|
Naatyaa
| |
| Tuesday, November 20, 2007 - 7:38 pm: |
| 
|
i think i know who you are.>>> माणसा तुझ्याबद्दलच लिहिलंय का त्याने?? शोभत नाही हो!! ड
|
Anilbhai
| |
| Tuesday, November 20, 2007 - 8:01 pm: |
| 
|
खाता-खाता प्लेट घेवुन बाथरुम मध्ये जावुन आरश्यासमोर खायचा.>> आता कळल GTG ला प्लेट घेवुन कुठे गायब झाला होता ते.
|
Maanus
| |
| Tuesday, November 20, 2007 - 11:48 pm: |
| 
|
हा हा हा तो मी नव्हे. एकंदरीत हे रुममेट प्रकरण डांगर असते. माझा सध्याचा रुममेट, आख्खी आल लसणाची बाटली ४ ते ५ round मधे संपवतो. म्हणे मला आल लसुन खुप आवडते.
|
Adi787
| |
| Tuesday, November 20, 2007 - 11:59 pm: |
| 
|
आरे माकडा, तु इथे पण आहेस तर... मानुस ID घेवुन लपलायस...बघ.. आता तुझी ही सवय सगळ्यांना माहीत झाली का नाही ते... स्वभाव तुझा..दुसरे काय.. आरे मायबोलिकर हुशार आहेत..इथे अश्या चुका नको करुस 
|
Arch
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:08 pm: |
| 
|
माणसा, मग तुझी ती girl friend कुठेगेली? का आदीने दुपारी एकच्या आत यायच नाही आंगितल्यावर गायब झाली का? 
|
Maanus
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:30 pm: |
| 
|
कशाला जखमेवर मिठ चोळताय. माझे लक एवढे चांगले कुठे की मी एखादी मुलगी मला आवडावी आणि ती आधीपासुन married, engaged नसावी. I think मी आता त्या casino royal मधल्या bond सारखे विचार मनात आनायला पाहीजे. eva: am i going to have problem with you, Mr. Bond? 007: no dont worry, you're not of my type. eva: smart? 007: single
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:03 pm: |
| 
|
अरे माणसा इतक का वाईट वाटतय तुला. एक नाही तर दुसरी नक्कि तिच्यापेक्षा चांगली मिळणार, मग जेवढ्या नाही म्हणतील तेवढी तुला भविष्यात जास्त आशा ठेवायला हरकत नाही. इथे काहीजण सन्यासी सुद्धा आहेत ज्यांना कशाचाच काहीच वाटत नाही, त्यापेक्षा हे बर काय... 
|
Gobu
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:30 pm: |
| 
|
माझा आताचा पार्टनर मल्लु आहे.... कपडे धुताना तो शर्ट, पैन्ट, बेड्शीट, टॉवेल,बनियन, रुमाल, उशी कवर.्ए सगळे एकाच वेळी वॉशिंगमशीन मध्ये कोंबतो! (वॉशिंग मशीन माझे आहे!) कळीचा मुदा आहे- वापरलेले सॉक्स! त्याला हजार वेळा सांगितलेय की वॉशिंग मशीन मध्ये वापरलेले सॉक्स टाकत जाउ नकोस, तरी हजार वेळा विचारतो "काय फरक पडतो?" या गाढवाने परवा हद्द केली... स्वेटर, लोकरीचे सोक्स, आणि लोकरीची माकडटोपी एकाच वेळी वॉशिंगमशीन मध्ये कोंबली!!!! मशीनमध्ये कैपेसिटीच्या पेक्षा कितीतरी जास्त लोड टाकलेला!!! मशीन कुर्कुर करत होती!!! (हे सगळे धंदे तो मी रुममध्ये नसतानाच करतो!) त्याच्या दुर्दैवाने मी त्याचवेळी रुमवर आलो होतो.... जाम झापले त्याले!!! आणि वर "खबरदार, पुन्हा वॉशिंग मशीन्ला हात लावशील तर.." अशी तंबीही दिली!
