Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 11, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » Archives » Archive through October 11, 2007 « Previous Next »

Vegayan
Wednesday, October 10, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कही महीनपुर्वी ITALY ला जात असताना घडलेला कीस्सा.....
माझ विमान MUMBAI-DOHA-MILAN अस होत . पहिलाच प्रवास त्यमुले बरिच घाबरले होते DOHA लआ पोहच्ल्यनन्त्र तिथल्या OFFICER ला Calling card kuthe मिलेल वीचारल , त्यानी कहितरि सन्गितल पन मि ईतकि tension मधे होते कि तो कय बोलतोय हे न baghata tyala म्हतल 'can you speak in english please?' आता मात्र तो जाम भडकला करन तो मगापसुन एन्ग्लिश मधेच सानगत होता अनी वर मि अस म्हन्तल्यावर तो चिद्ला अनि म्हनाल 'i am speaking in english '!! मग मी तिथुन काढता पाय घेत्ल... मग journy सुरु होइस्तोवर मला तो दिसला नही.

Kanak27
Wednesday, October 10, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पहिल्यांदा माझ्या मुलीला ६ दिवसानंतर पहिल.
जेव्हा Nurse नी पहिल्यांदा तिला माझ्या हातात दिल
i felt so nice & proud that such sweet baby is mine. She was so small.
ते क्षण मी कधिहि विसरु शकत नाहि.

& i can't forget that doctor also , due to her mistake we suffered lot, i never forgive her.


Chyayla
Wednesday, October 10, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे सगळ्यांचे किस किस्से वाचुन मलाही किस्सा द्यायचा आहे. त्याच शिर्षक आहे. "संगणक अभियंता"

अस म्हणायला कस वाटतय ना पण तो माझा संगणक अभियंता म्हणुन नौकरीचा पहिलाच दीवस. आईशपथ मी त्या आधी कधी कॉम्पुटर वापरलाही नव्हता. आणी मी वाशिम जिल्ह्याचे संगणकीकरण करण्यासाठी म्हणुन निवासी जिल्हाधिकारी खुळाज साहेबाना सांगतोय मी ना अमुक कम्पनीकडुन तुमच्या जिल्ह्याचे संगणकीकरण करण्यासाठी नियुक्त झालो आहे.

अस होय छान छान अस करा तुम्ही माझाच कॉम्पुटर आधी लावुन द्या... ईती जिल्हाधिकारी साहेब. मी ईतक्या आत्मविश्वासानी म्हणतोय हो ठीक आहे आत्ताच आपण काम सुरु करु. पण आतमधुन जाम टरकलो होतो कारण मी कधी कॉम्पुटर ईंस्टॉलशन केलेच नव्हते त्यातल्या त्यात वाशिम सारख्या ठीकाणी कॉम्पुटर म्हणजे शिपाई पासुन जिल्हाधिकारी पर्यंत सगळ्यानाच नवलाई, सगळ्यांची नजर माझ्यावरच होती, एक शिपाई कुणाला तरी म्हणत होता मम्बई वरुन फ़ार मोठ्ठे ईम्जिनियर आले आहेत... असो माझ्या सोबत आता २ शिपाई देण्यात आले होते ते मला एका गोदामात घेउन गेलेत पहातो तर कॉम्पुटरचा हा ढीग. त्यांच्या मदतीने एक खोकनाडे उचलुन आणले.

म्हटल चला आता काही तरी दाखवावेच लागेल हळु हळु सगळे पॅकिंग काढले मॉनिटर, सिपियु काढला पहिल्यांदाच माउस, किबोर्ड लावला तेवढा तर्क वापरता येत होता की कोणत्या स्लॉट मधे काय घालायचे, पॉवर सप्प्लाय दीला आता शेवटी देवाच नाव घेत कॉम्पुटरचे पॉवर बटन दाबले..

बोम्बला कॉम्पुटर काही सुरु व्हायचे नाव घेईना मला काहीच कळत नव्हते शिवाय सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनी माझ्याकडे आणी संगणक म्हणावा अश्या डब्ब्याकडे पहात होते. पण समजत कोणालाच नव्हते वासरात लंगडी गाय शहाणी त्याचा फ़ायदा घेत होतो. आता मात्र मी पुरता घामाघुम झालो म्हटल आज पहिल्याच दीवशी "मोठ्ठे ईंजिनियर", संगणक अभियंता चा पुरता पचका होणार.

तुमच्या कडे ईलेक्ट्रिशियन आहे का हो, मला याचे अर्थिंग चेक करायचे आहे. लगेच कलेक्टर साहेबान्नी आज्ञा सोडली जारे PWD मधुन कोणाला तरी घेउन ये.
तोपर्यंत साहेबानीच या बसा, चहा घ्या वैगेरे करत छान विचार्पुस केली बाकी म्हणाले तुम्हाला वेगळी खोली नाही तुम्ही माझ्याच ऑफ़िस मधे बसत जा माझ्या शेजारीच कॉम्पुटर वर वैगेरे.. आणी तुम्हाला सांगतो मी बरेच महिने त्यांच्याच ऑफ़िस मधे ठिय्या देउन बसलो होतो गाड्या सोबत नळ्याची यात्रा या न्यायाने लोक माझी पण विचारपुस करुन मान देत होते खरच ते दीवस खुप मजेत घालवले.. पुढे थोडे थोडे स्वता: शिकत होतो आणी मग कलेल्क्टर साहेब, मग ईतर भारदस्त साहेबाना शिकवत होतो. एवढच नव्हे तर त्यांच्या घरी त्यांच्या मुला-मुलीन्ना सगळ्याना शिकवत होतो.

असो तितक्यात शिपाई आला आणी म्हणाला साहेब ईलेक्ट्रिशियन नाहीत. चिंतातुर जंतु झालेलो मी ईतका आनंद झाला की कोणी बोलण्या आधी मीच म्हटल ठीक आहे ठीक आहे आपण उद्या आरामात पाहु.

आणी माझी तिथुन सुटका झाली.. हुश्शाSSS

दुसर्या दीवशी कार्यालय उघडण्या आधीच जेंव्हा तिथला सफ़ाई कामगार झाडु लावत होता तेंव्हाच पोचलो आणी सगळ कसब लावुन सिपियु उघडुन काही तरी दाबुन पाहिले कशाला मेमरी, कशाला डिस्क म्हणतात काही माहित नव्हते पण शेवटी एकदाचा संगणक सुरु झाला आणी आमच गंगेत घोड न्हाल म्हणायच. तर असा माझा संगणक अभियंताचा पहिला दीवस मी कधीच विसरु शकणार नाही.


Amruta
Wednesday, October 10, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुके, अजुन जरा detail मधे येउ दे कि....
चायला, सॉलिड आहे ह तुझा अनुभव.... बाकिचे सगळे अनुभव पण मजेदार आहेत.
DJ मला जाम आवडेल एका handsome cop ने पकडुन तिकिट न देता सोडुन दिलेल. सही lucky आहेस ह तु. .... :-)


Amruta
Wednesday, October 10, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिला एकट्याने केलेला विमान प्रवास तो पण १ वर्षाच्या जुई ला घेउन.

किरण आधिच austria ला पोचला होता. मी मागाहुन जुईला घेउन येणार होते. विमानात गर्दी असल्याने माझ्याकडचा stroller अगदी शेवटच्या क्षणी कुठेतरी नेला. म्हंटल ठिक आहे नंतर बघु.
परीसला माझ austria साठीच १ तासात connecting flight होत. बाहेर येताना बाहेर जी airline ची माणस असतात त्यांना विचारल तर त्यांनी मला जिथे जायला सांगितलेला ते चक्क baggage claim होत. झाल connecting flight पकडायच असेल तर आतल्या आत जायची सोय असते. आणि मी इथे बाहेर पडलेले. परत उलट जायला जागाच नव्हती. पुढच terminal कचकवुन लांब होत.वेळ कमी होता. मी इथे तिथे पहिल तर सगळिकडे exit direct बाहेर. एक दोन माणसांना विचारल तर त्यांच्या english ची बोंब. शेवटी एकाने सांगितल की बाहेर जाउन बस पकड म्हणुन. जुईला आणि बरोबरच्या hand luggage ला cart वर टाकल आणि धावत सुटले. बस मधे चढताना driver ला २,३ जणांना परत परत हि बस बरोबर आहे ना विचारल. शेवटी एकदाच्या त्या terminal वर पोचले. पहिल तर security checking ला हि मोठ्ठि रांग. माझ विमान सुटायची वेळ जवळ आलेली. मार्च चा महिना. थंडी होती jacket घातलेल आणी मला मरिमर घाम फ़ुटलेला. तर तिथे सरळ एका रिकाम्या counter वर गेले तिथल्या officer ला सांगितल कि बाबारे माझ flight आहे आत्ताच माझ्या कडे boarding pass पण आहे. मला मदत कर. जुई ला काखोटी ला मारलेली. त्यामुळे त्याने बहुदा अगदी तत्परतेने मदत केली. मला line मधे अगदी सुरवातीला नेल एकदाच security checking झाल आणी मला माझ gate मिळाल..., आत जाणारी मीच शेवटची होते. seat वर बसल्यावर जे हुश्श झाल, हसले, रडु आल अगदी सगळ झाल. बाजुची बाई चमत्कारीक नजरेनी माझ्याकडे पहात होती :-)
शेवटी एकदाची austria ला पोचले. पण अजुन वैताग संपलाच नव्ह्ता. माझ luggage आलच नव्हत. आता ती कटकट. तिथे line बाहेर किरणचा जीव वर खाली होत होता. शेवटि तो पठ्या सरळ exit मधुन आत घुसला त्याला पाहुन अतिशय बर वाटल. मग आम्ही त्या 'हरवलेल्या' stroller बद्दल पण सांगितल. म्हंट्ल सांगायला काय जातय??
तर दुसर्या दिवशी baggage घरपोच आल, तिसर्या दिवशी stroller घरपोच आला :-)


Deepanjali
Wednesday, October 10, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता ,
अजुन तीन चारदा पकडलय handsome COP नी आणि Tkt न देता जाउ दिलं , त्यातल्या दोनदा lights न लवणे हेच कारण होतं !
एकदा तर मला उगीचच वाटलं कि Cop ने मला थांबवलय म्हणून !
झालं काय , बराच वेळ एक cop मागून येत होता पण त्यानी lights लावले नाहीत म्हणून थांबले नाही .
मग एका construction zone मधे खिडकी उघडून त्या अतिशय handsome पोलिसानी काही तरी खूण केली मला .. तर मला वाटलं देशी पोलिसां सारखं " घ्या गाडी बाजुला " असं म्हणतोय !
म्हणून मीच त्याचा पाठलाग करत पार freeway वर शिरले .. शेवटी तो shoulder lane मधे गेल्यावर मी पण थांबले !
तर तो आला आणि मालाच म्हणे काही help हवी आहे का म्हणून !
मी माझं confusion सांगितलं तर म्हणे मी construction zone मधे तुला right off way देत होतो म्हणून hand wave केला !
आणि इतका well mannered होता , त्यानेच माफ़ी मागितली त्याच्या खुणेचा मी वेगळा अर्थ घेतला म्हणून !

असो , सगळे लिहायला Cops चे अनुभव असा BB काढावा लागेल .


Disha013
Wednesday, October 10, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीहीही! इथे तर कायमचाच सौजन्य सप्ताह चालु असतो!

मी माझी पहिलीवहिली driving test मस्तपैकी फेल झाले होते. actually ,सगळं नीट चाललं होतं,पण शेवटीशेवटी घोळ घातला टेन्शन्मध्ये! टेस्ट देत असताना त्या माणसाने मला लेफ़्ट टर्न घ्यायला सांगित्ला. त्याचे शब्द मी ऐकले पण मेंदुपर्यन्त ते गेलेच नाही नि मी गाडी पुढे दामटली. आणि थोडे पुढे जावुन u-turn मारला! बाकी चुक नसतानाही त्याने फेल करुन टाकलं! आणि वर शेरा लिहुन दिला ' not following my instructions!! म्हणुन! :-)


Supriyaj
Wednesday, October 10, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह!! DJ ...............सहीच आहेस ग तु!!!!!!!!!!!!!!!!!

Swapna_nadkarni
Wednesday, October 10, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी Connecticut ला असताना driving test first attempt मध्ये पास झाले पण with a remark "driver meets minimum requirements":-(

Zakki
Wednesday, October 10, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण प्रथम गाडी चालवायचा परवाना घ्यायला गेलो, तो खरे म्हणजे चाकामागे बसण्याचा माझा पहिलाच प्रसंग. इंजिनियर असल्याने क्लच, वगैरे ची माहिती ऐकली, वाचली होति. खरे तर मी फक्त लेखी परिक्षा देऊन L परवाना घ्यायला गेलो होतो. पण कनेक्टिकट मधे तेंव्हा तरी असे काही नव्हते. एकदा आत आलात की लेखी वगैरे सर्व परिक्षा देऊन, परवाना घेऊन मगच निघायचे.

मग काय देवाचे नाव घेऊन चाकामागे बसलो. पट्टा बांधायचा नियम तेंव्हा नव्हता. मागे पहाण्याचा आरसा आहे हे पाहून घेतले, त्यातून नीट दिसत नव्हते, पण नीट म्हणजे काय हे कुठे माहित होते? तशीच गाडी काढली, नि रस्त्यावर लागण्या आधीच मला परीक्षकाने सांगितले, असू दे असू दे. परत फिरव.

मी जाम खूष! एकहि झलकमे मी किती उत्कृष्ट पणे गाडी चालवतो याची खात्री पटलेली दिसते आहे! परत जाताना मी विचारले बॅक अप पार्क करू की पॅरलल? तो म्हणाला नको, नको. मला इथेच सोड. नि तू तिकडे लांब, जिथे फार गाड्या नाहियेत तिथे पार्क करून ये.

बाहेरच माझा मावसभाऊ उभा होता. त्याने विचारले, काय झाले? याने जोरजोरात मुंडी हलवत म्हंटले, कमीत कमी सहा महिने चांगल्या ड्रायव्हिंग स्कूल मधून शिकून आल्याशिवाय याला परत इथे आणू नका!


Zakki
Wednesday, October 10, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या मानाने नागपूरला किती सोपे! पंधरा वीस दिवस स्कूटर चालवल्यानंतर एकदा भावाच्या मित्राने मला पाहिले. तो मोटर वेहिकल डिपार्टमेंट मधे लायसन देण्याचा अधिकारी होता. त्या मित्राने माझ्या भावाला जरा संशयानेच विचारले, की मला लायसन कुठून मिळाले? भाऊ म्हणाला, त्याच्याजवळ कुठले आले लायसन? तो असाच चालवतो. तर मित्र म्हणाला की मग उद्या सकाळी त्याला पाठवून दे, मी देतो लायसन.

मग मी दुसर्‍या दिवशी गेलो. एक फॉर्म भरला. आता मला कधी नागपूरला लायनीत उभे रहाणे माहित नव्हते. मी आपला सरळ पुढे जात असे, तसा गेलो. मग त्या मित्राने माझा फॉर्म घेतला, नि न वाचतात कुठेतरी फायलीत कोंबला. नि एका शिपायाकडे वळून म्हणाला, अरे या सायबांबरोबर त्या बिल्डिंगमागे जा नि त्यांना आठचा आकडा काढता येतो का बघ.

मी स्कूटर हातात धरून निघालो. तो शिपाइ म्हणाला साहेब, काही चहा पाण्याला? त्या काळात आठ आण्यात एक प्लेट भजी नि चहा सहज मिळात असे. म्हणून मी त्याला लगेच आठ आणे काढून दिले. तो कुठेतारी पसार झाला. मी थोडा वेळ वाट पाहिली नि तसाच स्कूटर फिरवून परत गेलो. अधिकार्‍याने म्हंटले, जमले ना? मी मोठ्ठा होकार दिला. मग तो म्हणाला मी आज घरी येतो लायसन घेऊन. तू जा.


Zakki
Wednesday, October 10, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक खुलासा. वरील आठ आणे म्हणजे लाच नव्हे. गरीब अश्या शिपायाला चहासाठी पैसे देणे हे सत्कृत्य आहे. त्याचप्रमाणे भावाच्या मित्राला एकदा बाहेर जेवायला घेऊन जाणे यात काहीच गैर नाही. त्यालाहि लाच म्हणता येणार नाही. नाही म्हंटले तरी भावाने शाळेत कॉलेजात त्याला कॉपी करायला स्वत:चे होमवर्क अनेकदा दिले होते. मित्रा मित्रात असे चालतेच!

तुम्ही जरी अनोळखी अश्या कुणा आयकर विभागाच्या अधिकार्‍याला हजार रु. दिले नि त्याने तुमचे काम करून दिले, तरी ती लाच होत नाही. मैत्री करण्यासाठी आप आपसात लहान सहान रकम उसनी देणे नि ती परत घ्यायला विसरणे असे नेहेमीच होते!


Vishee
Wednesday, October 10, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काहीतरी लिहीणार होते, पण आता झक्कीकाकांनी लिहिलय म्हटल्यावर नेहेमीप्रमाणे त्यावर सांगोपांग चर्चा होणार. (माझं नंतर कधीतरी.)
बाकी आठ आकडा काढण्याचं छान टाकलय.


Amruta
Wednesday, October 10, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण मुंबईत २ wheeler च्या license साठी ८ चा आकडा काढायला सांगितलेला. मी अगदी प्रामाणिक पणे signal देउन u turn घेतला नी त्या officer कडे पाहिल तर तो माझ्याकडे पहातही नव्हता. नुसतच उपचारा पुरता 8 . BTW माझा RTO मधला account officer ओळखिचा होता. नंतर एवढ आरामात मिळालेल licence मी हरवल. म्हणजे आख्खि पर्सच हरवली. गाडीच्या handle ला लावलेली. नेली कुणितरी आता नेली तर नेली निदान माझ license तरी पोस्टाने पाठवायच की नाही हो झक्की??? :-)
तर त्या दिवसा नंतर आज पर्यंत मी without license गाडी चालवते. आता तो officer नवी मुंबैत (हे मुंबईइ का लिहिता येत नाहिये??) बदलुन आल्या शिवाय मी RTO मधे पाय ठेवणार नाहि. :-)


Amruta
Wednesday, October 10, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अहो अजुनही connecticut मधे learning मिळत नाही. सगळ काहि एकत्रच. चिवित्रच सगळ.
BTW मी मात्र माझि US मधली driving test CA मधे पहिल्या फ़टक्यात पास झाले होते बर. वर मला instructor grade च license मिळाल.

आत्त परत CT मधे test देताना नाही म्हंट्ल तरी थोड tension होतच. पण examiner मस्त होता. 'you have good experience. dont worry.. you will be fine' अस म्हणुन काय confidence आणला माझ्यात की मी आरामात पास झाले.


Amruta
Wednesday, October 10, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ सहिच ग.. मला अजुन एकदापण नाहि पकडलय चिकण्या कॉप ने :-(

Deepanjali
Wednesday, October 10, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता ,
संध्याकाळी अंधार पडल्यावर head lights न लावता जा भर रस्त्यावर , येइल लगेच मागे !


Naatyaa
Thursday, October 11, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळी अंधार पडल्यावर head lights न लावता जा भर रस्त्यावर >> आणी गाडी पण ने हो....

Limbutimbu
Thursday, October 11, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, काय अनुभव हेत एकेकाचे!
अमृता, तुझा विमानप्रवासाचा अनुभव वाचताना सुद्धा माझच ब्लडप्रेशर वर खाली होत होत!
(बायदिवे, किरणची काय खबरबात? बरेच दिवसात दिस्ला नाही कुठे)
आपल्याला नाय बाबा असले प्रवास जमणार!
झक्कीन्च काय? सगलच भन्नाटच अस्त! :-)


Rani_2007
Thursday, October 11, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पहिला अपघात...

झालं काय की सिग्नल असल्याने मी थांबले होते आणि कधी एकदा सिग्नल हिरवा होतो याची वाट पहात होते. पण जोरात मी स्टेअरींग व्हीलवर आदळले, दोन सेकंद काय झाले ते कळलेच नाही. नंतर लक्षात आले कि कोणितरी जोरात मागून ठोकले होते, नशीब मी accelerator वरचा पाय हलवला नाही (नाहीतर पुढच्यावर मी आदळले असते).

माझा एवढा संताप झाला कि बस्स..मनात म्हटलं कोण xxx आहे ज्याला थांबलेली कार दिसली नाही. धक्का एवढा जोराचा होता कि माझी पाठ चांगलीच दुखायला लागली होती. मी ताबडतोब ९११ call केला. नेमकी सकाळची वेळ असल्याने रोडवरची रहदारी भरपूर होती, त्यामुळे operator ने सांगितले कि आहे तिथेच थांबा आणि cop १५ मिनिटात येईल.

तर मग मी खाली उतरले कारच्या जखमा बघायला, बंपर चांगलेच चेपले होते. तितक्यात दुसर्‍या गाडीचाही चालक खाली उतरला. बघतेतर ४५-५० वयाची देशी बाई ... बघतेतर बाईसाहेब जोर्-जोरात रडत होत्या. मला कळेनाकी हि बाई एवढि का रडतेय? शेवटि मी तिला विचरले कि ' what happened? Are you a okay?' तर बाई म्हणते कि 'हि माझी पहिलीच वेळ आहे' (आणखिच जोर्-जोरात रडायला लागली). मला वाटले कि हिच्याकडे insurance नाहि कि काय? तसे तिला विचारले तर म्हणाली कि आहे insurance . मग मीच तिला समजावले की ' please रडू नका. मी ९११ ला inform केलय cop येतील थोड्याच वेळात आणि पुढच्या formalities पूर्ण करतील.' आणि 'नाम लिया और शैतान हजीर' तसे cop लगेच हजर.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators