|
Ajjuka
| |
| Saturday, October 06, 2007 - 7:29 am: |
| 
|
पहिला किस हा अगदी न लिहिण्यासारखा बावळट प्रकार असतो. नक्की काय करायचं कळत नसतं. आपण काय केलं म्हणजे बावळट वाटणार नाही या विचारात आपण अजूनच बावळट होतो. जे काय चाललंय आपलं आणि समोरच्याचं ते नक्की बरोबर चाललंय ना असंही सारखं डोक्यात येत असतं... (जसं काही चुंबनाचं manual च असतं आणी त्याप्रमाणे केलं नाही तर फाशीच बसणार असते...) सर्वसाधारणतः पहिला किस हा अधिकृत नसतो.. ही ही ही... चोरून मारून.. कोणाला न कळता.. कोणी बघत नाहीये ना.. घरी कळलं तर... तेवढ्यात इथे कोणी आलं तर.. अश्या हज्जारो tensions मधे एकदाचा पहिला किस उरकला जातो.... आणि आपण स्वतःला डॉन समजू लागतो.. इतर मित्रमैत्रिणिंपेक्षा आपल्याकडे एक अनुभव जास्त आहे असं समजत आपण मान ताठ करून फिरत असतो. मित्रमैत्रिणी आपल्याआधीच डॉन होते आणि आपल्याला काही जमलेलं नाही पण तरी काही बिघडलं नाही कारण पहिल्यांदा शक्यतो कोणालाच जमत नाही.. असं सगळं ज्ञान होईपर्यंत आपण रूळलेलो असतो..
|
Hkumar
| |
| Saturday, October 06, 2007 - 10:27 am: |
| 
|
पहिले चुंबन घेणार्यांना एक अनुभवी सल्ला आपल्या डोळ्यावर चष्मा असल्यास तो आधी काढून ठेवावा! अन्यथा चष्म्याची काडी वाकू शकते.
|
Manjud
| |
| Saturday, October 06, 2007 - 10:44 am: |
| 
|
अज्जुका, चोरून ठिक आहे पण मारून कसं शक्य आहे????? Hkumar अहो पहिल्या चुंबनापुढे चष्म्याची काडी काहिच नाही हो!! काल मी माझ्या मुलीला पहिला धपाटा घातला. इतक्या दिवसांची सुरसुरी काल शमवली. ताटलीत खायला दिलेला दहीभात तिच्या टेडिच्या अंगावर टाकत 'शुभमंगल सावधान' करणं चालू होतं बाईसाहेबांचं!!!
|
Supriyaj
| |
| Saturday, October 06, 2007 - 4:28 pm: |
| 
|
नी.... पहिल्या किस चा एवढा superb आणि अचूक वर्णन अजून नाही वाचलं कुठे 'डाॅन समजतो'... खत्री आहे comment !!!
|
Maanus
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:00 pm: |
| 
|
नीरजा Rockford movie ची आठवण झाली, त्यात ते कार्ट first kiss नंतर hostel ला परत आल्यावर कसा भाव खात असतो कुमार , खुप विचार केला पण कळाल नाही चष्म्याची कांडी कसकाय वाकू शकते आर्च बाह्या काढुन टाक, म्हणजे घालतील ते कदाचीत अमृता, अजुनही वेळ गेलेली नाहीय, कुठेतरी hiking जाल तेव्हा परत एकदा try मारायचा माझा पहीला घरी दाढी करण्याचा प्रसंग. पहीले काही दिवस सलुन मधे जायचो. एक दिवस घरी कोणी नाही हे बघुन संधी साधली, मावस बहीण होती, पण ती तीच्या अभ्यासात. खाली दुकानात जावून ब्लेड वैगेरे आणले, एका रुम मधे गेलो, सगळे पडदे वैगेरे लावून मग दाढी केली. तेव्हापासुन मला दाढी ईतरांसमोर करायला आवडत नाही दाढी करताना कोणी समोर असल की मला uncofortable feeling येते rockford चे गाणे इथे बघायला मिळेल, you tube link , चिकार first time movement ची आठवण येईल
|
Hkumar
| |
| Sunday, October 07, 2007 - 12:07 pm: |
| 
|
माणूस, पहिल्या चुंबनाबरोबर आलिंगनही असतच की हो! आता कळले काडी कशी वाकली ते? मला जरा smiley कसा टाइप करायचा सांगता का? आता टाकला आहे असे समजा!
|
बनाबरोबर आलिंगनही असतच की <<<<हे रोमॅंटिक शब्द मराठीत कसे वाटतात ना ऐकायला !! 
|
Upas
| |
| Monday, October 08, 2007 - 3:49 pm: |
| 
|
माझ्या आठवणीतला पहिला कीस म्हणजे ज्याला आपण पापी म्हणतो तो.. अगदी अगदी लहानपणी.. :-)
|
Manuswini
| |
| Monday, October 08, 2007 - 5:11 pm: |
| 
|
उपास, जे काही लिहायचे ते व्यव्स्थीत लिहायचे असे अर्धवट का ते आमच्या (इथील वाचकांच्या) कल्पनाशक्तीला त्रास का तो........
|
Zakki
| |
| Monday, October 08, 2007 - 5:34 pm: |
| 
|
उपास तू बटाट्याचा कीस म्हणतो आहेस की रताळ्याचा? तुला बहुतेक किस म्हणायचे आहे. छ्या:! काय हे आजकालच्या लोकांचे व्याकरण? नुसते व्या व्या केले की व्याकरण येत नाही काही!

|
एवढा कीस नका रे पाडू किस चा
|
Upas
| |
| Monday, October 08, 2007 - 8:50 pm: |
| 
|
झक्की, अहो तर काय तर काय.. खाली डोकं वर पाय.. बहुधा तुमच्याकडेच बघून पाडगावकरांनी हे लिहून ठेवलं असावं.. भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडीत असता, व्याकरणाचे बारकावे,याचे तुम्ही पंडित असता, ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता, ओठ म्हणजे सर्वनाम,त्याचा तुम्ही विचार करता, तर काय तर काय?......खाली डोकं,वर पाय ..!! 
|
चला म्हणजे अश्या प्रकारे गाडी परत किस / कीस वर आली म्हणायची..(ज्याला जो किस / कीस हवा असेल तो स्वत्:च्या सोईनुसार घ्यावा...) लिहा रे कोणीतरी first kiss बद्दल आणि बंद करा सगळ्यांची तोंड...
|
Zakki
| |
| Tuesday, October 09, 2007 - 1:44 pm: |
| 
|
उपास, धन्यवाद. आता कुणा 'ती' ने ओठ जवळ आणले तर लक्षात ठेवीन!

|
Hkumar
| |
| Tuesday, October 09, 2007 - 3:34 pm: |
| 
|
मंडळी, kiss ची एक मजेदार व्याख्या आठवली: Kiss is the contraction of the mouth due to expansion of the heart ...... आणि पहिल्या चुंबनाच्या वेळेस तर heart expand होतेच ना!
|
Amruta
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:36 pm: |
| 
|
वा!! काय व्याख्या आहे. जाम आवडली. उपाश्या, कविता पण मस्तच. पण अजुन कस कुणीच किसा बद्दल काही लिहिल नाही? मी कधिची वाट पहात्ये ;)
|
Rajya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 7:22 am: |
| 
|
त्यावेळी माझं वय होतं १९ आणि तिचं १८ मी हीला भेटायला सातार्याला गेलो होतो. तिला कॉलेजवरुन उचलला आणि गेलो रजताद्री हॉटेलात. काही बाही खाल्ल्यनंतर म्हटलं आता काय करुयात, तर ही म्हणाली इकडे जाऊ तिकडे जाऊ वगैरे वगैरे, मी म्हटलं उगाच कोणी पहायला नको. मग मीच तिला म्हटलं चल पिक्चरला जाऊ, थोडा वेळ हो नाही करत तयार झाली. मग विचारलं कुठल्या पिक्चरला जायचं? तर ती म्हणाली इथेच जयविजय टॉकीज आहे, तिथे बघु कोणता असेल ते. मग टॉकीजवर गेलो तर "कभी हा कभी ना" लागलेला. आम्ही दोघांनीही हा पिक्चर बघितला नव्हता, मग तिकिटं काढली तर नं. होते ४१ आणि ४२. आत गेलो तर ४१ आणि ४२ हे नं सर्वात मागच्या रांगेतले अगदी शेवटचे मनातल्या मनात तिकिट देणार्याला धन्यवाद दिला पिक्चर सुरु झाला, आमचं निम्मं लक्ष पिक्चरकडे निम्मं... ... तर त्या पिक्चर मध्ये एक सीन आहे, सुचित्रा आणि दीपक तिजोरीच्या (हाच आहे का हो?) किस चा हो हो, हा माझ्या पहील्या किस चा च अनुभव सांगतोय.. .. तो सीन झाल्यावर एकदम माझी ट्युब पेटली, आपण ही किस केला तर (सुचित्राला नव्हे) मग मात्र सगळं अंग थरथरायला