|
Mrinmayee
| |
| Friday, October 05, 2007 - 2:17 pm: |
| 
|
माणसा, तुला नेमकं 'पहिलं' काय ल्याहायचय म्हणुन हा BB उघडलास? किस वगरे ठिक आहे हो. इथल्या माऊल्यांना 'माझ्या पहिल्याच्या वेळी ना..' असं काही सांगण्याची दुरबुध्दी होऊ नये म्हणजे मिळवली. (मी पण ती सुरसुरी टाळतेय )
|
Zakki
| |
| Friday, October 05, 2007 - 4:05 pm: |
| 
|
कलप लावण्याचा प्रसंग! आता कलप लावणे बंद केल्यामुळे ते काही आठवत नाही. त्यात आठवण्याजोगे काहीच नव्हते. रॉबिनहूडशी 'प्रथम' केंव्हा झकाझक्की झाली आठवत नाही. ह. ह. ने माझ्याशी कधी खाष्टपणा केल्याचे आठवत नाही. ति(तो) फार हुषार, कोटिबाज, वाक्चातुर्यवान असावी(वा) असे मला वाटले. पण पुढे भारतात गेल्यावर कारणे सांगून माझी भेट घेण्याचे टाळल्यावर मी पण नाद सोडला! माझे पहिले GTG खरे तर पुण्यात नळस्टॉप जवळ झाले. तिथे वाकड्या नुसते तोंड दाखवायला आला होता. पण इतर लोक भेटले. मस्त मजा आली! डोसा इडली इ. व नंतर चहा कॉफी, खूप गप्पा असा प्रोग्रॅम झाला! मिंग्रजीचा बा. फ. बंद प(पा)डण्याचे श्रेय बरेचसे मला मिळावे.
|
Amruta
| |
| Friday, October 05, 2007 - 6:47 pm: |
| 
|
वा, चांगला BB काढलायस बर माणसा. जुन्या मायबोलीची आठवण काढुन दिल्या बद्दल धन्यवाद. मजा आली बघायला. तर मी काय बर पहिल लिहु? १९९९ च्या मला वाट्ट april,march मधे मी पहिल्यांदा मायबोली पाहिली. तेव्हा कुठेतरी my city वर मी message टाकला होता. तेव्हा झालेले मित्र,मैत्रीणी अगदी अजुनही भेटत असतात. माझाही cycle चा अनुभव अगदी सेम टु सेम dakshina सारखा आहे. ३,४ वेळा try केलय cycle चालवायला पण नाही जमल. एकदा तर शिकता शिकता माझ्या मैत्रीणीने मला सोडुन दिल आणी style मधे चालवता चालवता मी चक्क एका बाईच्या २ पायांमधे पुढच चाक घुसवलय आणी ढोपर फोडुन घेतलय (माझ ). त्या नंतर माझा सगळा उत्साह गेला. आता नंतर तर मी scooty, car शिकले पण cycle अजुनही comfidently नाही. हो पण scooter, car शिकवण्याच संपुर्ण श्रेय माझ्या नवर्याला जात. cycle शिकायच्या वेळि तो असता तर मी cycle पण नक्कि शिकले असते.
|
Arch
| |
| Saturday, October 06, 2007 - 3:51 am: |
| 
|
नवर्याला विणलेला पहिला स्वेटर. माझा नवरा चांगला सहा फ़ूट दोन इंच आहे. मी त्याच्यासाठी जेंव्हा पहिला स्वेटर विणला ( उंची सांगायच कारण मला केवढा मोठा स्वेटर विणायला लागला असेल ते कळाव म्हणून.) तेंव्हा छान आहे छान आहे अस म्हणाला पण घालायच काही नाव काढेना. शेवटी मी म्हटल आता salvation army लाच देऊन टाकते. तर म्हणे मग त्याच्याबरोबर दहा dollars ची नोट ठेव. जो कोणी घालेल he atleast deserves that . जन्मात त्याच्यासाठी कधी स्वेटर विणेन का? अर्थात त्यावर तो खूष आहे. थोडेसे खांदे उतरले होते. पण माझ्यामते घरात घालायला काही हरकत नव्हती आणि नाहितरी थोडे ढगळ स्वेटर घालतात की.
|
Aashu29
| |
| Saturday, October 06, 2007 - 8:48 pm: |
| 
|
इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षाला presentation सक्तिचं होतं, मी मस्त तयारी केली. आणि स्टेजवर म्हणजे नुसते वर्गासमोर जिथे सर उभे राहतात तिथे जाउन सगळे स्पीच दिले, माझे पहिले presentation काहीही चुकले नाहि, पण पुर्ण वेळ पाय जोरात थरथरत होते, ते कंट्रोल नाहि करु शकले. सर्व झाल्यावर सर म्हणाले, मस्त होता ब्रेकडान्स. कसले ओशाळले मी!!
|
Arch
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:34 pm: |
| 
|
आशुने लिहिलेलं सगळं चौकोन चौकोन दिसतय. कोणचा font आहे तो?
|
Bsk
| |
| Sunday, October 07, 2007 - 5:40 am: |
| 
|
माणुस, first time 'movements'??? moments म्हणायचय का तुला! बाकी, हा बीबी मस्तच! मला पण बरेच पहीले प्रसंग आठवले.. लिहीन नंतर!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|