|  
Aparnas
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 9:23 am:    |  
 
 
 |   
  |   
 हा हा हा... असाच विचित्र प्रकार माला सिन्हा 'जो तुम मुस्कुरादो' गाण्यात करते. प्रत्येक वेळी 'जो तुम' च्या वेळी हिरोकडे हात करते   
 
  |  
 पूनम, फारेंड    मला युट्यूब ला ऍक्सेस नाहीये. त्यामुळे पाहू शकत नाही पण वाचून पण मजा येतेय.  अपर्णा माला सिंहा तर बहुतेक सगळ्या गाण्यात असे करते.  एका कुठल्या तरी मुव्हीमधे (ज्यात ती हीरोला सारखी दाक्तरबाबू असे म्हणत असते) तिचा एक पार्टीतला डान्स आहे. जबरी हसले होते तो बघून. शिवाय त्याच का अजून कुठल्यातरी पिच्चरमधे उड्या मारत कळशी घेऊन पाण्याला जाताना गाते तो पण.  त्या वेळच्या घरकी मर्यादा, खानदानकी इज्जत वगैरे म्हणणार्या हिरॉईन्स स्वतःच्याच घरच्या पार्टीत अशा कशा नाचायच्या आणि ते इज्जतदार खानदान अगदी कौतुकाने कसे बघऽऽऽत बसायचे काय कळत नाही.  सगळे नाचतायत तेंव्हा एक ठीक आहे पण एकटेच? आणि कोरिओग्राफी तर सॉलीडच असायची. छान छान छान आमुची बाग किती छान वाली.  वर कॉस्च्युम काय तर पाचवारी साडी!   काही हिरॉइन्स तर टप्प्याटप्प्याने नाचत. प्रेक्षकांना अधूनमधून विश्रांती म्हणून दोन ओळी उभे राहून मग दोन ओळी चालत. मग मधेच नाचसदृश हातवारे.  उदा. भलीभलीसी इक सूरत हे गाणे. 
 
  |  
Chioo
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 2:20 pm:    |  
 
 
 |   
  |   
 ते माला सिन्हाचे गाणे 'कंकरिया मारके जगाया' म्हणते आहेस का गं? त्यात ती एकटीच नाचत असते आणि  party तले सगळे मख्खासारखे उभे असतात. चेहर्यावरची रेषपण हलत नाही.   फ़क्त हिरोवर आधीपासून लाईन मारणारी हिरवीण उगीच नाक्-बिक मुरडायचा प्रयत्न करत असते( make-up  आणि  angles ची न जमणारी कळजी घेत). 
 
  |  
Mandarnk
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 3:35 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मला रेमिक्स प्रकार फारसा आवडत नाही, पण  सामने ये कौन आया गाण्याचं रेमिक्स धमाल  tp  आहे. जुन्या काळचे रंगिबेरंगी कपडे,  hairstyle , लंब्रेटा स्कूटर अशा सही गोष्टी आहेत व्हीडिओमधे...   
 
  |  
 अश्विनि,बरोबर आहे.माझा जन्म १९८५चा आहे. त्यामुळे हा ज्युली माहित नाही. तो पुढचा सुंदर पिक्चर स्वामी ही माहित नाही आणि ते गाणेही. त्यामुळे सर्व चर्चा डोक्यावरुन जात आहे 
 
  |  
Disha013
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 4:06 pm:    |  
 
 
 |   
  |   
 आई गं हसुन हसुन पुरेवाट!  ते फ़ल्गुनी पाठकचं  'याद पिया की आने लगी भिगी भिगी रातोमे'   असेच फनी.  ही ओळ म्हणताना एक हात मागे नि दुसर्या हाताचे एक बोट वर करुन केलेला  'डान्स'  सही..      हे बघा जितेंद्रचे अजुन एक धमाल गीत..  तो आणि ती हिरोईन नुसत्या टनाटणा उड्या मारताहेत.  आणि एकामेकाला फटके पण मारतात...     http://www.youtube.com/watch?v=ZwStGUaK7uA 
 
 
  |  
Farend
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 5:19 pm:    |  
 
 
 |   
  |   
 दिशा तेही मस्त आहे. लीना चंदावरकर आहे का ती? ७० च्या दशकातील केश आणि वेषभूषा, असले अफलातून नाच आणि वर 'तेरा ही नाम है, पयाम है, सलाम है" वगैरे टोटल 'सुटलेला' आनंद बक्षी      आणि त्यावेळी काही लोक म्हणायचे अमिताभ ला नाचता येत नाही, बघा जितेन्द्र किती चांगला नाचतो. हीरॉइन च्या पायावर एक फटका, मग सेट वर एका पायाने गोल राउन्ड, असला 'नाच' अमिताभ ने केला नाही हे नशीब   
 
  |  
Lalu
 
 |  |  
 |  | Friday, September 28, 2007 - 5:30 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लीना नव्हे ती. कोणी कोमल आहे म्हणे....  त्या आधीच्या गाण्यात जितेन्द्रच्या घश्याखाली बो आहे, त्याच्या नाड्या कॉलरच्या खालून मागे बांधायच्या रहिल्यात असं वाटतंय. 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Saturday, September 29, 2007 - 5:04 am:    |  
 
 
 |   
  |   
  प्रकाश झा आता खोया खोया चाँद नावाचा सिनेमा घेऊन येतोय. सोहा आहे त्यात. त्यात असे जुन्या टाईपचे नाच बघायला मिळतील.  
 
  |  
Swa_26
 
 |  |  
 |  | Saturday, September 29, 2007 - 5:33 am:    |  
 
 
 |   
  |   
 अजुन एक सायरा बानुचे गाने आहे, 'तुमको हमारी उमर लग जाए'...  त्यात पण ती अशीच भन्नट नाचत असते, भर पार्टीत... तेही पाचवारी साडित!! 
 
  |  
Psg
 
 |  |  
 |  | Saturday, September 29, 2007 - 5:47 am:    |  
 
 
 |   
  |   
 जबरी दिशा   ए पण सर्वात मोठा अचाटपणा त्या गाण्यातला पाहिला ना.. हे दोघं ज्या बागेत नाचत आहेत तिथे चक्क रात्र आहे, दिवे लावले आहेत आणि जयदीप त्यांना बघतोय त्या भागात चक्क दिवस आहे, ऊन पडलय!!!!!!!!!!!!!! आणि जयदीप कशाला इतकं वाकवाकून त्यांचा नाच बघतोय?   
 
  |  
Sampadak
 
 |  |  
 |  | Monday, October 01, 2007 - 11:07 am:    |  
 
 
 |   
  |   
  नमस्कार मित्रहो,  आपल्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे लक्षात आहे ना?      कथा, कविता, ललित, विनोदी, रांगोळ्या, चित्र, छायाचित्र- सर्व प्रकारच्या साहित्याचे स्वागत आहे. तुम्ही लिहा, तुमच्या अन्य मायबोलीकर मित्रमैत्रिणींनाही सांगा.    नवीन मायबोलीत साहित्य पाठवायच्या लिंक्स तयार आहेत. तुमच्या साहित्याची वाट पहात आहोत. साहित्य पाठवायचे नियम व सूचना तुम्हाला इथे सापडतील     /hitguj/messages/34/131137.html?1191068395     संपादक मंडळ तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला तत्पर आहेच.    साहित्य पाठवायची तारीख आहे २४ ऑक्टोबर... तेव्हा त्वरा करा.. 
 
  |  
Aashu29
 
 |  |  
 |  | Monday, October 08, 2007 - 10:07 am:    |  
 
 
 |   
  |   
 काल मी राजश्रीवर जुगनु पाहिला,त्यातला लास्ट सिन काय अचाट होता!  धर्मेंद्र आणि त्याचा बाप प्राण दोघांना एका खांबाला बांधलेले असते, आणि त्यांना मारण्यासाठी ५-६ वेगाने फ़िरण्यार्या लाकुड कापायच्या चकत्या त्यांच्या जवळ जवळ येत असतात, आणि थोड्या अंतरावर बसुन अजित वगेरे विलन लोक ड्रिंक पिउन ती मौत एन्जोय करत असतात, अर्रे काय हे?डायरेक्ट गोळि का नाहि मारत?  मग गरीब घरातली हेमा मालिनी हेलिकोप्टर घेउन येते, आणि तिथे अजुन एक अतर्क्य सिन.  तिच्याकडे एक शक्तिशालि लोहचुम्बक असते, किती शक्तिशालि?तर ते विलनच्या गाडिला वर खेचते, बरं electromagnet आहे असे म्हणुया तर पुढच्याच सिनला ति असा एक हिसडा देते चुम्बकाच्या दोरिला आणि गाडी खड्यात पाडते.  आणि सर्व अcक्शन संपल्यावर पोलिस होडितुन येताना दाखवले आहेत.  हा हा मजा आली बघुन!!
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Monday, October 08, 2007 - 2:31 pm:    |  
 
 
 |   
  |   
  त्या जुगनु मधे, एस्डी ने बंदुकीच्या गोळीसाठी एक भन्नाट आवाज वापरलाय.  पुर्वी कधीही तसा आवाज नव्हता, नंतर कुणी तसे धाडस केले नाही.  
 
  |  
Farend
 
 |  |  
 |  | Tuesday, November 06, 2007 - 12:20 am:    |  
 
 
 |   
  |   
 तू मेरा सुपरमैन, तू मेरी लेडी  हो गया है अपना प्यार ऑलरेडी    गाणं जास्त अचाट आहे की त्याचे शूटिंग, तुम्हीच ठरवा   
 
  |  
 लोल अमोल.   बर त्या गोविदांने हात ऐन्टेना सारखा वर का धरलाय काही कळाले नाही. ( अन तो सुपरम्यान ही तसे का करतो, हा प्रश्न तो प्यांटीवरुन चड्डी का घालतो तसाच सतावत आहे)    अन ते गाण ऐकताना मला उगीच तु मेरी रेडी असे ऐकु आले. 
 
  |  
Psg
 
 |  |  
 |  | Tuesday, November 06, 2007 - 6:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 बापरे फ़ारेंडा!!! ह ह पु वा च्या पुढची स्टेज काय असते?    तो सुपरमॅन आणि ही त्याची स्पायडरलेडी! आईग्ग्ग! 'बेस्ट अतर्क्य गाणं' म्हणून बक्षिस द्यायला पाहिजे याला    
 
  |  
Monakshi
 
 |  |  
 |  | Tuesday, November 06, 2007 - 7:48 am:    |  
 
 
 |   
  |   
 आईशप्पथ, हा काय प्रकार आहे????? व्यायामाचे काही नवीन प्रकार वाटतायत.            माझा  pc  तर  without speaker  आहे त्यामुळे नुसतंच  action  बघितल्या तर ते आणखीनच  funny  वाटतं.  
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Tuesday, November 06, 2007 - 9:20 am:    |  
 
 
 |   
  |   
  ती सुपरमॅनीण, किमी काटकर आहे ना  ?   
 
  |  
Monakshi
 
 |  |  
 |  | Tuesday, November 06, 2007 - 9:39 am:    |  
 
 
 |   
  |   
 हो दिनेशदा, तीच आहे ती. किमी काटकसरकर.   
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 हितगुज दिवाळी अंक २००७ 
 | 
   |  
 
 
 
 
 |