|
Dakshina
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:04 am: |
| 
|
"अंकूर" निर्माते - मोहन बिजलानी आणि फ़्रेनी वैरावा दिग्दर्शक - श्याम बेनेगल संगित - वनराज भाटिया कॉलेजमधला प्रसंग. रिझल्ट पहाण्यासाठी उत्सूक असलेल्या विद्यार्थ्यांची झूंबड आणि त्यातून खूश होऊन बाहेर पडणारा चित्रपटाचा हिरो 'बाबू'.... कारण फ़र्स्ट क्लास मधे पास झालेला. घरी पोहोचतो, तेव्हा त्याचे वडील एका बाईशी बोलत दरवाज्यातच थांबलेले असतात. बाबूला त्या बाईला पाहून चिड येते. ती बाई बाबूशी बोलण्याचा प्रयत्न करते पण बाबू तिच्याकडे दुर्लक्ष करून आतमध्ये निघून जातो. बाबू आईकडे तिच्याविषयी विचारणा करतो तेव्हा त्याला कळतं की ती म्हणजे आपल्या वडीलांनी ठेवलेली 'बाई' आहे, आणि 'प्रताप' हा तिचा मुलगा आहे. बाबू खूश होऊन आईला रीझल्ट सांगतो, आणि पुढे शिकण्याची इच्छा प्रगट करतो, पण वडील नकार देऊन त्याचे लग्न ठरवल्याचं सांगतात. आणखी हे ही सांगतात की, लग्नानंतर त्याला गावी जाऊन शेती सांभाळावी लागेल. पुढे बाबूचं लग्न सरूशी होतं. सरू योग्य वयात नसल्याने माहेरी परत जाते. बाबू गावी येतो, शेतातल्या घराची देखभाल लक्ष्मी आणि तिचा पती करत असतात. लक्ष्मी जातीने कुंभार असते, तिचा पती मुका बहिरा असतो. दोघेही अत्यंत हालाखीत दिवस ढकलत असतात. लक्ष्मी आणि तिचा पती दोघं या शेतातल्या घराच्या जवळच्या झोपडीत रहात असतात. लक्ष्मीच्या पतीची पहीली नोकरी सुटलेली असते, त्यामुळे ती बाबूकडे त्याला नोकरी देण्यासाठी आग्रह धरते, बाबू ती उचलून धरतो आणि लक्ष्मीच्या पतीला बैलगाडी हाकण्याचे काम देतो. लक्ष्मी कुंभार असते, त्यामूळे ती फ़क्त घरकाम करत असते, बाबू तिला त्याच्यासाठी स्वयंअपाक, चहापाणी करण्याचा हुकूम देतो. ती खालच्या जातीतली असली तरीही तो तिच्या हातचं खातपित असतो. गावात बस्तान बसल्यावर, बाबू हळूहळू 'प्रताप' च्या शेताचे पाणी बंद करतो, ताडीच्या झाडांचा हिशेब ठेवतो, शेताची नीट देखभाल, इतर खर्चं यावर नेमकं लक्ष ठेवायला सुरूवात करतो. लक्ष्मीचा पती अत्यंत साधा, सरळ, भोळा असतो, पण त्याला 'शिन्दी' (ताडी) पिण्याची वाईट सवय असते. एके दिवशी गावातला छोटा मुलगा, लक्ष्मीच्या पतीला बाबूच्या शेतातली ताडी चोरताना पाहतो आणि येऊन सांगतो, बाबूला अनेकानेक विनंत्या करूनही, बाबू लक्ष्मीचे काहीही ऐकत नाही आणि तिच्या पतीचे केशवपन करून, त्याची गाढवावरून धिंड काढतो. दुसर्या दिवशी सकाळी लक्ष्मीला आपला पती नाहीसा झाल्याचं लक्षात येतं. पण ती त्याबद्दल कुठेच काहीच बोलत नाही. बाबू तिला खूप वेळेला विचारतो. पण ती त्याला काही सांगत नाही. हळूहळू बाबूच्या लक्षात येतं की लक्ष्मीचा पती गवातून नाहीसा झालेला आहे. बाबूला लक्ष्मीविषयी आकर्षण वाटू लागते. दरम्यान लक्ष्मी नित्यनियमाने बाबूच्या घरची सर्वं कामं करत असते. एके दिवशी लक्ष्मी नदीवर केस धूत असताना बाबू तिला पाहतो... आणि त्याचे तिच्याबद्दलचे आकर्षण वाढते. अप्रत्यक्षपणे तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो. लक्ष्मी सुद्धा हालाखिच्या परिस्थितीमूळे म्हणा, किंवा बाबूविषयी मनात निर्माण झालेल्या प्रेमापोटी... स्वतःला त्याला समर्पित करते. अशा प्रकारे लक्ष्मी आणि बाबूचे संबंध सुरू असतानाच गावात एक घटना घडते, एक स्त्री आपल्या नवर्याला सोडून दुसर्या पुरूषाबरोबर दुसर्या गावात जाऊन रहात असते, तिथून तिला तिचा नवरा आणि दिर ओढून गावात आणून पंचांपुढे उभी करतात. पंच निर्णय देतात की तिला तिच्या नवर्याकडे परत जावं लागेल, पण ती नकार देते कारण तिचा नवरा तिला मूल देण्यास असमर्थ असतो, आणि तिला मूल हवं असतं. पण पंच अखेरचा निर्णय देतात की, तिला नवर्याकडेच जावं लागेल, नवरा नाही तर दिर तिची 'जबाबदारी' घेतील, आणि तिची इच्छा ही पुर्णं करतील.लक्ष्मी या पंच सभेला उपस्थित असते. पंचांचा निर्णय ऐकून थोडी बेचैन होते. मग बाबूचे वडील येऊन बाबूला सुनावतात की गावातले लोक त्यांच्या नावाने छि थू करतायत. त्याने लक्ष्मीच्या हातचे खाऊ नये, आणि तिला घरातही ठेऊ नये, याबद्दल चिथावतात, पण बाबू त्यांचे काही ऐकत नाहे. दोनच दिवसात बाबूची बायको, सरू बाबूकडे शेतातल्या घरात रहायला येते.पहील्या दिवसापासूनच तिला लक्ष्मीचा घरातला वावर आवडत नाही, आणि ती बाबूला तिला काढून टाकण्याविषयी सुचवते. दरम्यानच एक दिवस, लक्ष्मीला उलट्या होतात, सरू बाबूला त्याविषयी सांगते तर बाबू घाबरतो. आणि लक्ष्मीला नदीवर गाठून मूल पाडून टाकण्याविषयी सांगतो. पण ती ऐकत नाही. बाबू मूलाची जबाबदारी घेण्याचे नाकारतो, लक्ष्मी, आपण मूल सांभाळण्यास समर्थं असल्याचं ठणकावून सांगते. सरूला, लक्ष्मीला कामवरून कमी करण्याची आयतीच संधी मिळते. लक्ष्मी परत जाऊन आपल्या झोपडीत राहू लागते. कामधंदा नसल्याने, आणि पोटात मूल असल्याने भुकेने व्याकूळ झालेली लक्ष्मी एके दिवशी परत बाबूच्या दरवाज्यात काम मागण्यासाठी येते. सरूला दया येते, आणि ती लक्ष्मीसाठी खयाला आणायला घरात जाते, परिस्थितीमूळे अत्यंत वाईट वेळ आल्या कारणाने, लक्ष्मी, पोत्यातले थोडे तांदूळ चोरण्याचा प्रयत्न करते. तितक्यात सरू तिथे येते, आणि बबूच्या निदर्शनास तिची चोरी आणून देते. बाबू आणि सरू दोघेही तिचा अत्यंत वाईट शब्दात पाणऊतारा करतात आणि तिला हाकलून देतात. लक्ष्मी दुःखी कष्टी होऊन झोपडीत परतते, भुकेने आधीच व्याकूळ असल्याने, तिला झोप लागून जाते, उठून पाहते, तेव्हा लक्ष्मीचा पती तिला परत आलेला आढळतो. लक्ष्मी गरोदर असल्याचे त्याच्या लक्षात येते, आणि तो खूश होतो. नजरेने आणि खाणाखूणांनी तिला सांगतो, की आता तो शिन्दी पिणार नाही आणि बाबूकडे परत जाऊन पाय धरून त्याची नोकरी मागेल, फ़क्त येणार्या लहानग्यासाठी. बाबू लक्ष्मीच्या पतीच्या या खाणाखूणा लांबून पहातो आणि त्याला असं वाटतं की तो आपल्याला मारायला येतोय. म्हणून तो हातातला पतंग तिथेच सोडून घराकडे पळ काढतो, आणि लक्ष्मीचा पती दरवाज्यात पोचल्यावर काठी आणि लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण करतो. लक्ष्मी त्याला वाचवायला धावते आणि इतके दिवस मूग गिळून अपमान आणि बाबूचे दुर्लक्ष सहन करणारी ती, नवर्याला मारताना पाहून चवताळून उठते आणि बाबूला शिव्याशाप देते. व नवर्याला घेऊन झोपडीत परत जाते. शेवटच्या प्रसंगात बाबू ज्या छोट्या मूलाबरोबर पतंग उडवत असतो, तो मुलगा, ह्या सगळ्या प्रसंगाननंतर बाबूच्या घराची काच फोडतो आणि पळून जातो... चित्रपट इथे संपतो.
|
Aashu29
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:33 am: |
| 
|
दक्षिणा, मी जेव्हा ह चित्रपट पहिल्यांदा पाहिला ना, तेंव्हा जवळ जवळ १ तास सुन्न बसले होते, काय तो अभिनय, ओम पुरिचा, बाबुची व्यक्तिरेखा कोणी केलि आहे?
|
Dakshina
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:33 am: |
| 
|
चित्रपटात मला स्वतःला काही गोष्टी अत्यंत भावल्या. अगदी पहील्या प्रसंगापासून...... म्हणजे बाबूची हतबल आई, जिने काही न बोलता प्रतापच्या आईचा स्वतःच्या आणि आपल्या नवर्याच्या आयुष्यात स्विकार केलेला असतो. बाबूचे तरूण रक्तं तरीही वडीलांच्या शब्दाबाहेर न जाण्याची टाप, त्यातून होणारी घूसमट. खूप नसलं तरी गावातली सधनता खूप छान साकरली आहे या चित्रपटात. बाबूचे कार ने येणेजाणे, गॉगल लावणे, शेतातल्या घरात ग्रामोफ़ोन घेऊन जाणे, घड्याळ घालणे, हजामाकडून दाढी, मसाज करून घेणे... थोडक्यात सरकारी थाट.... आणि चित्रपटात पण लक्ष्मी (शबाना आजमी) त्याला सरकार म्हणूनच हाक मारत असते. बाबूचे अर्धवट शिक्षण आणि त्याच्या आधारावर त्याने घेतलेले निर्णय सगळं अगदी वास्तविक. शबाना आजमीची गरीब परिश्थिती, तिचा त्या साडीतला वावर, अनवाणी चालणे, छोटासा पदर, नदीवरून पाणी आणणे... आणि बिलकूल Glamorous न दिसणे ही खास वैशिष्ट्यं. तर झोपडीतल चुलीवरचा स्वयपाक, आणि सहज वावर. दारूडा असला तरीही त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी, बाबूच्या अप्रत्यक्ष मागणीला मूकपणे प्रतिसाद देणारी, आणि वेळप्रसंगी बाबूला स्वतःच्या सामर्थ्याविषयी बेधडकपणे सांगणारी....शबाना....माझ्यामते इथे दुसरी कोणतीही नायिका फ़िट बसली नसती. शबानाचा अभियन निव्वळ अप्रतिम. गावचे छायाचित्रण तर अतिशय छान. शेत, झोपडी, गावातले रस्ते, देऊळ, विहीर, गावकरी.... सर्वंच जिथल्या तिथे, कुठेही काही चूक किंवा जास्तीचं नाही. खूप दिवसात मनाला भावणारा हा पहीलांच चित्रपट.
|
Dakshina
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:38 am: |
| 
|
आशू, तुझी काहीतरी गफ़लत होतेय, अंकूर मध्ये ओमपुरी नाहीये. बाबूची व्यक्तीरेखा बहूतेक साधू मेहेर ने साकारली आहे. अनंत नाग पण आहे, पण लक्ष्मीचा पती झालेला अनंत नाग की बाबू झालेला ते मात्रं मला कळू शकलं नाही.
|
Aashu29
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:54 am: |
| 
|
७-८ वीत असताना पाहिला होता ग हा चित्रपट!! पण मला ओम पुरीच का आठवतोय? तो अन्कुश असावा बहुधा!!
|
Ajjuka
| |
| Wednesday, October 10, 2007 - 11:13 am: |
| 
|
बाबू म्हणजे अनंत नाग. साधू मेहेर कोण ते लक्षात नाही.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, October 10, 2007 - 11:36 am: |
| 
|
साधू मेहेर शबाना आज़मीचा नवरा झाला होता.
|
Supriyaj
| |
| Thursday, October 11, 2007 - 12:16 am: |
| 
|
and if i m not wrong.. priya tendulkar was babu's i mean anant nag's wife in the movie.
|
Ajjuka
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:17 am: |
| 
|
हो तीच होती. http://www.imdb.com/title/tt0071145/
|
अंकूर हा शबानाचा बहुतेक पहिला चित्रपट होता. आशु, ओम पुरी अंकुश मधे पण नाहिये. त्यात नाना पाटेकर आहे. नाना पाटेकरचा दिक्षा नावाचा चित्रपट देखील फार सुंदर आहे.
|
Zakki
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:17 pm: |
| 
|
अमोल पालेकर नावाच्या एका नटाचा एक सिनेमा होता, त्यात तो अर्धवट वाढलेले गर्भ काळ्या बाजारात वैद्यकीय संशोधनासाठी विकत असतो. त्या सिनेमाचे नाव पण अंकूर असेच होते असे वाटते. कुणाला (किंवा त्यांच्या आईवडिलांना) माहित आहे का?
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 2:56 am: |
| 
|
तो बहुतेक तरी 'आक्रित' होता. अमोलदांनीच दिग्दर्शन केलं होतं. आणि ते स्वतः व त्यांची तेव्हाची पत्नी चित्रा पालेकर हे दोघे lead role मधेही होते.
|
Supriyaj
| |
| Friday, October 12, 2007 - 5:55 am: |
| 
|
आक्रित मधे नरबळी हा विषय आहे. त्यात अमोल आणि चित्रा दोघेही आहेत. सत्यघटनेवर आधारित आहे हा चित्रपट अस मी ऐकलं होतं. नुकताच पाहिला.
|
Dineshvs
| |
| Friday, October 12, 2007 - 7:00 am: |
| 
|
झक्कि, अज्जुका, सुप्रिया तुम्हाला कदाचित मानवत खुन खटला आठवत असेल, त्याचा संदर्भ या सिनेमाला होता. अमोल पालेकरची नेहेमीपेक्षा वेगळीच भुमिका होती. राधिकेचा रंग पाहुनि, कृष्ण दंग जाहला, हे भजन त्या सिनेमातले.
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 9:22 am: |
| 
|
मानवत खून खटल्यावरचा सिनेमा म्हणजे सर्वसाक्षी. त्यात 'कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर!' हे पण गाणे होते. त्यात पालेकर नव्हते. त्यांच्यासारखा दिसणारा एक ठोकळा मात्र होता.
|
Ajjuka
| |
| Friday, October 12, 2007 - 9:26 am: |
| 
|
आणि मानवत खून खटला लहान मुलांचे बळी देण्याबाबत होता. पालेकरांची IMDB entry ढुंढाळली. पण आक्रित आणि शांतता हे दोन सिनेमे सोडून कुठलीही फिल्म त्यांच्या नावावर नाही अभिनेता म्हणून.
|
Ankyno1
| |
| Wednesday, December 19, 2007 - 5:18 am: |
| 
|
एक शुद्धलेखनाची चूक तशी शुःल्लक पण निदान मला तरी सहन होत नाही नाव 'अंकुर' असतं 'अंकूर' नाही ही चूक मला सहन न होण्याचं कारण my name is अंकुर
|
Vinaydesai
| |
| Wednesday, December 19, 2007 - 5:12 pm: |
| 
|
फक्त तो शब्द शुःल्लक नसून क्षुल्लक असावा....
|
Ankyno1
| |
| Thursday, December 20, 2007 - 4:41 am: |
| 
|
देवनागरी टायपिन्ग चे अज्ञान.... 'क्ष' काढता येत नव्हता.... ;)
|
Dakshina
| |
| Monday, January 07, 2008 - 5:41 am: |
| 
|
अंकुर, माफ़ करा... या पुढे लक्षात ठेवीन.
|
Ankyno1
| |
| Monday, January 07, 2008 - 7:08 am: |
| 
|
चल कर दिय तुझे माफ.... तेरा मन है साफ...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|