|
Maanus
| |
| Saturday, October 27, 2007 - 12:24 am: |
| 
|
http://reddit.com http://www.digg.com सगळ internet इथे सापडेल
|
चिन्या, वरचे सगळे पिक्चर पैसा वसूल आहेत. निर्मात्यासाठी. विवेक तसा dependable स्टार आहे. गंमत म्हणजे सलमान विवेक बॉबी देओल संजय दत्त असे स्टार्स dependable म्हणून ओळखले जातात. कारण याचे फ़ॅन्स पिक्चर बघायला येणारच असा होरा असतो. या लॉटमधे अमिताभ अभिषेक आमीर बसत नाहीत!!!! आमिरच्या मंगल पांडे वर्षातला सर्वात मोठा पैसा गमावणारा पिक्चर होता. अमिताभने तर झूम बराबर झूम आग निशब्द अशी फ़्लॉप्सची रांग दिली आहे. यामागे त्याचं over exposure कारणीभूत आहे. आता जरा एक गंमत सांगतेय
|
>>>>> २००५ ला ऍमस्टरडॅम वर त्याला आणि कटरिनाला जवळपास तासभर बघत होतो ५ फूटांवरून त्याच्या बरच आधी तू मला अन लिम्बीला केवळ तीन फुटान्वरुन बघत होतास रे भो! विसरलास का??? DDD
|
हा.... तर आता सलमान भाऊना जरा साईडला व्हावं ही विनंती. मी अकरावी बारावीत असताना "हम दिल दे चुके सनम"पिक्चर आला. त्या आधीच त्याची कॅसेट आणली होती. आणि निंबोडा ढोल बाजे वगैरे गाण्याचं स्टेज मटेरीअल अस्मादिकानी ओळखून त्यावर डान्स बसवायला सुरुवात केली होती. (रेकॉर्ड डान्समधे वगैरे मी भाग घ्यायचे म्हणजे अजूनही घेते. ) तर त्यावेळेला मला लेक्चरला बसायला जाम कंटाळा यायचा. सर्वात पाठच्या बेंचवर मी एकटीच बसायचे. आणि साईडच्या खिडकीतून बाहेर बघत बसायचे. तिथे कॅंटीन असल्यामुळे बरीचशी मनोरंजक आणि नॉन शैक्षणिक दृष्ये बघायला मिळायची. तर असो. पण नेमकं मझ्या या viewline मधे मुलाची रांग होती. तरीही त्यातल्या कुणाचं माझ्याकडे लक्ष नसायचं. मी आपली एकटीच बसलेली असायचे. पण गंमत सुरू झाली ती पिक्चर रीलीज झाल्यावर. त्यामधे ऍशचं नाव नंदिनी होते. आणि... आणि... माझ्या वर्गात समीर देसाई नावाचा एक मुलगा होता. नेमका त्या खिडकीच्या तिथेच बसायचा. झालं... वर्गातल्या रिकामटेकड्या मुलानी त्याला माझ्या नावाने चिडवायला सुरुवात केली. मला हा विषय काहीच माहीत नव्हता. कारण आधी मी वर्गात हजर असणं म्हणजे महा कठीण. कोण हा समीर हे मला माहित सुध्दा नव्हतं. एक दोनदा असंच कुणीतरी चिडवल्यावर मी हा समीर कोण याचा शोध घेतला. बिचारा एकदम सीधासाधा लाजाळू पोरगा होता. मी त्याच्याकडे बघितलं की तो चक्क बिचकायचा!!!! चिडवणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. मी पण मुद्दाम इब्लिस्पणाने त्याच्याकडे बघायचे. लेक्चर चालू असताना आणि जर त्याने कधी माझ्याकडे पाहिलंच तर कधी हसायचे कधी लाजायचे. तो हबकून जायचा. एकंदरीत चिडवणं प्रकरण जोरात चालू होता., त्यातच मी कॉलेजमधे निंबोडावर डान्स केलाअ. (दोनदा वन्स मोर मिळाला) अजूनच लोक चिडवायला लागले. अर्थात तेव्हा पिक्चर पण खूप हिट झाला होता. आणी इथे पण वनराज भाटियाची एंट्री झाली. पण त्या पठ्ठ्याने सर्वासोबत मला आणि समीरला चिडवायला सुरुवात केली. वर्गामधे जर मी असलेच तर हा ड्रामा चालू असायचाच. समीर तसा दिसायला एलदम क्युट वगरेइ होता. त्यामुळे मला खरंच याची गंमत वाटत होती. आम्ही एकमेकाशी एक शब्द देखील बोललो नव्हतो. पण तरी बहुतेकानी आम्हाला कपल करून टाकलं होतं. बारावीच्या परीक्षेला तो आणि मी मागे पुढे होतो. आणि बिचार्याचं अक्षर मोठं असल्यामुळे त्याने मला बरीचशी मदत केली. तेच आमचं दोन वर्षातलं कम्युनिकेशन. }
|
Itgirl
| |
| Saturday, October 27, 2007 - 8:19 am: |
| 
|
नंदे, इब्लीस कार्टे क्यूट समीरची हालत केलेली दिसतेस!!
|
Aktta
| |
| Saturday, October 27, 2007 - 11:06 am: |
| 
|
आयला काल र्पयंत सलमान क्रश होता...... आज भाउ... डेंजरच पोर हाय.... एकटा..
|
अरे एकट्या ती म्हणायची माझी स्टाईल आहे भाऊ भाई बंधु साहेब किंवा अंकल वगैरे. अजूनही सलमान क्रश आहे. त्याचा आणि कॅटचा जरी निकाह झाला असला तरी.
|
Zakasrao
| |
| Saturday, October 27, 2007 - 11:44 am: |
| 
|
महाइब्लिस कार्टी पण तुझा क्रश होता का तो समीर?? नाही इथे लिहिलस म्हणुन विचारतोय का तुच त्याचा क्रश होतीस?
|
झकास, महाभारत झाल्यावर विचारतोस रामाची सीता कोण? खरंतर हा किस्सा इब्लिसपणातच जास्त शोभला असता
|
हा वनराज भाटिया कोण? सबीर माहीत आहे, डिजेच्या कृपेने
|
नंदिनि,हा काय तुझा रिअल लाईफ़ हिरो???बर मग पुढे काय झालं??? विवेकची बच्चन आमीरशी कुठल्याच angle ने तुलना होऊ शकत नाही.
|
Tiu
| |
| Saturday, October 27, 2007 - 6:12 pm: |
| 
|
वनराज भाटिया = अजय देवगण in हम दिल दे चुके सनम...
|
Maanus
| |
| Saturday, October 27, 2007 - 8:42 pm: |
| 
|
Bold Move Pays Off
They said it couldn't be done, some said it shouldn't be done. This may just may break the cute meter.
|
oh ok... to vanraj tar.. hmmm...
|
Itgirl
| |
| Sunday, October 28, 2007 - 3:59 am: |
| 
|
मस्तच रे माणसा कुठून कुठून मिळवत असतोस रे काय काय सव्यसाची, मराठीच बोट का सोडल मधेच?
|
अग पुर्वी मायबोलीवर मिंग्रजीच चालायच. त्याची आठवण आली की सोडतो बोट देवनागरीच अधून मधून
|
Itgirl
| |
| Sunday, October 28, 2007 - 3:31 pm: |
| 
|
देवनागरीत वाचायला छान वाटत बर, आता क्रश लिही बघू तुझा, मराठीतूनच लिही, वाचायला सोपे जाते
|
Manuswini
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:16 pm: |
| 
|
सव्या, असे बोटे सोडणं चांगले नाही ना.. बरे ती itgirl ने सांगीतले ना लिही बघु तुझा क्रश
|
माझे क्रश म्हणजे अळवावरच पाणी. सगळ लक्ष खेळण्यात कायम. त्यामूळे कोणी आवडली तरी दुसर्या दिवशी काही नाही. पण एक आठवते. मला वाटत हिच्यामुळे मला वाचनाची आवड लागली असावी. शाळेत ८वी मधे असेन. आम्ही सुट्टीत रोज संध्याकाळी गावी बॅडमिंटन खेळत असू. अगदी तासनतास, मी आणि हिची मोठी बहीण. आणि हिला काहिही खेळायचा उत्साह नसायचा. त्यामूळे कोर्टवर कधीच दर्शन नाही ती कायम वाचनालयात. मला खेळ प्रचंड प्रिय पण ही तिकडे आहे अस कळल की २ ३ गेम कंटाळा आला म्हणून सांगून आधी पळायचो. मग मला काही मिनीटे एकट्याला तिच्याबरोबर वाचनालयात मिळायचे. तिच्यासमोर काहीतरी पुस्तक घेऊन बसायचो आणि मग उगाच काहीतरी बोलायचो तिच्याशी. ती पण ईमानेइतबारे प्रश्नांची उत्तरे द्यायची. पण मग तिची बहीण आली की ती मला अजून काहीतरी खेळायला घेऊन जायची. माझी गाडी तसूभरही पुढे सरकली नाही कधी. आणि ही पण कधी खेळायला आली नाही
|
नंतर एकदा सही पोपट झालेला. असच रस्त्याने जाताना एक मुलगी जबरी आवडली. मग तिच्या मागे मागे जाऊन तिची रहाण्याची ईमारत बघून आलो. तर तिथेच माझा एक मित्र रहायचा. मग दुसर्या दिवशी त्याला फोन करून तिच नाव विचारल. मग तिसर्या दिवशी डिरेक्टरी मधून तिचा नं. शोधून फोन फ़िरवला. चक्क तीच फोन वर होती. माझ्या छातीत एकदम धडधड प्रचंड वाढली. अहो, इतक नशीब अपेक्षितच नव्हत. म्हटल मी हृषिकेश आणि मला तुझाशी बोलायच आहे. तर मला म्हणते तू क्ष चा मित्र ना? बापरे, माझीतर पळता भुई थोडी झाली. म्हटल इतक माहिती आहे म्हणजे पिताश्रींकडून फ़टक्यांची पण सोय झाली असणार. फोन ताबडतोब ठेवावा वाटत होता पण ऊलट हो म्हणून वर माझ्याशी मैत्री करणार का असही विचारल ! मी अनोळखी माणसांशी मैत्री करत नाही अस उत्तर मिळाल. मग मी क्ष चा मित्र आहे हे तुला माहीत आहे मग अनोळखी कसा अस म्हटल्यावर तिचा स्वर थोडा बरा झाला. पण तरी नकारच मिळाला. नंतर मित्राला लई झापले. मग कुठूनतरी कळले की तोच तिच्या मागे होता. आणि म्हणून माझ्याबद्दल त्याने तिला लगेच माहिती दिली. (एक पत्ता कट ) आता तर त्या मित्राचे नाव पण विसरलो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|