|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 12:01 am: |
| 
|
एका मैत्रिणी च्या स्क्रापबुक मधली स्क्राप... Hi, I dont know how but accidently i entered in ur profile. sorry for that but i saw ur profile and now i want to friendship with u. I want a true and caring friend who shares every happy and sad moments with me. If u trust me then give reply. I will waiting for ur reply.................. now here is an advice to whoever has used it before or planning to use it... accidental approach is good... that works sometime स्वानुभव पण किती त्या english च्या चुका. आणि किती वेळा i want... just say what you can give. and why are you saying you are sorry, you should be happy to *accidentally* discover such a nice profile. and say you'll be excited to see yourself in her friends list. never say can/should i do this/that, sorry, i want
|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 12:24 am: |
| 
|
nobody is talking about how one should approach.. think positive people. -------------------------------------------------------------------------------------------------- ok i have personally used this many times and it worked a lot on chat. (atleast 5-6 yrs back it used to.) What's your sun-sign? whatever she replies. (if she replies once, she'll reply again) Oh thats perfect!. Do you know Linda Goodman says _HER_SIGN_ and _YOUR_SING_ can be perfect friends. they have so much in common... go on frm here. -------------------------------------------------------------------------------------------------- if you want to flatter somebody... (very low chances of it to work) lets say you come across some profile with nice photographs... Excuse me, but I think I dropped something!!! MY JAW!! that photo is so good or, after you share photographs. Wow! For a moment I thought I had died and gone to heaven. Now I see that I am very much alive, and heaven has been brought to me. -------------------------------------------------------------------------------------------------- otherwise just scrap one word Wow... if reply comes good, otherwise Aasman main laakho tare. finally everything works if THAT is not your aim and you just want to increase girls in your friends circle. *just using my chatting experience* ** hope my sister is not on maayboli.com, otherwise she is going to give me hard time **
|
एकदा मी माझ्या गर्लफ़्रेन्ड्च्या ईमेल आयडी वरुन चटिन्ग करत होतो तर एक जण लगेच ओन लाईन आला (मुली म्हतलि कि लागलि साल्याची लाळ गळायला) आणि पहिल्यान्दा नीट माणसातला वाट्ला अन नन्तर जास्तच मजनुगिरि करु लागला मग कय गोड बोलुन त्याच्याकडून त्याचा नम्बर घेतला आणि नन्तर फोन करुन मस्त फैलावर घेतले हरामखोराला नन्तर हिम्मत झाली नसेल कोनाशी करायची, खासकरुन कोनत्याही मुलीशी.
|
Maanus "What's your sun-sign? " is good try but next q will not work for sure.... then u sould guess b'month I think so... and these accident so much common... even LIC is not paying for them... forget about gals.... evn flattering pan nehemich ahe tyachya peksh let her no tht she is not some one spl. some times I start with stupid q's like "abtak kitnae ladko ko fasaya hai aapne???" baki ajun ahet i'll write them as time allows ... ani one important thing nvr ask for ASL at first shot.... tht meance u r on hunt... aaj kaal chyaa poari lay husahr ahet yar... ASHish....
|
Ajjuka
| |
| Friday, August 24, 2007 - 3:28 pm: |
| 
|
आजकालच्या पोरी हुश्शार तर नक्कीच. वरच्या ३ - ४ उदाहरणातल्या एकाही वाक्याला reply दिला तरी नशीब समजा. मला तर वाटतं दिलाच तर काहीतरी असा तिरका मारतील की परत असल्या boring pickup lines घेऊन कुणाकडे जायची हिंमत होणार नाही तुमची. आणि कसलं काय positive घेऊन बसलात. कसे स्क्रॅपस आले असता खिल्ली उडवली जाते हे कळेल ना लोकांना. निदान सुधारतील तरी, किंवा मुलींना गृहित तरी धरणार नाहीत. असले मेसेजेस आले की मी सरळ उडवून टाकते. एखाद्याने अगदी स्पेसिफिकली काही प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं बास.
|
Aktta
| |
| Friday, August 24, 2007 - 8:52 pm: |
| 
|
अज्जुका मला वाटत की ते chatting बद्ल बोलतायत...... chatting आनी orkut मधे बराच फ़रक आहे chat room मधे तुम्ही स्वताहुन जातात...... कोनी तरी approach कराव म्हनुन किंवा just to approach some one आता way to approach मी काही ठरवून buzz करत नाही lot मधे buzz करायच जी (कधी कधी जो पन) reply करेल ते आपले मीत्र बाकीच्यांना नंतर भेटु... फ़क्क्त जे रूम मधे नुकतेच आले आहेत त्यांना पकडायच..... कारन बाकी चे busy अस्तात.. एकटा......
|
Aktta
| |
| Monday, September 10, 2007 - 12:18 pm: |
| 
|
वैष्णवी कानविंदे आर्कुट साइटचा वापर करण्यात भारतीयांचा अधिक भरणा आहे. ऑर्कुट जरी पाश्चिमात्य देशात घडलेली साइट असली तरी त्याच्या वापरात भारतीयांचा दुसरा क्रमांक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्यातही मराठीभाषक सर्वात जास्त आढळल्याने आर्कुटने सर्व सेवा मराठीतही देण्याचे ठरवले आहे. याशिवाय बंगाली , तेलगू , तामिळ आणि हिंदी या इतर चार प्रादेशिक भाषांमध्येही आर्कुट येणार आहे. आर्कुटबद्दल सुरू असलेल्या वादांना आळा बसावा म्हणून जास्तीत जास्त भारतीय टच देण्याचा हा ऑर्कुटचा प्रयत्न असल्याचे समजते. ऑर्कुटने देशभर केलेल्या संशोधनानंतर त्यांना भारतातील ८० टक्के ऑर्कुट जाळे या पाच भाषांमध्ये असल्याचे आढळले. त्यामुळे त्या भाषांमध्ये ऑर्कुटचे भाषांतर होणार आहे. कालांतराने इतरही भाषांमध्ये भाषांतर करण्याचा ऑर्कुट समितीचा विचार असल्याचे समजते. सध्या ऑर्कुट ब्लॉगवर यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे. जेव्हा मराठीत ऑर्कुट येईल , तेव्हा स्क्रॅप , टेस्टिमोरिअल आदी आपल्या भाषेत लिहिता येऊ शकतील. सोशल नेटवकिर्ंग साइटमधली स्पर्धा ओळखून या भाषांतरावर गूगलद्वारे भारतातच काम सुरू असल्याचे ऑर्कुटच्या माहीतगारांनी सांगितले. *************************************** सध्या नोंदणीसाठी खुल्या असलेल्या सोशल नेटवकिर्ंग साइट्सची सदस्यसंख्या ऑर्कुट : सहा कोटी ७९ र्ाख ६२ हजार ५५१ फोटोलॉग : ९० लाख स्टुडंन्ट सेंटर : ८० लाख हाय फाय : ५० लाख बझनेट : ५० लाख याहू ३६० डिग्री : ४७ लाख फ्रेंडस्टर : ४७ लाख ईस्पिन : ४४ लाख क्लासमेट डॉट कॉम : ४० लाख फ्लिकर : ४० लाख झिंग : ३५ लाख फेसबुक : ३४ लाख बेबो : ३४ लाख रीयुनियन डॉट कॉम : २८ लाख डॉल पॅलेस : २५ लाखनेट लॉग : २४ लाख टॅग र्वल्ड : १८ लाख ५० हजार लाइव्ह जर्नल : १२ लाख ९० हजार फ्रेंड्स रीयुनायटेड : १२ लाख माय ऑपेरा कम्युनिटी : साडे आठ लाख टॅव्हेल बडी : सात लाख ६० हजार ग्रॅज्युएट डॉट कॉम : सहा लाख ५० हजार लायब्ररी थिंग : तीन लाख जेनी डॉट कॉम : एक लाख
|
Ajjuka
| |
| Friday, November 02, 2007 - 11:00 am: |
| 
|
एका कम्युनिटीमधून एका व्यक्तीने मला शोधले.. त्याला सोयीसाठी आपण R म्हणू. कसे तसे करत जीटॉक वर accept करून घेतले स्वतःला. मग गप्पा मारू लागला. अगदी सुरूवातीचे हाय हॅल्लो झाल्यावर R अमुक शहरामधे आहे का कुणी तुमचं? मी तिथे रहातो. मी - (मनात) काय संबंध? कशाला उगाच सांगा.. (उघड) नाही R येता का कधी या बाजुला? आलात तर नक्की या घरी.. मी - (मनात) भारीच गळेपडू आहे. आत्ता नाही ओळख झाली तर लगेच घरी बिरी.. (उघड) नाही तिथे येणं नाही होत. आले तर कळवीन. R १२३४५६७८९० हा माझा नंबर. फोन करा मी कशाला? R असंच. मी - (मनात) अडलंय माझं खेटर.. (उघड) मी कामाशिवाय कुणाला फोन करत नाही अगदी खास मित्रमैत्रिणी सोडल्यास. R मग मला खास मित्र समजा.. मी - (मनात) आरं तुज्या..... (उघड) बघू R तुमचं कोणीच नाही का अमुक शहराच्या आसापास? मी नाही पण आज आत्ता या क्षणाला माझा नवरा आहे त्याच भागात (हे खरंच होतं. नवरा अश्या वेळेला उपयोगाला येतो) R १२३४५६७८९० हा माझा नं द्या त्यांना. आणि फोन करायला सांगा. मी कशाला? R काही नाही त्यांना घेऊन घरी गेलो असतो. मी तो कामासाठी गेलाय तिथे. त्यामुळे तिथला त्याचा वेळ कसा manage करायचा ते मी त्याला सांगत नाही. सांगणार नाही. (हे १००% खरंय) R तुमच्या घरात कोण असतं? आत्ता कुठे आहात? आत्ता कोण कोण आहे घरात? माहेरी कोण कोण असतं? तुम्हाला भाउबहिण? मी - (मनात) काय त्रास आहे? (उघड) हे एवढे प्रश्न? का? कशासाठी? I am not comfrotable talking abt these details to a complete stranger. R तुम्ही गैरसमज करून घेताय. मी typical नाहीये. मी म्हणजे? R typical ऑर्कुट वर असतात तसे. लोक इथे कशाकशासाठी येतात. घाणेरडेपणा. माझे तसे नाहीये. मी - (मनात) कळतंच आहे. विचारलं नसताना सफाया देतायत त्यावरून. (उघड) हं.. ऑर्कुटवरचे सगळेच तसे असतात असं नाही. R अहो तुमच्याबद्दल नाही हो तुम्ही चांगल्याच आहात. मी - (मनात) आवशिचो.... ^$&^**( R मी एक वाक्य सांगू का तुम्हाला धक्का बसेल. मी बोला R शेवटच्या प्रवासाला खूप लोकं असावीत असं मला वाटतं त्यामुळे मी असं वागतो. (एव्हाना मला कंटाळा आला होता. आणि हे वाक्य ऐकल्यावर तो १०० पटीने वाढला..) R काय बसला की नाही धक्का? मी नाही हो. तसं म्हणलं तर सगळ्यांचीच तशी इच्छा असते. R अहो सगळ्यांचीच तशी इच्छा असती तर इथे रामराज्य दिसलं असतं. मी प्रत्येक जण आपापल्या परीन योग्यच वागत असतो. एकाचं बरोबर दुसर्याचं चूक असू शकतं. R सापेक्षतावादाच्या सिद्धांताप्रमाणे काही सिद्ध करता येईल... मी - (मी कंटाळलेली होते.) नो उत्तर.. R तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? मी काम करतेय. R कामच ना की अजून काही? ही ही. हरकत नाही माझी बायको यायला अजून बराच वेळ आहे. मी - (मनात) चला हीच ती वेळ हाच तो क्षण.. (उघड) मला निघायला हवे आता. इथे तो संवाद संपला. अप्ण मग लक्षात आले की त्या कम्युनिटीवरच्या बर्याचश्या मुलीशी तो असंच काहीसं बोलाअ होता. आणी फोन नंबर देऊन फोन करा फोन करा सांगत होता. एकीला तर शिकागो हून फोन करा म्हणाला होता. नंतर अर्थातच त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. post contd..
|
Ajjuka
| |
| Friday, November 02, 2007 - 11:12 am: |
| 
|
मग एकदा त्या कम्युनिटीच्या GTG ला गेले होते. तर तिथे व्यक्ती हजर. मी अर्थातच फारसं काही बोलले नाही. हा माणूस मुंबईतल्या GTG साठी ८ ९ तासांचा प्रवास करून आला होता. आणि या कम्युनिटीतून ओळख झालेल्या एका प्राची नावाच्या मुलीच्या घरी उतरला होता. तिच्याशी ओळख होऊनही त्याला फक्त महिनाच झाला होता. हे अर्थातच माझ्या दुसर्या मित्राने त्याला विचारले तेव्हा कळले. मग माझा तो दुसरा मित्र थोडा त्या प्राचीच्या चिंतेत पडला. हा R माणूस इतरांशी बोलतानाच थोडा चवली पावली हरवल्यासारखा वाटत होताच. मग त्या GTG चे फोटो एकाने तिथे upload केले. त्या ग्रुप फोटो मधे मी पण होते तर मला स्कऍप. तुमचा फोटो dwnld करू का म्हणून. जसं काही मी नाही म्हणाल्यावर हा करणारंच नव्हता. मी विचारलं, कशाला? असंच पुढे मागे उपयोगी येईल म्हणे.. त्याचाही अर्थ विचारला तर तसं काही नाही.. तुम्हाला नको असेल तर नाही घेणार म्हणाला. म्हणलं मग नका घेऊ. मग मी स्कऍप्स ही थांबवले. पण तो माणूस अजूनही अनेक मुलींना असाच approach होतोय. अजूनतरी माझ्या अंदाजाने त्याने serious काही केले नाहीये. पण you never know! आणि जोवर काही serious केले नाहीये तोवर कळूनसुद्धा त्याला थांबवणार कसे?
|
Ana_meera
| |
| Friday, November 02, 2007 - 11:36 am: |
| 
|
अज्जुका, खरच गंभीर खरा हा विषय.. पण मुलींनी हिंट्स मिळत असतानाही जपून राह्यला पाहिजे नाही का? काही खटकण्यासारखे नसले तरी एक नजर(हापिसात ही स्त्रिया हा अनुभव घेतात की नजरेचा) ही किंवा आंतरजालावर लिहिण्याची स्टाईल ही खुप काही सांगून जाते... हम्म्म..
|
Ajjuka
| |
| Friday, November 02, 2007 - 12:36 pm: |
| 
|
अगदी खरंय ऍना_मीरा. फसलेल्या बायकांकडे बघून वाटतं बायकांच्यात जो sixth sense असतो तो अश्या वेळी कुठे शेण खायला जातो कळत नाही..
|
Manuswini
| |
| Friday, November 02, 2007 - 5:38 pm: |
| 
|
मी तेच तर तिथे लिहीले की you get some signaling आणि जो पर्यन्त एक confidence नसेल तर करतात कशाला ह्या मुली तरी? ईतके कोणीही दूधखुळे नसते. आजकाल सगळीकडे असे प्रकार होत असताना. माझा ही अनुभव लीहावाच लागेल and I am sure, it is equally gross
|
Mansmi18
| |
| Friday, November 02, 2007 - 6:20 pm: |
| 
|
ऑर्कुट मधे म्हणा किंवा इतर कुठे म्हणा.. प्रथम हा प्रश्न या स्त्रीयानी स्वत:ला विचारावा की एखादा विवाहीत पुरुष किंवा अविवाहीत पुरुष तुमच्याशी का मैत्री करण्याची इच्छा दाखवतो आहे? एखादा त्यातील पुरुष sincere असेलही पण ते प्रमाण दहा लाख किंवा करोड मधे एक असे असेल. बाकी कोणाचा हेतु काय असेल हे न समजण्याइतके naive कोणी नसावे. हे सगळे माहीत असुनही जर तुम्ही कोणाला जवळीक करु दिलीत तर हे त्यांचे behavior तुम्ही condone करता असा अर्थ कोणी घेतला तर हा सर्वस्वी आपलाच दोष असेल नाही का? गुलमोहर वरील closeup ही कथा वाचुन धक्का बसला कारण भारतीय नवरा हा कुठेही असला तरी त्याला "बायकोचा चाट वरील मित्र" ही संकल्पना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही.(हीच गोष्ट नवर्याची चाट वरील मैत्रीणीलाही लागु पडते.) उगाच भलत्या गोष्टीत पडुन नंतर दुसर्याला दोष देणे कितपत योग्य? -मी "पुरुष" असे generically वापरले आहे कारण कोणी मुलगी किंवा स्त्री असे कुणा पुरुषाला apporach होइल असे वाटत नाही. असो.
|
Rashmee
| |
| Friday, November 02, 2007 - 6:39 pm: |
| 
|
अज्जुका तु जे लिहिलंय ते मला वाटतं माझ्या साठीच. तुझ्याच सारखा अनुभव मला ही आलाय.
|
Zakki
| |
| Friday, November 02, 2007 - 10:29 pm: |
| 
|
मला असे वाटते की बर्याच लोकांना एक सुप्त का होईना, इच्छा असते की लोकांनी आपले कौतुक करावे, आपण लोकांना हवे हवेसे वाटावे अशी. म्हणू ते असे ऑर्कूट, मायबोली इ. ठिकाणी येतात, आणि मग कुणाशीहि बोलत बसतात!! निदान मी तरी मायबोलीवर याच कारणासाठी आलो. सुदैवाने मला फक्त चांगलेच लोक भेटले, मुंबई, पुणे, NJ , सान होजे इथे. म्हणून मग मी इथे येत राहिलो. पण ऑर्कुटवर जाण्याची मुळिच इच्छा नाही!
|
Ajai
| |
| Saturday, November 03, 2007 - 5:38 am: |
| 
|
झक्की- तुम्ही १० वर्षापुर्वी जेव्हा मायबोलीवर आलात तेव्हा या सर्व विकृती इतक्या बोकाळल्या नव्हत्या. मी ही त्याकाळातच मायबोलीवर आलो( परदेशात एकटा असल्याने ती माझी गरज होती) आणि मायबोलीवर सुदैवाने चांगलेच अनुभव आले. त्याच काळात काही chat sites होत्या जिथे registration शिवाय chat करता येत होत उदा. mid-day ची site . तरीही तीथे गल्लिच्छ्पणा झाल्याचे आठवत नाही. मला वाटत जसजशी एखाद्या माध्यमाची व्याप्ती वाढत जाते तसतश्या अपप्रवृत्ती शिरकाव करतात. आपणच योग्य ती खबरदारी घेणे हाच उपाय.
|
Viveki
| |
| Saturday, November 03, 2007 - 10:11 am: |
| 
|
अशा प्रकारच्या तक्रारी करणार्या मुली दांभिक आहेत. तुम्ही समाजात वावरता तेंव्हा अनेकांशी ओळख होते आणि त्यातल्या काहीम्शी मैत्री होते. स्व्त:चे कुटुंब, मित्रपरिवार, नवरा वा बॉयफ़्रेंड असतांनाही या मुली एक तर ऑर्कुट, चॅट अशा ठिकाणी जातात, अनोळखी लोकांच्या advances ला प्रतिसाद देतात कारण यांनाच कुणीतरी पुरुष आपल्याकडे लक्ष देतोय हे कुठेतरी सुखावत असते, आणि मग अजून पुढे जाऊन बघायची इच्छा असते, यात काही चूक आहे की नाही यावर माझे काहीच म्हणणे नाही, हे नैसर्गिक आहे असे सगळ्याच मानसशास्त्राच्या पुस्तकात वाचले आहे. पण मग गोष्टी अंगाशी येउ लागल्या की लगेच कांगावा करायचा हे काही बरोबर नाही. आधी लिफ्ट द्यायची कशाला मग ? अमुक अमुक माझ्या मागे असा असा लागला होता हे अनुभवण्याची आणि सांगण्याची नशाही अनेकींना असते. ज्यांना खरच अशी opposite सेक्स शी ओळख, संबंध निर्माण करायचे नाहीत ते ऑर्कुटसारख्या ठिकाणी जाऊन, अनोळखी लोकांशी स्क्रॅप स्क्रॅप खेळत नाहीत आणि त्यांना चॅट आयडी वगैरे देत नाहीत. बाहेरून कितीही नाटक करा, हमाम मे सब नंगे है...
|
Ajjuka
| |
| Saturday, November 03, 2007 - 10:22 am: |
| 
|
मनु, लिहिच तुझा अनुभव. बरं वाटेल तुला आणि त्या माणसाने वाचले तर त्याला थोबाडातही बसेल. निदान मुलीच वाईट असतात म्हणून त्यांना असे अनुभव येतात असं म्हणण्याची जी अविवेकी वृत्ती आहे त्यातला फोलपणा चार टाळक्यांना तरी कळून येईल.
|
Viveki
| |
| Saturday, November 03, 2007 - 10:34 am: |
| 
|
अरे पोस्ट एकदम वर्मी लागले की काय ? स्वत्:हून एखाद्या अनोळखी पुरुषाला प्रतिसाद द्यायचे, त्याला आपला चॅट आयडी द्यायचा आणि मग म्हणायचे की कसेबसे जीटॉकवर accept करून घेतले. अहो जीटॉकवर एकतर accept करता येते नाहीतर reject करता येते. कसेबसे accept असा प्रकार नाही. तुमचे ते पोस्ट पुन्हा वाचले तर प्रत्येकाला माझे याआधीचे म्हणणे पटेल. म्हणजे माझे पोस्ट जर थिअरी असेल तर तुमचे पोस्ट म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरण आहे.
|
Ajjuka
| |
| Saturday, November 03, 2007 - 11:57 am: |
| 
|
विवेकी, तुमच्यासारख्या माणसाला मी काहीही प्रूव्ह करायची गरज मला मुळीच वाटत नाही. ना कुठलं स्पष्टीकरण द्यायची. तुम्ही मला ओळखत नाही. मी तुम्हाला कधी भेटले नाही, भेटण्याची शक्यताही नाही असे असताना तुम्ही माझ्या बदनामीचा जो प्रकार चालवलाय त्यातून तुम्ही स्वतः काय आहात हे कळतंय. तुम्ही प्रत्यक्ष कोण ते माहीत नाही मला पण बहुतेक फडतूस request करत येणार्या ज्या अनेकांना मी हुडूत केलेय त्यातलेच तुम्ही एक असण्याची शक्यता वाटायला लागलीये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|