|
Runi
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:13 am: |
| 
|
एवढे सगळ्यांचे पोलीसांचे अनुभव आलेत त्यात माझाही (देशाबाहेरचा पहिला अनुभव) मी तेव्हा जर्मनीत नुकतीच रहायला गेले होते. तेव्हा एका पोलीसाच्या गाडीने मला आणि माझ्या कलीग ला अडवले मजा म्हणजे आम्ही तेव्हा गाडीत नाही तर सायकलवर डबलसीट जात होतो. तिथे सायकलवर डबलसीट जायला बंदी होती म्हणे. आम्हा दोघांनापण तो पोलीस जर्मन मध्ये काय म्हणाला हे कळणे शक्य नव्हते आणि माझा कलीग तर रशियन होता, त्याला जर्मन आणि ईंग्रजी अशा दोन्हीही भाषा येत नव्हत्या. मग आम्ही तिघांनी एक्मेकांना कळेल अश्या english मध्ये संवाद सुरु केला. शेवटी बहुदा कंटाळुन त्या पोलीसाने फक्त warning देऊन सोडुन दिले आणि जाता जाता जर्मन बोलायला शिका असा दम सल्ला दिला.
|
Amruta
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:12 pm: |
| 
|
DJ अग कालच जुईला शाळेत घ्यायला जाताना पाउस पडत होता तर head lights लावले नव्हते तेव्हा तुझी अचानक आठवण आली आणि लावले ग head lights . आज पण पाउस पडतोय... try मारु काय?? लिंम्ब्या, पाण्यात पडल कि पोहायला जमत म्हणतात ना तसच हे पण जमत (फक्त पोहायला काही जमल नाहिये अजुन.) बाकी किरण एकदम मजेत. पण बर्यापैकी busy आहे. त्यामुळे हितगुज वर येण जमत नाही त्याला.
|
Zakki
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:34 pm: |
| 
|
बायकांनो, हे पोलीसवर लाईन मारणे सोडून द्या. यावर ऐकलेला एक विनोद: एकदा एक गृहस्थ आरामात गाडी चालवत कुठेतरी जात असतो. इतक्यात त्याला एक पोलिसची गाडी दिसते. त्याबरोबर तो सुसाट वेगाने गाडी हाकायला सुरुवात करतो. गोंधळलेला पोलीस क्षणात त्याच्या मागे लागतो. शेवटी रहदारीच्या रस्त्यावर आल्यावर पोलीस त्याला पकडतो नि म्हणतो ' काय राव, कुठे आग लागली आहे?' तो म्हणतो 'आग नाही, पण गेल्या वर्षी माझी बायको तुझ्याबरोबर पळून गेली. मला भीति वाटली की आता तू तिला परत करायला आलास की काय?'
|
Chyayla
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:22 pm: |
| 
|
संध्याकाळी अंधार पडल्यावर head lights न लावता जा भर रस्त्यावर , येइल लगेच मागे चाल: सांग सांग भोलानाथ.. सांग सांग दीपांजली, (लेडी)पोलिस येईल काय?.. कोणी तरी म्हटले आहे की लेडी पोलिस पण सुंदर असतात.
|
Maanus
| |
| Sunday, October 14, 2007 - 2:50 am: |
| 
|
अरे वा बरेच first timers येवुन गेले की. हा माझा एक recent first time my first robot. माझा पहीला robot फाराच चांगला आहे. घरी आल्या आल्या पहीले त्याने मला स्वतःबद्दल माहीती दिली, तो कसे काम करतो, त्याच्या कडे काय काय आहे, माझे काम कसे वाचनार आहे. मी तर जाम खुश झालो ती माहीती ऐकुन, पण तेव्हाच त्याला काम करायला सांगु शकत नव्हतो कारण रात्र झालेली, त्याने बिचार्याने काम केले असते, पण खालचा माणूस ओरडत आला असता. दुसर्या दिवशी सकाळीच तो कामाला लागला, सगळ्या घरभर फिरुन कचरा गोळा करायचे काम करतो. एक देखील कोपरा सोडला नाही. पहील्या दिवशी मी त्याच्या मागे मागे फिरत होतो, नीट कचरा उचलतो की नाही बघायला पण तो ईतके निट काम करत होता की १० मीनटात मी माझ्या बाकीच्या कामला लागलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कोण? तर हा आहे iRobot Roomba vacuum cleaner अफलातुन प्रकार आहे जे काही आहे ते, गेल्या आठवड्यात vacuum cleaner घ्यायला गेलो, तर तेथे हा दिसला video demo It gives demo of itself. Its small still powerful. One can schedule weekly time so your hose is automatically cleaned atleast once a week and you dont have to be at home to start it. After few days it gets used to your home and adjusts itself to the walls, furniture around (AI programming). Pretty kool.
|
Itgirl
| |
| Sunday, October 14, 2007 - 6:41 am: |
| 
|
माणसा, तुझा मायबोली संन्यास संपला वाट्ट
|
Maanus
| |
| Monday, October 15, 2007 - 1:36 am: |
| 
|
सन्यास ... बापरे इतके अवजड शब्द नको...
|
Arch
| |
| Monday, October 15, 2007 - 2:09 am: |
| 
|
माणसा, एक सांग हा robo hardwood floor, carpeted area ह्या दोनालाही automatically adjust होतो का? आणि खुर्च्यांखालून वगैरे व्यवस्थीत जातो का? I wanted to get it but was not sure. Thanks for sharing.
|
Maanus
| |
| Monday, October 15, 2007 - 2:20 am: |
| 
|
Oh yeah, it does. एक दोन वेळा तो iron table, bathroom floor mats आणि patio door मधे अडकला, बाकी काही त्रास नाही Its careful to avoid wires, it goes on them but doesnt get stuck there. its costly outside, but comparatively cheap in Costco. जर तुमच्या घरात पायर्या असतील तर त्यावर तो जात नाही, त्यामुळे तिथे manually साफ करावे लागेल. and with other regular vacuum, not this one. ह्या ठिकाणी कदाचीत जास्त माहीती मिळेल.
|
Mrinmayee
| |
| Monday, October 15, 2007 - 2:50 pm: |
| 
|
हा first time चा अनुभव ओळखीतल्या एका मुलीचा. लग्नानंतर पहील्यांदाच खूप कौतुकानी नवर्यासाठी मटण करी करायाला घेतली. दहादा रेसिपी वाचून, तंतोतंत पाळून मटणाचा हंडा गॅसवर चढवला. नवर्याला फोन करून सांगीतलं, "आज मैं तुम्हारी फ़ेवरेट मटन करी बना रही हुँ." हे सकाळी साधारण १० वाजता. नवरा रात्री साताला घरी आला तरी मटण शिजतच आहे. भांड्यात नुस्तं गरगट्ट शिजलेलं, एकजीव झालेलं काहीतरी दिसंत होतं. नवर्यानी विचारलं, "क्या हुआ? अबतक पका नही?" उत्तर आलं, "बस, सिर्फ़ हड्डियाँ गलना बाकी हैं!!"
|
Disha013
| |
| Monday, October 15, 2007 - 5:25 pm: |
| 
|
बिचारा नवरा! धसकाच घेतला असणार बायकोचा!
|
Supermom
| |
| Monday, October 15, 2007 - 5:54 pm: |
| 
|
माझेपण अमेरिकेत आल्यानंतरचे पहिले पहिले अनुभव. आल्याआल्या नवर्याच्या ऑफ़िसने क्वालिटी इन मधे रहायची सोय केली होती. ऑफ़िस जवळच असल्याने नवरा रोज दुपारी पायीच हॉटेलवर येऊन मला घेऊन मग जेवायला जात असे. तीन चार दिवस असे गेल्यावर एकदा त्याचा फ़ोन आला की मला आज इथेच लंच मिटींग आहे तर तू एकटी जाऊन पिझा घेऊन ये तुझ्यासाठी. आमची स्वारी थाटात खाली उतरली. भारतात इंग्लिश मिडियम असल्याने भाषेचा प्रश्न येणार नाही असे उगाचच वाटत होते.(पुढची फ़जिती आधी थोडीच दिसते हो?) तर applebees मधे जाऊन थाटात ऑर्डर दिली पिझ्झाची. काऊंटरवरच्या माणसाला आपले बोलणे कसे पटकन कळले या तोर्यात पर्स उघडायला लागले तोच त्याने विचारले, 'do you want"to go" or...' मला काही कळेचना. मी त्याला सांगतेय, 'I dont want to go anywhere. i want a pizza...' अशी जुगलबंदी काही वेळ चालली, अन मग बाजूच्याच टेबलावर बसलेल्या एका अमेरिकन ललनेला माझी( बहुधा तिच्या देशबंधूची जास्तच) दया आली. तिने येऊन मला कळेल अशा भाषेत समजावून सांगितले. अजूनही नवरा चिडवतो कधीकधी .
|
Manuswini
| |
| Monday, October 15, 2007 - 6:03 pm: |
| 
|
हा माझा इथील पहीला गाडीचा exp ,तशी मुंबईत गाडी चालवलेली पण माहीती आहे ना कसले rules n regulations बाळगतो आपण. घे steering नी घुसव गर्दीतून हा प्रकार. speed नसतो तिथे पण आपली turning वर गाडी मारायची सवय असते ना. road test होती. सरळ belt लावला नी सुरु. आता ही quite residental area मधून test होती तरी speed तोच. नी turn एकदम गरकन घेतले(मुंबई style ). बाजुला handsom DMV चा माणुस. शेवटी test संपवून परत आले DMV त. त्याच्याकडे smile देवून बघत बसले काय लिहीतोय ते. ' PASS ' लिहीले पण नंतर जे म्हणाला ते एकून एकदम चुप्प?? Lady when You drive,let your husband sit in the backseat.. माझा चेहरा लगेच पडलेला पाहून, लगेच Are you from India? हे उगाच विचारले.(चेहयावर दिसते की). मी तेच वाक्य मोठ्याने english मध्ये म्हटले, देशी वाटत नाही का मी तुला? मग शेवटी हसत गाडीतून निघता निघता एक वाक्य म्हणाला,त्याने मी एकदम खुष...... Believe me,You are really beautiful! घरी येवून मी बहिणीला, भावाला,आईला पहीले वाक्य सांगीतले ते इतके खो खो हसत होते...... " बिचारा जीव मुठीत घेवून बसला असेल दुसरे काय.. " (इती बहिण, भाऊ,आई). त्यांना मी पास कशी झाले ह्याचे कोडे पडलेले कारण मी तशी reckless n impulsive आहे काही बाबतीत. मग त्यांचे खुप हसून झाल्यावर शेवटचे वाक्य जसे सांगीतले तसे सगळे एका सुरात एकदम जोरात......... तरीच.ऽ.ऽ.ऽ असा राग आला होता ना काही दिवस. कित्येक दिवस तो जोक एकवला जायचा, मनु गाडी चलवतेय, मागे बसा मागे बसा.
|
Maanus
| |
| Tuesday, October 16, 2007 - 3:57 am: |
| 
|
I dont want to go anywhere. i want a pizza... ही ही ही... :D american english: 'to go' मराठीत parcel Believe me,You are ... हम्म्म्म point to be noted
|
Supermom
| |
| Tuesday, October 16, 2007 - 11:48 am: |
| 
|
अरे सागर, मी त्याला पार्सल पण सांगून पाहिले पण त्याला मुळीच कळले नाही.
|
Gsumit
| |
| Tuesday, October 16, 2007 - 9:59 pm: |
| 
|
आयला, मला पण आजच कळले टुगो म्हणजे काय ते... धन्स मायबोलीची "माणुस"की...
|
Sunidhee
| |
| Tuesday, October 16, 2007 - 10:04 pm: |
| 
|
ते TO GO ने मला पण फसवले. मी 'to go? where?' असे विचारले होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|