव्हते. त्याच्या फ़िल्मचं प्रमोशन चालू आहे. लग्नाच्या वेळेला मीडिया वाल्याना त्याने दिलेली वागणूक अजून मीडीयावाले विसरले नाहीत.
|
आमिर दिग्दर्शकाला overpower करतो, स्वतःची व्यक्तिरेखाच सगळ्यात जास्त highlight व्हावी, सगळे लक्ष आपल्याकडेच असावे यासाठी खूपच interfere करतो. <<<<आमिर ची power बहुदा home production मधेच चालत असावी . कारण DCH, रंग दे बसन्ति सारख्या films मधे भरपूर star cast होती आणि इतरांनाही त्याच्या इतकाच वाव होता , अर्थात लहान रोल मधेही अमिर कडे जास्त लक्ष जातं ती गोष्ट वेगळी . 
|
आणि चिन्या, मिड डे आमिरकडे मुलाखत मागायला गेले नव्हते. त्याच्या फ़िल्मचं प्रमोशन चालू आहे. लग्नाच्या वेळेला मीडिया वाल्याना त्याने दिलेली वागणूक अजून मीडीयावाले विसरले नाहीत. मिडियावाले शाहरुखला विकले गेले आहेत. आज हिंदुस्तान टाईम्सवाल्यांनी फ़्रंट पेजला पुर्ण पानभर OSO ची जाहिरात छापलिय. आज ईपेपरचा मेल पाठवला नव्हता म्हणुन साल्यांनी!!!मग मीच जाउन चेक केलं तर कळल की का मेल केली नव्हती. तरण आदर्शनी OSO ला साडेचार स्टार दिले होते!!!३च्या वरती या सिनेमाला स्टार नको द्यायला. काय आहे चित्रपटात???कॉमेडी म्हणुन चार स्टार द्यायचे तर हेरा फ़ेरी व इतर OSO हुन जास्त कॉमेडी चित्रपटांना ३ स्टारही मिळत नाहीत कधी. मिड डे वाले मुलाखत मागायला गेले नसतीलही पण काही तरी उगाच बातम्या कशाला छापायच्या???लग्नाच्या वेळेचा सुड घ्यायचा असल्यास फ़्री प्रेस वगैरेच्या गप्पा मिडीयाने मारू नयेत. बाकी मिडिया आमीरच्या विरुध्द नेहमीच लिहिते तरी त्याचे चित्रपट यशस्वी होतात याबाबत त्याला मानायला हवे. कारण DCH, रंग दे बसन्ति सारख्या films मधे भरपूर star cast होती आणि इतरांनाही त्याच्या इतकाच वाव होता राकेश ओमप्रकाश मेहराने आमीरला 'रंग दे'तील रेडिओवर बोलण्याचा सीन नंतर दिला होता पण आमीरने सांगितल की जुन्या स्क्रीप्टप्रमाणेच राहु देत.
|