Dineshvs
| |
| Thursday, November 08, 2007 - 2:05 pm: |
| 
|
माणुस खुपच छान आहे रांगोळी. ह्या रांगोळीचा वरुन फ़ोटो काढता आला असता तर आणखी छान दिसले असते. पाकळ्या कुठल्या फ़ुलाच्या होत्या ? आणि रंग कुठले वापरले ? जयु, आम्हाला तुझी रांगोळी पण बघायची आहे.
|
Maanus
| |
| Thursday, November 08, 2007 - 2:32 pm: |
| 
|
ओ मी नाही काढली ती रांगोळी... असेच flickr browse करताना सापडली. बहुतेक त्यांनी झेंडु च्या फुलांसारखी पाकळ्या असलेली फुले वापरलीत. माझ्या काही बहीणी काढायच्या अश्या फुंलांनी रांगोळ्या. दिसायला सजीव आणि भरलेल्या दिसतात अशा रांगोळ्या flickr वर अजुन काही रांगोळ्या आहेत. पण फुल किंवा पाण्याखालच्या दिसल्या नाही. flickr rangoli search जयावी तुम्हाला flickr कसेकाय दिसले, i though its blocked in saudi countires
|
Panna
| |
| Thursday, November 08, 2007 - 4:25 pm: |
| 
|
माणसा, छान आहेत रांगोळ्या!
|
Prajaktad
| |
| Thursday, November 08, 2007 - 8:31 pm: |
| 
|
पदरावरती जरतारिचा मोर...सगळ्या ओळी आठवल्या..माणसा सही आहे फोटू.. हा! मोर मी वर लिहलय तस भुसा रंगवुनही काढता येईल.ऽर्थात फ़ुलांनि खुपच सुंदर ईफ़ेक्ट आलाय..
|
Dineshvs
| |
| Friday, November 09, 2007 - 1:29 pm: |
| 
|
प्राजक्ता, भुसा वापरुन काढलेल्या रांगोळ्या छान भरीव दिसतात. आणि फुलांच्या रांगोळीपेक्षा जास्त टिकतातही. BTW आता पैठणीचे शर्ट आणि कुडतेही मिळतात, त्यामूळे पदरावरतीच्या जागी, आणखी काही शब्द घुसडता येतील.
|
Bsk
| |
| Friday, November 09, 2007 - 2:03 pm: |
| 
|
मी काढलेली पहीली रांगोळी
|
Prajaktad
| |
| Saturday, November 10, 2007 - 9:11 pm: |
| 
|

|
Radha_t
| |
| Tuesday, November 20, 2007 - 9:49 am: |
| 
|
हा रांगोळीचा BB मला माहितच नव्हता. आत्ताच मी माझी चित्रकला मधे हा फोटो upload केला. 
|
Radha_t
| |
| Tuesday, November 20, 2007 - 9:54 am: |
| 
|
अजून गणपतीत काढलेल्या रांगोळ्या. याही पूर्वी post केल्या होत्या

|
Amruta
| |
| Tuesday, November 20, 2007 - 4:34 pm: |
| 
|
हि माझी रांगोळि फ़क्त हळद आणि पाना फुल वापरुन काढलेली.

|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:30 am: |
| 
|
WOW!अमृता कसली मस्त रंगसंगती साधलीये. मस्तच, मधे फ़ुला ऐवजी पणती नाहीतर tea light हवा होता म्हणजे अजुन जान आली असती. 
|
Psg
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:00 am: |
| 
|
खरंच सगळ्या रांगोळ्या सुरेख आहेत. प्राजक्ता, अमृता- साध्या असल्या तरी गोड आल्या आहेत तुमच्या रांगोळ्या.. राधाची खास आहे.. मला साधं फूल काढायला जमत नाही रांगोळीचं, हे असं फ्रीहॅंड कसलं काढत्ये मी? एक प्रश्न, रोज सराव केला तर रांगोळी काढण्यात सफाई येईल का? का 'तेथे पाहिजे जातीचेच'? म्हणजे मला स्कोपच नाही
|
Monakshi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:31 am: |
| 
|
सगळ्याच रांगोळ्या खूपच सुंदर. छ्या. आम्हाला फक्त बघण्यावरच समाधान मानावं लागतं.
|
Swa_26
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:36 am: |
| 
|
अरे वा..... मस्तच आल्यात सगळ्या रांगोळ्या!! ए पुनम असं काहीच नाहिये बरं का!! सरावाने तुलापण जमतील ह्या माझ्याही काही!! http://www.esnips.com/web/Raangolyaa
|
Psg
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:59 am: |
| 
|
वॉव स्वाती! तुझ्याही ग्रेट आहेत.. ती गुलाबाची फुलं मस्त जमली आहेत.. मी प्रयत्न करीन, पण जमायचे अवघड आहे हे मलाही माहित्ये.. ती कलाच असावी लागते गं अंगात.. तुमच्यासारख्यांचं फार कौतुक वाटतं मला..
|
Monakshi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:26 am: |
| 
|
स्वा सहीच गं. कसल्या क्लास काढल्या आहेत.
|
Manjud
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:34 am: |
| 
|
स्वाते, माझ्या ऑफिसात esnips ओपन होत नाही. मी दिवाळीत ती पाण्याखालची रांगोळी काढायचा प्रयत्न केला. एका थाळीला व्हॅसलिन चोपडलं. त्यावर छान रंगीत रांगोळीचा गणपती काढला. इतका सुंदर आला होता. पण थाळी उपडी करून ठोकल्यावर रांगोळी पडूनच गेली. मग ते वॉटर कलरने रंगवल्यासारकहं दिसायला लगलं. मी वर पाणि ओतून बघितलं, प्रयोग सक्सेसफुल झाला होता पण ती रांगोळी दिसत नव्हती. अगदी जाड रेघा ओढल्या होत्या. बह्तुएक मी व्हॅसलीन लिपगार्ड वापरलं म्हणून अपेक्षित परीणाम झाला नाही. पण माझ्या पाटवरच्या रांगोळ्या खुप छान आल्याहोत्या. पण फोटो नाही काढता आले.
|
Swa_26
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:29 am: |
| 
|
ए, मी काढलेली पाण्याखालची रांगोळी!! एवढी खास नाही पण ठिक आहे. मी मेण वापरलेले..

|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:56 pm: |
| 
|
Swa_26 रांगोळी expert च आहेस तु. Psg सरावाने रांगोळी नक्किच जमायला लागते. ते पाच बोटांची रांगोळी प्रकरण मात्र जर अवघडच आहे. माझ्या हातातुन रांगोळी नीट पडत नाही म्हणजे एकसारखी रेघ सगळ्या angle ने येत नाही. सरावाने आल असत पण इथे काही करायच म्हणजे आनंदच आहे.
|
Panna
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:08 pm: |
| 
|
सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम!! स्वाती, खासच आल्यात गं रांगोळ्या!!
|