२ दिवसानंतर मलाच कसे तरी वाटले! आता परत तेच करतो... मी सांगायचेच सोडुन दिले त्याला!!!
|
Supermom
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:01 pm: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणीची सवय मलाही खूप त्रास द्यायची. माझी मुलं अगदी लहान असताना तिचाही रांगता मुलगा सोडून द्यायची माझ्याकडे अन मला म्हणायची 'तुझे दोन दोन आहेत ना, मग तिसराही खेळेल छान त्यांच्यात. सांभाळ बरं जरा. मला स्वैपाक करायचाय...' (जसंकाही माझ्याकडे जादूनंच व्हायचा स्वैपाक.) एकदा दोनदा सौम्यपणे सांगून पाहिलं की तुझा मुलगा तोंडात वगैरे वस्तू घालतो सतत. मला जरा भीती वाटते...' 'यावर म्हणाली की 'अग, तुझी मुलं थोडीशी मोठी आहेत ना. मग तीच देतील लक्ष. येऊन सांगतील तुला काही तोंडात घातलं तर...' खूप मनस्ताप व्हायचा. शेवटी एक दिवस माझ्याकडचाच स्वैपाक तिघांना बघण्यात झाला नाही तेव्हा नवर्याने सांगितलं, 'सरळ स्पष्ट नाही म्हण..' ते करावंच लागलं शेवटी मला...
|
Naatyaa
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:38 pm: |
| 
|
त्याला हजार वेळा सांगितलेय की वॉशिंग मशीन मध्ये वापरलेले सॉक्स टाकत जाउ नकोस,>> मग? तुम्ही वापरलेले socks कुठे धुता??
|
Gobu
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:44 pm: |
| 
|
नात्या, मी माझे वापरलेले सॉक्स हातानेच धुतो, मशीन मध्ये टाकत नाही!
|
Psg
| |
| Thursday, November 22, 2007 - 6:07 am: |
| 
|
माझ्या कॉलेजमधल्या दोन मैत्रिणींना सवय होती- एकमेकींचे ड्रेस घालायची!! ईईई! मला कधीच तो प्रकार सहन नाही झाला.. वर म्हणायच्या देखील की 'त्यात काय? आपण मैत्रिणी ना..' मला तर जाम टेन्शनच यायचं नवीन ड्रेस घालताना कारण कधीही या म्हणायच्या, 'अया, नवा ड्रेस, मस्त आहे, मला घालायचा आहे.. कधी देशील?' बापरे.. त्यांना 'नाही' म्हणणं म्हणजे संकट.. कारण ही पण मल्लीनाथी वर असायची, 'तू आमचे घाल'. देवा रे देवा! साडी वगैरे ठीक आहे.. पण पंजाबी ड्रेस, जीन्सवरचे टॉप्स वगैरे दुसर्याचे वापरणं म्हणजे.. छे.. सहन नाही होत मला..
|
Sush
| |
| Thursday, November 22, 2007 - 7:29 am: |
| 
|
psg अगदि मला पण असाच राग येतो. college मधे असताना एका मैत्रिणिने माझ्या दुसर्या मैत्रिणिचा ड्रेस घालायला मागितला. का तर म्हणे कोणत्यातरि लग्नात घालायचा होता. पण असं नाहि कसं म्हणनार म्हणुन तिने घालायला दिला. पण या पठ्ठिने न धुताच तो दिला. ड्रेसला घामाचा वास सलवार च्या पायाच्या कडा काळ्या झालेल्या. वर म्हणते कशी, वाटल्यास dryclean करुन घे हवतर मी पैसे देते. अरे मग स्वताच नाहि का करुन देता येत. वैताग सगळा, पण नशिबाने तिने मला कधिच ड्रेस नाहि मागितला. ( कारण ती बारिक आणि मी जरा सुद्रुढ)
|
Dakshina
| |
| Thursday, November 22, 2007 - 7:38 am: |
| 
|
ड्रेसच्या बाबतीत मी अगदी सुखी आहे, कारण आम्ही चौघी राहतो, आणि आम्ही सगळ्याच वेगवेगळ्या साईजच्या आहोत... त्यामूळे कुणाचे कुणाला बसतच नाहीत.
|
Dakshina
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:02 am: |
| 
|
या सवयी तुमच्या रूममेटला असतील तर काय होईल ते सांगा... * Vasalin चि स्टिक उघडून वरपर्यंत काढून त्याला डायरेक्ट झाकण लावणे, लिपस्टिकचे पण तेच.... * इस्त्रीचे कपडे असलेल्या कप्प्यातून, सर्वात खालचा कपडा खसकन ओढून काढणे. * बाथरूमचा नळ अर्धवट उघडा ठेवणे. * सकाळी सकाळी खडखड करून दाराच्या कड्या घालणे.
|
Dakshina
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:12 am: |
| 
|
मला कोणाच्या सवयी न आवडण्यापेक्षा त्याचं इरिटेशन जास्त होतं. लेटेस्ट गोष्टं मी आणि माझी रूममेट सकाळी साडेपाचला योगाच्या क्लासला जातो. ही उंच टाचेचं चप्पल घालून जिना खाडखाड आवाज करत उतरते. मी म्हणलं अग सकाळी सगळे झोपलेले असतात साधं चप्पल घालावं म्हणजे जास्त आवाज होणार नाही.. तर म्हणे माझ्याकडे नाही आहे गं... बरं चालावं तरी हळू, ते पण नाही... रस्ता हादरवत चालते.
|
Manuswini
| |
| Thursday, November 22, 2007 - 9:10 am: |
| 
|
मला fortunately roomamate ना सहन करावे लागले नाही. कारण इथे शिकताना आई वडीलांकडे आयते रहायला मिळाले. असो, सांगायचा मुद्दा हाच की इथे school मधे एकत्र dorms मधे रहण्यार्यांचे प्रकार एकून मी एकधीच daring केले नाही. पण दोन असे किस्से आहेत की इतके horrible की मदत करणे सोडून दीले जर कोणाला apt share करायचे असेल अगदी काही दिवस सुद्धा. मी baltimore ला असताना एक मल्याळी collegue join झाली ऑफ़ीसला, मी apt शोधतेय देशील का काही दिवस, म्हटले एका आठवड्याचा प्रश्ण आहे तर हरकत नाही, एक तर बहुतेक मद्रासी फक्त पैसे कसे वाचवायचे हा एक मुद्दा डोक्यात ठेवून येतात, आता हीच्या इतक्या घाणेरड्या सवयी ना, ती ओले हात माझ्या मसाल्याच्या डब्यात घालायची, एकदा माझ्या घरातले dishwasher liquid संपले म्हणून अंघोळीच्या साबणाने भांडी घासली. मोजे,इतर 'सगळे' तिचे कपडे, माझे कपडे सगळे एकत्र करून उगाचच मशीन मध्ये धुतले. मला कुणाचे एकत्र कपडे दूवायला अजीबात आवडते नाही. washer,dryer असण्यार्याच apt बघून मी घेते ह्याच साठी. मोजे एक्तत्र धूतले तर इतका घाण वास येतो बाकी कपड्यांना. माझे घर, माझे सामान including 'सगळे' निर्लज्ज्पणे वापरायची. .... शेवटी भाऊ येणार भेटायला खोटेच सांगून टाकले. कहर म्हणजे मी living room मध्ये झोपेन त्यात काय असे उत्तर. म्हटले दिवस रात्र एक करुया पण तुला apt शोदुया. १ आठवड्याचा ३ आठवडे वैताग आणला. आता 'कानाला खडा लावलाय, अशी मदत बिलकुल करणार नाही. बरे तोंडे पण वाकडी होणार ह्यांची पुढे मागे भेटल्यावर. म्हणजे मदत आम्ही करायची नी वर हे असे वागणार. पैसे तर ह्यांचेच वाचणार ना. बरे भांडी न धूता मशीन मध्ये टाकायची, खरकट्यासकट.... basically मला वाटते where you grow up and how you grow up मध्ये ह्याचा खुप भाग असत ह्या सवयींमागे. पूनम, माझी एका मैत्रीणला पण अशी घाण सवय आहे, मी mall मध्ये तिच्याबरोबर जर गेले तर काही नवीन खरेदीच करत नाही. एकत्र फिरायला गेलो तर त्यातला त्यात बरा असा top,jeans घालावी लागते. कारण असेच तीला कपडे मागायची सवय आहे. घालून न धूता परत करणार बरे बोलले तर राग नी मिरची लागणार. बरे स्वच्छ ही राहाणे नाही. सांगायला लाज वाटते इथे पण underarm stick पण नाही लावणार, इतकी stink करते नी त्यात माझे top घरी येवून घालणार. मी posh कपडे लपवूनच ठेवते..... घरी आली की पोलीसी थाटान बघणार,क्या नया है मनु तेरे पास.... नशीब घरापासून लांब रहाते. नाहीतर मला नवीन कपडे घालायचे चोरी. if we have night out at my place , मला ते जड जातात. ती मजा बरी वाटते पण असे नमुने गेल्यावर साफ़सफ़ाई, कपडे धुवणे हा एक त्रास असतो कोणाला घरी ठेवले तर. हीला दुसरी घाण सवय काय, मी weekend ला घरी असले नी travelling नसेल दुसर्या दिवशी तर अगदी सग्रसंगीत जेवण करते,हीला माहीती मग सकाळी ९ वाजल्यापासून घरात माझ्या, जीमला एकत्र जातो मग तिथून मझ्याच घरी थेट,क्या बना रही है खाने मे?. कधी कधी वाटते whats big deal जावु दे पण कोणाचे फोन आले,गेले वगैरेचा हिसाब बसल्या बसल्या. बरे खायला बसेल नी मनु चम्मच देगी, मनु नमक कम है थोडासा,डब्ब लाके देना. मी इथे अजून गस जवळ उभे राहून गरम गरम चपात्या करणार. खायला वाढायला problem मला अगदी अजीबात नाही. राग ह्याचाच की अरे नको त्या चौकश्या कशाला तुला?. माझा सेल फोन वाजला की हीच उचलणार,आधी ही गप्पा मारणार मग मला देणार. कधी कधी तर वोह खाना बनाने मे busy है करून मला न सांगताच फोन ठेवणार. बहुतेकदा आपला भिड्स्त स्वभावच कारणीभूत आहे पण काय करणार असे असते माझे. अक्खा शनीवर, रवीवार बेकार जातो कधी कधी. "pain in the ..." आहे. आपण प्रेमाने करतो पण ह्यांच्याकडून काही सुटत सुद्धा नसते.
|
Nkashi
| |
| Thursday, November 22, 2007 - 10:33 am: |
| 
|
"pain in the ..." अरे काय हे... कशासाठी सगळ सहन करायच. मी म्हणते, एकतर pain ज्यामुळे होतो ते काढुन टाका नाहीतर "..." काढा "..." काढण सोप्प नाही ना
|
Manjud
| |
| Thursday, November 22, 2007 - 12:01 pm: |
| 
|
ऑफिसमधे मिटींग चालू असताना माझा सिनीअर कायम दात कोरत बसतो. जेवण झाल्यावर मिटिंग असेल तर मग बघायलाच नको. मी शक्यतो त्याच्या समोर बसणं टाळते पण बर्याचदा ते शक्य होत नाही. कारण दोघांच्या फाईल्स कॉमन असतात. टिपिकल यु. पी. आहे तो.
|
Divya
| |
| Thursday, November 22, 2007 - 2:05 pm: |
| 
|
क्या बना रही है खाने मे?. कधी कधी वाटते whats big deal मनु तु जेवण छान बनवतेस ना म्हणुन येउन चिकटतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|