Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 04, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through December 04, 2007 « Previous Next »

Dakshina
Monday, December 03, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आपल्यापैकी कित्येकजणं शिक्षण, नोकरी आणि मुली असतील तर लग्नाच्या निमित्ताने आपापली गावं, शहरं आणि कितीतरी जणं तर देश सोडून कुठेतरी जाऊन राहीले आहेत. त्यातल्या त्यात जे लोक ज्या शहरात / गावात जन्मले, त्या त्या गावात अजूनही बस्तान मांडून असले तर भाग्यवानच. दिवाळीचा बी.बी वाचल्यापसून 'जुने दिवस' असा बी.बी. असायला हवा असं मला वाटत होतं
तर.... आपण आपलं बालपण गेलेल्या शहरापासून कितीही लांब गेलो तरीही, आपल्या आठवणींची खुमारी काही कमी होत नाही. कुठे ना कुठेतरी, असं वाटतंच की अरे.. याला 'त्याची' सर नाही. मग ते काहीही असेल, एकदा मनावर कोरल्या गेलेल्या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही.
आज मी माझ्या गावच्या अशाच काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करून त्यांना उजाळा द्यावा म्हणते. यात फ़क्त गावाची स्पेशालिटीच असेल असं काही नाही, तर हा एक आठवणींना उजाळा असेल, की आपले जुने दिवस कसे होते? आणि आत्ता कसे आहेत? आपण तेव्हाची अशी कोणती खास गोष्टं आहे, जी आत्ता खूप मिस करतो.


Dakshina
Monday, December 03, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच अगदी, खास जाणवलेली गोष्टं म्हणजे, माझ्या एका ऑर्कूटवरच्या मित्राचा फोन आला होता, तो मूळचा कोल्हापूरचाच आहे, आणि अजूनही तिथेच आहे, बोलता बोलता Multiplex चा विषय निघाला, आणि तो म्हणाला की काय तुमची पूण्याची थेटरं ... 'राव दंगा पण करता येत नाही.' आणि मला ते इतकं पटलं. खरंच कोल्हापूरची काही थिएअटर्स ही फ़क्त दंगा करणार्‍या जमातीसाठी प्रसिद्ध आहेत. गाणं आवडलं की शिट्ट्या, थेट पडद्यावर नाणेफ़ेक सुद्धा.... black चे तिकिट कितीही महाग असलं तरीही एकदा पिक्चर पहायचा म्हणजे पहायचाच.

नाहीतर, इथे ना तो दंगा, ना त्या शिट्ट्या, थोडं उशिरा आलं तरीही लोक, किती चिडून पहातात... जणू काही अगदी त्यांचा थोडा जरी चित्रपट चुकला तर, त्यांना कोणी फ़ाशिची शिक्षाच देणार आहे.
मी आणि शेजारच्या काकू एकदा 'पडोसन' पहायला, 'पद्मा' टॉकिजला गेलो होतो, तिकीटाचा दर बाल्कनी फ़क्त रुपये 7 आता तिथे किती रेट आहे माहीती नाही, पण इथे मात्र दसपट झालाय.


Zakasrao
Monday, December 03, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा पद्माला आता नव नवीन चित्रपट येतात. तिकिट दर फ़ार तर ४० असेल. मी अजुन पर्यंत कोल्हापुरात पद्माला पिक्चर नाही पाहिलेला :-)
आणि अस बर्‍याच थेटराबाबत आहे. त्यामुळे गर्दी चिल्लर हे माहित नाही.
पण सरफ़रोश च्या वेळी मित्राने कालेजात येवुन सांगितले होते की तिकडे फ़िल्म सुरु झाली की इकडे घोषणा सुरुच. गदरच्या वेळी तसच होते म्हणे :-)
जुन्या दिवसातल मी मिस करतोय ते माझ्या सुट्ट्या. शाळेला सुट्टी लागली रे लागली की गावी जायच.
आणि तिकडे फ़ुल्ल धमाल हा एअक्मेव कार्यक्रम असायचा. :-)
त्यावेळी खेळात असलेले पत्त्यान्चे डाव (मेंढिकोट,वक्कय, 5-3-2 ), विहिरित केलेल्या दिवसातुन ५-५ वेळच्या अंघोळी, आमच्या पोहोण्याच्या किंवा पत्त्यांच्या नादात चरणार्‍या गायी म्हशी गायब व्हायच्या मग त्याना शोधण्यासाठी आमची पळापळ आणि धावपळ (कारण धारेची वेळ निघुन गेली की मग ते दुध घरीच शिल्लक रहायच डेअरीत नाही घलता यायच आणि घरी शिव्या मिळायच्या कधी रागाच्या भरात आमचे पत्ते चुलीतच जयचे आणि ते परवडण्यासारख नसायच), कोणाच्याहि बांधावरच्या झाडाचे काढुन खाल्लेले आंबे,पाळत ठेवुन पळवलेला फ़णस (काय करणार माझ्या मावशीच फ़णसाच झाड नव्हत म्हणुन मग चोरि ),काजुच्या झाडांकडच्या फ़ेर्‍या, त्यात्ल्या काजुंच्या बियांच केलेल फ़िक्सिंग ही माझी ही तुझी अस, झाडावरुन काढुन खाल्लेला मध (त्यामुळे मला डाबरचा विकतचा मध खावावत नाही. चवीत अति प्रचंड फ़रक आहे :-(), हे अणि बरच काहि आहे माझ्या जुन्या दिवसांच्या आठवणीत :-)



Dineshvs
Monday, December 03, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरच्या थिएटरची एक आठवण म्हणजे, तिथे मी एक गाव बारा भानगडी ( हा सिनेमा सुपरहिट होता ) हा सिनेमा चक्क गादीवर बसुन बघितला होता. त्यावेळी बायकांसाठी बाल्कनी राखुन ठेवलेली असायची. तिथे खुर्च्या नसायच्या, सगळीकडे गाद्या आणि त्यावर पांढर्‍याशुभ्र चादरी घातलेल्या असायच्या. आईबरोबर तिथे बसुन सिनेमा बघितलेला आठवतोय.
त्यावेळी थिएटर्स फ़ार छान होती. आता जी जुनाट वाटताहेत ती त्यावेळी अर्थातच चकाचक होती. पण एक किळसवाणा प्रकार म्हणजे, तिथे जिन्यात जागोजागी थुंकून ठेवलेले असायचे.


Zakki
Monday, December 03, 2007 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९५६ पूर्वी पुण्यात स. प. कॉलेजसमोर उदय विहार नावाचे हॉटेल होते. आमच्या घरापासून अगदी जवळ. कधी दोन आणे (सोळा आण्यांचा एक रुपया असे.) मिळाले की आम्ही त्या हॉटेलात बटाटे वडा खायला जात असू.

अर्थात आम्हा मुलांकडे कुणि लक्ष देत नसे, पण शुक शुक करून बोलावल्यावर एखादा वेटर यायचा. 'काय पाहिजे?' 'बटाटेवडा'
'दोन आणे पडतील, आहेत का?' 'हो' 'बघू'
'कुठून आणले? चोरून आणलेस ना? चल दे ते मला, तुला पोलिसातच देतो.' 'अहो नाही हो'.
हा सगळा प्रकार गल्ल्यावरचा मालक बघत असायचा. मग आम्ही रडकुंडीला आलो की तो उदारपणे म्हणायचा, 'जाऊ दे, दे त्यांना बटाटे वडा'. मग आमच्यावर ओरडून म्हणायचा, 'आत्तापासून हॉटेलात खाताय्, घरी मिळत नाही का खायला?, अभ्यास केलात का आधी? नाहीतर तुझ्या बाबांना सांग़ीन!'.

इतके झाल्यावर आम्हला काय त्या बटाटे वड्याची चव लागणार?
तरी आम्ही पुन: आपले दोन आणे जमले की तिथे हजर!


Zakki
Monday, December 03, 2007 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन. २६ जानेवारी १९५०. मी अजून शाळेत जाऊ लागलो नव्हतो, तरी मोठ्याभावाबरोबर त्याच्या शाळेत गेलो, चांगले कपडे घालून. जोरजोरात ओरडून वंदे मातरम वगैरे म्हंटले. मग आम्हाला प्रत्येकी दोन दोन लिमलेटच्या गोळ्या नि दोन आण्याचे चौकोनी चकचकीत नाणे दिले. ते सर्व घट्ट मुठीत धरून घरी आलो. तोपर्यंत हात, नि पैसे चिकट्ट होऊन गेले होते. मग आईने हात धुवून, गोळ्या ठेवून घेतल्या नि दोन आणे मला दिले. मी दिवसभर त्याच्याशी खेळलो, नि रात्री झोपताना उशाखाली ठेवून झोपलो.

दुसर्‍या दिवशी बर्‍याच वेळाने त्या पैशाची आठवण झाली. पण तोपर्यंत सर्व बिछाने उचलून ठेवण्यात आले होते. मी रडू लागलो, नि माझे मोठे भाऊ मला हसू लागले. तेंव्हा त्यांनीच ते पैसे घेतले असे म्हणून आमची चांगलीच जुंपली. मी भरपूर मार खाल्ला त्यांच्या हातचा, पण लवकरच देव येऊन तुम्हाला शिक्षा करेल, कंसाच्या तुरुंगात टाकेल, मग राम येऊन तुमच्यावर बाण सोडून तुम्हाला मारून टाकेल असे शाप दिले. मग आईने कशीबशी समजूत घालून मला थांबवले.

हे माझे मोठे भाऊ अतिशय वाईट्ट! पुढे आमच्या एक आजी नागपूरहून उन्हाळ्यात कल्याणला येत असत. आम्ही बिझिक खेळत असू. त्या नि मी पार्टनर, नि मोठे दोघे भाऊ पार्टनर. ते दोघे जे दनाद्दन प्रत्येक खेळीला जाम फसवाफसवी करायचे. मी चिडायचो. नि मारामारी सुरु करणार एव्हढ्यात् आजी ओरडून मलाच गप करायच्या! बिचार्‍या आजींना वेळ जायला काहीतरी हवे म्हणून त्या खेळायच्या. कोण जिंकले याचे त्यांना काही नाही, फक्त मारामारी न करता शांतपणे खेळा, एव्हढेच.

आता मी त्या आजींच्या वयाचा आहे. कधी कधी मुलाशी, जावयाशी खेळताना, लक्ष नसल्याने चुका होतात, नि ते चिडतात. मला त्याचे काही नाही!


Gsumit
Tuesday, December 04, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सगळ्यात जास्त एंजॉय केलं ते म्हणजे दहावीचं वर्ष... दहावीला असतानी आमच्या शाळेमधे संध्याकाळी सात ते अकरा स्टडी असायची, मी साडेसहालाच जेवण करुन निघायचो घरुन... आणी शाळेत येउन मस्त टाइमपास करत बसायचो, शाळेत फक्त एक शिपाइ असायचा (आम्ही त्यांना मामा म्हणायचो त्यांना :-))
येतानी लोकांच्या शेतातुन हरभरे, भुइमुगाच्या शेंगा अस पळवुन आणायचो अन शाळेत आणुन भाजुन खायचो... मामांना त्यांचा वाटा दिला की मामा खुश... :-)
मग रात्री सायकलीच्या रेस लावायचो, उसाचे ट्रक्टर दिसले की उस पळव असे उद्योग करायचो... अभ्यास कधी केल्याचे आठवत नाही.

परिक्षेच्या आधी अभ्यासासाठी सुट्या लागल्यावर घरात गडबड असती, लक्ष लागत नाही या नावाखाली लांब मित्राच्या शेतावर अभ्यासाला जायचो आणी बर्‍याच वेळा झाडाखाली गार सावलीत झोपा काढायचो... मग नंतर नंतर टेन्शन यायला लागल्यावर झाडावर चढुन वाचायचो... :-) पडायच्या भीतीने झोप तरी नाही लागायची.

आता अस कधी अनुभवायला भेटणार... आता गाव पण खुप बदललं, किंवा माझी पहाण्याची नजर बदलली, तेव्हाचे सगळे मित्रपण जॉबसाठी इकड तिकड पसरले... आता घरी गेल्यावर भटकणार तरी कुणाबरोबर...


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सगळ्यांनी किती छान छान आठवणी लिहील्यात. वाचून एकदम मस्त वाटलं. ...

उजळणी करावे असे, बहारदार दिवस मी पण कोल्हापूरातच जास्त अनुभवले. कॉलेजचे दिवस, केशव स्वीटस मधे मधल्या सुट्टीत खाल्लेली कचोरी. मी विद्यापीठला होते (कॉलेजला) त्याच्या बाहेरच एक रसवंती गृह होतं तिथे आम्ही खूप वेळा रस प्यायचो.

लहानपणी आम्ही वाट्टेल ते खेळ खेळायचो, बिट्ट्या, गजगे, सिगरेटची पाकीटं, सागरगोटे, विटी - दांडू, लपंडाव, गलोर. एक ना अनेक.

तुम्ही, शेंगांचा चेचून बॉल करायचात का? आम्ही पण करायचो, त्या. त्या शेंगा कसल्या असतात मला माहीती नाही, पण ती झाडं आमच्या घराच्या आसपास कुठेच नव्हती, आम्ही कुठून कुठून शोधून आणून तो चेंडू करायचो. मांजा दोरा, हात कापून घेणे. मी तर लहानपणी maximum मुलांच्यातच खेळायची. त्यामूळे मूलांचे सगळे खेळ मला माहीती पण होते, आणि खेळता पण येत होते.

रंगपंचमी हा एक अजून अविस्मरणीय सण, आम्ही अगदी वाट पहायचो, की कधी रंगपंचमी येतेय. कोल्हापूरात धूळवडीला रंग खेळत नाहीत, त्यामूळे रंगपंचमी खूप उशिरा येतेय असंच वाटायचं आम्हाला. म्हणून आम्ही सगळे मिळून रंग आणि पिचकारी खरेदी करायला आदल्या दिवशी जायचो. so that उगिच घरात ते रंग आणि पिचकारी बघून खेळायचा मोह नको व्हायला. रंग पण आम्ही ठरवून विकत घ्यायचे. म्हणजे मी लाल आणि जांभळा, तू अजून दोन निराळे रंग... असं. कोणितरी एकजण रंग तयार करण्याची जबाबदारी घ्यायचा. साधारण सकाळचे ९ वाजले की आम्ही सगळे खेळायला बाहेर. एक दोन वाजेपर्यंत मनसोक्त ख़ेळून घरी, जेवायला, तसंच रंगलेलं तोंड घेऊन. मग परत एकत्र जमून आमचा लिटरली सामूदायिक अंघोळीचा कार्यक्रम असायचा. आमच्या घराजवळ एक आड होतं, तिथे मूलं आम्हाला पाणि काढून द्यायची आणि मग आम्ही आंघोळी करायचो. कूणाचा रंग जायचा, कूणाचा रहायचा..... I really miss that


Hkumar
Tuesday, December 04, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी विटीदांडू व डबडाऐसपैस हे खेळ खूप खेळलो. आता शहरात तरी हे खेळ दिसेनासे झालेत.

Tanyabedekar
Tuesday, December 04, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डबडाऐसपैस.. कितीतरी दिवसांनी तुम्ही आठवण करुन दिली राव ह्याची.. आम्ही वाड्यात खेळायचो.. आणि मी सगळ्यात लहान होतो वाड्यात.. माझ्यावर डाव आला की बराच वेळ माझ्यावरच राहायचा.. सगळे येउन डबडा उडवायचे.. आणि मग माझी मोठी बहीण माझ्या वाटणीचा डाव घ्यायची.. आणि मी कृतघ्न.. कॉलेज मध्ये असताना तिला उगीचच त्रास द्यायचो.. तिला काहीही घेवून दिले तरी त्याची भरपाई होणार नाही..

लहानपणी (म्हणजे मी २-अडीच वर्षाचा होतो आमच्या आईच्या आठवणीप्रमाणे) एकदा मी तिला चावलो.. आई बाहेरुन आल्यावर तिला कळले आणि तिने मला विचारले की मी का चावलो. मी म्हणालो, ताईने मला मुद्दाम मारले म्हणुन मी तिला चुकुन चावलो.. मी लहान असतानाच मुक्ताफळे उधळली होती.. एव्हडी प्रेमळ होती ना माझी ताई..


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या गल्लीत दहीहंडीचा कर्यक्रम पण सॉल्ल्लिड असायचा. दहीहंडी बांधून ठेवायची आणि साधारण ४ वाजल्यापासून फ़ोडण्याचा प्रयत्न सुरू व्हायचा, मग लोक एकामेकांवर चढून आता फ़ोडणार असं वाटतय ना वाटतय तोपर्यन्त, कूणितरी गार गार पाणि फ़ेकायचं मग ५ / ५.३० च्या सुमारास कधीतरी ती फ़ोडून व्हायची, आणि फ़ोडणार्‍याला मिळायचे रुपये १०१ /- जो ते मिळवायचा तो हिरो. एकदा दहीहंडी एका छोट्या मुलाने फ़ोडली, खूप दिवस त्याचं कौतूक सुद्धा झालं.

पूण्याची दहीहंडी काही वाईट नाही, पण मोठ्यामोठ्याने गाणी लावून रात्री उशिरापर्यंत लोकांना ताटकळवून काय मिळतं? पूर्वी, कोल्हापूरात आम्हा मुलिंना दहीहंडी बघायला जायला काही भिती वाटायची नाही, पण इथे पूण्यात भिती वाटते.


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेमंत तुमचं अगदी खरंय, आजकाल हे खेळ खरंच नामशेष झालेत. आता पहावं तर लहान मुलं एकतर
कॉम्प्युटरवर गेम खेळतात किंवा क्रिकेट. इतर खेळ न च्या बरोबर झालेत.


Maanus
Tuesday, December 04, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीच्या बटाटे वड्यावरुन आठवले.

मी नविन नविन दाढी करायला लागलो होतो तेव्हा नव्ह्याकडे जावुन दाढी करायचो.
एक दिवस त्याला म्हणालो आज मिशा पण काढा
"बाप जिवंत आहे ना अजुन" ईती न्हावी :-)
ईमानदारीने व्यवसाय करणारे गेले वाटत आता.



लहानपनी संध्याकाळी भावु (अजोबा) बरोबर अंगणात बसायचो तेव्हा त्यांना विचारायचो अमेरीका कुठेय म्हणुन... ते म्हणायचे आपन आता जिथे बसलोय ना, तिथे खणत राहीलास की येईल अमेरीका. wish they were alive to see that I have dug that very big hole :-)

अंब्याच्या झाडावर tree house बांधताना मस्त मजा यायची. :-)

नदीवर कपडे धुताना आजीच्या साडीत मासे पकडायला एक फार आवडायचे... आता नदीवर गेलो तरी ते जमेल असे दिसत नाही :-)

miss those days when my mother used to pull out the computer plug. I was obsessed by that game "Age of Empires" that time.

miss those days of struggle, when I used to spend continues 3-4 days in office without bath or brushing. work for 20 hours and sleep for 4 hours on computer tables. :-)

miss those days when i used to wait for that crush in front of school gate :-)


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक गम्मत आठवली, मी आणि माझी बहीण ज्या शाळेत होतो, ती शाळा घरापासून बर्‍यापैकी लांब होती. काही दिवस, बाबांच्या शाळेतला शिपाई आम्हाला दोघींना (मी आणि माझी मोठी बहीण) घ्यायला आणि सोडायला यायचा. मग आम्ही बसने जायला सूरवात केली, तेव्हा बाबा पण यायचे, मग एक दिवस फ़क्त आम्हा दोघींवर जाण्याची वेळ आली, तर बाबांनी बस ओळख़ण्यासाठी खूण सांगितलेली की, ज्या बसवर 'जलाराम ट्रान्स्पोर्ट' असं लिहीलं असेल त्या बसमधे चढा.. म्हणजे ही पाटी नव्हती, तर बसवर लावलेली जाहीरात. आम्ही बरोब्बर पोचलो होतो शाळेत. आजही ते आठवलं तर किती मस्त वाटतं.

मी ३ रीला असताना हट्टाने, शाळेत एकटी गेले होते, आई - बाबा काळजीत पडले होते का नाही ते काही आठवत नाही, पण त्यांनी मला कडेकडेने जा, असं सांगितलेलं त्यामूळे, मी लक्षात ठेवून अगदी रस्ता क्रॉस करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत, कडेकडेने गेले होते, मग संध्याकाळी घरी आल्यावर 'कशी कशी गेलीस' विचारल्यावर मी प्रत्येक रस्ता, गल्लीचे नाव सांगितले. बाबांनी फ़ाऽऽऽर कौतूक केलं होतं माझं


Maanus
Tuesday, December 04, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

११ मिड टर्म ते S.Y.B.Com मी आणि माझा एक मित्र आम्ही रोज म्हणजे रोज थिएटर मधे मुव्ही पहायला जायचो. माझ्याकडे काही पैसे नसायचे, पण माझा मित्र जरा अती श्रीमंत होता.

मंगला मधे तर black वाले ओळखीचे झाले होते. त्यांना दर महीन्याला advance रक्कम देवुन ठेवायचो आणि थिएटर मधे गेलो की लगेच तिकीट तयार :-)

चुकुन कधीतरी मी तीकीट काढले तर मग वीजय किंवा अलका.

राम शस्त्र (जॅकी श्रॉफ चा) आम्ही पाच वेळा थिएटर मधे पाहीलाय, तेव्हा त्या काळात आले बाकीचे पिच्चर किती वेळा पाहीले असतील विचार करा.

पुण्यातले असे एक देखील थिएटर सोडले नाही, जिथे चित्रपट पाहीला नाही just name it . हो श्रिकृष्ण, अल्पना मधे देखील, एकदाच पण :-) त्या नंतर काही धाडस झाले नाही तिकडे जायचे.

man I have wasted too much time in my life. :-)


Manjud
Tuesday, December 04, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wish they were alive to see that I have dug that very big hole
माणसा, किती आजोबा होते रे तुझे?

शाळेत असताना इंग्लिशच्या तासाला आम्ही अश्याच एकमेकांच्या चूका काढायचो. ज्याच्या जास्त चूका तो सगळ्याना बटाटेवडा देणार असा अलिखित नियम होता आमचा....


Manjud
Tuesday, December 04, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि काय रे तुला झोप वगैरे काही नही वाट्टं.? आत्ता जागा कसा तू?

Maanus
Tuesday, December 04, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला आदरार्थी ईंग्लीश म्हणातात :-)...


शाळेत असताना आम्ही आमच्या ईंग्लीश च्या बाईंचे ब्लेड ने केस कापायचो :-)... त्या पाठमोर्‍या झाल्या की काही मुलांचे उद्योग सुरु व्हायचे :-)

म्हणजे एक एक केस कापायचो, त्यामुळे त्यांना पण काही कळायचे नाही.




well i just said, miss those days when my mother used to pull out the computer plug :-) ....

a weird thought came in my mind right now, not sure how to put it in words or if irony is appropriate word here. but i use laptop now and she may now say I miss those days when I was able to easily turn off that stupid machine.


Devdattag
Tuesday, December 04, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>miss those days when i used to wait for that crush in front of school gate
सागर..:-) शाळेच्या मागच्या गेटसमोर सायकल घेउन उभे असायचो, सकाळची शाळा सुटायची वाट पहात..:-)

Maanus
Tuesday, December 04, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Purani jeans aur guitar
Mohalle ki vo chhat
Aur mere yaar
Vo raaton ko jaagna
Subah ghar jaan
Kood ke deewar
Vo cigaretee peena
Gali mein jaake
Wo karna daanton ko
Ghadi ghadi saaf

Pahunchna college hamesha late
Vo kehna sir ka
"Get out from the class!"
Vo bahar jaake hamsha kehna
Yahan ka system
Hi hai kharaab
Vo jaake canteen mein
Table bajaake
Vo gaane gaana
Yaaron ke saath

Bas yaadein
Yaadein
Yaadein reh jaati hain
Kuchh chhoti
Chhoti
Baatein reh jaati hain
Bas yaadein..

Vo papa ka daantna
Vo kehna mummy ka
Chhodein ji aap
Tumhein to bas nazar aata hain
Jahan mein beta
Mera hi kharaab
Vo dil mein sochna
Kar ke kuchh dikha dein
Vo karna planning
Roz nayi yaar

Ladakpan ka vo pehla pyaar
Vo likhna haathon pe
A + R
Vo khidki se jhaankna
Vo likhna letter
Unhein baar baar
Vo dena tofe mein
Sone ki baaliyan
Vo lena doston se
Paise udhaar

Bas yaadein
Yaadein
Yaadein reh jaati hain
Kuchh chhoti
Chhoti
Baatein reh jaati hain
Bas yaadein..

Aisa yaadon ka mausam chala
Bhoolta hi nahin
Dil mera
Kahan meri jeans aur guitar
Mohalle ki vo chhat
Aur mere yaar
Vo raaton ko jaagna
Subah ghar jaan
Kood ke deewar

Purani jeans
Aur guitar..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators