Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 08, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through September 08, 2007 « Previous Next »

Mahaguru
Monday, September 03, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्मा असले म्हणुन काय झाले
रा.गो.व. म्हणजे एकदम १००% गुल्टी, खरा गुल्टी पण असला गुल्टी न्हाय

Farend
Monday, September 03, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी त्याला उत्तरेकडचा समजत होतो.

रुनी सलाम्-ए-इश्क़ ज्यावरून बहुधा काढलाय तो ' Love, Actually ' त्यापेक्षा बराच चांगला आहे, निदान १-२ "ट्रॅक" तरी नक्कीच बघण्यासारखे आहेत.


Runi
Monday, September 03, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु मला वाटले की वर्मा आडनाव मल्लु लोकात असते ना म्हणुन मला राम गोपाल वर्मा गुल्टि न वाटता मल्लु वाटला. प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा मल्याळम होते ना म्हणुन माझा असा घोळ झाला.
फारेन्ड मी Love actually बघितला नाहीए, सलाम्-ए-इश्क पेक्शा चांगला आहे तर बघायला हरकत नाही.


Jadhavad
Tuesday, September 04, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्मा साहेब, जन्म व शिक्षण फ़्रॉम विजयवाडा. पहीले चलचित्र ९० मध्ये नागार्जुन बरोबर शिवा. ते पण तेलेगुच. रंगीला हा पहीला बॉलीवुडपट. पण तो बराच नंतर.

Farend
Tuesday, September 04, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडून आला होय? मग 'सत्या' नंतर चारमिनार जवळून ओस्मानिया ची डिग्री विकत घेऊन थेट सिलिकॉन व्हॅलीत आला असता तरी चालले असते :-) (फिल्म इंडस्ट्री च्या दृष्टीने, व्हॅलीच्या नव्हे)

मी 'कॅश' पाहिला, अजूनही काय चालले होते ते समजलेले नाही. कोणी पाहिला का? आणि त्यात तो संता बंता चा जोक आहे त्यातील शेवटचे वाक्य काय होते? किती वेळा ऐकूनही कळले नाही.


Mrinmayee
Tuesday, September 04, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mr. Bean's holiday चिरंजीवांसाठी बघावा लागला! आता खरं रोवेन अटकिन्सननी रिटायर व्हायला हरकत नाही असं वाटायला लागलं.

Amruta
Tuesday, September 04, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच partner पाहीला. आणी पहायच्या आधी माहितच नव्हत कि partner hitch ची अगदि copy आहे.
copy म्हणजे किती copy असावी. काहि bollywood touch सोडुन बाकी सगळ same ?


Mbhure
Wednesday, September 05, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीकएण्डला पाहिलेले चित्रपटः

Blue Umbrella: दिग्दर्शक विशाल भरद्वजचा हा चित्रपट Ruskin Bond ह्यांच्या कथेवर आधारीत आहे. खरा फॅमिली सिनेमा आहे. जरा Slow आहे. मला त्याचा मकडी जास्त आवडला होता. ह्यात परत पंकज कपुरने बाजी मारली आहे.

चेन कुली की मेन कुलीः ही इंग्रजी चित्रपट "Like Mike" ची कॉपी आहे. पण मुलांसाठी एकदा बघावा. राहुल बोसने नेहमीप्रमाणे सहज काम केले आहे.जरा " अचाट आणि.... " मध्ये मोडणारा असला तरी सिनेमा बघणेबल आहे. हिटलरचे कॅरेक्टर फारच नाटकी वाटले.

बरनः मजिद मजिदीचा हा चित्रपट अवश्य पहावा असा आहे. Love Story अशी ही सादर करता येते हे समस्त बॉलीवूडवाल्यांने एकदा पहावे. न भिजलेली नायिका, ना चुंबन ना भरजरी कपडे; अगदी अंगस्पर्शसुद्धा नाही.

Color of Paradise: अजुन एक मजिद मजिदीचा चित्रपट. आवडलेली गोष्ट म्हणजे अप्रतिम फोटोग्राफी असुनही कुठेही कथेला बाधा येत नाही. Of Course बघाच!!!


Asami
Wednesday, September 05, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न भिजलेली नायिका >> हे काही खरे नाही हो. भिजते कि अंगभर कपडे घलून ती :-)

Chinya1985
Wednesday, September 05, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेन्ड मी मागे cash मधील तो जोक लिहिला होता तो तु वाचला नसावा.
शेवटच वाक्य आहे-'पुछनेमे क्या हर्ज है?'


Chinya1985
Wednesday, September 05, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक दे शाहरुख खान housewives चा स्टार आहे. या सिनेमातदेखिल त्याला महिलांची मदत घ्याविच लागली हिट देण्यासाठि. सिनेमा ठिक पण अगदि ग्रेट वगैरे नाही. शोभा डेच्या लेखाबद्दल लिहिल आहे कोणितरि. लिंक द्याल का कोणी??

हे बेबी-ठिक ठाक टाईमपास वाटला मला तर.

मेट्रो-एकदम सहि पिक्चर. गाणी तर जाम आवडली. प्रीतमनी चोरी केली आहेत का स्वत्:ची ओरिजनल आहेत??

उपास, गोडसेच खर स्टेटमेंट माहित नव्हत पण नाटकात तर मी लिहिलेलच स्टेटमेंट होत. गांधिजि 'हे राम' म्हटले नाहित हे सांगितल असत तर मानायला जास्त बर पडल असत पण जेन्व्हा ते का म्हटले नसतिल याच कारण दिल गेल तेन्व्हा ते चुकिच असायचा संशय जास्त येतो. रामरहिम का नाहि म्हटल??याला काहिच उत्तर नाहि. हे राम म्हटल का वगैरे प्रश्नच येत नाहि. तसेही कॉंग्रेसवाल्यांना अफ़वाच पसरवली असति तर त्यांना 'रामरहिम' म्हटल अशीच पसरवली असति. त्याने तर गांधिजिंचा अजुन उदो उदो झाला असता नाहि का??


Slarti
Wednesday, September 05, 2007 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल chungking express पाहिला. हे एक fast food चे दुकान. तिथे नेहमी येणारे दोन पोलिस, तिथे काम करणारी मुलगी आणि एक रहस्यमय गॉगलधारी बाई अशा लोकांना गुंफत जाणारी प्रेमकथा असे ढोबळ कथारूप आहे. पण खरे महत्व कथेला नसून तिच्या मांडणीला आहे, चित्रणाला आहे. त्या दोघा पोलिसांचा एकटेपणा आणि आपापल्या girlfriend शी संबंध तुटल्यावर 'ती आता परत येईल... निदान आता तरी....बरे, आता नक्कीच...' ही अवस्था भिडून जाते. दैनंदिन जीवनाच्या वाहत्या धकाधकीच्या पार्श्वभूमीवर एक अलिप्तपणाने हे सर्व लोक त्यांचे नित्य व्यवहार करत राहतात... अननसाच्या cans मध्ये, घरातील निर्जीव वस्तूंमध्ये, गॉगलमध्ये, pop music मध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतात, किंबहुना स्वतःला पाहत राहतात... अन् आपण शहरातील एकटेपण, detachment ची भावना, आशा यांना कडकडून भेटतो.

Cop 223 : If memory could be canned, I hope this one will never expire. If an expiry date must be added onto it, let it be 10,000 years.


Savyasachi
Thursday, September 06, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chinya hi ghe link
http://timesofindia.indiatimes.com/Shobhaa_De_Indias_hope-_SRK/articleshow/2291647.cms

Chinya1985
Thursday, September 06, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सव्यसाचि,
अस झाल तर कल्याणच आहे. मुस्लिम लोकांना defend करणारे अनेक आहेत त्यात अजुन एक शाहरुख येईल. मुस्लिम दहशदवादी वाढतच आहेत ते थांबवण्याचा कोणिच प्रयत्न करत नाहि नुसतेच त्यांना defend करतात


Zakki
Friday, September 07, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला जर मुसलमानांबद्दलचा (गैर)समज थांबवायचा असेल तर मुसलमानांना अत्याचारापासून परावृत्त केले तर आपोआप ते काम होइल.

Savyasachi
Friday, September 07, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, कुठेतरी कोणितरी लिहिल्याप्रमाणे त्याला मग शिक्षक व्हावे लागेल आणि आयुष्यभर तेच काम करावे लागेल. (त्याने पाल्यांना काही फ़रक पडणार नाही म्हणा :-) )

Lopamudraa
Friday, September 07, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम लोक हट्टी असतात त्यांच्यात बदल करणे कठिण आहे शिवाय एकी कीती त्यांच्यात एक निर्णय सगळे मान्य करतात.
नाहीतर आपले लोक साधे मराठी लोक सुध्दा एकत्र येत नाहीत.


Manuswini
Friday, September 07, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, तुला मोदक,
बघ मी कशी तुला साथ देते :-). तु उगाच आता मराठी लोक साथ देत नाहे म्हणु नकोस.


Maanus
Friday, September 07, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी लोक सुध्दा एकत्र येत नाहीत

ओय... NJ GTG को तुम भुल गये क्या.


Ajjuka
Saturday, September 08, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल रात्री चक दे पाह्यला.. फ्रेशच वाटलं. खूप मजा आली. इतक्या लोकांनी चांगला चांगलाय असं सांगितलं होतं त्यामुळे थोडी धास्तीच होती पण मी संपूर्ण वेळ involve होते सिनेमात. मुळात तिरंगा किंवा देशभक्ती यासंदर्भातल्या गोष्टी आल्या की मी impossible emotional fool असतेच आणि त्यातही देशभक्तीचे खोटे अवडंबर माजवले नव्हते त्यामुळे ते फारच भिडलं.
SRK खूप वर्षांनी परत आवडला. बाजीगर च्या वेळेस मी १७ - १८ वर्षांची होते आणि त्याच्या प्रेमात होते. मग मधल्या काळात तो गुलगुलीत राज, रोहित आणि राहुल बनल्यापासून आवडेनासा झाला. डॉन केल्यावर तर डोक्यातच गेला. तेरी ये मजाल इत्यादी वाटलं होतं... तर ही सगळी पापं त्याने चक दे मधे धुवून टाकलीत.
दाढी मस्त दिसते त्याला.. (दाढी is my personal fav.. ही ही ही)
सगळ्या पोरींनी उत्तम कामं केलीत. प्रिती सबरवाल ही विजयेंद्र घाटगे नामक ठोकळ्याची मुलगी आहे हे सांगूनही खरं वाटत नाही. मला छोटीशी पोरग्यासारखी दिसणारी कोमल तिच्या lisp सकट खूप आवडली. हा मात्र तो अभिमन्यू सिंग असलेला एक सिरियलकुमार आहे तो संपूर्ण शून्य मार्क आहे.
सगळ्यात आवडलेला performance म्हणजे अंजन श्रीवास्तव.. दिल्लीतल्या सरकारी लोकांमधे असलेली गुर्मी, बिन्डोकपणा सगळ्यासकट मस्त उभा केलाय त्याने.
माझा एक आवडता सीन म्हणजे सगळ्या पोरी मिळून छेड काढणार्‍या पोरांना अक्षरशः धुवून काढतात तो. प्रत्येक मुलीची fantasy असणार ही. आपली छेड काढलेल्या मुलाला असं झोडपून काढण्याची.
पण मुळात पटकथा आणि संवाद लेखकाची शाब्बास आहे. इतकं tight script लिहिलंय त्याने. कुठेही film पसरणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतलीये त्याने.
काही बारीक बारीक goof ups आहेत यात पण ते काणाडोळा करता येण्यासारखे आहेत.
पण its definitely a must see!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators