Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लक्षात आलेले सामाजिक प्रश्न.. » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Bee
Friday, October 12, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाला आपापले वैयक्तिक प्रश्न चांगलेच माहिती असताता पण आपल्या अवतीभवती एक समाज असतो त्या समाजाचे काही प्रश्न असतात. ज्यांना सामाजिक कळ, सवेंदना, समज लाभलेली आहे अशांना सामाजिक प्रश्न कळतात आणि भेळसावतातही. तर ह्या बीबीचा उद्देश निदान इतपत तरी नक्कीच आहे की तुम्हाला कुठले सामाजिक प्रश्न लक्षात आलेले आहेत का.. किंवा येत आहेत का? काळानुसार काही प्रश्न नव्यानी उभे ठाकतात तर काही जुने प्रश्न ज्वलंत रूप धारण करतात. हे प्रश्न कसे मिटवायचे हा खूप दूरचा मुद्दा आहे पण निदान ते प्रश्न ती समस्या तुम्हाला माहिती आहे हेही नसे थोडके. जेणेकरून तुम्ही एक समाजरक्षक म्हणून त्या प्रश्नांची व्याप्ती आणि त्यांचे गांभिर्य वाढवणार नाही...

काही सामाजिक प्रश्न खूप जुने आणि चोथा झालेले आहेत त्याची इथे चर्चा मला मुळीच अपेक्षित नाही. पण नव्यानी निर्माण होत असलेले वा अजून उघडकीस न आलेले परंतू अस्तित्वात असलेले प्रश्न जरूर इथे मांडा..



Hkumar
Monday, October 15, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला विषय. सद्ध्या खाजगी क्षेत्रात नोकरी करणार्‍यांचे दिवसाचे कामाचे तास हा चिंतेचा विषय आहे. काही क्षेत्रात तर याचा अतिरेक होत आहे. ' मी दिवसाचे १४ तास कंपनीत असतो' हे कौतुकाने सांगीतले जाते. त्यातून जर नवरा बायको दोघेही अशा नोकर्‍यांत असतील तर हा खरेच सामाजिक चिंतेचा विषय आहे. अशा जीवनशैलीतून आपण स्वतःचे आरोग्य, कौटुंबिक संवाद, अपत्यांची देखभाल इ. ग़ोष्टींमध्ये गंभीर समस्या निर्माण करीत आहोत.

Maanus
Monday, October 15, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1. addiction to x x x material, it has reached to a total new level these days. people are getting more and more addicted to it every other day. It has become similar to smoking and drinking. I know couple of my friends who broke their marriage cause of this.

there is difference between sometimes and addiction. everyone watches it, there is nothing wrong in that i guess. But addiction is different world all together. anyway this can be that person's personal matter, as long as its limited to him.

but few people are crazy, they take your snaps with these new mobile phones unknowing to you and post them on net; which is certainly not a personal problem.

2. call centers... come on people, there are other jobs you can do. (I am only addressing collage students) and anyway what kind of service do call center people give these days.

3. PUC certificate, those guys need to test your vehicle before they give you certificate. you cannot just give it, without testing. I still cannot drive with white shirt. that PUC thing is certainly not working. Have you heard of any case where PUC certificate was rejected?


Hkumar
Monday, October 15, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, जरा मराठीत लिवा की वो!

Ashwini_k
Monday, October 15, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अमक्या तमक्याच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा", "हार्दिक अभिनंदन", "सर्व गणेशभक्तांचे स्वागत" वा तत्सम captions आणि गणपतीचा किंवा देवीचा छोट्टासा कोपर्‍यात फ़ोटो, उरलेल्या space मध्ये बरेचसे थोबडे (मी चिडून हा शब्द वापरते आहे), एखाद्या main व्यक्तीचा फ़ूल साईज, हात उंचावलेला फ़ोटो. असले डोक्यात जाणारी होर्डिंग्ज सगळी मुंबई व इतर शहरे, कानेकोपरे विद्रूप करत आहेत. एकाही छोट्या मोठ्या राजकिय पक्षाला हा मोह आवरता आला नाही आहे. बंदी आणली पाहीजे ह्या प्रकारावर.

Zakki
Monday, October 15, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय असले हे होर्डिंग चक्क कायदा मोडून, सार्वजनिक रस्त्यावर उभारले जातात, त्यामुळे आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात.

पण काय करणार काय? मूर्ख, बेशिस्त, लाचखाऊ नि गुंड यांची सध्या चलती आहे. हे असेच चालायचे.


Hkumar
Monday, October 15, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण टी.व्ही. आणि कंप्युटर च्या आहारी गेल्याने कौटुंबिक व सामजिक संवाद कमी होत आहे. अर्थात हे समाजातील ठराविक वर्गाला लागू आहे.

Dineshvs
Monday, October 15, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, झक्कि, गेल्या काहि वर्षात या होर्डिंगचे प्रमाण फारच वाढलेय.
कुठलेही पोस्टर लावायला काहि नियम आहेत. त्याचा कर म्युनिसिपालिटीला द्यावा लागतो. तसेच पोस्टर लावल्यावरही त्याची परवानगी कुठल्या तारखेपर्यंत आहे, तेही त्यावर नमुद करावे लागते.
या होर्डिंग्जच्या बाबतीत सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत. यात अर्थातच निवडणुका नजरेत ठेवुन केलेली सरोगेट जाहिरात असते. आता गणपति, नवरात्र, ईद च्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या असतात. त्यात बिचारा गणपति वा देवी, नावापुरतीच यांचीच थोबाडं जास्त ठळकपणे दिसतात.
यासंबंधी जनहित याचिका कोर्टात दाखल करता येईल. पण ज्यांची थोबाडं तिथे चमकत असतात ते सगळेच साहेब ना ( पक्षी, गुंड, दादा वैगरे ) मग ते धाडस कोण करणार ?
आपले न्यायाधिश तर या समाजापासुन फटकुनच राहतात. त्यांच्या नजरेत हे येत नाही ? त्याना स्वतःला दखल का घ्यावीशी वाटत नाही ?
या होर्डिंग्जच्या बाबतीत एक बाब नोटिस केलीय का ? अशी पोस्टर्स सिनेमाच्या बाबतीत कधीच नसतात. तसेच ती रेल्वे स्टेशनवरही नसतात.
तक्रार कुणी करायची याबाबतीत, माझ्या एका परिचीत बाईंचा किस्सा लिहिण्यासारखा आहे. एका पोलिस चौकीसमोर राजरोस नव्याने झोपडपट्टी उभारली जात होती. या बाई पोलिस चौकीत गेल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला दिसत नाही का ? आत्ताच आवर घाला, पुढे पक्की घरे उभी राहतील.
तर ड्युटीवरचा पोलिस म्हणाला, बाई तुमच्या नावापत्त्यानिशी लेखी तक्रार द्या, उद्याच तोडतो झोपड्या.
बाई म्हणाल्या, म्हणजे तु ती तक्रार त्या लोकाना दाखवशील, आणि परवा माझा मुडदा, तुमच्याच दारात पडायचा.
पोलिस चूप बसला !!!


Mandarnk
Monday, October 15, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा video बघा....

http://video.google.com/videoplay?docid=3070120386399623186

खरंच सुन्न झालो बघून...

Maanus
Tuesday, October 16, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगात सगळीकडे लोक सारखेच आहेत. the only reason why people in other countries follow law is because of FINE.

Fine for not following law is extreamly high, overdraft fee 35 $ कार निट पार्क नाही केली 35 to xyz $.
highway वर गाडीतुन कचरा टाकला fine 500 $. भाड्याच्या घरात जर तुमच्या घरात झुरळ वैगेरे आढळले तर १ दिवसाच्या notice वर घर खाली करायला लावतात.

people are afraid of fines, and so they follow law.

seat bleat न लावल्यास new york state मधे direct license जप्त करतात.

कचर्‍यावर देखील fine आहे, but i dont know the details

तुम्ही कुणी ते घाशीराम कोतवाल नाटक पाहीले आहे का? त्यात नाही घाशीराम सगळ्यासाठी परवाना आणि नसेल तर जबरदस्त शिक्षा. तसे काहीतरी करायला पाहीजे.

विचार करा पुण्यात signal तोडल्यास रु १०,००० fine , बघा मग कसेकाय कोण signal तोडतोय. signal तोडन्यापुर्वी १००० वेळा विचार करेल माणूस. रस्त्यावर थुंकल्यास १५,००० fine


Slarti
Tuesday, October 16, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दंडाचा विषय निघाला आहे त्यावरुन -
कचरा चोरला तरी दंड

Asami
Tuesday, October 16, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

people are afraid of fines, and so they follow law.
seat bleat न लावल्यास new york state मधे direct license जप्त करतात.
>> MA मधे असा काही rule नाहिये. In fact seat belt न लावता गेलास तर cop तुला फक्त विचारू शकतो. बस. पण लोक चालवतात seat belt लावून. सवयीचा भाग असतो हा असे मला वाटते

Disha013
Tuesday, October 16, 2007 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणसा, आधी इंग्लिश नि आता मिंग्लिश का? मग मराठी पोस्ट कधी? (मायबोलीवरचा लक्षात आलेला प्रश्न!) दिवे घे....:-)

आणि १०,००० किंवा १५०००० दंड कसा परवडेल रे?
माणसाचा(तु नव्हे!) पगार पण हवा ना त्या प्रमाणात! :-)
आणि इथले पोलिस लाच घेत नाहीत म्हणुन गपचुप दंड भरतात लोक. आपल्या इथे 'कायदारक्षकच'
भीक मागत फ़िरतात! ते सुधारले की निम्म्याच्या वर प्र्श्न सुटतील.

मला एक उपाय सुचतोय की जर एखाद्या पोलिसाने एखाद्या गाडीवाल्याला पकडले तर त्याला होणा-या दंडातली काही % त्याला देण्यात यावेत. मग अगदी जागरुक होवुन काम करतील ते!


Lukkhi
Tuesday, October 16, 2007 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक उपाय सुचतोय की जर एखाद्या पोलिसाने एखाद्या गाडीवाल्याला पकडले तर त्याला होणा-या दंडातली काही % त्याला देण्यात यावेत. मग अगदी जागरुक होवुन काम करतील ते!

>> दिशा, त्यांना दंड न करता ५० % मिळतात ना पण!!!
law enforcement strict कसे होणार हा खरच खूप गहन प्रश्न आहे.



Sunidhee
Tuesday, October 16, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टी सी ना असतो तसा कोटा कायम करावा, की इतका दंड वसूल झालाच पाहिजे.

Uday123
Wednesday, October 17, 2007 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण होर्डिंग बद्दल चिड येते. "आत्-पाट नगराचे शिल्पकार दादांच्या ३४ व्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" हे भर चौकात वर्षभर वाचायला मिळते, मग पुढे ३५ वा येतोच आहे. आता या पुढार्‍याने पस्तिशीत काय नगर विकास केला याचा एक आढावा पण असतो. खाली प्रायोजीतांचे छोटे-छोटे ८-१० फ़ोटो. एका ठिकाणी तर या पुढार्‍या(गुंडा)ची भली मोठी तसबीर, आणी त्याच्या अगदी शेजारी लागुन एक छोटासा साने गुरुजींचा फ़ोटो, पाहुन मी तर आवाक झालो.



Maanus
Wednesday, October 17, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसाचा पगार पण हवा ना त्या प्रमाणात!

हिच तर खरी गम्मत आहे. दंड इतका ठेवायचा की तो परवडनार नाही. जर परवडनारा दंड असेल तर आपण सारखेच नियम तोडु.

अमेरीकेत common man चा पगार इतका नसतो, tax वैगेरे जावुन hardly हातात तीन्-एक हजार येतात, त्यात त्याला घर भाडे, वैगेरे वैगेरे सगळ भाववायचे असते. हे सगळे जावुन क्वचीतच तो savings करु शकतो. अश्यात १०० $ दंड देखील परवडन्यासारखा नसतो, पण तरीही सरकार ने दंड १००-२००-५०० असे ठेवलेत, जेने करुन कधी पकडलो गेलो तर येवढी मोठी रक्कम कशी पे करायची हा प्रश्न पडावा.

so the fine has to be high, so high that it puts a BIG hole in your pocket. If you cannot afford it, go to jail, work there and pay through those wages.

and as sunidhee said, monthly fine che target set kele kI barobar fine goLaa hoto.



Sad thing is we can just talk, for next 100 years these things will never get implemented. how many of you have ever visited police station. those guys are useless, there may be few exceptions, but majority are useless.



दोन तीन वेळा मला पोलीस स्टेशन मधे जायचा संबध आला. दर वेळेस तिथे गेले की ते लोक काहीही फालतु काम सांगतात, जा ह्याच्या xerox काढुन आन, हे कर, ते कर. लायकी नसलेल्या माणसांना साहेब साहेब म्हणावे लागेते.

एकदा पहाटे ६ च्या सुमारास मी पोलीस स्टेशन मधे गेलो, एक urgent फोन करायचा होता आणि इतक्या सकाळी काहीच उघडे नव्हते. गेलो बिन्धास्त पोलीस स्टेशन मधे.

एकुन एक जर घोरत होते. तिथे एकाला साहेब साहेब म्हणुन हलवले तरी तो उठला नाही. शेवटी तसाच फोन केला. कुनचा कुनाला पत्ता नाही.



again we can just talk, we have got used to this system. we dont like changes.


after getting used to US driving, I understood that pedastrians have first right to cross the road. last time when i was driving in India, there was this one lady who wanted to cross the road, I stopped my bike to give her way. while corssing road, she kept on looking at me with strange eyes.

I am sure she was thinking, why the hell he stopped.

So that has become tendency. we are so much used to the system, that we dont like any changes in it. or changes look odd, strange.



विजचोरी महाराष्ट्रात अजुनही सर्रास चालते(मी करत होतो त्यामुळे माहीतीय), का नाही गुजराथ govt सारखे आपन pre-paid cards काढु शकत.



university circle flyover construction, why cannot they do it in parts, construct one part complete, then go to next part. or else construct the way sea bridges are constructed, actual road is constructed somewhere else and then carried to the place where it needs to be installed. But government knows people will just talk, create videos, nothing is going to happen. No one is going to put me in jail for doing some mistake.

well someone needs to sue the government (talking like american now). file a case against pune municipal. when government officials understand that they can be counted for the mistakes, they wont do mistakes. take the fresh students from law school, they will run your case.


Only unmarried, single people can do such things. thats the fact. but people of my age or younger, are busy in call centers or taking secret photographs of woman walking down the street with their new mobile phone. and people who think like me are busy repaying their loans.


anyway I dont think I have right to talk on any of this, as I have never voted.


Maanus
Wednesday, October 17, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साने गुरुजीं, आंबेडकर, गांधी गेले.

try living in present tense and think about future.


Slarti
Wednesday, October 17, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> साने गुरुजीं, आंबेडकर, गांधी गेले.
सध्या माझीही प्रकृती बरी नसते...
असो. स्वयंशिस्त दंडादी उपायांनी येईल का ?


Dineshvs
Wednesday, October 17, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या होर्डिंगचे पेव फुटायचे एक कारण म्हणजे सध्या प्रिंतिंगचे तंत्र फारच सुधारलेय आणि स्वस्तही झालेय. रावणाच्या दहा डोक्यांसारखी दहा थोबाडे अगदी सहज दाखवता येतात.
पुर्वी सिनेमाची पोस्टर्सपण हाताने रंगवावी लागत असत. अगदी शोले पर्यंत हिच पद्धत होती. नेमकी कधी बदलली ते आठवत नाही.
आपले परमपूज्य आदरणीय मकबुलजी फ़िदाजी हुसेनसाहेबजी पुर्वी पोटापाण्यासाठी हाच उद्योग करत असत.
पुढे कामच न उरल्याने ते असे चळले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators