Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 5:30 am: |
| 
|
हा बीबी सुरू करायचं कारण हेच की काही अस्सल भीषण गाणी आज पहाटे ६ पासून ऐकायला लागतायत. आमच्य शेजारी देवीचे देऊळ आहे. सगळा खाक्या उत्तरप्रदेशी आहे. नवरात्रीसाठी सगळं देऊळ सजलंय. आणि आज नवरात्र सुरू त्यामुळे पहाटे ६ पासून विविध देव्यांची गाणी ऐकलीयेत मी... त्यातली out of this world भयाण गाणी १. तू मिले.. दिल खिले हे गाणं आठवतंय का कोणाला? मनीषा कोइराला आणि व्यंकटेश होते त्यात. तर त्या गाण्याच्या चालीवर अंबे मा... जगदंबे मा.. अस गाणं होतं... गाण्याच्या सुरुवातीला ते मादक आवाजात जे काही म्हणलंय ना तसंच त्या चालीवर 'जय अंबे' असंही म्हणलं होतं. तश्याच मादक आवाजात मूळ गाण्यात काही गद्य पण म्हणलेलं आहे त्या ठिकाणीही तसंच काही गद्य होतं. मी असली दचकले ना ते ऐकून... २. कही दूर जब दिन ढल जाये.. यावर लोक कसे दूर दूर वैष्णोदेवीला चालत जातात आणि पायात छाले पडले तरी कशी मी (गाननायिका) चालतेय. असं वर्णन.. आणि मग शेवटी समेवर येतना... या गाण्यातही दिप जलाये दीप जलाये असं होतंच.. कसं काय जमवलं कुणास ठाउक.. आता १० दिवस असल्या ज्ञानात भर पडणार...
|
सिनेगीतान्च्या चालीवर देवाची गाणी लिहिणारेगाणारे याना खरेच बदडून काढायला पाहिजे. काही वर्षान्पुर्वी चुम्मा चुम्मा दे दे या चालीवर साइबाबान्चे गाणे ऐकून मी जवळ जवळ बेशुद्धच पडलो.
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 2:31 pm: |
| 
|
मी २ वर्षांपूर्वी 'धूम पळाले धूम पळाले धूम' असं गाणं गणपतीत ऐकलं होतं. नक्की कोण पळालं काही कळलं नाही. आत्तच मै जो निकला गड्डी लेके या चालीवर जय माता शेरोवाली असं ऐकलय!! आणि जे गाणं चालू आहे त्याचं ओरिजिनल लक्षात येत नाहीये.
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 2:40 pm: |
| 
|
आईगं.... आत्ता ऐकतेय हे... मेरी मैय्याने है बुलाया मै तो जाउंगा मेरी माताने है बुलाया मै तो जाउंगा नारीयल चढाके चुनरी ओढाके मै तो जाउरे मूळ गाणं ओळखा
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 2:54 pm: |
| 
|
पावन मनभावन है मैय्या तेरा गाव मैय्या तेरी जयजयकार.. बोलो बोलो सब मिलके बोलो.. पावन मनभावन है मैय्या तेरा गाव दर्शन करनेवाले हो जगसे पार. ओळखा ओळखा.. बोलो बोलो मधे हिंट लपलेली आहे...
|
Mrinmayee
| |
| Friday, October 12, 2007 - 3:06 pm: |
| 
|
काही वर्षांपूर्वी ठाण्यातल्या टेंभीनाक्यावरच्या जैन मंदीरात 'मेरे अंगने मे..' च्या चालीवर 'पद्मावतीका भरा दरबार हैं' असलं काहीसं गाणं ऐकलं! वाटलं, भगवान महावीर ह्यांना सुबुध्दी देवोत!
|
पूर्वी नारदाने वाल्या कोळ्याला रामनामाची दीक्षा दिली तेव्हा त्याला राम म्हणायला जड जात होते त्यामुळे त्याला मरा मरा असे म्हणायला सांगितले आणि मग तो राम राम म्हणायला शिकला अशी बोधकथा आहे. तसेच आजच्या सिनेसंगीतात बुडलेल्या धर्मभ्रष्ट लोकांना देवाधर्माचे काही शिकवायचे असेल तर सिनेसंगीताच्या चालीवर शिकवावे असा आजच्या धर्ममार्तंडांनी विचार केला असेल! ज्या विद्वानाने हा शोध लावला त्याची स्तुती करणारे एखादे गाणे एखाद्या लेटेष्ट सिनेगीताची चाल लावून रचले पाहिजे! अर्थात मूळ गाणे अत्यंत वाह्यात असेल तर मनुष्य अध्यात्माचा विचार करण्याची शक्यता कमीच!
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 3:25 pm: |
| 
|
द्वारे तेरे मा कैसे मै आऊ पावमे छाले बदन दुखाये चला ना जाये उंचे पहाडोंपे घर तेरा जहापे तूने दिप जलाये दीप जलाये अर्थातच कही दूर जब दिन ढल जाये.. कडवी तर 'नोबेल' पारितोषिक देण्याइतकी महान आहेत!! नवीन quiz कबसे बैठी हू द्वार तेरे आके प्यासी है आखे दिलमे.... हो ओ ओळखा..
|
Tiu
| |
| Friday, October 12, 2007 - 4:02 pm: |
| 
|
मेरी मैय्याने है बुलाया मै तो जाउंगा >>> मेरा बाबु छैल छबिला मै तो नाचुंगी! :D
|
Disha013
| |
| Friday, October 12, 2007 - 5:04 pm: |
| 
|
ही अशी गाणी जन्माला घालण्याचं श्रेय मला वाटतं त्या गुलशनकुमारला द्यावं लागेल. धुमाकुळ घातला होता त्याने आणि त्याच्या टी-सिरीजने!
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 5:43 pm: |
| 
|
टिउ.. good guess! आता बाकीची उत्तरं मीच सांगते... पावन मनभावन... हे गाणं सावन का महिना पवन करे सोर यावर आधारीत तर कबसे बैठी हू.. हे गाणं अभिमान मधल्या 'अब तो है तुमसे हर खुशी अपनी' या गाण्यावर आधारीत... गाऊन(नरड्यातून आवाज काढून.. दुकानात जाऊन नाही..) बघा.. किंवा कुणा गळेपडूला तरी म्हणून दाखवा... परत तुमच्या वाटेला जाणार नाही...
|
हा जरा जुना "क्लासिक" टच. हवा में उडता जाये मेरा पवनपुत्र हनुमानजी हो जी हो जी होय. हे भजन मी ऐकले आहे. हनुमान की कसम!
|
North India मधे तर सगळीच भक्तीगीतं filmy गाण्यंच्या चालीवर च करतात , दुसर्या चाली शोधत च नाहीत . भारतात असताना हरिद्वार trip मधे ऐकलेलं हे गाणं अजुन लक्षात आहे . चाल : गोरे गोरे मुखडेपे काला काला चश्मा विष्णु के चरणोमे गंगाजी का वास है (coonecting music पण तसेच धिंग टाडा ढिंग टाडा ..)
|
Manuswini
| |
| Friday, October 12, 2007 - 9:18 pm: |
| 
|
गणपती जाताना हे एक हमखास गाणे लागायचे specially कोणीतरी राजा singer तेव्हा famous होता तेव्हा, तुम तो चले परदेसी, याद बहुत आवोगे (मग परत) बाप्पा चले परदेसी original: तुम तो ठहरे परदेसी इतके sick वाटायचे ना.
|
सावानकुमार चा एक चित्रपट सनम बेवफा. त्यात एक गीत होते "चुडी मजा न देगी, कन्गन मजा न देगा " त्यावर "गणनायका गणेशा . " असे गाणे ही ऐकलय. अरे बाबानो, चाली जरूर चोरा पण निदान कुठली चाल चोरायची याचा तरी पाच पोच ठेवा. असल्या आचरटपनात वैश्नो देवीची भक्त पुडे असतात. काय ती जागरणे.
|
Swa_26
| |
| Saturday, October 13, 2007 - 6:19 am: |
| 
|
आमच्य शेजारी रहाणारा एक भजनी बुवा तर proper गाणी लावुन स्वत: त्यावर भजने रचत असे. दिदि तेरा देवर दिवान च्या चालीवर, 'ताई तुला कमळं हवी ना, हे काम तु अर्जुनाला सांग ना' हे रचलेले त्याने!! आणि अशी बरीच आहेत, जशी आठवतील तशी लिहिन!!
|
Manya2804
| |
| Sunday, October 14, 2007 - 11:58 am: |
| 
|
एका भजनी बुवाने म्हटलेलं चाल : तू चीज बडी है मस्त मस्त गीत : तू सत्यनारायण देव देव... हा भजनीबुवा लय फेमस. वर सांगितलेल्या भजनाला त्याने once more घेतले...
|
एक प्रसिद्ध पार्शवगायिका आपल्या प्रक्षेपणासाठी रेडिओ स्टेशनवर गेली होती. स्टाफ़ आर्टिस्ट्स चा संप सुरू होता म्हणून आयत्या वेळेला हिच्या कोरस साठी तमाशाच्या ब्राॅडकास्ट साठी आलेला संच उभा राहिला. स्टूडिओचा ON AIR चा लाल दिवा लागला... गाणं सुरू झालं... "ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्तगुरू दिसले" मुखडा संपताच कोरस गाऊ लागला... "हिला गं बाई, दत्तगुरू दिसले!!"
|
मला तर मायबोली दिवाळी अन्कासाठी एक स्पर्धा सुचली. मायबोलीने एखादे सुपरहिट्ट हिन्दी गाणे द्यायचे. स्पर्धकानी त्या चालीवर तन्तोतन्त एखादे भक्तीगीत रचायचे. अज्जुका तुम्ही पुलन्ची युक्ती वापरा. घराबाहेर कर्कश गाणी तुमच्याच करमणूकीसाठी लावली आहेत असे मानून चाला. मनस्ताप कमी होतो.
|
Swa_26
| |
| Monday, October 15, 2007 - 5:47 am: |
| 
|
अज्जुका अज्जुका अज्जुका.... अगं काल तुझी कित्ती किती आठवण आलेली म्हणुन सांगु!! अगं काल एका देवीच्या मंडपाजवळुन जात होते तर हे गाणं कानावर पडलं आणि मी तिथेच थोडा TP करुन पुर्ण ऐकलं ते गाणं पाठ केल नि मगच हटले तिथुन... जगदंबे माते आइचे नाते आहे हे खरोखरी... मंदिरी येईन नवस मी देईन केली तु इच्छा पुरी!! (मूळ गाणं यारा ओ यारा मिलना हमारा )
|