लागलं, आयुष्यात अजुन पर्यंत कुणालाच किस केलं नव्हतं. विचार करत होतो कसं करावं, तिला आवडेल का? कोणी बघेल का? वगैरे.. .. मग हळुच तिच्या खांद्यावर हात टाकला, थोडा वेळ अस्सच गेल्यावर हळुच तिच्या गालावरुन हात फिरवला, तिने हळुच माझ्याकडे पाहीले व हसली मग मला थोडा धीर आला, हळुच तिचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले पण काय सांगु लोकहो नेम चुकलाच की, माझा ओठ तिच्या अर्ध्या ओठावर आणि अर्ध्या गालावर असा टेकलेला पण जो काही अनुभव होता तो अफलातुन होता त्या किसची चव मला अजुनही आठवते आणि आजपर्यंत भरपुर किस घेतले दिले पण तो अर्धे ओठ आणि अर्ध्या गालाचा किस घेणे अजुनही मला आवडते, माझा तो आवडता किस चा प्रकार आहे. अजुनही लाडात आलो की बायकोला असाच किस करतो तुम्हीही ट्राय करुन बघा, छान वाटतं तर असा हा माझ्या पहील्या किसचा अनुभव त्यात लाजायचं काय? मंडळी चला आता तुमचे अनुभव सांगा
|
Zakasrao
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:30 am: |
| 
|
राज्या लाजायच काही नसत पण घाबरायच तरी असतच रे. आता हे सगळ बायकोने वाचल की झालच....... मग तुझी फ़र्स्ट टाइम बायकोने घराबाहेर काढल्याचा अनुभव येइल तो फ़र्स्ट टाईम बायकोचा वाढदिवस विसरण्याचा अनुभव येवु दे रे. सगळ्या नवरे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ह्या म्हणीप्रमाणे वागतील
|
Rajya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:36 am: |
| 
|
मग तुझी फ़र्स्ट टाइम बायकोने घराबाहेर काढल्याचा अनुभव येइल झक्या   अरे बरी आठवण केली रे, जरुर लिहीन वाढदिवस विसरण्याचा अनुभव, पण नंतर. पहील्यांदा वरच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया बघतो आणि मग लिहीतो
|
Swa_26
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:54 am: |
| 
|
राज्या.. सही लिहिलंत... एकदम बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल!!
|
Suhasya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:26 pm: |
| 
|
सहीच. bold & beautiful आता पुढचा अनुभव लीही वाट पहात आहेत सगळे.
|
Dakshina
| |
| Wednesday, October 17, 2007 - 1:03 pm: |
| 
|
राज्या, जिचा किस घेतलास तीच बायको आहे? की 'ती' 'किसवाली'वेगळी होती? आम्हाला आपली उगिचच उत्सुकता... पण काहीही म्हण खरंच तुझा अनुभव Bold & Beautiful आहे.
|
बापारे!!!! सातार्यात पब्लिक एरिआमध्ये किस करायची हिम्मत... ग्रेट आहात. तिथे तर मुलांशी रस्त्यावर बोलताना पण शंभरदा विचार करावा लागतो.
|
Disha013
| |
| Wednesday, October 17, 2007 - 4:50 pm: |
| 
|
साता-याला भेटायला गेलतास म्हणजे ती बायकोच(म्हणजे तेव्हाची प्रेयसी नि आताची बायको) असण्याचीच शक्यता जास्त! बरोबर ना?
गॉसिपिंग सुरु बाकी,राज्या,प्रामाणिकपणे सगळं लिहीलय छान! अजुन येवु दे!
|
Amruta
| |
| Thursday, October 18, 2007 - 12:22 am: |
| 
|
अग बायकोच असणार नाहीतर एवढ खुल्ल लिहायची हिंमत करणार नाही तो. आणि पोस्ट मधे 'हिला भेटायला' अस लिहिलय बघ बाकी मजेदार लिहिलय बर
|
Chyayla
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:01 am: |
| 
|
राज्या, तु या BB वर प्रेम-प्रसंग टाकुन हिरोच झाला की रे. बाकी,राज्या,प्रामाणिकपणे सगळं लिहीलय छान! अजुन येवु दे! चावटपणा पुरे हं दिशा, अजुन म्हणजे काय म्हणायच काय तुला? हिरोच लगीन झाल की सुखांत झाला म्हणतात सिनेमाचा.
|
Rajya
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:16 am: |
| 
|
धन्यवाद स्वाती, झकास, च्यायला, दक्षिणा, अमृता, सुहास्य, सोनल एक खुलासा करतो, ही किसवाली (हीचं नाव रश्मी) माझी बायको नाही, त्यावेळी ठवरलं होतं या किसवाली बरोबरंच लग्न करायचं पण तिचा बाप मध्ये आला असो तो एक वेगळाच विषय आहे, जमलं तर लिहीन पण "माझं पहीलं प्रेम" असं काहीतरी
|
Rajya
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:33 am: |
| 
|
च्यायला   अजुन येवु दे! आता पुढचा अनुभव लीही वाट पहात आहेत सगळे. दिशा, स्मिता, आता अजुन काय?
|
Chchotu
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:49 am: |
| 
|
राज्या, शब्दान्कन मस्तच. आधि माहित असुनही वाचताना रोमान्च आणि इतर उभेच राहिले.
|
Chchotu
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:54 am: |
| 
|
मला सुद्धा पहिलं प्रेम लिहायचं होतं. पण " मी माझं पहिलं प्रेम तीन्-चार मुलींवर करायचा प्रयत्न केला पण......" असं लिहावं लागेल म्हनुन रद्द केलं.
|
Dakshina
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:56 am: |
| 
|
आपला हिरो लईच धाडशी आहे.. नाव लिहून पण रिकामा.... अरे राज़्या ही पोस्ट तुझ्या बायकोने वाचली तर तुझं काही खरं नाही... छोटू...
|
Swa_26
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:04 am: |
| 
|
मी माझं पहिलं प्रेम तीन्-चार मुलींवर करायचा प्रयत्न केला पण पहिल प्रेम एकदम तीन चार मुलींवर कस काय पण??? ए.भा.प्र.
|
राज्या! लेका लईच भारी Narration केलस रे! हमममम! आता मी माझ्या पहिल्या अनुभवाची (किस च्या) अजून आतूरतेने वाट बघतोय! बाकी तू सगळ खरं खरं आणि बिनधास्तच लिहीणार, ह्यात काही शंकाच नाही. ( हा माझा अनुभव आहे) 
|
छोटू, इथे पण आगमन झाले का? सही सही! आता खरी मजा येणार!
|
Chchotu
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:15 am: |
| 
|
हा प्रश्न "पहिलं प्रेम फ़क्त तीन्-चार मुलींवरच?" असा योग्य वाटतो की नाही? अर्थात माझं पहीलं प्रेम वगैरे काही न होता पहीलं तांदुळच पडलं.
|
असू दे, असू दे! शेवटी काय तर " जो होता है, भले के लिये होता है" म्हणायचं आणि गप्प बसायचं

|
Manjud
| |
| Thursday, October 18, 2007 - 10:10 am: |
| 
|
राज्या,  जिला पहिल किस केलास ती बायको झाली नाही म्हणतोस तर बायकोला पहिला किस केलास तो अनुभव लिही की.......
|
Rajya
| |
| Thursday, October 18, 2007 - 10:25 am: |
| 
|
बायकोला पहिला किस केलास तो अनुभव लिही आयला हे भारी आहे की, एकदा चालु केलं की मग हे लिही ते लिही चालु करता तुम्ही लोक मंजु तु लिही की तुझा अनुभव
|
Ajjuka
| |
| Thursday, October 18, 2007 - 11:04 am: |
| 
|
ए आवरा रे... काहीपण विचारतात लोक!! खाजगीत विचारायचे प्रश्न इथे विचारायला लाज कशी वाटत नाही म्हणते मी... असं कुणीतरी म्हणालेलं ऐकू आलं म्हणून टाकलं हं इथे.. मला असं काही म्हणायचं नाहीये... राज्या... तू तुझं सांगायचं काम चालू ठेव बरंका..
|
Rajya
| |
| Thursday, October 18, 2007 - 11:54 am: |
| 
|
राज्या... तू तुझं सांगायचं काम चालू ठेव बरंका.. ए अज्जुके, सांगीतलं की आता, आणि काय काय सांगु की तुझंच वाक्य (कुणाकडुन तरी ऐकलेलं) तुलाच टाकु परत
|
Chyayla
| |
| Thursday, October 18, 2007 - 7:16 pm: |
| 
|
एक खुलासा करतो, ही किसवाली (हीचं नाव रश्मी) माझी बायको नाही, त्यावेळी ठवरलं होतं या किसवाली बरोबरंच लग्न करायचं पण तिचा बाप मध्ये आला "कहानी मे ट्वीस्ट.. " राज्या अरे तुझा खरोखरच चित्रपट झाला की काय?
|
Rajya
| |
| Friday, October 19, 2007 - 4:14 am: |
| 
|
राज्या अरे तुझा खरोखरच चित्रपट झाला की काय होय रे च्यायला, आणि विशेष म्हणजे ही रश्मी कुठे आहे हे मलाही कळलेलं नाही अजुन, १९९८ ला तिचं लग्न झालं ही तिच्याविषयीची मला कळलेली शेवटची बातमी, ते ही तिच्या लग्नानंतर मला एक महीन्यानी कळलं
|
Ana_meera
| |
| Friday, October 19, 2007 - 5:18 am: |
| 
|
मा.बो. वर येत असेल, हे वाचले असेल तरी ओळख देण्याइतकी बोल्ड आहे का हो तुमची रश्मी(जी आता तुमची नाही)? (सॉरी हा जखमेवर मीठ चोळल्याबद्द्ल.. पण सत्य आहे ते.. उरात एक जखम असेल तिच्या... हम्म... चालायचंच...
|
Rajya
| |
| Friday, October 19, 2007 - 5:24 am: |
| 
|
अनघा, इथे येत असेल तर मला माहीत नाही, आणि जखम वगैरे माही नाही गं आता तसलं काही राहीलं नाही माझ्याकडुन तरी
|
Manjud
| |
| Friday, October 19, 2007 - 5:50 am: |
| 
|
राज्या, तुझ्यासारखी लेखनप्रतिभा नाहि रे माझ्याकडे इतकं मधूर वर्णन करायला.... हि हि हि.... डोंबल तुझं.. मी काय लिहिणार माझा अनुभव? बाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी नवरा माझा हात पण धरत नाही ना मला त्याचा धरायला देत तो थिएटरमध्ये किस काय करेल मला.......... 
|
Ana_meera
| |
| Friday, October 19, 2007 - 6:01 am: |
| 
|
अगदी अगदी मंजू... same here परक्या बाई शी वागाव तसा माझा पण नवरा वागतो सार्वजनिक ठिकाणी.. हातात हात जे गुफुंन जातात ते कपल्स किती गोड दिस्तात? मनोमिलन पण झालय असे वाटत नाही?
|
Zakasrao
| |
| Friday, October 19, 2007 - 6:52 am: |
| 
|
कोणाच काय आणि कोणाच काय. हा BB आता माझा नवरा अस करतो आणि तस करतो ह्याकडे जाइल आता.
|
Giriraj
| |
| Friday, October 19, 2007 - 7:28 am: |
| 
|
झक्या,तुझा नवरा? काय बोलतोस??
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 11:32 am: |
| 
|
अनघा, अगं फ़क्त रश्मीच्याच काय..? पण राज्याच्या उरात पण जखम असेलंच की... उगाच इथे उफाळून आली का.. पहीलं प्रेम कोनी कंदी इसरत न्हाई...
|
Rajya
| |
| Friday, October 19, 2007 - 12:09 pm: |
| 
|
पहीलं प्रेम कोनी कंदी इसरत न्हाई... आयला!!! दक्षिणा, नविन विषय दिलास की माझं पहीलं प्रेम लिहु का? नकोच, एका किसचा एव्हढा कीस पाडलात, मग अख्खं प्रेम प्रकरण टाकलं तर काय होईल?
|
Lalitas
| |
| Friday, October 19, 2007 - 12:18 pm: |
| 
|
नेकी और पूछ पूछ? लिहूनच बघ की काय होईल ते!
|
Itgirl
| |
| Friday, October 19, 2007 - 12:32 pm: |
| 
|
राज्या, पण नाव नको लिहूस रे मुलीच उगाचच कोणाला तुझ्यामुळे त्रास झाला समज, तर तुला ते आवडेल का?
|
Rajya
| |
| Friday, October 19, 2007 - 1:28 pm: |
| 
|
पण नाव नको लिहूस रे मुलीच घाबरु नकोस आयटे, किस च्या किश्श्यातलं नाव खोटं आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|