| 
   | 
| | Maanus 
 |  |  |  | Wednesday, November 07, 2007 - 12:40 am: |       |  
 | 
 ही ही ही... काय आहे हे...
 
 
 |  | | Dakshina 
 |  |  |  | Monday, November 12, 2007 - 10:46 am: |       |  
 | 
 मला आठवतंय, अमच्या लहानपणी शेजरच्या सगळ्या आज्ज्या आणि काकवा
 मोठ्या भक्तीभावाने 'सत्यम शिवम सुंदरम' हा सिनेमा शंकराचा म्हणून पहायला गेल्या होत्या...
 आणि आल्यावर जाम शिव्या....इथे तर चित्रपटाच्या नावातंच घोळ...
   
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Monday, November 12, 2007 - 2:27 pm: |       |  
 | 
 दक्षिणा, मी अजुनही तो सिनेमा बघितला नाही. परवा त्यातले एक गाणी बघितले, तिचा देवळाची फ़रशी पुसायचा शॉट वैगरे, इतके किळसवाणे होते ना ते सगळे  !!!  चीप.
 
 त्यावेळी लोकांच्या धार्मिक भावना कश्या दुखवल्या नाहीत  ?
 
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Monday, November 12, 2007 - 6:32 pm: |       |  
 | 
 farend  एकदमच अचाट गाणे, कधी काळी आला होता हा मूवी? तो गोवींदा आहे?
 
 केदार,
 Exactly  मलाही कायम हा प्रश्ण देव्वाशप्पथ पडत आलाय की  superman   दिसेल अशी बाहेरून आणखी एक चड्डी कशाला घालतो. त्यात ओम शांती ओम बघितल्यापासून ज्यास्त छळायला लागलाय जसा शाहरुखला पडला तसाच?
 कोणाला माहीतीय त्याचे कारण?
   
 सत्यम शिवम सुन्दरम हा  picture  मी अजून पाहीला नाहीय. पण एकदा त्यातले गाणे बघितले शशी कपूरबरोबर, त्यात तो कसाही कुठेही झीनतला हात लावताना पाहून कल्पना आलीय की 'काहीतरी' विचीत्र आहे हा मूवी. बघयाला हवा.
 
 तसाच 'राम तेरि..' अजून नाही पाहीला. जेव्हा आला तेव्हा अती लहान असल्याने जाणे शक्य न्हवते तो पर्यन्त सगळ्या लोकांनी त्यातले काही सीन्स इतके  discuss  केले की नंतर जरा बर्यापैकी मोठे झाल्यावर मला तो  movie  पहायचाय म्हणायला चोरी होती घरी
  आणि  theater  मध्ये नंतर कधीच हे जुने मूवी लागत नाहीत ना. इथे आल्यावर पार विसरले. एकदा शांतपणे बसून अश्या राज कपूरच्या  so called creative movie  ची  list  बनवून पहायला हवे.. आहे तरी काय त्यात  for curiosity sake  हो
   कोणाला माहीतेय इथे  US  ला असे जुने  movie  मिळतात का ते?
 
 
 |  | | Farend 
 |  |  |  | Monday, November 12, 2007 - 6:46 pm: |       |  
 | 
 मनुस्विनी, तू बे एरियात आहेस का (बहुधा वाचलेले आठवते),  Cupertino library  मधे 'राम तेरी...' आहे. ते सीन्स वगैरे तेव्हा फार कुतूहल होते. फाल्तू दिग्दर्शक वाटेल तेथे अशी दृश्ये घुसडतात आणि जाणकार दिग्दर्शक कहानी की मांग तयार करतात
  . पण आता बघितला तर फक्त गाणी लक्षात राहतात. लताची गाणी महान आहेत त्यातील. एकूण चित्रपट नक्कीच बघणेबल आहे. 
 त्यातही एक अचाट व अतर्क्य आहे. राजीव कपूर कोठेतरी वादीयोंमे पहिल्यांदा फिरायला जातो, आणि तेथील निसर्ग सौदर्य पाहून जोरात ओरडतो. काय ओरडतो ते तुम्ही पिक्चर पाहिल्यावर कळेल का अतर्क्य नाहीतर निदान अचाट तरी आहे ते
   
 आणि हो तो गोविंदा चा ८० च्या दशकातील कोणतातरी चित्रपट आहे. संगीत राजेश रोशन चे वाटते.
 
 
 |  | मनुस्विनी. राज कपूर बघायचा असेल तर ब्लॅक ऍंड व्हाईट जमान्यातला बघ. आह आग आवारा श्री ४२० बूट पॉलिश जिस देश मे गंगा बहती है जागते रहो.. आणि रंगीत मधे संगम मेरा नाम जोकर बॉबी
 
 राज कपूरला दुसरं काही जमू न जमू देत  entertainment  करायला बरोबर जमायचं तेही त्या त्या पिढीची गरज ओळखून. सत्यम शिवम सुंदरम आणि राम तेरी गंगामैलीचा अपवाद (सिद्धार्थ कुणाच्याच लक्षात नाहिये.. ) सोडता राज कपूरने चांगले पिक्चर भरपूर दिले आहेत.
 
 
 |  | राजीव कपूर कोठेतरी वादीयोंमे पहिल्यांदा फिरायला जातो, आणि तेथील निसर्ग सौदर्य पाहून जोरात ओरडतो. काय ओरडतो ते तुम्ही पिक्चर पाहिल्यावर कळेल का अतर्क्य नाहीतर निदान अचाट तरी आहे ते
 <<<<कुठलं वाक्य रे
   तेच का ते येड्यासारखं  " गंगा लेने आया हूं ,  गंगा लेके जाउंगा ! "
  
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Tuesday, November 13, 2007 - 4:28 pm: |       |  
 | 
 या राजकपूरने, भल्या भल्या नट्याना, कपडे उतरवायला लावले होते.
 जागते रहो तसा सुंदर सिनेमा आहे. संपुर्ण सिनेमाभर राजकपूरला संवाद नाही. तशी हिरॉईनही नाही. फ़क्त शेवटच्या, जागो मोहन प्यारे, गाण्यात नर्गिसला तशी म्हणजे बिनब्लाऊजची उभी केलीय.  (  तरी ते प्रकरण सभ्य होते कारण तिला भिजवले नव्हते.  )
 संगम मधे वैजयंतीमालाला बिकीनीमधे दाखवले होते.
 मेरा नाम जोकरमधे तर पद्मिनीला, जवळजवळ विवस्त्रच केले होते. त्यात सिम्मिचाही तसला सीन होता, पण पुढे तो कापला.
 राम तेरी गंगा मैली मधे मंदाकिनी ला पण तसेच दाखवले. पण त्याच्यापुढे तिला काही करताच आले नाही.
 नंदिनी, सिद्धार्थ म्हणजे सिम्मि आणि शशि कपुरचा ना  ?  तो राज कपुरचा कुठे होता  ?
 
 
 |  | | Asami 
 |  |  |  | Tuesday, November 13, 2007 - 7:51 pm: |       |  
 | 
 राम तेरी गंगा मैली मधे मंदाकिनी ला पण तसेच दाखवले. पण त्याच्यापुढे तिला काही करताच आले नाही. >> तुम्हाला त्याला म्हणायचेय का
   
 मला वाटते मेरा नामच्या अपयशानंतर राज कपूर सुटला. त्याच्या चित्रपटातल्या सामाजिक जाणिवांनी डुबकी खाल्ली. कुठे तरी हे वाचले होते
 
 
 |  | संपुर्ण सिनेमाभर राजकपूरला संवाद नाही'
 >>>>..
 दिनेशदा. या सिनेमामधेच राज कपूरला एक सो एक ग्रेट संवाद आहेत. क्लायमॅक्सच्या त्याचा मोनोलॉग आजही कित्येक अभिनय शाळेत परीक्षेला ठेवतात. अवघ्या एका रात्रीत आणि एका बिल्डिंगमधे घडणारी ही कथा आहे.
 अर्थात गाणी एक सो एक आहेत. नर्गीस जरी बिनब्लाऊजची असली तरी "सभ्य" दिसते. तिचा रोलच मुळी  angel चा आहे.
 
 असामी. बरोबर,मेरा नाम च्या अपयशानंतर राज कपूर म्हणाला "लोगो को अगर कचरा पसंद आता है तो मै भी कचराही दूंगा." त्याचा फ़ालतू बॉबी सर्वात जास्त चाललेला पिक्चर होता.
 
 पण त्याच्या पिक्चरमधे  nudity  हाच एक भाग कधीच नव्हता. त्याचा महेश भट्ट कधीच झाला नाही. याचा प्रत्यय "प्रेम रोग" मधे येतो. अख्खा रेप सीन त्याने इतक्या सुंदर रिया हाताळलाय... त्याला तोड नाही.
 
 
 
 |  | | Dakshina 
 |  |  |  | Wednesday, November 14, 2007 - 5:53 am: |       |  
 | 
 सगळ्यांचे मत राज कपूरबद्दल वेगवेगळे असू शकते, त्याला मला काही धक्का लावायचा नाही, पण तो  Obsessive  होता हे मात्र नक्की.. त्याचा बहुतेक चित्रपटात स्त्रीचे सौंदर्य ठळकपणे वापरण्याकडे खूप कल होता..
 
 दिनेश :  अहो, मेरा नाम... मधे तो सिम्मीचा सीन कापालाय कुठे? मी पाहीलाय तो. त्यावेळी असला सीन म्हणजे सिम्मीला  hats off.
 
 शिवाय राम तेरी... मधे सुद्धा, मंदाकिनी चे जे काही रूपडे दाखवलेय, त्यामूळे त्या चित्रपटाने भरपूर गर्दी खेचली. माझ्या मते राज कपूरला लोकांना काय हवे.. याची गोम व्यवस्थित कळली होती. राम तेरी काही अगदीच टूकार नव्हता... रसिकांनी त्याची गाणी खूप उचलून धरली होती... आणि आंबटशौकिनांनी मंदाकिनीच्या अंघोळीचा सीन....
 
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Wednesday, November 14, 2007 - 5:51 pm: |       |  
 | 
 नंदिनी, जागते रहो बघुन बरिच वर्षे झाली. बहुतेक परत बघावा लागेल.
 दक्षिणा, मी टिव्हीवर बघितला त्यावेळी ते सीन नव्हता.  (  ती पाण्यात पडते आणि मग गवताच्या मागे जाते वगैरे  )
 नंतर एक गाणे, काटे ना कटे रैना, पण कापले होते. पद्मिनीच्या बॅरलमधल्या अंघोळीचा सीनही मग नव्हता.
 
 
 
 |  | जागते रहो माझ्या आठवणीप्रमाणे आरके बॅनरचा चित्रपट नाहीये. त्यामुळे त्याला राज कपूरचा पिक्चर म्हणता येणार नाही. शंभू मोइत्राचा आहे जागते रहो.
 
 जिंदगी ख्वाब है ह्या गाण्याला मात्र तोड नाही.
 
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Thursday, November 15, 2007 - 6:30 am: |       |  
 | 
 जागते रहो हा मी पाहिलेला राज कपुरचा (एक्टिंग) बेस्ट चित्रपट होता.
 त्याचा दिग्दरशक वेगळा होता. राज कपुर नव्हता.
 black comedy type  चित्रपट आहे.
 मेरा नाम जोकर मला चांगला वाटला होता. त्यातील तो सिन मी पाहिलाय बहुतेक. नीट आठवत नाही. पण खुप लोंग शोट आहे आणि पाठमोरा सीन आहे. ती सिम्मी गरेवाल नसेल दुसरीच एखादी डमी वै असेल असे वाटते.
 राम तेरि गंगा मैली हा तर निव्वळ लोकानी राज कपुरचा म्हणुन गाणी खुप छान आहेत म्हणुन आणि काहि जणानी त्या सीन साठी पाहिला असेल. मंदाकिनेने खुपच मोठे धाडस केले असे म्हणावे लागेल.
 आग, आह आठवतच नाहियेत. बरेच दिवस झाले पाहुन. आवारा आणि श्री ४२० पण चांगला होता.
 संगम,राम तेरी गंगा मैली,बॉबि हे मी पाहिलेत. फ़ार ग्रेट नाहियेत. बरे आहेत. गाणी सगळीच अप्रतिम असायचीत मात्र.
   संगम मधे वाजवलेल बॅगपाइपर ऐकुन इतक मस्त वाटत ना
   जुने राज कपुरचे चित्रपट पहायला हवेत परत एकदा.
   
 
 |  | | Chinya1985 
 |  |  |  | Thursday, November 15, 2007 - 10:25 pm: |       |  
 | 
 RK बॅनर्स सध्या चित्रपट बनवतात का??गेल्या ५-१० वर्षात त्यांनी कुठले चित्रपट बनवले आहेत???सावरिया सोदुन सांगा.
 
 
 |  | | Farend 
 |  |  |  | Thursday, November 15, 2007 - 11:51 pm: |       |  
 | 
 'प्रेम ग्रंथ' नंतर आणखी कोणता आल्याचे आठवत नाही. त्यात बहुधा निवृत्ती मधून बाहेर काढलेले ऋषी कपूर व माधुरी होते.
 
 
 |  | आ अब लौट चले...
 अक्षय खन्ना ऍश्वर्या राय. गाणी चांगली होती पण पिक्चर गाजला नाही.
 बाय द वे रणबीर याचा असिस्टंट डिरेक्टर होता.  RK  सध्या स्टुडिओ भाड्याने देतो. ब्लॅक सावरियाचे बहुतेक शूटिंग तिथेच झाले आहे.
 
 शांतनु, जागते रहो आरकेचाच आहे. पण दिग्दर्शक मात्र राज कपूर नाही. (म्हणजे फ़क्त नावापुरता...
  ) 
 चिन्या, सावरिया आरके चा नाही. सोनी पिक्चर्स (हॉलीवूडवाले) याचा पहिला हिंदी फ़िल्म आहे. परत हिंदी पिक्चर्स बनवण्या आधी आता ते दहादा विचार करतील. भारतीय प्रेक्षकाचे नस ओळखून हिट पिक्चर्स देणं सोपं नाही आहे.
 पण रणबीर सीरीयसली आरकेचा फ़िल्म बनवण्याचा विचार करतोय. दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे टॅलेंट आहे.
 
 बाय द वे कुणी रणबीरचा पहिला पिक्चर पाहिलाय का? यु ट्युबवर आहे.  India 1964  नावाने. तो बघा.. मग मी एक गंमत सांगेन.
 
 
 
 
 
 |  | | Dakshina 
 |  |  |  | Tuesday, November 20, 2007 - 5:12 am: |       |  
 | 
 परवा केबलवर 'विवाह' नावाचा सिनेमा लागलेला, सुदैवाने अणि दुर्दैवाने मी चित्रपटाचा शेवट शेवटचा भाग पाहीला, निव्वळ तद्दन असच म्हणता येइल. तर्क आणि कथा याचा तर दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. सुदैवाने अशासाठी म्हटलं कारण इतका महान चित्रपट (?) मला फ़ार वेळ झेपवावा लागला नाही. अणि दुर्दैव म्हणजे,  actually  पाहीला असता तर कोल्हापूरी भाषेत, सिनेमाची अजून मापं काढता आली असती.
 
 बापरे! ती हिरॉईन, बहीणीला वाचवताना, ते वरच, जळकं मोठं लाकूड आपल्या अंगावर पडायची वाट पहाते.(?) दवाखान्यात पण ती फ़क्त "छोटी ठिक है?" "छोटी ठिक है?" इतकंच विचारते. इतकं भाजलेल असून इतकं भान? कमाल आहे डायरेक्टरची. आणि चेहर्यावर भाजलेल्याचा जराही लवलेश नाही. अचाट म्हणजे, आलोकनाथ तिला येऊन भेटतो, त्याहूनही अचाट म्हणज़े शाहीद तिथे येऊन तिची मांग भरतो.  Burn Ward  मध्ये कुणाला घुसू पण देत नाहीत, मारे हे येऊन लग्नं बिग्नं करतात. शिवाय,  तिच्यावर सर्जरी कसली करतात कोणजाणे. भाजलेलया व्यक्तीला लगेच सर्जरी करून एक ते दिड महिन्यात घरी परत पाठवण्याचा पराक्रम फ़क्त सिनेमातच घडू शकतो. भाजलेल्याच्या जखमा भरण्या आगोदरच प्लास्टिक सर्जरी? ...
   
 
 
 |  | | Divya 
 |  |  |  | Tuesday, November 20, 2007 - 4:26 pm: |       |  
 | 
 दक्षिणा अग तो विवाह बरा असा त्या बडजात्याचा हम साथ साथ है  movie  म्हणजे कहर आहे. दुसरा रामायणपटच आहे तो  movie  म्हणजे. मी फ़ार हसले होते तो  movie  बघताना. मैने प्यार किया नंतर त्याला एकही धड पिक्चर काढता आला नाही.  HAHK  माधुरी आणि गाण्यांमुळे जरा बरा पण ती ही लग्नाची कॅसेटच वाटते.
 
 
 |  | | Dakshina 
 |  |  |  | Wednesday, November 21, 2007 - 7:04 am: |       |  
 | 
 खरंय गं दिव्या.... हम साथ साथ... म्हणजे कहर... मिनिटा मिनिटाला संगित नाटकासारखं गाणं....
 वैताग येतो बघून आणि ऐकून...आणि झी सिनेमाला सारखा तोच पिक्चर लावतात.
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |