Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 25, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Malaa vinodi vaTlele » Archive through August 25, 2007 « Previous Next »

Sunidhee
Thursday, September 14, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा बीबी आधीच कुठे असेल तर सांगा.. मला दिसला तरी नाही.

गोष्ट माझ्या नात्यातल्या बहिणीची.
तर, ताई चे माहेरचे आडनाव होते "शहाणे". तिला आणि तिच्या भावाला म्हणजे दादाला ते आडनाव आवडायचे नाही. पण इलाज नव्हता. ताई नेहमी दादाला चिडवायची "माझे लग्न होइल तेव्हा माझे आडनाव बदलेल पण तुला कायम हेच आडनाव वापरावे लागणार". दादा बिचारा शान्त माणुस, चुप्प बसायचा...
पुढे मग लग्न होइतोवर हि गोष्ट ताई विसरुन गेली. मग यथावकाश तिचे लग्न झाले. आणि तिच्या सासरचे आडनाव काय असेल ?? ... "बावळे" !!!!! तर, लग्नाच्या दिवशी पुर्वीच्या प्रथेप्रमाणे मंगल कार्यालयावर पाटी लागली "शहाणे-बावळे शुभविवाह" !!!!!!
त्या दिवशी रस्त्यावर जाणारा-येणारा प्रत्येकजण मनापासुन हसुन पुढे जात होता... :-)

नंतरची मजा... ताई एकदा माहेरी गेली. बोलता बोलता दादा तिला नेहमीच्या शांतपणे म्हणाला "ताई एक सांगु का? माझच आडनाव जास्ती बरं आहे नाही?"
ह्या वेळि चुप्पी अर्थातच ताईला लागलि.




Mrinmayee
Thursday, September 14, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, खरंच मजेदार किस्सा! मला पण असा काही बी बी इथे असल्याचं दिसलं नाही.

Soha
Friday, September 15, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी एका मंगल कार्यालयाच्या दारावर "फुले-माळी शुभविवाह" अशी पाटी पाहिली होती. त्यांच्यामधे मुलाचे नाव काय होते आणि मुलीचे नाव काय होते ते कळले नाही. पण जर मुलाचे नाव माळी असेल आणी मुलीचे नाव फुले असेल तर लग्नाला आलेले लोक म्हणाले असतील, "फुले माळ्याच्या घरी गेली."..... :-)

Pooh
Friday, September 15, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. लं चा एक किस्सा:

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते.

हे कळल्यावर पु. ल. म्हणाले

"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो"


Mrinmayee
Friday, September 15, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखीच्या एका काकांकडे घडलेला किस्सा. त्यांची आजी (वय वर्षे ९८) अतीशय आजारी होती. अगदी प्राण जाता जात नाही अशी स्थिती होती. तीच्या बिछान्याशी बसून जरा वेळाने ते बाहेर अंगणात आले आणि बघतात तर कुणीतरी 'शेवटचं' सगळं सामान आणून ठेवलेलं!! त्यांनी चक्रावून जाऊन घरातल्यांच्या नावानी ओरडायला सुरवात केली. त्यांचा मुलगा समोर येऊन म्हणाला,
"बाबा, मीच आणलं सामान, काकाबरोबर जाऊन".
"मूर्खा हे असं करायला सांगीतलं कुणी तुला? तुझी पणजी जिवंत आहे अजून!" काका करवदले.
"बाबा, आत्ताच डॉक्टर म्हणाले 'काही तासांचा खेळ आहे' म्हणून. इकडे मॅच सुरु व्हायला जराच वेळ आहे. नेमकं मला त्याच वेळी तुम्ही पाठवलं असतं, म्हणून आत्ताच सामान घेऊन आलो"! इती चिरंजीव.
वर्ल्ड कप का कुठलीशी महत्वाची क्रिकेट मॅच जराच वेळात सुरु होणार होती, आणि त्याचं उत्तर ऐकून काका देखील काही न बोलता तिथून निघून गेले. पणजीबाईंनी पण भारत जिंकल्याचं बघून मगच प्राण सोडला.


Meggi
Saturday, September 16, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, सोहा .
मी पण शुभविवाहाच्या विनोदी पाट्या वाचल्यात.. पण आता आठवत नाहित :-)
मृ, रागवु नकोस. पण मला हे विनोदी नाही वाटलं


Mrinmayee
Saturday, September 16, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेग्गी, कुणाच्या मरण्याचा प्रसंग हा विनोदी असुच शकत नाही, अगदी ९८ वर्शांच्या व्यक्तीचा देखील!! आणि राग वगरे नाही गं. एकाला विनोदी वाटणारं दुसर्‍याला वाटायलाच हवं असं कुठे आहे? त्यातून हा विनोद कुणी मरतंय म्हणून नाही तर त्या मुलाच्या आगाउपणात आहे!ज्यांना हे विनोदी वाटलं त्यांना " sick sense of humor " होता असं मला तरी वाटंत नाही.

Moodi
Monday, September 18, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा आम्ही सगळ्या मैत्रीणी क्लासहुन घरी चाललो होतो. आमच्या क्लासमधली मुले सायकलवरुन पुढे चालली होती. त्यातल्या एकाने एका बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्याची खोडी काढली. तो कुत्रा चवताळुन त्यांच्या मागे भुंकत पळत आला. ज्याने खोडी काढली नेमका त्याच्याच मागे होता. या बहाद्दराची मग बोबडी वळली कारण कुत्रा मोठा होता. तो चावेल म्हणून हा आधी जोरात पायडल मारायचा आणि मग सर्कशीत दाखवतात तसे पाय वर घ्यायचा. सार्‍या रस्त्याने हाच प्रकार चालु. आमची सगळ्यांची हसुन मुरकुंडी वळली.

माझे घर सगळ्यात शेवटी. मला फार वाईट सवय आहे की कुठलीही विनोदी गोष्ट मला केव्हाही कुठेही आठवते, त्यामुळे माझी जाम पंचाईत होते आनि हसूही आवरत नाही. कशी बशी मी घरी पोचले. आईने चहा दिला तो खाली ठेवला आणि झालेला प्रकार सांगतांना अक्षरश गडबडा लोळले. असे अनेक किस्से घडलेत, आठवले तर लिहीन.


Lajo
Tuesday, September 19, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुत्र्याबद्दल विषय निघाला म्हणुन हा फोटो इथे टाकला. पुण्यात एका गेट वर पाहिलेली पाटी. (स्पेलिंग मिस्टेक बघितली का?)


Zakki
Tuesday, September 19, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हटकेश्वर हटकेश्वर मूडी! समजा तो कुत्रा तुमच्यामागे लागला असता तर? मग आले असते का हसू? आँ?

मुले हुषारच असतात. त्याला माहित होते की तो जोरात पळून गेला तर कुत्रा तुमच्या मागे लागेल. म्हणून तो मुद्दाम हळू चालवत होता! शिवाय त्या मुळे तो मुलगा तुम्हाला लक्षात राहिला, म्हणजे नंतर तो कुणा मुलीशी बोलायला गेला तर ती नेहेमी सारखी फिस्कारून बोलण्या ऐवजी निदान हसत हसत तरी बोलेल. हा सगळा 'लाईन मारण्याचा' प्रकार!

एव्हढे जर बायकांना कळत असते तर काय पाहिजे होते?!



Disha013
Thursday, November 09, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंजिनीरिन्ग करत असताना मी आनि माझी एक मैत्रिण मिळून काॅलेज ला जायचो. एकदा स्कूटी बिघड्ल्यामुळे आम्ही जाताना बस ने गेलो आणि येताना आॅटोने जायला निघालो.....सहा सिटर आॅटो होत्या तेव्हा.....एक थांबविली पण एकालाच बसायला जागा होती......मी दणकट आनि ती होती बारकुळी,तिला म्हटले तु बैस माझ्या मांडीवर!ती बसली!
आणि वर म्हण्ते कशी, 'आज वर्तमानपत्रात माझे भविष्य होते' मजेशीर प्रवास होईल ' म्हणून!!



Mrinmayee
Thursday, November 09, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवर्‍याच्या ऑफीसमधल्या कलीगच्या पिल्लाचा किस्सा:
या छोट्याचं वय वर्षे दोन! आईबरोबर मोठ्या भावाला सकाळी शाळेत सोडायला गेला. आईनी ड्रॉप ऑफ एरीयात कार थांबवली. काहीतरी अनाऊन्समेंट ऐकु आली म्हणून तिनी कार जरा बाजूला नेऊन परत थांबवली, ती नेमकी एका क्लासरूमच्या खिडकीच्या शेजारी. लाउडस्पीकरवर बोललेलं स्पष्ट ऐकु यावं म्हणून तिनी स्वत:च्या बाजुची काच खाली केली. लागलीच मागून एक बारकासा आवाज आला,
"I will take a cheeseburgar and coke please !" :-)


Aashi
Friday, November 10, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol Mrinmayee . प्रयत्न करुनही हसु थाम्बत नहीय

Sunidhee
Friday, November 17, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय आजकाल कोणाला काही विनोदी वाटत नाही वाटते? काय लोक हसत नाहीत का हल्ली? दहशतवादातुन बाहेर या बरं जरा. :-)
म्रुणमयी :-)
वरच्या pooh नि लिहिल्या सारखा अजुन एक पु. लं. चा किस्सा आहे.. माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु. ल. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला'.


Atul
Monday, November 20, 2006 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मित्राकडे गेलो असतानाचा हा किस्सा आहे. ह्या मित्रा कडे कुत्रा आहे हे ऐकले होते त्यामुळे जरा दबकतच गेलो आणि बेल वाजवली. दरवाजा उघडाच होता, पण sliding shutter door बन्द होते त्यामुळे कळजी नव्हती. बेल वाजवल्या बरोब्बर एक वीतभर उन्चीचा कुत्रा ओरडत बाहेरच्या खोलीत आला. त्याचा आकार पहुन वाटले हत्तिच्या इस मच्छर को क्या घबराना. sliding door उघडुन आत गेलो आणि कोचावर बसलो, मच्छर भुन्कतच होता. १-२ मिनीटान्नी दोन भले मोठे दन्डगे कुत्रे कसलाही आवाज न करता बाहेर्च्या खोलीत येउन मझ्या दोन्हिबाजुला येउन पहरेकर्‍यान सारखे बसले. मच्छर ला चान्गलाच जोर चढला होता. मला काय माहित की याच्याकडे २-३ कुत्रे आहेत. मी भेदरलेल्या अवस्थेत ४-५ मिनिटे काढली आणि मग हे मित्र(!) महोदय बाहेर आले. भालदार चोपदार आतल्या खोलित गेल्याची आणि त्याना बान्धून ठेवल्याची खात्री केल्यावर मी मित्राला जाम ओरडलो :-)

Kiru
Thursday, January 18, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मित्राच्या ऑफ़ीस मध्ये गीता नवलकर नावाच्या एक अकाउंटंट बाई होत्या. त्यांचं अक्षर कुठल्याही डॉक्टरला लाजवेल इतकं वाईट होत.
एकदा ऑफ़ीस मध्ये काही ऑडीटर्स आले होते अकाऊंट्स चेकींगला. बाईंच अक्षर काही केल्या त्यांना लागेना. ते होते तसे चारच दिवस ऑफ़ीसमध्ये, पण पहिले दोन दिवस गीताबाईना अक्षरश: ऑडीटर्सना समजाऊन सांगण्याकरता त्यांच्याबरोबर बसावे लागले.
तिसर्‍या दिवशी बाईंना जरा लवकर जायचे होते घरी. ऑडीटर्स तो दिवस सांभाळून घ्यायला कसेबसे तयार झाले.
दुसर्‍या दिवशी गीताबाई ऑफ़ीसमध्ये आल्या आणि बघतात तो टेबलावरली सगळी कागद्पत्र अगदी व्यवस्थीत रचून आणि बांधून ठेवली होती रबरबॅंडने. बाई खूश झाल्या... 'चला म्हणजे ऑडीटर्सना काही प्रॉब्लेम आलेला दिसत नाहीये'..
त्या खुर्चीवर येऊन बसल्या तेंव्हा त्या पेपर्स च्या वर एक कागद ठेवलेला त्यांना दिसला.
आणि त्यावर एकच शब्द लिहिला होता...
'गीतारहस्य'



Kedarjoshi
Thursday, January 18, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीतारहस्य' >> LOL .. ..

Rahulphatak
Friday, January 19, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kiru ,.. .. ..

Prajaktad
Friday, January 19, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गीतारहस्य' >>>>
'किरु' ये जबरि किस्सा है!



Vishee
Sunday, August 26, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचे सगळे किस्से मस्त!!!

आमच्या सोसायटीत शिरतानाच एक अगदी छोटं देऊळ आहे आणि बहुतेकांना सवय असते गेट मधुन आत येताना नमस्कार करायचा चालता चालता (म्हनजे एका हाताने करतो ना आपण, आधी कपाळाला हात लावुन मग तोच हात मानेखाली लावतो....तसा). माझी एक मैत्रीण आत येताना कोणत्या तंद्रीत होती की नुकतंच आधी कोणाला hi, hello केलेलं हात उंचावुन माहित नाही, पण इथे देवळासमोरुन जातानापण हिने हात उंचावुन hello सारखा हात हलवला.....मग पटकन लक्षात आलं तिच्या. आधी आजुबाजुला बघितलन कोणी बघीतलं नाही ना...

मला हे आठवलं की डोळ्यासमोर येतं कसं झालं असेल ते आणि एकटिलाच हसु येतं अजुनही.....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators