Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 18, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » हिरवेहिरवेगार कोंकण » Archive through October 18, 2006 « Previous Next »

Prasadp77
Wednesday, December 21, 2005 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mandali,

one request. How about developing wiki travel on Konkan?

http://wikitravel.org/en/Konkan

Whoever is 'expert' (I mean EXPERT) please start off with basic architecture and whoever knows specific issues, go on updating!!

Champak
Wednesday, December 21, 2005 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Birla Mandir... Alibag - MuruD road!

Saee
Wednesday, February 08, 2006 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझंही या bb कडे अजुन लक्ष गेलं नव्हतं! वरती दिलेली ठिकाणे तर महत्वाची आहेतच, पण तिथे नेहमी पर्यटक असतातच. पण काही ठिकाणे अशी आहेत जी या वरच्या ठिकणांपेक्षा रमणीय आहेत आणि मुख्य म्हणजे शांत आहेत. ती फारशी कोणाला माहीत नाहीत त्यामुळे गर्दी नसते. उदा. किनारेच हवे असतील तर पावसजवळचं गणेशगुळे, जयगड - गणपतीपुळ्याच्या मधलं नेवरे आणि सनखोल, किरणपाणी - सिन्धुदुर्ग जिल्ह्याचे गोव्याकडचे टोक, वेंगुर्ल्याजवळचं सागरेश्वर, आंजर्ल्याचा किनारा, वेळणेश्वरचा किनारा, जयगडाचं कर्‍हाटेश्वराचं मंदिर आणि तिथला किनारा, अशी कित्येक ठिकाणे आहेत. आणि नुसती कोकणातली गावं किंवा मंदिरे बघायची असतील तर ही पहा... मालगुंड - कोकण मराठी साहित्य परिषदेनं उभारलेलं केशवसुतांचं अप्रतिम स्मारक आहे तिथे आणि गावही अगदी टुमदार आहे, गणपतीपुळ्यापासुन फक्त ३ की.मी. अंतर आहे हे, पण खुप कमीजण जातात ते बघायला. निवळी - गणपतीपुळे रस्त्यावरच कोळीसरे हे गाव आहे, शांत आणि सुंदर मंदिर आहे तिथे. राजापुरचं धूतपापेश्वराचं देऊळही असंच शांत आणि पहाण्यासारखं आहे. गगनबावड्याखालचं वैभववाडी हेही छोटंसं असंच छान गाव. ही तळकोकणातली आणि थोडी रत्नागिरी जिल्ह्यातली काही ठिकाणं सांगितली पण सार्‍या कोकणातच असं कितीतरी आहे. आयुष्यभर बघत बसलं तरी संपणार नाही आणि तरीही मुळीच कंटाळा येणार नाही.

आणखीही कोणी लिहीणार असेल तर त्यांच्याबरोबर मला आणखी लिहायला आवडेल.


Moodi
Thursday, May 04, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक मस्त लिंक. मुंबई अन पुणेकरानी अनुभवायला हरकत नाही या उन्हाळ्यात.

http://www.loksatta.com/daily/20060504/viva03.htm .

Mrdmahesh
Tuesday, May 16, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या वर्षी मी दिवेआगरला गेलो होतो...मस्त किनारा आहे... रात्री समुद्रकिनारी camp fire सारखे करून त्यात बटाटे अन् मासे भाजून खाल्ले...किनार्‍यावरून जे आकाश दर्शन झाले ते आयुष्यात पहिल्यांदाच झाले होते... अगदि satellite पण दिसत होते... (ते satellite आहेत हे २ गोष्टींवरून ओळखले १. ते खूप उंचावरून वेगाने उडत होते. २. ते विमानाप्रमाणे लुकलुकत नव्हते. आमच्याबरोबर आलेल्या खगोलप्रेमींनी याला दुजोरा दिला.)...तिथला गणपती सुंदरच...पुढे भरडखोल ला जाताना लागणारा किनारा सुद्धा अतिशय सुंदर आहे... दिवेआगर uncommercialized आहे. उगीचच महागडे रिसॉर्ट्स / हॉटेल्स नाहीत की टूरिस्ट कंपन्यांचा गोंधळ नाही... खूपच शांत गाव आहे...
आणि तेव्हाच मी कोकणच्या प्रेमात पडलो तो कायमचा...


Gondhali
Tuesday, May 16, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Me pan gelya mahinyat Dive agar la jaun alo.. mast parisar ahe.. Beach pan mast ahe ani shaant ahe. Some contact numbers for stay and food--
Suhas Bapat (02147) 224377
Uday Bapat (02147) 224235
Kale (020) 27452232 / 51400 / 9371011392 [ Here I stayed - Rooms with double bed, fan, battery backup & attached toilet.. But they do not have any facility for lunch / dinner.. 1 room 500 Rs per night ]

For Veg. Lunch / Dinner - Mr. Suhas Bapat's home [Need to book in advance] - Khupach mast jevan asate. Advance madhye Pithale-bhakari, Ukadiche Modak sangaila lagtat.



Gajanandesai
Wednesday, May 17, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, दिवेआगाराबद्दल आणखी माहिती म्हणजे त्याचं स्थान, येण्याजाण्यासाठी सोयीचे मार्ग, मुक्कामाची व्यवस्था वगैरे पण लिहिलंस तर फार बरे होईल.

Gondhali
Friday, May 19, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन तुम्ही कोठुन जानार दिवेआगर ला? पुणे का मुम्बई

पुन्याहुन जाणार असाल तर मार्ग असा आहे:
पौड्-ताम्हनि घाट असे येऊन माणगाव ला या.. एथे तुम्ही मुम्बई-ग़ोवा हायवे ला जोइन होता.. तिथुन म्हसळा गाव च्या दिशेने गेल्यावर दिवेआगर च्या पाट्या आहेत
मी कारने ४ तासात पोचलो

मुम्बई हुन जाणार असाल तर मार्ग असा आहे:

मुम्बई-ग़ोवा हायवे वरुन माणगाव ला या.. तिथुन म्हसळा गाव च्या दिशेने गेल्यावर दिवेआगर च्या पाट्या आहेत

राहणे आणि जेवण्याच्या सोयी बद्दल हे बघा-
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&;post=798064#POST798064
>

Gajanandesai
Friday, May 19, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोंधळी, माहितीबद्दल अनेक धन्यवाद. मी मुंबईत आहे.

Gondhali
Friday, May 19, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवेआगर ला गेलात तर सुहास बापट यान्च्याकडे जेवल्याशिवाय येऊ नका :-).. फारच मस्त जेवण असते


Gajanandesai
Saturday, May 20, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी नक्की लक्षात ठेवीन. :-)

Phdixit
Sunday, May 21, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दापोली, सुवर्ण दुर्ग सभोवतालची भटकंती च्या द्रुष्टीने माहिती हवी आहे.

Moodi
Sunday, May 21, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए फदी इथे बघ रे.

http://ratnagiridarshan.esmartweb.com/dapoli.htm .


इथे पण बघ रे, त्या उंदेरीवर नको जाऊस, पकडतील तुला.

http://bhatkanti.blogspot.com/

अन दापोलीला जाऊन आलास की मग नीट अनुभव लिहुन फोटु पण टाक.


Mrdmahesh
Monday, May 22, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवे आगर बद्दल एकच सांगवेसे वाटते ते म्हणजे... तिथला किनारा वाटतो तसा सुरक्षित नाही... काही झाले तर तात्काळ मदत मिळणे अवघड वाटते... दिवेआगर पुढे भरडखोल गावाच्या थोडे अलिकडे रस्त्याला लागूनच किनारा आहे. किनार्‍यावर खडक आहेत... तिथे जाण्याचा मोह होतो... पण जाऊ नये... या किनार्‍यावर खूपच विंचू आहेत अशी माहिती मिळाली... भरडखोल गावापलिकडे जो किनारा आहे तो ठीक...
कुठल्याही किनार्‍यावर रात्री जाणे टाळावे... कारण परत.. विंचू... मात्र किनार्‍यावरून रात्री आकाशातले जे विहंगम दृष्य दिसते ते सुंदरच


Dineshvs
Tuesday, May 23, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा हरिहरेश्वरचा प्रदिक्षणेचा मार्ग, गणपतिपुळे ईथले किनारे पण सुरक्षित नाहीत. कुठल्याहि किनार्‍यावर स्थानिक लोकांच्या सुचना लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते.
आपले विमान जर वर ऊडत असेल, तर शहाणपणा आवरणेच चांगले.


Phdixit
Thursday, May 25, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो तुमच्या सुचना नक्कीच विचार करण्या सारख्याच आहेत,
अत भर पावसातच जायचे तर नक्कीच जास्त खबरदारी भ्यावी लागणार आहे. मागच्या वर्षीचा अनुभव पाठिशी आहेच पण ह्या अश्या पावसाळ्याचा अनुभव आपण केव्हा घेणार.

कदाचीत सुवर्णदुर्गावर जाता येणार नाही आणी समुद्रावरही फारसे खेळता येणार नाही कारण ह्या दिवसात समुद्र तुफान खवळलेला असतो. तरी मंडणगड आणी बाणकोट ला जाता येउ शकेल.

मुडे लिंक बद्दल धन्यवाद


Ruchira
Sunday, September 17, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi attach join jhale ahe.......

mala pan firayla khup avadta..



Ruchira
Sunday, September 17, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar mandali kasa challay???

Bhramar_vihar
Wednesday, September 27, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला फिरायला आवडत, मग मायबोलीच्या ईतर विभागानाही भेट दे की :-)

Paragb
Wednesday, October 18, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maza Ratnagiri Jilhyat phirnyacha pahnycha plan aahe, Thanyahun, kuni velapatrak suchu shakel kaay ? 4 divasancha plan aahe..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators