|
. दोन्ही हात नसलेली खुर्ची: ठाकूर खुर्चीचे कुशन खालून फाटले असले तर्: हेलन >>>>> ह ह पु वा.....
|
Disha013
| |
| Monday, June 18, 2007 - 4:37 pm: |
| 
|
ठाकुर न हेलन सही.... ह. ह. पुरेवाट! या BB वर आलं की हसायला येतं नेहमी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 19, 2007 - 2:02 am: |
| 
|
रितु, कोल्हापुरच्या प्रत्येक भेटीच्यावेळी असले काहीतरी ईरसाल ऐकू येते. हे तर खासच आहेत.
|
Giriraj
| |
| Tuesday, June 19, 2007 - 10:05 am: |
| 
|
धुळेकरपाटिल,'बांगट' म्हणजे काय आणि?
|
Cool
| |
| Tuesday, June 19, 2007 - 10:45 am: |
| 
|
रॉबीनहुड तुम्ही दिलेल्या नगर जिल्ह्यातील शब्दावरुन काही मला सुद्धा आथवले, तुम्हाला आणि नलिनीला नक्की महिती असतील कारण : (नवसाच्या बोकडाच बळी देउन केले जेवण) येंदुळ: (थोड्या वेळा पुर्वी), मला वाटायचे हा शब्द common असावा पण मी याचा उपयोग नगर भागातच बघितला (सहज आठवले म्हणुन्: काही लोकांना आपण शुद्धच बोलावे असे वाटत असल्यामुळे काही मुळात शुद्ध शब्दाचे अजुन 'शुद्ध' रुप केले जाते (उदा, व्हीटर (हीटर), शर्ट 'विण' केला ('इन' केला) )
|
कूल, येंदुळ / यदुळ / यदाळ म्हणजे आमच्याकडे 'साधारण सध्या जी वेळ आहे ती' असा वापरतात. उदा. काल यदुळा मी जेवायला बसलो होतो. म्हणजे काल ह्यावेळी मी जेवायला बसलो होतो. (मला वाटते तो 'ह्या वेळी' याचा अपभ्रंश असावा.) 'शुद्धच' बोलण्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे विष्टी (=एस्. टी.) , विंग्रजी (= इंग्रजी!) तसेच नगरकडे 'उद्या', 'कधी' हे शब्द 'उंद्या', 'कंदी' असे उच्चारतात. बरोबर का?
|
कुल, आमच्या कडे (खान्देश) त्या शब्दांचा अर्थ वेगळा होतो. कारण = तेरवी ला (मेल्या नंतर) दिलेले जेवण. मांता = नवसाच्या बोकडाच बळी देउन दिलेले जेवण
|
Nalini
| |
| Thursday, June 21, 2007 - 2:48 pm: |
| 
|
कुल म्हणतो त्या प्रमाणे नगर जिल्ह्यात येंदुळ हा शब्द थोड्या वेळापुर्वी किंवा आतापर्यंत ह्या अर्थी वापरला जातो. जसे की ईथे वापरलाय. आमचा सोन्या पाहिला का हो तुम्ही? येंदुळ खेळत व्हता इथं. म्होरल्या(पुढच्या) दाराला आसल बघ. कारण : (नवसाच्या बोकडाच बळी देउन केले जेवण) ह्यालाच कंदुरी पण म्हणतात. देवळी( भिंती मध्ये वस्तु ठेवण्यासाठी बनवलेली जागा.) हा शब्द नगरकडेच म्हणतात का? ह्यालाच काही भागात खातं पण म्हणतात. टिपाड: शहरात ह्याला टाकी म्हणताना ऐकलय. हा शब्द आणखी कुठे वापरला जातो?
|
Dineshvs
| |
| Thursday, June 21, 2007 - 4:22 pm: |
| 
|
नलिनी, देवळी हा शब्द मलकापुरलाही वापरतात. अख्खा भोपळा राहिले एवढी मोठी असते ती. आणि त्यातच आमच्यासाठी ( म्हणजे घारगे करण्यासाठी ) भोपळा राखुन ठेवलेला असतो.
|
देवळीचा आकार छोटासुद्धा असतो. म्हनजे पणत्या, रॉकेलच्या चिमण्या ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होई.दरवाज्याजवळच्या देवळीचा उपयोग कुलूप किल्ली ठेवण्यासाठी होई... नगरच्या उत्तर भागात म्हणजे नलिनीच्या गावी देवळीला 'खाते' असा शब्द आहे. मला त्याची बॅन्केच्या खात्यातून पैसे काढताना नेहमी आठवण होते...
|
Karadkar
| |
| Thursday, June 21, 2007 - 5:54 pm: |
| 
|
अमच्याकडे पाणी भरुन ठेवायच्या पत्र्याच्या बॅरल ला टींप, पिंप, टाकी असे म्हणतात.
|
Madhura
| |
| Thursday, June 21, 2007 - 11:20 pm: |
| 
|
देवळीचा आकार छोटासुद्धा असतो. म्हनजे पणत्या, रॉकेलच्या चिमण्या ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होई.दरवाज्याजवळच्या देवळीचा उपयोग कुलूप किल्ली ठेवण्यासाठी होई... देवळी म्हणजे कोनाडा ज्याला म्हणतात तेच दिसतेय.
|
आमच्या भागात पण इधुळा म्हणतात. म्हणजे यावेळी. उदा. इधुळा याया पायजी खरं म्हण्जी. नलिनी टिपाड मी पण ऐकलाय. शिवाय जीपला जिपडं पण म्हणतात. कूल, गजानन, शुद्ध शब्द अगदी सही आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे गादीवर 'बेडसीट' टाक.
|
नलिनी आमच्याकडे या देवळीलाच बोख़ले म्हनतात... खेड्यात पुर्वी खरच त्यात पणती ठेवत आसत... आनी शेतातुन आले की गाय छाप, चुना पुडी ठेवत आसत...... पुडी आजुनही तिच्या जागी आहे पण आता थोड्या मोठ्या बोखल्यात टी. वी. ठेवलेला आसतो... पुडी वरुन आठवीले आमच्याकडे सगळ्या गुटख्याना पुडी म्हनतात.... आणी खाणार्याना पुडीबाज म्हणतात....... ग़ाय छापची पुडी खाकी आसते म्हणुन तीलाच फ़क्त लष्करी आहार म्हणतात......... ग़ाय छाप आनी चुन्याच्या पुडीला गाय आणी पान्ढरे वासरु म्हनतात... पाण्याच्या टीपाला टीपड म्हणतात... ड्रमला सम्पुट म्हनतात...... सबसे स्पेशल खान्देशी शब्द वळु कीन्वा गोर्हा आसतो ना... त्याला धान्डया म्हनतात.. गीरी.... बान्गट म्हनजे शुद्ध मराठीतला वेन्धळा...
|
Zakasrao
| |
| Saturday, June 23, 2007 - 8:03 am: |
| 
|
ग़ाय छाप आनी चुन्याच्या पुडीला गाय आणी पान्ढरे वासरु म्हनतात... >>>>>>. मी याचा कोड वर्ड कोल्हापुरात दहि भात असा ऐकला आहे.
|
अक्षिता या शब्दासाथी अर्थ पाहिजे
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:02 pm: |
| 
|
जितु डोंगरे, तांदूळ किडला तरी कुठलाहि किडा त्याला आरपार छिद्र पाडु शकत नाही. म्हणुन तांदळाला अक्षत किंवा अक्षता म्हणतात. अक्षिता हे त्याचे तयार केलेले स्त्रीलिंगी रूप असावे.
|
अरे वा काय छान रंगलाय हा भाग.. धुळेकर पाटिल तुम्ही आप्ल्याकडचा कोनाडा शब्द विसरला बोखल्याला कोनाडा पण म्हणतात ना? अजुन सांगा बरेच नविन नविन शब्द कळले मजा आली वाcचुन.
|
Mahaguru
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:16 am: |
| 
|
मला अंधुकसे आठवते त्याप्रमाणे, क्षत म्हणजे तुटणे, अक्षत म्हणजे न तुटणारे. लग्नातले हे बंधन कधीही न तुटणारे असावे म्हणुन तांदुळरुपी आशीर्वाद देताना त्या तांदळाला अक्षता म्हणत असावेत. अक्षिता म्हणजे त्याचे स्त्रिलिंगी असावे कधीही न तुटणारी ह्या अर्थी
|
पण 'अक्षता' हाच स्त्रीलिंगी शब्द नाही काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|