|
Gobu
| |
| Thursday, November 22, 2007 - 6:20 pm: |
| 
|
मनुस्विनि, अनुमोदन! स्वच्छ व टापटीपीत रहाणारा, स्वतच्या वस्तु वापरणारा, जरुरी असेल तिथे पैसे खर्च करणारा, दुसर्याला मदत करणारा, आणि दुसर्याने केलेले उपकार लक्षात ठेवणारा मल्लु मला अद्याप दिसलेला नाहीय....
|
Manuswini
| |
| Thursday, November 22, 2007 - 6:53 pm: |
| 
|
गोबु, ते मल्लुचे सोड, बहुतेक जणे असे असतात. मुळात स्वत नोकरी करत असताना सुद्धा कुठे फुकटात चालत असेल शोधणारी सगळेच अशी असतात. nkashi , अग काय आहे ना, बर्याच वर्षाची ओळख आहे तेव्हा असे फटकन तोडणे कठीण वाटते(म्हणजे हा माझा विचार आहे...). बरे काही सांगीतले तर 'चुक' दाखवते स्वतला मोठी समजते असे statements , मग आपल्या सारख्या sensitive लोकांनाच 'मनस्ताप' खुप होतो. Believe me,swear by my expereince . अजून 'नाही' कसे म्हणायचे शिकायचेय मला.......... जेवण करण्याचा प्रश्ण नाही, उलट मला आवडते पण घरी सकळपासून बसायचे नी नको त्या चौकश्या. पाच मीनीटवरच्या walking distance apt complex मध्ये रहाते मग एकदम सकळी उठून दारात मग काय दरवाजा उघडायचा नाही? सांग.. जीमला जायचा बहाणा असतोच सकाळी शनीवारी. कारपूल तर अजीबात करणार नाही. कीती वेळा hint दीली की बाई, स्वतची गाडी सुद्धा काढ कधी. जीमला पुर्ण एक आठवडा तेच कपडे, घामाने डबडबलेली मझ्या गाडीत येवून बसेल तेव्हा इतका दर्प मारतो, कीती वेळा सांगून, यार तु perfume मार या तो जीम का दुसरा नया सेट ले कपडेका. इतकी मिरची लागते शेवटी मी सोडून दीले. कसे थांबवू तीला हेच कळत नाहीय.... ह्याला वाईट वाटेल, वाईट दिसेल ह्या वरच गाडी अडते माझी.
|
Shraddhak
| |
| Friday, November 23, 2007 - 5:18 am: |
| 
|
कसे थांबवू तीला हेच कळत नाहीय.... ह्याला वाईट वाटेल, वाईट दिसेल ह्या वरच गाडी अडते माझी<<<<< मनु, एक सांगते. एकदा काय ते स्पष्ट बोलले तर कदाचित थोडा वेळ मनस्ताप होईल. एकदाच... पण इतर शंभर वेळा होणारा मनस्ताप बंद होईल. बघ, पटतंय का?
|
Nkashi
| |
| Friday, November 23, 2007 - 6:33 am: |
| 
|
श्रद्धाला अनुमोदन.... मी काही एकदम तोडुन टाक अस म्हणत नाही पण जर फ़ार वर्षांची ओळख असेल आणी "hint" देउनही समजत नसेल तर स्पष्ट सांगन जास्त बर उगाच आपल्या चांगुलपणाचा कोणी फ़ायदा घेत असेल तर नक्किच........ बघ तुला पटतय का १. atleast once a week तिला clearly सांग तुझ्या कार ने gym ला जाउ. २. नुसत्याच बसुन चौकशा करण्यापेक्षा तिला जेवण बनवताना मदतीला घे. ३. whenever with u, make sure she is busy all the time or best don't ans all her Qs ४. तुला न आवडणारे प्रश्न topics विचारत असेल तर तिला सांग "बाई ग आपण दुसर्या कुठ्लया तरी विषयावर बोलू" रागाऊ नकोस पण मागे एकदा तुला अनुभव आला आहे. be careful
|
Meenu
| |
| Friday, November 23, 2007 - 8:46 am: |
| 
|
बाय द वे मनु तिच्यात काही +ve आहे का ? नाहीतर तोडुन टाक उगीच कशाला ताप ..?
|
Manuswini
| |
| Friday, November 23, 2007 - 10:13 pm: |
| 
|
श्र, nkashi , राग नाही ग. मीनु, you pushed me to think, good question, we just forget at times certain things and get carried away. +ve असे काहीच नाही ग. ( it took five minutes over the question and answer is No ). सांगीतले तर खोटे वाटेल, आणि वाटेल मी खरोखर इतकी बुद्धु आहे का प्रश्ण पडेल पण बहुधा चुक माझीच की उगाच तीला जवळ केले. सुरवातीला वाटायचे जवळ रहाते, company म्हणून पण त्रास ज्यास्त आहे. बरे तिच्या चांभारचौकश्या स्वभावाने तीला माझे friends, relatives सगळे माहीती आहेत, कधी कुठे चालली सांगीतली तर इथे का,तिथे का हे प्रश्ण. बरे आता तर एकाच ऑफ़ीसमध्ये. स्वभाव इतका घाणेरडा आहे हे उशीरा कळले. काय करते माझ्या सर्व friend ची ओळख काढून स्वत गप्पा मारेल, ऑफ़ीस collegue शी दोस्ती त्यामुळे कधी मला ऑफ़ीसचे काम आहे मी सांगू शकत नाही कारण हीला माहीती असणार ना मी कधी travel करते ते. बरे घरी नाही सांगीतले तरी ५ मीनीटाच्या अंतरावर रहाते तर इतकी लबाड ना आधी येवून parking lot मध्ये माझी कार आहे का चेक करणार, फोन न करता येणार. एकदा वैतागून दरवाजा उघडला नाही तर कार न घेता कुठे गेली होतीस असे प्रश्ण. बरे जिथे जाईन तिथे येणार. माझे सगळे घरचे private function ला न सांगता हजर. नाकी नऊ आणलेत. जेवणात मदत कर सांगणे कठीण कारण बसल्या हातला चाळे, नखे तोड, केस खजवत बसेल. एकदा हात न धुता भाजी कापायला आली नी सगळी भाजी carpet वर सांडली ती तशीच घेतली. बरे म्हटले हात धू तर हां हां पता है तु cleanliness maniac है, हॉटेल मे खाना नही खाती क्या कभी, वहा देखती है क्या हे उत्तर. मी म्हटले तो फिर घर और हॉटेल मे फरक क्या? तरी निर्लज सदा सुखी. सरळ घर जरा लांब बदलायचा विचार केलाय. उगाच कडवटपणा कशाला. बरे माझे friend आता स्वतचे केलेत. बर्याच friend ना मी थोदे सांगीतले की हीला ज्यास्त entertain करु नका म्हणून. इतकी लोचट वृती मी कधी बघितली नाही पण...................
|
Meenu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:33 am: |
| 
|
हं मनु तुला लांब घर घेणं बरं वाटत असेल तर तसं कर. अगं पण हा काही पर्याय असु शकत नाही. अशी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळता यायला हवी तेही आपलं नुकसान न होऊ देता. तुला तिला हे स्वच्छपणे सांगता यायला हवं की माझ्याकडे यायचं असेल तर फोन करुन मला विचारुन मगच ये. माझ्या वैयक्तिक बाबीत लक्ष घालु नकोस. कधी कधी तोंडावर दार बंद करावं लागलं तरी जमायला हवं.
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 28, 2007 - 4:05 am: |
| 
|
सरळ घर जरा लांब बदलायचा विचार केलाय. उगाच कडवटपणा कशाला>>>मने!मला वाटल नाही तु इतकी भिडस्त असशिल..ऽसो prob सिरियस आहेस.. तु थोड जास्तच स्वांत्रंत्य दिलय अस वाटत नाहि का तुला?तु म्हणतेस तशी ति जरा निर्लज्जच दिसतिय त्यामुळे हिंट देवुन उपयोग नाही...सरळ स्पष्ट सांगुन टाक..किंव चक्क avoid च करायचे.. माझ्या complex मधे ही एक गुलटि राहते.ऽगदी फ़ुकट्चंद...सतत नेट वर फ़्रि डिल्स शोधणार.. एकदा एका fair ला हिला एका फ़ेमस शोचे तिकिट फ़्रि मिळाले..तर हि पठ्ठी म्हणते..पार्किंग तो पे करना पडेगा ना?..आता बोला!
|
Mandarnk
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:18 pm: |
| 
|
माझा एक रुममेट मोठमोठ्यानी गाणं म्हणत आंघोळ करत असे. इतक्या मोठ्यानी की बाथरुम च्या बाहेर अख्ख्या अपार्टमेंट मधे त्याचा आवाज घुमत असे. आणी बर्याचदा त्याला सकाळी लवकर जायचं असायचं कुठेतरी, विकेंडला सुद्धा! वरवर साध्या वाटणार्या या किस्स्याचं गांभिर्य ज्यांनी साखरझोपेत असताना त्याची गाणी ऐकलीत त्या (बिचार्यांनाच!) कळेल!!! काहींचा गळा गोड असतो तर काहींचा गळा केवळ तिथल्यातिथे दाबावा असा असतो, नाही?
|
Chinnu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 4:48 pm: |
| 
|
माझी एक महान मराठी शेजारीण आहे. सतत दरवाज्याबाहेर ताटकळत असते, केव्हा दार उघडेल आणि केव्हा घुसायचे घरात. नाहीच उघडले तर दिवसातून दहावेळा मेसेज ठेवते. आंघोळीचा पत्ता नसतो. न तिच्या ना मुलीच्या. पुजा वगेरे प्रकार बहुतेक करून माहित असल्यासारखे दिसतात. घरी घुसून येतेच शिवाय आंघोळ न करताच देवघर आणि रिलेटेड वस्तू हाताळणे. किचन मध्ये बिनदिक्कत घुसणे. फ़्रीज आणि आतील वस्तू आपल्याच समजणे ह्या सर्व गोष्टी अतिशय निर्लज्जपणे करते. अगदी दुसर्या खोल्यांमध्ये परवानगीशिवाय हे काय ते काय म्हणून निर्लज्जपणे नाक खुपसणे तीच करू जाणे! तिच्या फ़्री डील्स बद्दलच्या हाव्रट आणि वाईट सवयीमुळे मॅडमने कित्येक ठिकाणी आमचा आणि कितितरी लोकांचा पत्ता टाकला आहे इकडे तिकडे. पुन्हा पत्रे चुकुन बाहेर सापडलीच तर फोडून वाचणार. अगदी निर्लज्जपणाचा 'कळस'. दार उघडले नाही तर चार लोकांना फोन करून सांगणार! स्वयंपाकाची कथा यथा तथाच आहे. मी चाखुन पाहते पासून(टेस्ट करायला चमचा वापरता येतो हे माहित नसते तिला, सरळ हात घालणार ई ई ई!) माझ्या नवर्याला आवडते म्हणून सरळ घरी नेण्याची पद्दत आहे! आतापर्यंत जे पण मराठी शेजारी वा मैत्रिणी मिळाल्या त्या जरी २ सेंट्स ची चिंता करणार्या असल्या तरी वैयक्तीक बाबीत नाक न खुपसणार्या होत्या. मॅडम पहिला प्रश्न विचारणार तो म्हणजे विसा स्टॅटस काय आणि जीसी झाला का? बरं प्रकरण तिथेच थांबत नाही तर त्याची आजूबाजूला व्यवस्थित जाहीरात करुन होते, नावासकट! माझे जावुं दे, पण एक दिवस कुणी नॉन मराठी खात्रीने एक्स्ट्रीम ऍक्शन घेईल यात मला अज्जिबात शंका नाही! देव तिला आणि तिच्यासारख्या 'कळस' प्रकरणांना सावरण्याची बुद्धी देवो. इति.
|
Chinnu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:08 pm: |
| 
|
गर्दीमध्येही ठिरामे सहज ओळखू येतात. खाण्याचे ताट घेउन चोरट्या नजरेने दुरुनच गर्दी न्याहाळत असतात! चुकून त्यांच्या 'हपिसा'तले कुणी भेटलेच की मग यांच्या जीवात जीव येतो. तसे कुणी उत्साही माणसाने हात पुढे करून ओळख करून घेतल्यास अगदी संधी मिळताच, टपकन यांच्या तोंडून प्रश्न बाहेर पडणार, जी सी झाला का?!
|
Farend
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:23 pm: |
| 
|
ठिरामे? कळलं नाही चिन्नू. आणि ते महान शेजारी येथे अमेरिकेत आहेत? विस्कॉन्सिन मधे दारासमोर घुटमळणे म्हणजे रस्त्यावर ती एकच व्यक्ती बराच वेळ असणार
|
Chinnu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:47 pm: |
| 
|
अमोल, ती महान शेजारीण बर्याच लोकांच्या डोक्यात जाते. फुकटी तर आहेच पण मागचा पुढचा काही विचार करत नाही बोलतांना! एका कन्नड मैत्रिणीकडे ही शेजारीण आली असतांनाची गोष्ट. मैत्रीण नुकतीच grocery घेवुन आलेली. तर हीने तेलाचा डब्बा उचलला. अन कन्नड मैत्रिणीला म्हणे अय्या एव्ह्ढा मोठा डबा! तू काय करते याचं? मैत्रीणीच्या नवर्याने लगेच उत्तर दिलं. म्हणाला आम्ही तेलाने अंघोळ करतो! ती कन्नड मैत्रीण मला म्हणते एक न एक दिवस हिचे कुणीतरी दात तोडणार, तेव्हा तिने insurance ची तजवीज केलेली बरी! या शेजारीणीचे सुदैव (आणि शेजार्यंचं दुर्दैव) असं कि ती लिफ़्टच्याजवळ राहते. त्यामुळे कुणी ओळखीचे लिफ़्टने वर आले की बाई दार उघडून समोर. मग काय आणलय नाही ते 'उघडून' पाहिल्याशिवाय आणलेल्या वस्तुंना घरात प्रवेश मिळत नाही!
|
Farend
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:50 pm: |
| 
|
ओह ठिरामे त्यांचे आडनाव आहे का? मला वाटले की एखादा slang शब्द मला माहीत नाही.
|
Chinnu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:50 pm: |
| 
|
कुठून एकदा अवदसा आठवली आणि एका पंजाबी मैत्रिणीला हळदीकुंकवाला बोलाविले होते. तिला फोनवर कल्पना देवून ठेवली तरी हिचे इतर लोकं आल्यावरही नाकं मुरडणे चालूच. वाण हातात ठेवले तर म्हणे ये सब ड्रामा है! मी अर्थात त्या नंतर कानाला खडा लावला हे सांगणे नलगे!
|
Tiu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:11 pm: |
| 
|
मला वाटतं तेलुगु लोकांना गुलटी म्हणतात तसं मराठी लोकांना ठिरामे म्हणत असतील!
|
Chinnu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:21 pm: |
| 
|
तिउ, तेलुगु हा शब्द इथे मराठीमध्ये व्यवस्थित लिहिणारा तू पहिलाच असशील. तेव्हा तुझे अभिनंदन! इतर लोक्स हा शब्द कैच्या कैच लिहितात
|
Manuswini
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:46 pm: |
| 
|
अग प्राजे, झाले काय सुरवातीला वाटले नाही एवढे म्हटले चला company आहे, आपल्या लक्षात येत नाही कधी कधी काही गोष्टी(माझ्या आल्या नाहीत). मग इतके जवळ केल्यावर, अपेक्षा त्यांच्या वाढल्यावर मग लगेच तोडायला आपल्यालाच जड जाते.(मला जड झालेय). बरे ऑफ़ीस मधे पण तीचे तोंड दिसणार मग उगाच कशाला कडवटपणा.. असा विचार करून गप्प बसले. ऑफ़ीसमध्ये काय कमी politics असते त्यात हा आणखी एक शत्रु कशाला. पहिल्यांदा लक्षात आले नाही पण इतकी जळू आहे ना.. ऑफ़ीसमधले माझे चांगले खपत सुद्धा नाही. . हल्ली मी जेवणच करत नाही तिच्यासमोर. बोर हो रहा है करून तीला avoid करतेय, ही apt lease संपली की लगेच जाणार दुसरीकडे, bottomline, from my expereince " दुसर्याला इतके जवळ करु नये की इतका त्रास व्हावा " हे शिकले मी आता.(उशीरा का होईना). तसे मी बर्याऽ.ऽच प्रमाणात friends ला बोलावणे, socialize करणे घरी आता सोडून दीले, बरेच कडूच अनुभव आली दुर्दैवाने. असो.
|
Sashal
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:52 pm: |
| 
|
ह्या bb वर 'माझ्या मित्र / मैत्रिणीच्या आवडणार्या किंवा नावडणार्या गोष्टी' लिहायच्या आहेत ना? मग वरच्या बर्याच posts मध्ये तेलुगु, कन्नड, मल्लू, पंजू आणि हो " ठिरामे " ह्यांच्या नावडणार्या गोष्टीच जास्त आहेत .. असं generalization करणं कितपत योग्य आहे? आणि एकाने south indians ना नावं ठेवली म्हणून दुसर्याने महाराष्ट्रियन, पंजाबी लोकांना नावं ठेवायची म्हणजे 'एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरु मारायचं' हा प्रकार दिसतोय .. सवयींबद्दल लिहा .. माणसं किंवा त्याहीपेक्षा त्यांच्या जातीवर, धर्मावर, dilect वर generalized statements करणं योग्य आहे का?
|
Amruta
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:57 pm: |
| 
|
माझी एक गुल्टी शेजारीण आहे. अगदी चिन्नुच्या रमाठी बाई सारखी. इतकी डोक्यात जाते कि सांगुन सोय नाही. कधीहि वेळी अवेळी घरी येणार आणि नॉक करायच्या आधी सरळ नॉब फ़िरवुन दार उघड आहे का ते पहाणार. आपल्या दुर्दैवाने ते उघड असेल तर सरळ घरात घुसणार. जेवायला काय बनवलय?? फ्रिज मधे काय काय आहे?? आख्या घरात उगिचच फिरुन येणार. माझ्याशी बोलताना पण हिचे डोळे घरभर फिरत असतात कुठे काय नविन दिसताय पहात. काहि दिसल कि चौकशा चालु. परत हिच घरहि अगदी आत शिरल्या शिरल्या लगेच. तिला चुकवुन आत येण वा बाहेर जाण केवळ अशक्य. (असल्या बायकांना असली प्राइम लोकेशन्स कशी काय मिळतात देव जाणे.)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|