Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 24, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » पहिली सायकल » Archive through October 24, 2007 « Previous Next »

Maanus
Thursday, October 04, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप BB सुरु करतोय... त्यात हा अजुन एक :-)

First Time :-)

पहीली सायकल, पहीली bike , पहीला computer , पहीली चोरी, पहीला मार, कॉलेजचा पाहीला दिवस, पहीला दिलेला / मिळालेला गुलाब, पहील प्रेमपत्र, पहीला kiss , पहीला KP program , पहीला दिवाळ सण, पहील मुल, पहीला पगार, पहीला विमानप्रवास, पहील लोन, पहीली पोलीस स्टेशन ला भेट, पहीला पांढरा केस, पहीली अंतयात्रा... असे एक ना अनेक पहीले प्रसंग आणि प्रत्येक वेळी एक वेगळी भावना.

जसे आज parking lot मधुन गाडी बाहेर काढताना मला गाडीवर पडलेला पहीला scratch दिसला... जास्त नाही पण थोडतरी वाईट वाटल :-(

आज पहील्यांदाच धुक्यात गाडी चालवली, खुपच मजा आली गाडी चालवताना :-)


Dakshina
Thursday, October 04, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, चांगला बी.बी. उघडलायंस.

तुम्ही कल्पना करू शकणार नाही, मला इयत्ता १२वी पर्यंत सायकल येत नव्हती. (अर्थात अजुनही येत नाही म्हणा...)
तर असं झालं की १२ वीच अभ्यास करण्यासाठी मी माझ्या काकाकडे बेळगावला रहात होते. आणि त्याने मला सायकल शिकवण्याचा जणू काही विडाच उचलला होता... काका आर्मीत होता त्यामुळे त्याच्याकडे घरकामासाठी एक कुटूंब होते. त्यातली जी शालिनी नावची बाई होती, ती म्हणाली मी शिकवते तुला सायकल. मग काकाने सायकल ८ दिवसांसाठी भाड्याने आणली. काकाचे आर्मीचे क्वार्टेर असल्याने आजूबाजूला फ़ार वस्ती नव्हती, रस्ते पण खूप छान होते.

शालिनी मागून सायकाल पकडायची आणि मी पायडल मारायची. २ - ३ दिवस अशीच सायकल चालवली, आणि मग जेव्हा थोडासा अंदाज आला, तेव्हा शालिनी मला म्हणाली आता मी सोडून देते, तिने इतकं म्हणायचा अवकाश, मी नुसत्या भीतीनेच धप्पकन खाली पडले. शालिनी घाबरली, आणि सायकल धरून मझ्यामागे, मी मस्त मनाला समाधान मानून पुढे मजेत पायडल मारत फ़िरायची मनसोक्त.

त्यामुळे मला स्वतंत्रपणे सायकल चालवता येतच नव्हती, जी काही येत होती ती शालिनीच्या मदतीनेच. काका आपलं पहायचा हा प्रकार आणि शालिनीला ओरडायचा.... मग त्याने एकदा तिला सांगितलं की तू मागून सायकल हळूच सोडून दे, तिला (मला) न कळू देता... मग दुसर्‍या दिवशी, तिने तसंच केलं. मी तिने हात सोडलेला पाहून खूप खुश झाले,कारण मी स्वतंत्रपणे सायकल चालवायला लागले होते. त्याच वेळी थोडं पुढं गेल्यावर समोरून जवानांचा ताफ़ा येत होता. त्यातल्या एकाने, मला सायकल चालवताना बघून शिट्टी मारली. आणि मी धाडकन खाली कोसळले. ते सगळे फ़िदीफ़िदी हसायला लागले. माझा confidence च गेला सगळा...

सायकल चालवण्याचा पहीला आनंद घेत घेत मी बरीच दूरवर गेले होते. यांनी तो अगदी मोडीत काढला. मी सायकल हातात धरून इतकसं तोंड करून घरी (उशिरा) परतले. काकाने लाख समजावलं पण मी त्याला या पुढी सायकल चालवणार नाही अस त्याला निक्षून सांगितलं. काकाने पण नाद सोडून दिला...

पुढे मी पूण्याला परतले, माग आत्याने माझा सायकल चालवण्यासाठी पाठपुरावा केला. मग खूप धाडस करून आत्तेबहीणीची सायकल घेऊन बाहेर पडले. तेव्हा माझी आत्या येरवड्याला हाऊसिंग बोर्डात रहात होती... तिथे पण वाहनं फ़ार नसत. आणि चक्क आश्चर्याची गोष्टं म्हणजे, मला सायकल चालवायला जमली, थोडं पुढे गेल्यावर माझ्या मागून एक कायनेटिक वाला आला, आणि पुढे जाऊन फ़क्त डाव्या बाजूला थांबला. त्या भितीने सुद्धा मी धप्प. गुडघा फ़ोडून घेतला. त्यानंतर मात्र कधीच सायकल चालवली नाही, अगदी आजतागायत.

डायरेक्ट गाडीच शिकले.




Tiu
Thursday, October 04, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा... चलता है!

संजय गांधीला पण गाडी चालवता यायची नाही म्हणे. तो डायरेक्ट विमान चालवायला (म्हणजे उडवायला!) शिकला...:-)


Disha013
Thursday, October 04, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान छान माणसा,मस्त बीबी.
पण 'पहिली अंतयात्रा' म्हणजे नेमकं काय लिहाय्चं?आपली की दुसर्याची? बरं,आपली स्वत्: ची लिहायचे असेल तर लिहिण्याबाबत थोडे मार्गदर्शन करावे. :-)
दक्क्षिणा, एका शिटीला घाबरलीस?
मी पहिल्यांदा सायकल चालविली ती पाचवीत गेल्यावर.
कॉलनितल्या सगळ्या मुली मागुन धरायच्या. मग एकदाची ८ दिवसात जमली बुवा! जाम मजा यायची. स्कुटी मात्र माझी मिच शिकले,रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करत.. आणि पहिलावहिला अपघातही स्कुटिबरोबरच केलेला. काय विचार करत होते आठवत नाही आता,पण गाडी चालवताना विचारांच्या नादात पुढे थांबलेल्या मोठ्ठ्या ट्रककडे लक्षच गेले नाही, सरळ जावुन धडकले! नशीब जास्त लागले न्हवते.खरचटण्यावर भागले.पण गाडीचा आरसा फ़ुटलेला. दुसरा आरसा लावुन मी दुस-याच दिवशी परत स्कुटीवर सवार! :


Deepanjali
Thursday, October 04, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहीला kiss , पहीला KP program ,पहीली अंतयात्रा
<<<<<< lol मानुस
पहिलं प्रेम , first crush नाही का या लिस्ट मधे ?


Zakki
Thursday, October 04, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माझे 'पहिले' असे काहीच आठवत नाही. आता फक्त मरायचे बाकी आहे! मेल्यावर जमले तर 'मी पहिल्यांदा मेलो तेंव्हा .. .. .. ' असा अनुभव लिहीन!

Maanus
Thursday, October 04, 2007 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा बघा परत एकदा प्रयत्न करुन, जमेल आता :-) पर्यावरण रक्षणासाठी आणि पोट कमी ठेवण्यासाठी ;)

पहिला kiss कोणी लिहेण असे वाटत नाही, ते आपले असेच मनातल्या मनात आठवण काढायला .. हा आता कुणाला exp share करायचा असेल तर.... welcome :-)

अहो काय काय पहिले असु शकते, ते आठवत होतो... अजुन चिकार पहील्या गोष्टी असतील. एक वेगळी excitement, भिती, आनंद असतो पहील्या प्रसंगात... नंतर routine होते :-)

अर्धा एक डजन लोकांना खांदा दिलाय मी, पण पहिली वेळ अजुनही आठवतेय, नंतर कधीतरी लिहेन त्यावर. पण आपल्यापेक्षा लहाण व्यक्तीला खांदा देण्यासारखे दुखः कशातच नाही :-(


Maanus
Friday, October 05, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की तुमच्याकडे पण चिक्कर first time अनुभव असतील की.

उ.दा.

पहिला कलप लावण्याचा प्रकार

तुमचे पहिले Maayboli NJ GTG

मायबोलीची पहिली भेट, मला तर विचीत्रच लोक वाटलेले तेव्हा इथले (२००३ बहुतेक). चहा आणा, दिवे घ्या काहीही बडबड करायचे. आणि एकेकाचे id

हे बघा पहिले हितगुज असे दिसायचे
jan 2002

( old guys/gals click here it takes time to come, but its worth waiting :-) )
हा friendship center काय प्रकार होता? आणि migaraji साठी खास वेगळा BB होता, बापरे आणि त्यात zakki, milindaa बोलायचे? hawa_hawai तेव्हा पण गायब असायची, मग active केव्हा होती? link2 विषयांतर होतेय

Yogita_dear
Friday, October 05, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहु का first kiss चा अनुभव????

Dakshina
Friday, October 05, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, अता कुठे रे सायकल चालवायचे दिवस रहीलेत? गाडीवरून सुद्धा office ला पोचायला उशिर होतो, सायकलवरून तर बहुतेक संध्याकाळच उजाडेल.

आणि तू First Kiss चा विषय काढून इथल्या लोकांना ड्यू. आयडी बनवायला उद्युक्त करतोयस असे नाही का तुला वाटंत?

Crushes तर इतके आहेत, कि पहीला crush नक्की कोणता ते ही आता आठवत नाही...


Yogita_dear
Friday, October 05, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही मी नाही बनवणार ड्यु. id ..खर्रच....लिहु का ह्याच id ने????

Dakshina
Friday, October 05, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिही की, इथे माणसाने आधीच सर्व मुभा देऊन ठेवली आहे.
धाडसाची गं बाई तू... लिही लिही...


Deepanjali
Friday, October 05, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा ,
लहान बाळाचे लाड किंवा flying kiss लिहिणार बहुतेक ती .


Badbadi
Friday, October 05, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की तुमच्याकडे पण चिक्कर first time अनुभव असतील की. >> हो हो... अगदी काहीच नसेल तर RH आणि तुमच्यामधला पहिला (वि)संवाद किंवा HH चा अनुभवलेला पहिला खाष्टपणा वगैरे आहेच :-)

माणसा, तू 'पहिला बीबी' वर लिही बघू आधी




Yogita_dear
Friday, October 05, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहाहा..तुल कस कळल ग दीप्स मी हेच सांगणार आहे ते???

Dakshina
Friday, October 05, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीच म्हणलं ही इतकी का उत्सुक आहे इथे लिहीण्यासाठी ते...

काय गं 'यो'.. फ़िरकी घेतेस काय? ....


Yogita_dear
Friday, October 05, 2007 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

but ofcourse यार दक्श माणसाने अस तर नाही सांगितलय न कि bf / gf ने घेतलेल first kiss ... मग मी बरोबर आहे तर...

Dakshina
Friday, October 05, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'यो'.... अगदी बरोबर, तू फ़ार हुशार...

Vegayan
Friday, October 05, 2007 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ४थीत असताना साय्कल चालवायला शीकले .सुर्वातीला १दम पायडल मारने जमत नव्हते म्हनुन half पायडल मारत होते , पन विचार केल मारुन बघुया फ़ुल्ल पायडल . दुपारचि वेल ,आमच्या घरासमोर रस्त्याच्या त्या बाजुला खानावल होती. थेट पहिल पायडल मरुन खानावलित घुसली मि , तीथे सगले जेवनारे भितिनि उथुन उभेच रहिले ...त्यानन्तर मात्र नित सायकल चालवायला शीकले मी

Gsumit
Wednesday, October 24, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा, तु लिहिलेले वाचतानी बोबडं बोलणार्‍या मुलांची आठवण आली... मजा वाटली

मी चौथीच्या सुट्टीत सायकल शिकलो. किती वेळा आपटलो अन किती वेळा गुडघे फ़ोडुन घेतले, काही लिमीटच नाही... :-) पण शिकल्यावर धमाल केली, खुप लांब लांब फ़िरायला जायचो सायकलवर सगळे मित्र मिळुन... (अन आल्यावर आइचे बोलणे खायचो


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators