|
Disha013
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:17 pm: |
| 
|
आईशप्पथ!! हसुन हसुन वाट लागली की! काय धमाल लिहिलेय सगळ्यांनी. मी हे नागपट लहान असताना अगदी सिरियसली बघितलेत! अगदी 'आता काय होईल' अशी उत्सुकता ठेवुन! आणी ते आत्मापट तर कधीच भीतीदायक वाटले न्हवते. ह्या नागिणी जेव्हा रुप बदलतात,म्हणजे चिडतात,हिरवे डोळे धारण करतात,झिप-या मोकळ्या सोडतात तेव्हा त्यांच्या अवताराला आम्ही 'हबा डाकीण' असे नाव दिले होते.
|
Deepanjali
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:34 pm: |
| 
|
या सगळ्या नागिणीं मधे श्रीदेवी ही निर्विवाद पणे नागराणी किंवा Queen Kobra बनायला हावी . ती एकदम चांदोबा मधल्या चित्रातल्या बायकां सारखी दिसते .! त्यातल्या त्यात कृर आणि वळवळण्यात चपळ वाटू शकेल अशी ही एकच filmy नागीण आहे . बाकी सगळ्या heavy बायका नागिणी कमी आणि म्हशी जास्त वाटल्या ! श्रीदेवी मस्तं दिसते नगिना मधे आणि तिच्या मुळे ते नाग नृत्य पण famous झालं . तसा अमरीश पुरी पण गारुडी बाबा म्हणून शोभतो ! निगाहे मधे मात्र अनुपम खेर अगदीच बहुरुपी दिसतो ! - एक श्रीदेवी फ़ॅन सर्प मैत्रीण
|
Manuswini
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:53 pm: |
| 
|
आई.ऽऽ.ऽऽ ग हसुन वाट, नुसती जत्रा आहे इथे भरलेली. ते गाणे आज ही हमने बदले ही कपडे वर solid जोक केले होते त्यावेळी. काय बेचव गाणे... शी.. निगाहे मध्ये पण श्रीदेवी ने पुरी वाट लावली. आम्ही हसुन पडायचो बाकी होतो थेटरात. ......... काय एकेक movies यार. डोक बाजुला काढून बनवायचे त्यावेळी. सगळी गरीब लोक थेटरात एकदम गंभीर चर्चा जेव्हा श्रीदेवि नी कोण तो थोराड नट(मेला हल्लीच) अमरीश पुरी हो त्यांची जुंपते तेव्हा... काही काही मुस्लिम बायका आमच्या मागे बसलेल्या अल्ला अल्ला करत होत्या. ...... अजुन ही आठवते ते.
|
Disha013
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:15 pm: |
| 
|
कमाल ए! हे असले नागपट थेटरात बघायच्या लायकीचे असतात का? आम्ही १० रुपयात व्हिडीओ कॅसेट आणुन बघायचो खुप पुर्वी. म्हणजे आपल्या मर्जीनुसार बघता येतात! फ़ाफ़ॉ करुन! आणि हो त्या 'मै तेरी दुश्मन' गाण्यावार शाळेतल्या गॅदरिंगमध्ये दरवर्षी एक तरी मुलगी आपले 'नृत्यकौशल्य दाखवाय्ची!
|
Farend
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:37 pm: |
| 
|
जुनून मधे राहुल रॉय कसा इच्छाधारी वाघ असतो!! तो प्रकार ही Cat People नावाच्या चित्रपटावरून ढापलेला आहे. तो वाघरूपात असतानाच त्याला पिंजर्यात बंद करून झू वगैरे मधे का नाही ठेउन दिला?
|
Maanus
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:47 pm: |
| 
|
थोराड नट(मेला हल्लीच) अमरीश पुरी काय कधी कसकाय
|
Disha013
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:58 pm: |
| 
|
हल्लि वगैरे नाही,अमरीश पुरीला जावुन ३ वर्षे होतील की. हार्ट अटॅकने बहुतेक..... राहुल रॉय इच्छाधारी असतो? त्याने एका वाघाला मारलेले असते(एका विशिष्ट रात्री) आणि मग शाप लागुन तो वाघ बनतो,असे काहीसे आहे ना ते?
|
Amruta
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:39 pm: |
| 
|
शी!! कसला पकाउ मुव्ही होता तो आणी वाघ कोण तर म्हणे राहुल राॅय. कसला मिळमिळीत दिसतो तो. आम्ही पण हे असले सगळे मुव्ही १० रु. विडियो कसेट आणुन पहायचो. जाम धम्माल होते ते दिवस
|
Sweetgirl
| |
| Friday, September 14, 2007 - 10:52 am: |
| 
|
या BB वरचे सर्व Posts वाचुन खुप हसायला येते. फ़ारच धमाल चाललेली असते इथे.
|
Aashu29
| |
| Saturday, September 15, 2007 - 12:24 pm: |
| 
|
निगाहे वरुन एक गोष्ट आठवलि. सन्नी देओल काहितरी २० वर्ष पेटार्यात असतो, मग तो बाहेर येतो, एक मनुष्याच्या रुपात वगैरे, आणि प्रेमात पडतो श्रिदेवीच्या, तेंव्हा श्रिदेवी तिच्या बापाला त्याचा intro करुन देताना सांगते, ये बहोत पढे लिखे है, हा काय पेटार्यात शिकत होता का काय?
|
श्र, तुमचे लेख एखाद्या इच्छाधारी नागिणीने वाचले तर तुमच्या मन्गळ्सुत्राची खैर नाही. आजच बाजारातून एखादा भक्कमसा ओम आणा आणी नवर्याच्या गळ्यात बान्धा. त्याला सक्त ताकीद द्या की कितिही सुन्दर तरुणीने आग्रह केला तरीही हा ओम गळ्यातून काढू नकोस.
|
Uchapatee
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:03 pm: |
| 
|
य़ा बा.फ. वर आधीच्या एका पोष्टमध्य़े जुन्या “नागीन” सिनेमाचा उल्लेख आला आहे त्या विषयी थोडेसे. पण त्या आधी नम्र निवेदन. आठवण बरीच जुनी असल्याने तपशीलांमधे फरक असण्याचा संभव आहे, तेंव्हा CBDG. (फरक फारच असल्यास या “नवीन” कथासुत्रावर एक अजून नागपट काढता येइल. कथा हक्क सुरक्षित.हास्यमुद्रा ). हा सिनेमा त्यामधील अविट गाण्यांसाठी खूप गाजला. य़ा सिनेमा मध्य़े प्रदीप कुमार व वैजयंतीमाला होते. यात वैजयंतीमाला खूपच गोड दिसली व नाचली ही मस्त! हा व नंतरचे “नागीन” यात नावा व्यतिरीक्त काही साम्य नव्हते. याची कथा सरळ साधी हाड्वैर्यां मधील प्रेम कहाणी होती. प्रदीप कुमार हा एक सपेरा असतो व रोज रात्री जंगलात जाउन नाग पकडून आणत असतो. (आता हा रोज का जातो व पकडलेल्या इतक्या नागांचे काय करतो कोणास ठाउक! वास्तविक एका गारुड्याला 7-8 नाग पुरेसे आहेत. 15-20 म्हणजे डोक्यावरुन पाणी. तो बहुतेक सर्व कबील्याला” सप्लाय करत असावा) कोणताही/कितीही विषारी नाग याच्या पुंगीच्या आवाजाने भारला जाउन याच्या कडे ओढला जातो अशी याची ख्याती असते. वैजयंतीमाला ही नागलोकाची राजकुमारी असते व रात्री सख्यांबरोबर नाइट आउट साठी पृथ्वीवर येत असते. पृथ्वीवर ती व तिच्या सख्यांनां फक्त रात्रीच मानव रुपात वावरता येते. त्यामुळे त्यांनां दिवस उजाडायच्या आत नागलोकात परत जावे लागते. एका रात्री त्या अश्याच पृथ्वीवर येतात तेव्हा प्रदीप कुमार पण नाग पकडायला जंगलात आलेला असतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैजयंतीमाला भारली जाउन त्याच्या कडे ओढली जाते व त्याच्या समोर पुंगीच्या तालावर नाचते. (बाकीच्या नागकन्या बहीर्या असाव्यात कारण फक्त वैजयंतीमालाच भारली जाते). दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग काय? रोज दोघांच्या भेटी सुरू होतात. (अर्थातच रात्री). ती नागलोकातली आहे हे कळून देखील प्रदीप कुमारचे तिच्या वरील प्रेम आटत नाही. य़ा भानगडीमुळे तो नाग पकडणे बंद करतो. (सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे?). नागांचा सप्लाय बंद पडल्याने प्रदीप कुमारच्या कबिलेवाले त्याच्यावर भडकतात. ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात पण हा ऎकत नाही. ईकडे वैजयंतीमालाच्या सख्यांनां पण ही बाई/नागीण रात्रीची एकटीच गायब होते ते लक्षात येते व त्या पण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. ती पण ऎकत नाही. मग सपेरे नागांवर व नाग सपेर्यावर हल्ले चढवतात. सपेरे वैजयंतीमालाला मारण्याचा प्रयत्न करतात तर नाग प्रदीप कुमारला. शेवटी नागराज (वैजयंतीमालाचा बाप) प्रदीप कुमारला चावतो आणी मारून टाकतो. (अगदी नॉन रीटर्नेबल – म्हणजे नाग परत येउन विष शोषुन जिवंत करतो वगैरे भानगडच नाही).
|
Uchapatee
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:06 pm: |
| 
|
आता वैजयंतीमालाच्या प्रेमाची परीक्षा सुरू होते. प्रदीप कुमारला जिवंत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वर्गातुन अमृत आणणे. ती स्वर्गात जायला निघते. मग वाटेत लाखो अडथळे. डोंगर-दर्या, घनदाट जंगल, इ.इ. शेवटी तिला आगीतुन जावे लागते. तिच्या या तपामुळे देवांची आसने डोलायला लागतात. (अक्षरशः देवांची आसने उल्ट्या पेंडुलमवर असल्यासारखी डोलतांना दाखवली आहेत.) देव मग मुकाट्याने अमृत देउन टाकतात व वर बोनस म्हणुन वैजयंतीमालाला पर्मनंट मानव करुन टाकतात. अशा रीतीने प्रेमाचा विजय होतो. य़ा सिनेमात माझ्या आठवणीनुसार एकदाही नागाचे मानवात अथवा मानवाचे नागात रुपांतर दाखविले नाही. (बहुदा टेक्निकली शक्य झाले नसावे) वर लिहील्या प्रमाणे यातील गाणी - मन डोले मेरा तन डोले, जादूगर सैया छोडो मोरी बैया, मेरा दिल ये पुकारे आजा, मेरा बदली मे छुप गया चांदरे, उची उची दुनियाकी दिवारे सैया छोडके, ओ जिंदगीके देनेवाले, तेरे द्वार खडा एक जोगी, छोडदे पतंग मेरी छोड दे वगैरे खूपच् गाजली. पण मन डोले विषेशच. हे गाणे व त्यातिल संगीत हे सर्व गारुड्यांनी उचलले. आजही गारुडी म्हटले कि तो “मन डोले” च पुंगीवर वाजवतो. (हे गाणे येण्यापूर्वी ग़ारुडी कोणते गाणे/संगीत वाजवत असावेत? एक भा.प्र). या सिनेमाला संगीत हेमंतकुमार यांचे होते. पाश्वसंगीत कल्याणजींचे होते. (कल्याणजी-आनंदजी जोडी मधले – तेंव्हा ते हेमंतकुमारचे असिस्टंट होते). पाश्वसंगीतामध्ये पुंगीच्या आवाजाचा भरपुर वापर केला गेला पण गंमत म्हणजे खरोखरची पुंगी एकदाही वापरली नाही. क्ले व्हायोलीन नावाचे वाद्य पुंगीच्या आवाजासाठी वापरले होते. नाग़ पुंगीच्या आवाजाने भारला जाउन पुंगीच्या दिशेने खेचला जातो हा भ्रम या सिनेमामुळे बराच पक्का झाला. विषेशतः “मन डोले” ला “नागांना वश करणार्या हुकुमी मंत्राचा दर्जा मिळाला. शेतात ट्रांसिस्टर वर मन डोले लाग़ले होते तेंव्हा नाग बिळातून बाहेर ओढला गेल्याच्या आख्याइका पसरल्या होत्या. नाग पुंगीच्या आवाजाने ओढला जातो या भ्रामक समजुती इतकाच “दुखावला गेलेला नाग/साप डुख धरतो व संधी सधून चावतो” हा समजही होता(आहे). क़ोणत्याही भ्रामक समजुतींवर मुलांचा फार पटकन व दृढ विश्वास बसतो. वरिल समजुतींमुळे आमच्या वाड्यात एक प्रसंग घडला त्याचा किस्सा.
|
Uchapatee
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:10 pm: |
| 
|
आमचा वाडा छोट्याश्या गावातला. वाडा कसला? एक मजली चाळच म्हणायला हवी. एका मागोमाग एक अश्या तिन खोल्याचे (पुढल्या दारात उभे रहील्यास मागल्या परसातिल दिसायचे) एक घर, अशी आठ बिर्हाडे एकमेकांना लागुन होती. पुढे सुमारे चार-पाच फूट रुंदीचा कॉमन व्हरांडा. व्हरांडा व घर जमिनीपासुन तिन एक फूट वर असल्याने दोन-तिन पायर्या चढुन जावे लागायचे. समोर सुमारे 12-15 फूटाचे अंग़ण तर मागे 15-20 फुटांचे परस होते. वाड्याला चारही बाजुने पाच फूट उंच भिंतीचे कंपाउंड होते. एका बाजुला घराची भिंत व कंपाउंडची भिंत एकाच रेषेत होते तर दुसर्या बाजुला पाच फूटाचा पॅसेज होता. तिकडुन अंगणातून सरळ परसात जाता यायचे (मोलकरणीं साठी). अंगणात भिंतीला लागुन चाफा, पारिजात यांची तिन-चार झाडे होती. वावर अंगणातुन असल्याने ते बरेच साफ होते (एक कोपरा अपवाद). आम्ही बच्चे कंपनी अंगणात क्रिकेट, लगोरी लंगडी, इ.इ. खेळ खेळायचो. परसात मोठी झाडे व फारसा वापर नसल्याने बरेच गवत उगवलेले होते. वाड्यात आठ घरातिल मिळून वेगवेगळ्या वयाची 10-12 मुले असावीत. एक 11 वीत असलेला सतिश दादा नुकताच पेटी शिकत होता. त्याला “मन डोले” हे एकच गाणे पेटीवर वाजवता यायचे. क़ोणीतरी त्याला “तू हुबेहुब वाजवतोस” असे सांगीतल्या मुळे तो सारखे हेच गाणे वाजवुन वाड्यामधिल तायांवर (व असल्यास त्यांच्या मैत्रीणीवर) इंम्प्रेशन मारायचा प्रयत्न करयचा.
|
Uchapatee
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:14 pm: |
| 
|
उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ. वडिल मंडळी ऑफिसला गेली होती. सर्व घरातील आया जवळच एका वाड्यात उन्हाळी कामात (पापड, लोणची इ) मदत करायला गेल्या होत्या. त्या मुळे घरात (वाड्यात) मुलांचेच राज्य होते. आम्ही लिंबुटिंबु अंगणात लगोरी खेळत होतो. खेळतांना जोरात फेकलेला चेंडू सरळ घरा समोरील भिंतीजवळ पडलेल्या वाळलेल्या पानांमधे शिरला आणी तिथे काही तरी खसफसले. चेंडू मागे धावणारा मुलगा थबकला व त्याने “ए, त्या पानां खाली बघ काहीतरी आहे” असे म्हणून इतरांना गोळा केले. काय आहे ते बघण्यासठी दोन तीन मुलांनी छोटे दगड उचलुन त्या पानांमधे फेकले. त्या बरोबर त्या पानांखालून सुमारे तीन फूट लांब साप बाहेर पडला. सर्व मुले किंचाळत व्हरांड्यावर चढली. सापही घाबरला असावा त्यामुळे तो वाट मिळेल तसा आणी नेमका चुकीच्या दिशेने म्हणजे पॅसेजच्या विरूध्द बाजुला - शेजारच्या भिंतीच्या दिशेने गेला. तिकडे त्याला लपायला काहीच आडोसा नव्हता. भिंतीला लागून आमचा स्टंम्पचा दगड होता त्या मागे तो लपला. (तो दगड व भिंत या मधिल खोबणीत माती भरून आम्ही काठ्यांचे स्टंम्प उभे करायचो). मुलांच्या ओरडण्यामुळे घरात असलेले दादा व ताई काय झाले ते पहायला बाहेर आली. तायांच्या एक दोन मैत्रीणी पण होत्या. मुलींवर इंम्प मारायची इतकी छान संधी दादा लोक सोडणार नव्ह्तेच. त्यांनी लागलीच घरातून धूणे वाळत घालायच्या काठ्या आणल्या आणी 5-6 दादा अंगणात उतरले. (केवळ अंगठ्या एवढ्या जाड काठ्य़ां नी साप कसा मारणार होते कोणास ठाउक). दगड फरसा मोठा नसल्याने सापाचा काही भाग दिसत होता. सर्व सापाभोवती अर्धगोल करुन (अर्थातच सुरक्षित अंतरावर म्हणजे 5-6 फुटावर) उभे राहीले. एकाने जरा बिचकतच काठीने दगडाला हलवले. इतक्या वेळात त्या सापाला पण आपण सुरक्षित नसल्याचा अंदाज आला असावा. आजुबाजुच्या गडबडीने आधिच अस्वस्थ असलेला साप दगड थोडासा हालल्यावर जिवावर उदार होउन बाहेर पडला आणी सरळ “दादां”च्या दिशेने आला. त्याला पळायला ती एकच बाजु होती. साप आपल्या अंगावर येतोय असे बघताच एकच गोंधळ उडाला. सगळ्यांनी लांब पळत पळत आपापल्या काठ्या आपटल्या. म्हणजे त्यांना सापाला मारायचे होते पण घाबरुन आधी लांब पळाल्यामुळे काठ्या सापापर्यंत पोचल्याच नाहीत. तरी पण प्रत्येकाला आपल्या काठीचा एकतरी फटका सापाला निसटता का होइना पण बसल्याचा साक्षात्कार झाला होता. साप वेढा तोडुन जो निघाला तो सरळ समोरच्या भिंतीला गेला व कडेकडेने कोपर्यात गेला. या वेळेला पण त्याने पुन्हा नेमकी चुकीची दिशा घेतली आणी पॅसेज मधुन परसात जाण्याऐवजी विरुध्द दिशेला (पुन्हा अंगणातच) गेला. क़ोपर्यात जरासे भंगार व झाडाच्या तोडलेल्या फांद्याचा ढीग पडलेला होता, त्या मधे तो गडप झाला. आता त्याला लपायला चांगली जागा मिळाली होती. दादा मंडळींची मात्र पंचाइत झाली. त्याला बाहेर कसा कढायचा यावर खल सुरू झाला. भंगार हाताने हलवण्याची कोणाची हिंम्मत नव्ह्ती. एक दोन वेळा काठीने भंगार हलवण्याचा प्रय़त्न झाला, एक दोन दगड देखिल मारले गेले पण साप काही दिसेना. सर्पनिर्दालन मोहीम इथेच थांबविण्यात “मुलींवरील इंम्प” चा प्रश्न होताच, पण त्याही पेक्षा लाख मोलाचा सवाल “सापाने डुख धरला आणी नंतर सुड घ्यायला आला तर?” हा होता. कारण वर लिहील्याप्रमाणे प्रत्येकालाच आपल्या काठीचा फटका सापाला लाग़ल्याचे प्रामाणीकपणे वाटत होते.
|
Uchapatee
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:17 pm: |
| 
|
तशात एकाच्या डोक्यातुन सापाला “मन डोले” वाजवुन बाहेर काढण्याची सुपीक आयडिया आली. आता यात पुंगीची एक बारिकशी अडचण होती, पण पेटी वाजवून प्रयत्न करायला काय़ हरकत? अशा प्रसंगी पेटी वाजवणे सतिश दादाला फारसे मान्य नव्हते (मुलींसमोर हे कसे दिसेल्?) पण भविष्यकालीन संभाव्य सर्पदंशाच्या भितीने (आणी इतर दादांच्या जबरदस्तीने) तो व्हरांड्यात बसुन पेटी वाजवायला तयार झाला. साप लपलेला कोपरा व्हरांड्यापासून बराच लांब असल्याने व्हरांड्यात बसुन वाजवायची आयडिया बाद झाली. सर्वांनी त्याला कोपर्याच्या जास्तीत जास्त जवळ वाजवण्यासाठी तय़ार केले. दादा पेटी गळ्यात अडकवुन उभ्याने वाजवू शकत नव्हता (“जंजीर” स्टाइल) आणी जमीनीवर ठेउन बसुन वाजविण्याची छाती होत नव्हती. (साप एकदम अंगावर आला व चावला तर?). शेवटी त्या ढीगाजवळ पेटी एका स्टूलावर ठेउन तोडगा काढण्यात आला.आता दादा उभे राहुन पण वाजवायला तयार होइना. त्याचे म्हणणे मला पाय जमीनीवर नको. (पळायला वेळ मिळायच्या आत जर साप येउन पायाला चावला तर?”). मग एक लोखंडी बिन हाताची फोल्डिंगची खुर्ची त्या स्टूलासमोर मांडण्यात आली. त्यावर दादासाहेब पाय वर घेउन बसले. मांडी घालुन नव्हे तर उकीडवे. (अगदी “त्या” साठी बसतात तसेच. फरक इतकाच की शेजारी “ट्मरेलच्या” ऐवजी समोर पेटी) कारण पळायची वेळ आली तर सोपे. उरलेल्या दादांनी आपापल्या काठ्या परजल्या (बेसबॉल मधला बॅट्स मन डोळ्यासमोर आणा – त्या दांडूने बॉल मारणार्याला बॅट्समन च म्हणतात ना?) आणी पेटी वादनाला सुरूवात झाली. सगळे गाणे त्याच्या सर्व कडव्य़ां सकट वाजवून झाले पण परिणाम शून्य. इतरांनी धीर दिला. तू वाजवत रहा, थांबू नकोस. साप बाहेर पडेलच. पण काहीच झाल नाही. शेवटी “नुसते संगीत” नॉन स्टॉप वाजवण्याचा सल्ला दिला गेला तरीही साप बधला नाही. हा प्रकार सुमारे 10-15 मिनीटे चालला आणी सर्व कंटाळायला लाग़ले. शेवटी सापालाच दया आली (की पेटीवादन असह्य झाले?). त्याने अंदाज घेउन सर्व बेसावध असल्याची संधी साधली आणी तो विजेच्या वेगाने बाहेर पडून भिंतीच्या कडेने परसात निघून गेला. दादा मंडळींना कोणतीही हालचाल करायची संधी त्याने दिली नाही. त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला गेला पण तो गवतात कुठे नाहीसा झाला ते कुणालाच समजले नाही. संध्याकाळी वडिल मंडळींच्या कानावर सर्व हकीकत गेली व “तुम्हाला कोणी नस्ते उपद्व्य़ाप सांगीतले” म्हणून बोलणी बसली. मोठ्यांनी समजवून देखिल दादा लोकं 2-3 महिने “साप चावेल” या भितीखाली वावरत होते. (समाप्त)
|
Tiu
| |
| Thursday, November 01, 2007 - 3:47 pm: |
| 
|
हसुन हसुन पुरेवाट झाली...सही किस्सा आहे!
|
Itgirl
| |
| Thursday, November 01, 2007 - 3:53 pm: |
| 
|
एकदम धमाल किस्सा!! हहपुवा!!
|
Mast lihile aahe. Hasun Hasun potat dukhayala lagale.............
|
Panna
| |
| Thursday, November 01, 2007 - 4:50 pm: |
| 
|
सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला!!!!  
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|