|
Durandar
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:55 pm: |
| 
|
प्रत्येकाच्या काही सवयी असतात तुम्हालाही असतिल आश्याच काही मित्रांच्या सवयींचे भंडार उघडूयात का
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:04 am: |
| 
|
मला वाटते सवयी बरोबर जिवलग मित्रा बद्दल Or मैत्रीणिबद्दलचा अविस्मरणीय किस्साही सांगावा..!!!
|
Chaffa
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:28 pm: |
| 
|
चलेगा लोपा!! नाहितरी जुन्या मित्र (आणी मैत्रिणींच्या देखिल हं ) आठवणी आपण केंव्हा सांगणार.?
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 4:38 am: |
| 
|
हा मित्रांचा किस्सा... आवडनारे, न आवडनारे असे काही नाही. त्यासाठी मला एक अचाट रुममेट्स वर BB काढायचाय. विजया... म्हणजे खरी खुरी विजया, त्या गोष्टीमधली नाही. खरी विजया एक अती comedy मुलगी आहे. तेचे लग्न ठरले होते तेव्हाचा किस्सा... ती कुठल्यातरी शाहु महाराजांच्या दुरच्या नात्यातल्या ठिकाणी जानार होती. तर तेव्हा असाच मी तीला एकदा फोन केला लग्नाची तयारी कशी सुरु आहे वैगेरे विचारायला. ईतर गप्पा झाल्यावर थोडेफार cooking बद्दल बोलायला लागलो, तीने Butter Chicken बनवले होते. मला कल्पना होती त्याची चव कशी असेल तरीदेखील तिला विचारले "मग कसे झाले होते चिकन"... अता तुम्ही विचार करा ह्यावर सरळ साधे चांगले झाले होते, tasty होते असे तसे बोलन्या ऐवजी ह्या पोरीने काय उत्तर द्यावे.. "अरे इतके मस्त झालेय चिकन की शाहु महाराजच पाहिजे होते ते खायला" मान्य आहे बाई तु royal family मधे चालली आहेस... पण शाहु महाराज अस फुल आत्मविश्वासाने काहीही comedy बडबडायची ती. पण मधे मधेच बावळट सारखी देखील वागायची. ती रहायची कोरेगाव पार्क मधे आणि मी कोथरुड ला. मी एकदा असाच german bakery मधे लाल मोरांना बघत बसलो होतो तेव्हा तीचा फोन आला. घरी येतोस का म्हणुन. तीच्या कंप्युटर ला काहीतरी प्रॉब्लेम होता. मी काय १० मीनटात तिच्या घरी पोचलो. "तु इतक्या लवकर कसाकाय आलास" "तुला माहीत नाही का" "काय" "कोथरुड ते कोरेगाव पार्क हॅलीकॉप्टर सेवा सुरु झालीय" "नाही, कधी झाली सुरु" मी आपला तीच्या कंप्युटर ला काय झाले बघत बसलो. थोड्या वेळाने तीच्याकडे लक्ष गेले, ही अजुनही विचारातच. "विज्या भाई क्या हुआ?" "मला कसेकाय नाही दिसले कधी हॅलीकॉप्टर?" असे तीचे बावळट सारखे चिकार किस्से आहेत but she was one the best friend i ever had
|
Dakshina
| |
| Monday, October 01, 2007 - 11:05 am: |
| 
|
हा बी.बी. बघितल्यावर एकदम, हरवले ते गवसले असंच वाटलं एकदम. मला तर माझ्या रूममेटच्या प्रचंड गोष्टी अक्षरशः डोक्यात जातात, पण तरीही ती माझी Best Friend आहे. सुदैवाने, मनतलं तोंडावर बोलण्याची मूभा आमच्याकडे सर्वांना आहे त्यामुळे काही गोष्टी खूप सोप्या होतात. बाथरूममधे दरवाज्याच्या मागच्या बाजूला हूकला धुवायचे कपडे अडकवून ठेवले की मझ्या डोक्यात जातात, आणि ही नेमकी तसंच करणार. अगदी नेमाने. मी कितीही ओरडो, चिडो काही फ़रक नाही. वेंधळी तर मुलखाची आहे. एकदा मला पित्त झालं होतं म्हणून मी दोन शहाळी आणली होती, एक पित पित घरी आले, आणि पिऊन झाल्यावर फ़ेकून दिलं, दुसरं रात्री जेवल्यावर पिऊ म्हणून fridge वर ठेवलं आणि क्लास ला गेले. परत आले, जेवले, आणि म्हणलं चला आता शहाळं पिऊ, तर काय? ह्या मुलीने ते न फोडलेलं शहाळं फ़ेकून दिलं होतं वर म्हणे मला वाटलं की तू ते already प्यायली आहेस. पिऊन झालेलं शहाळं कोणी fridge वर ठेवेल का? मी डोक्यावर हात मारून घेतला. तिचे असे बरेच किस्से आहेत, सांगेन हळू हळू.
|
Dakshina
| |
| Friday, October 05, 2007 - 5:24 am: |
| 
|
हा बी.बी बहुतेक मलाच पुढे चालू ठेवावा लागणार असं दिसतय. मझ्या office मधे एक मुलगी होती, एकतर मीहून कोणाशी मैत्री करत नाही, पण तिच्याशी कशी काय झाली काय माहीती? तिला २ - ३ (माझ्यामते) अत्यंत वाईट्ट सवयी होत्या. पहीली म्हणजे, मी कधीपण फोनवर बोलत असूदे, किंवा मला कोणी भेटायला आलेलं असू दे, हिने येऊन अगदी disturb केलाच पाहीजे. एक तर माझा job म्हणजे निम्मा वेळ मेल अनि निम्मा वेळ फोन, आणि दररोज हे चालायचं. मी तिला कित्येक वेळेला सांगितलं की बाई मी कोणाशी बोलत असेन तर मला disturb नको करत जाऊस, तर ती ऐकून निव्वळ सोडून द्यायची... दुसर्या दिवशी परत तेच सुरू... दुसरी गोष्टं म्हणजे टिफ़ीन मधे डायरेक्ट हात घालणे आणि अविचाराने खाणे (ते ही दुसर्याच्या डब्यातलं) My God माझा संताप व्हायचा अगदी. तिला नेहमी दुसर्याचाच डबा जास्त आवडायचा. माझा मोठ्ठा problem म्हणजे मला गूळ घातलेल्या भाज्या लागतात. आणि हिच्या भाजीत नावाला पण गूळ नाही. अपण कसं दुसर्याची भाजी फ़क्त टेस्टला घेतो, हि म्हणजे औरच... दुसर्याचा डबा फ़क्त आपल्यासाठीच आहे अशा अविर्भावात...इतकंच नाही. तर जेवण झाल्यावर सुद्धा, कधी कधी टेबल वर लेट येणार्या मंडळींचा डबा पण खायची. वर आणि सारवासारवी 'अरे ये सब्जी तो मेरी favorite है..... अजुन एक म्हणजे, तिचं L1 चं काम सुरू होतं आणि ती long Term साठी USA ला जाणार होती... त्यमूळे तिला तात्पुरता कुठला तरी project allocate केला होता. त्यामूळे तिला फ़ार काम नसायचं. office ला आली की मला आयपी वर मेसेज.. 'नाश्ता करने चलती क्या..'?... मग तासभर तिकडेच... दुपारी जेवण पण निवांत.... मग... 'चल नीचे आती क्या...? थोडा घूम के आते है...'? परत संध्याकाळी चहा नाहीतर snacks म्हणजे दिवसातले almost दोन ते अडीच तास असेच खाण्यापिण्यात वाया... पहील्या पहील्यांदा मला नाही म्हणणं आगदी जीवावर यायचं पण मला फ़ार वैताग यायला लागला आणि मी कामाचं निमित्त सांगून तिला टाळू लागले. तर तिने दुसरी कोणितरी पकडली... मी मनात म्हणलं चालू दे..' ती खूप बोलायची, आणि दुसर्याला काहीच बोलू द्यायची नाही. पण तिचे जाण्याचे दिवस जसे जवळ जवळ येत गेले, तसं तसं मला तिच्याबद्दल बरंच काही कळलं. एकतर धक्कादायक म्हणजे, ती वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी निघाली, घरच्या काही परीस्थितीमुळे ती लग्न करू शकली नव्हती, त्यामुळे ते एक अधुरेपण होतं, असमाधान होतं कुठेतरी. हे सगळं तिच्या वागण्यातून reflect व्हायचं. शेवटी शेवटी तर मी आपणहोउनच तिला बाहेर जाऊ वगैरे म्हणायला लागले.... आता ती USA मधे आहे, आम्ही रेग्युलरली मेल वर बोलतो. ती खुश आहे. मी इतकं मात्रं नक्की सांगू शकते की, मी पाहीलेल्या इतर मुलींपेक्षा ती खूप वेगळी होती...आहे...
|
पुण्यात शिक्षणानिमित्त राहतांना अमराठी क्लासमेट्स आणि रूममेट्सच्या इतक्या छटा पाहिल्यायत ना!! माझा क्लासमेट देवमाणूस होता... पण माझे जूनिअर्स.... देवा रे... कुठून त्यांच्याबरोबर अपार्टमेंट शेअर केलं असं होई... १) खाणे- कसंही खातील, कुठेही खातील. काॅलेजातून रूमवर आल्यावर बूटमोजे न काढता पलंगावर बसून खातील. मी गणपतीत दोन दिवस घरी जाऊन आलो. 'Someone special' साठी उकडीचे मोदक माझ्या हातांनी बनवून आणले होते... मी क्लासवरून परतल्यावर मला प्रेमाने सांगतात.. "भाई, वह नारियल की मिठाई तो बड़ई स्वाद बनी थी!!" मी धावतपळत जाऊन डबा उघडला तर मोदकांच्या नुसत्या आठवणी उरल्या होत्या!! २) सिगरेट: आता मला सिगरेटचं वावडं नाही, मीही महिन्यातून एकदा कधीतरी सिगरेट ओढत असलो तरी घर किंवा धूर कोंडून राहिल अशा ठिकाणी ओढत नाही. पण इथे- सकाळी काॅलेजची धावपळ- हे sample संडास अडवून बसणार. तो बाहेर आल्यावर पळतपळत आपण आत जावं तर त्या 'गाभार्यात' धुराचा वास कोंदलेला. आपण बाहेर येऊन वासाची तक्रार करावी तर... "ओए यारा, सिगरेट पिए बग़ैर होत्ती नही है!!"- हे उत्तर ठरलेलं. आता त्या धुराच्या वासाने आम्हाला होत असलेली होईनाशी होते हे ह्याला सांगून थकलो!! ३) हा आपल्या एका मैत्रिणीला घरी रहायला बोलवायचा! त्याचा रूममेट आमच्या खोलीत, आणि हे दोघं आतमध्ये. आम्हाला वाटलं, ह्यांच्या परीक्षा संपल्यावर हे बंद होईल, पण ती पोरगी पुढे दीड आठवडा रोज रात्री यायची!! आम्हाला शेवटी घरी यावसं वाटेना. एका संध्याकाळी कहर!! आमच्या खोलीत त्या तिसर्या मित्राची खाट येऊन पडलेली!! आता मात्र डोकं सटकलं!! मग आम्हा तिघा निर्वासितांचा मोठ्या आवाजात लेकी-बोले-सुने-लागे च्या चालीवर संवाद, "सुमित, यार, यह रूम कुछ भरा-भरा सा नहीं लग रहा?" "कोई गल नहीं दोस्त, सृजनी ही तो आयी है!! कौनसी बड़ई बात है? एक दो दिन झेल ले!! फिर सऽऽब ठीक हो जाएगा!!" "अरे, प्राॅब्लेम कुछ नहीं है यार, सिर्फ़ स्पेस दी गल है... पढाई ही करनी है, तो यह खाट भी अंदर भिजवा दो, तुम तीनो साथ पढाई करना..." मग रात्री आम्ही अजून हलकटपणा केला. रात्री १२:३०.. दारावर टकटक... "दोस्त!! दोस्त!!" दाराआडूनच उत्तर.. "बोल योगेश, क्या है?" "कुछ नहीं दोस्त... सवेरे जल्दी उठना है... अलार्म क्लाॅक चाहिये था." "अब्बे यार, सुमित के मोबाइल पर अलार्म लगवा लेना" पाऊण वाजता परत टकटक.. आता सुमित! "क्या है?" " Sorry to disturb yaar!! मेरा मोबाइल अंदर है!" आता त्यांना दार उघडावंच लागलंच... मग ह्याच क्रमाने रात्री एक वाजता मोबाईल चार्जर, दोन वाजता लपटाॅप, सव्वादोन वाजता लॅपटाॅपचा चार्जर, तीन वाजता बाथरूमच्या स्लिपर्स, चार वाजता 'लॅपटाॅप परत ठेवणे', पाच वाजता जाॅगिंगसाठी शूज़ (एरवी कधीच जाॅगिंगला जात नाही!), सहा वाजता अंघोळीचा टाॅवेल आणि सात वाजता त्यांच्या गॅलरीत पडलेला पेपर असल्या कारणाने त्यांना झोपूच नाही दिलं आम्ही तिघांनी!! ही पोरगी आठ वाजता डोळे चोळत बाहेर आली तेव्हां आम्ही काॅलेजला निघायच्या तयारीत होतो... जाता जात तिला खवचटपणाने सांगून गेलो... " Good morning! Hope you had a good sleep... दरवाज़ा लगा लो, हम तो भाग रहे हैं काॅलेज के लिए... see you at dinner!!" (हे पु. लंच्या "या एकदा, दाखवीन मजा!" सारखं!! :ड ती नंतर रहायला कधीच आली नाही!! बाहेर राहून संतांना लाजवणारी संयतवृत्ती जरी अंगी बाणत असली, तरी "अंगावरती याल तर शिंगावरती घेऊ" हा मराठी बाणा अजून तीक्ष्ण होतो!!
|
Ajjuka
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:44 am: |
| 
|
अथेन्स मधे गेल्यावर जी पहिली रूममेट मिळाली ती म्हणजे असल्या अनेक वाईट सवयींनी भरलेली होती. किंवा तिच्या असल्या सवयी माझ्या पचनी पडत नव्हत्या.. १. दिसेल त्या कंगव्याने केस विंचरणे. मला माझा कंगवा दुसर्याने वापरलेला आवडत नाही. घाणच वाटतं. आणि असा चूकून कुणी वापरलाच तर तो नीट साफ़ करून धुतल्याशिवाय मी वापरू शकत नाही. दुसर्यांचे कंगवे मला वापरता येत नाहीत. आणि ही बिन्धास्त रूममधे यायची नी गप्पा मारता मारता सरळ कंगवा उचलून केस विंचरणे चालू. शेवटी मी एकदा तिला सांगितलं तर ती रडली मग मलाच कसंतरी वाटलं. मी नंतर तिच्यासाठी रूममधे वेगळा कंगवा ठेवायला लागले आणि माझा लपवलेला असायचा. आणि गंमत म्हणजे ते तिलाही माहीत असायचं. २. कंगव्याची सवय परवडली अशी ही सवय होती ती म्हणजे स्वतः काही न रांधता आम्ही रांधलेल्या जेवणावर स्वतःच्या boyfriend ला खूश करणे. आम्ही चौघीजणी रहायचो. आमच्या सगळ्यांच्या वेळा, चवी सगळंच वेगळं होतं त्यामुळे आम्ही जेवण आपापलं बनवायचो. एकत्र भानगड ठेवली नव्हती. बर्याचदा मी आणि अजून एकजण रविवारी २-३ भाज्या करून ठेवायचो की आठवडाभर पुरेल. असं केलं की आमच्या महाराणीचा सोमवारी संध्याकाळी मला फोन. घरमे कुछ खाना है क्या? सलमान (तिचा NRP boyfriend) wants too eat Indian food. अन्नाला नाही कसं म्हणणार... असं म्हणता म्हणता रोज रोज हे सलमान साहेब घरी येऊन जेऊ लागले आणि आम्ही रविवारी रांधून ठेवणं बंद केलं. असो.. बरेच किस्से आहेत नंतर कधीतरी..
|
Aashu29
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:28 pm: |
| 
|
अज्जुका, जाम चीड येणारेच किस्से आहेत, तू कसे काय सहन केलेस बुवा!!
|
Aashu29
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:31 pm: |
| 
|
योगेश, बाकि आयडिआ सहि आहे,दोस्ताला पकवायची. नक्कि तू बाहेरचाच होतास ना की आतला? हिहि
|
Dakshina
| |
| Monday, October 08, 2007 - 5:31 am: |
| 
|
योगेश, अरे मित्रांची नावं इथे देऊन त्यांना असं बदनाम नको रे करू. usually मुलांच्या रूमवर असे प्रकार (म्हणजे 'एकमेकां साहयं करू, आणि अवघे धरू सुपंथ' ) घडतात असं ऐकीवात आहे 
|
Dakshina
| |
| Monday, October 08, 2007 - 5:49 am: |
| 
|
मला पण अज्जुका सारखा अनुभव आलेला आहे. कंगवा वापरून झाल्यावर, विचारणा केली असता... अय्या सॉरी गं, माझ्या लक्षातंच आलं नाही, की तो तुझा कंगवा आहे म्हणून... जेवताना कधीच पाणी न घेणे, वर आपण घेतलेलं पाणी, 'पिऊ का गं? म्हणून विचारणे, आपण थोडंच नको पिऊ म्हणणार आहे? पण एके दिवशी मी म्हणलं नको, ऊठ आणि स्वतःचं स्वतः घे. तर तिला कोण राग आला, उठली फ़णकार्यने आणि घेतलं तिनेच... दुसर्याची गाडी वापरायची, पण पेट्रोल कधीच भरायचं नाही. मला पेट्रोल पंपावर वारंवार जाण्याचा कंटाला येतो, म्हणून मी आठवड्याचं पेट्रोल एकदम भरते, तर वापरणारे वापरतात, त्यांना माहीत असतं माझ्या गाडीत पेट्रोल असतं ते.. मग काय...वापरा.. एके दिवशी मी reserve ला आलेली गाडीच दिली...तरीही, त्यापुढे माझी गाडी वापरणं तसं सुरूच होतं.. कमाल असते लोकांची...
|
Hkumar
| |
| Monday, October 08, 2007 - 7:04 am: |
| 
|
माझा एक मित्र त्याने विकत घेतलेले कोणतेही पुस्तक संपूर्ण वाचतो. कारण काय तर आपले पैसे पूर्ण वसूल झाले पाहिजेत! अभ्यासाच्या १००० पानी पुस्तकालाही त्याचा हाच नियम.
|
माझ्या इन्जीनीयरिन्ग च्या अत्यन्त हुशार आणी दिलदार रूम मेट ची एकच अत्यन्त खटकणारी सवय होती. होस्टेल वर कॉमन बाथ रूम्स विन्ग च्या एका टोकाला असत. तो आन्घोळ करून रूम मध्ये आला की अन्ग आणी केस टॉवेल ने व्यवस्थीत पुसुन घेत असे. त्यानन्तर तो टॉवेल खुन्टीवर नीट वाळत घालणे. आणी मग अन्डर वेअर ची शोधाशोध सुरू.
|
Dakshina
| |
| Monday, October 08, 2007 - 12:42 pm: |
| 
|
विजय... अरे बाप रे...!
|
Hkumar
| |
| Monday, October 08, 2007 - 2:27 pm: |
| 
|
माझा एक मित्र एखाद्याच्या न पटणार्या विधानावर प्रतिक्रिया देताना नेहमी अशी सुरवात करतो,'' तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण...'' हे वाक्य कोणालाही ऐकायला छान वाटते. त्यानंतर त्याचे काही विरोधी मुद्दे नीट ऐकले जातात.
|
Zakki
| |
| Monday, October 08, 2007 - 3:06 pm: |
| 
|
माझे काही मित्र मात्र नेहेमी कुणि विनोद केला की त्यावर आणखी काही 'विनोदी' कॉमेंट्स करणे, कुणि काही म्हंटले की ' त्याचे खरे कारण .. .. ' असे आहे वगैरे सांगतात. कुणि म्हंटले, 'भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे' की हे म्हणणार, छे छे. कुणि म्हंटले 'भारताची परिस्थिती वाईट आहे' की तेच म्हणणार, 'उलट आता आणखी चांगली प्रगति होणार आहे!'.
|
Disha013
| |
| Monday, October 08, 2007 - 6:25 pm: |
| 
|
झक्कीकाका,भारत नावाच्या कुण्या मित्राबद्दल बोलताय का तुम्ही? दिवे घ्या.... विजय अजुक्का,खरच सटकवणारे किस्से आहेत. मी आणि एक मैत्रीण बरोबर शाळेत जायचो.पण ही पठ्ठी कधीच वेळेवर तयार नसायची. नेहमीचा उशीर. वर ती आवरुन बाहेर येईपर्यन्त आपण वाट बघत दारात उभं राहायचं. ३,४ वेळा तिच्यामुळे हातावर छड्या मिळाल्यावर तिला सांगितले,बाई तु ये जा निवांत.मी नाही थांबणार तुझ्यासाठी. माझी एक वर्गामैत्रीण होती. तिला गोष्टी वगैरे सांगताना 'बरं का' हे २ शब्द वापरायची सवय होती. तिचं सुरु व्हायचं,' एक राजा असतो बरं का. त्याला दोन राण्या असतात बरं का. एक नावडती असते बरं का..........' आम्ही सगळे गालातल्या गालात हसायचो! तिची ही सवय कोणतेच शिक्षक मोडु शकले नव्हते.
|
Adi787
| |
| Tuesday, November 20, 2007 - 1:10 am: |
| 
|
माझ्या रुममेट चि गर्ल्फ़्रेंड पण अशीच त्रासदायक बनली होती.. किचन मध्ये ही बया असला पसारा घालुन ठेवायची का बस्स... साधं चहा करायला पण जागा नसायची. माझ्या आनि ह्याच्या रुम करिता एकच बाथरुम... माझ्या रुम मधुन बाथरुमला जायचे म्हणजे सगळा हॉल पायथा घालावा लागे... ही बया वीकेंडला सकाळी ९-१० पासुनच हॉलमध्ये सोफ़्यावर पडुन असायची... मग अंगभर कपड्यानीशी आंघोळीला जावे लागे... वैताग आलेला... मग त्याला सांगीतले.. शनी-रवी, दुपारी १२-१ नंतरच TV बघायचाहॉल मध्ये बसायचे. ह्याची एक अत्यंत वाईट सवय... खाता-खाता प्लेट घेवुन बाथरुम मध्ये जावुन आरश्यासमोर खायचा.
|
Maanus
| |
| Tuesday, November 20, 2007 - 3:05 am: |
| 
|
बंगाली होता का तो? i think i know who you are. टकल्या पत्ता बदल, तु न्युपोर्ट मधे रहात नाही आता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|