|
Disha013
| |
| Tuesday, June 26, 2007 - 7:13 pm: |
| 
|
शनिवारी मैत्रिणीकडे डिनरला गेलो होतो.तिनं बरच काय बनवलेलं. माझ्या मुलाला तिने चिकन खायला दिले आणि विचारले की कसं झालयं म्हणुन. तर तो म्हणाला 'छान झालयं. पण माझी मम्मी बनवते तितकं छान नाही झालं!'
|
माझ्या भाचीला (इयत्ता पाचवी) माझी आई म्हणाली की, अगं गॅस सिलींडर सम्पलाय त्याला फोन करून नोंदणी कर म्हणजे चार पाच दिवसांत दुसरा सिलींडर येईल. हिने फोनची डायरी काढून नंबर फिरवला. पलीकडच्या बाईने ग्राहक क्रमांक विचारला, तो हिने डायरीत लिहिलेला वाचून दाखवला. त्यानंतर त्या बाईने विचारले, "तुझं नाव काय?" "आकांक्षा" "आकांक्षा?..... ...." "हो आकांक्षा!" "अगं पुढे काय?" "नाही नुसतंच आकांक्षा!" "तुला आडनाव नाही का? वडलांचे नाव काय?" "नाही नुसतंच आकांक्षा. लवकर सिलींडर पाठवून द्या!" आणि फोन ठेवला. आजीने विचारले "अगं नाव का सांगितले नाहीस नीट?" तर म्हणते "बाईऽ तुला काय? माझी सगळी माहिती काढून शाळेत गेल्यावर मला तिने पळवून नेले तर?"
|
Aashu29
| |
| Friday, August 31, 2007 - 1:31 pm: |
| 
|
generally माझा मुलगा जेवण झाले की लिंबुची फ़ोड चोकत बसतो !! माझ्या नवर्याच्या केसांमधे बराच कोंडा झाला असल्याने मी त्याला एकदा आमच्या चिरंजिवांसमोर केसांना लिंबु लाउन दिले!! दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे लिंबु घेतले आणि गुल झाला, मी शोधले तर एक कोपर्यात स्वतःच्याच केसांना लिंबु लावायचा प्रकार चालला होता!! मी पाहिले तर माझ्याकडे पाहुन गोड हसला!! वय वर्षे दिड!!
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 2:41 pm: |
| 
|
मी पाहिले तर माझ्याकडे पाहुन गोड हसला माझ्या मनेजर चा मुलगा कोणी घरी गेले की त्यांचे केस विचारत बसतो. त्याच्यात त्या मॅनेजर ने पन त्याला भारी कंगवा देवुन ठेवलाय, तो नसतो का १ रुपाय वाला दातेरी... डोक्याला जोरात लागतो तो. माझ्या मते त्याच्या बायकोने घरात कमी पाहुने यावे म्हणुन तो दातेरी कंगवा देवुन ठेवलाय.
|
Aashu29
| |
| Saturday, September 01, 2007 - 12:41 pm: |
| 
|
एका टकल्या माणसाला पाहुन माझा भाचा म्हणतो, ए याचं डोक कुठेय?
|
Monakshi
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:43 am: |
| 
|
>>त्याच्या बायकोने घरात कमी पाहुने यावे म्हणुन तो दातेरी कंगवा देवुन ठेवलाय. काय रे माणसा, मॅनेजर ची बायको कोकणस्थ आहे किंवा होती का???
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:34 pm: |
| 
|
राजस्थानी आहे. .. ..
|
Nanya
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:11 pm: |
| 
|
मोनाक्शी तुम्ही अजुन कोकणस्थाना ओळखत नाही असे दिसते.. ते असले काही कधीच नाही करणार, *सरळ "सध्या वेळ नाही नंतर या" असे सांगुन मोकळे होतिल.
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:38 pm: |
| 
|
अहो ते कोकणस्थ असो किंवा देशस्थ असो किंवा अगदी अस्पृश्य असोत, पण ते एका विशिष्ठ शहराचे रहिवासी असतील हे नक्की!
|
Preetib
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:34 pm: |
| 
|
tumhala Punyache mhanayachae aahe na..
|
Disha013
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:29 pm: |
| 
|
एका टकल्या माणसाला पाहुन माझा भाचा म्हणतो, ए याचं डोक कुठेय?
माझ्या सोळा महिन्यांच्या मुलीला ठसका वगैरे आला तर मी तिच्या डोक्यावर थापटते. आता तिने स्वत्:च ते काम करायला सुरुवात केलिये. फ़क्त आधी स्वत्:चे डोके थापटते नि मग खोकते!
|
Madhavm
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:35 am: |
| 
|
TV वर मराठी मालिका चालू होती. त्यात नायिका नायकाला I Love You म्हणते आणि लाजून दाराबाहेर पळते. नायक आश्चर्यचकीत झाल्याने क्षणभर काही बोलूच शकत नाही. मग ती बाहेर गेल्यावर भानावर येउन I love you too म्हणतो. आता या प्रसंगावर मझ्या ५ वर्षाच्या मुलीची comment : अग तू नाही आधी म्हणायच, आधी त्याने म्हटलं पाहिजे.
|
Monakshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:50 am: |
| 
|
>>मोनाक्शी तुम्ही अजुन कोकणस्थाना ओळखत नाही असे दिसते अहो, माझा जन्मच कोकणस्थ घरातला आहे. अगदी एकारान्त चित्पावन ब्राह्मण. म्हणूनच असं म्हणायचं डेरिंग करु शकते. सरळ "सध्या वेळ नाही नंतर या" असे सांगुन मोकळे होतिल. हे मात्र पुण्यनगरीस्थीत को.ब्रा. म्हणण्याची शक्यता आहे. पुणेकर दिवे घ्या हो.
|
Varsha11
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:45 am: |
| 
|
माझी लेक काल शुभंकरोती म्हणत होती (वय ९ वर्षे) मधेच तिला वाटले की स्टुलावर उभे राहुन म्हणुया (आमचा देव्हारा जरा वरती आहे) तर देवालाच म्हणाली "EXCUSE ME" आणि मग स्टुलावर उभे राहुन बकीची राहीलेली शुभंकरोती पुर्ण केली.
|
Manuswini
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:51 pm: |
| 
|
माझ्या भाचीने असेच केले होते, तीला सुरवातीला prayers शिकवली वय वर्षे ३, ती नीट म्हणतेय ते बघायचो तेव्हा जवळ उभे राहयचो नी देव्हर्यासमोर हात जोडून उभे करायचो तीला, आम्ही उभे असे पर्यन्त ती देव्हार्यासमोर उभी,जसे आम्ही रूम बाहेर गेलो की की बाजुच्या खिडकीवर चढून आकाशाकडे पाहत अर्धी प्रार्थना म्हणायची. ही गोष्ट आम्हाला बरीच उशीरा लक्षात आली कारण तीचे ते स्टूल आणणे मध्येच, त्यावर चढायची खटपट पाहून मी विचारले तु प्रार्थना पुर्ण न करता हे काय करतेस, स्टूलवरून पडशील ना? तीचे उत्तर, God lives in the sky,so I want to look at him and pray . कीतीही सांगीतले की प्रार्थना देवासमोर बसून म्हण एक नाही दोन नाही. वर you only told that god lives in the sky and we should pray by looking at him . ह्यात ती दोन गोष्टी mix करायची. मी तीला प्रार्थना देवाकडे पाहून म्हणायची सांगीतली होती नी एकदा कुठलीशी गोष्ट सांगताना म्हटले god lives in the sky..
|
Manjud
| |
| Friday, September 07, 2007 - 6:05 am: |
| 
|
काल आमच्या घरी गॅसवाला सिलिंडर घेऊन आला. त्याने पैसे घेतले आणि सा. बा. ना पावती दिली. त्यानी ती सही करण्यासाठी भिंतीवर धरली, सही केली आणि त्याला परत दिली. नीरजाचं (माझी मुलगी, वय वर्ष १ / २) हे सगळं ऑब्झर्व करणं चालू होतं. मधेच आजीला हे काय करतेस, ते काय करतेस असे प्रश्न विचारणं पण चालू होतं. थोड्या वेळाने आजोबा बाहेरून आले, ते तिला केळी घेऊन आले होते ती पिशवी तिच्या हातात दिली. हिने कुठून तरी एक कागदाचं चिटोरं मिळवलं आणि भिंतीवर तो कागद धरून काहितरी लिहिलं आणि कागद त्याना दिला. आणि म्हणते, " पावती दिलीये, सही करून " .
|
Monakshi
| |
| Friday, September 07, 2007 - 7:26 am: |
| 
|
मंजू, सॉलिडच दिसतेय तुझी मुलगी. आईवर गेली असणार बहुतेक.
|
Aashu29
| |
| Friday, September 07, 2007 - 4:40 pm: |
| 
|
माझी बहिण तेंव्हा बरीच लहान होती, आणि generally घरी कोणि आले की तिला खाउसाठी पैसे देत, दहा रुपये वगैरे!! एकदा एक चुलती आणि तिचा नवरा पहिल्यांदाच घरी आले, गप्पा झाल्या, मग घरी जायला निघाले, तर हि कलंदर म्हणते आणि माझे खाउचे पैसे? सदर महाशयांनी ओशाळवाणे हसत दहाची नोट काढुन दिली!! आम्हाला लाज लाज वाटलि अगदी!!
|
Disha013
| |
| Friday, September 07, 2007 - 5:36 pm: |
| 
|
आशु,लहान मुले नेहमीच अशी पंचाईत करतात मोठ्या माणसांची. म्हणजे माझ्या मुलाला कोणी बिस्कीट देत असताना जर मी सांगितले की त्याला नाही आवडत ते,तो नाही खाणार,(कारन जनरली मुलांना क्रीमची बिस्किटे आवडतात ना) तर अशा वेळी तो ते बिस्कीट फ़स्त करणार नि वर अजुन मागणार! माझा भाऊ लहान असताना त्याने एकदा हटाने मोठ्ठा फ़ुगा विकत घ्यायला लावला होता. आम्ही घरी आलो नि तेवढ्यात जवळच राहणा-या एक काकु त्यांच्या मुलाला घेवुन आल्या. तोही साधारण भावाच्याच वयाचा. त्याने तो फ़ुगा मागितला. त्याची आई त्याला समजावु लागली,पण तो ऐकेचना. मग आम्ही भावाला गोडीगुलाबीने समजावले,आपण दुसरा आणु वगैरे. तो रडवेलं तोंड करुन बसलेला. दोघांनी फ़ुग्याच्या दो-याची ओढाताण सुरु केली. शेवटी शेजारीन काकुंचे पोरगं जिंकलं. तो फ़ुगा घेवुन घरी निघाला,तेव्हा माझ्या भावाने डोके चालवले. आणि त्याचे लक्ष नसताना मागच्या मागे दोरा तोडुन हळुच फ़ुगा घेतला नि आत जावुन लपला घरी जाईपर्यन्त दोघांच्याही लक्षात आले नाही की मागे फ़ुगा नाहीये!. नशीब त्या काकु स्वभावाने खुपच चांगल्या आहेत.
|
Arch
| |
| Friday, September 07, 2007 - 5:44 pm: |
| 
|
एकदा एक चुलती आणि तिचा नवरा >> आशु, तुला काका काकी म्हणायच आहे का? 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|