Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 04, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लहान मुलांच्या उचापती आणि खूप काही » Archive through June 04, 2007 « Previous Next »

Storvi
Wednesday, March 21, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरोहीला मी बर्याचदा कृष्णाच्य गोष्टी सांगते... तिला त्या अतिशय आवडतात, कारण माझ्या गोष्टीत कृष्णाने लोणी चोरुन खाल्ले कि यशोदा त्याला म्हणते you naughty little thing :-) तर एके दिवशी बाबाच्या मगे लागली गोष्टं सांग म्हणुन, तो म्हणाला मला येत नाहि..
लेक म्हणाली तु आई झालास की मग तुला येईल
:-O
आणि पर्वा तर बापरे.. माझ्या काळजात चर्र झालं की हे असले बाहेर बोलली शाळेत बिळेत तर काही खरं नाही...
काय झाले.. की आम्ही तिला एकटी झोपण्यासठी तयारी करतोय, तर बाबा म्हणाला तु एकटी झोप. तर तिला बाबा जवळ हवा होता. तर तो म्हणाला तु baby आहेस का? babies फ़क्त आई बाबांबरोबर झोपतात...
हे सगळं संभाषण माझ्या अपरोक्ष झाल, आणि मी आल्यावर बाई साहेब म्हणाल्या Daddy sleeps with babies


Fulpakhru
Wednesday, March 21, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SM, storvi, झक्की काका
माझ्या लेकानेही काही स्वताचे शब्द बनवले आहेत.

आई मला हे लावत नाही
(म्हणजे लावता येत नाही.)

आई मला हे काढत नाही
(म्हणजे अर्थातच काढता येत नाही)


Savyasachi
Wednesday, March 21, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्तोरवी, कृष्ण kRuShNa अस लिही. क्रु अगदीच क्रूर मधला वाटतो :-)
कमळ आणि तुझा किस्सा सहीच.


Mahesh
Thursday, March 22, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी साडेतिन वर्षाची आहे.

तिला जेव्हा नुकतेच बोलायला यायला लागले होते
तेव्हा दार, झाकण, पिशवी, ई. सर्व गोष्टींसाठी दार उघड असे म्हणायची. आणी डोळे उघड ला डोळे चालू कर.

परवा ती एक गाणे गुणगुणत होती
निट ऐकल्यावर आम्ही खुप हसलो
ती म्हणत होती
गजानना श्री गणराया
आधी बन्दूक तुज मोरया

एकदा माझी बायको म्हणत होती की पोटात दुखतय,
तर आमचे कन्यारत्न तिला विचारते झाले की
मम्मा तुला आकाच्यान झालय का ?
तिला अपचन म्हणायच होत, पण जपानी शब्दाने तिचा गोन्धळ झाला होता.
जपानी भाशेत खुप लहान बाळाला आकाच्यान म्हणतात.


Suyog
Thursday, March 22, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza 6 yrs cha mulaga manato this game is gooder than that

Manuswini
Thursday, March 22, 2007 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी च्या password वरुन माझ्या भाचीची गम्मत आठवली, ती आहे आता ६ वर्षाची. तिलाही passowrd वगैरे एकुन माहीती.
झाले काय, बहिण नेहमी comp वर काम करताना ही अवती भोवती असायची आणी बहिणीला बघायची की ती काहीतरी password वगैरे type करते तेव्हा comp चालु होतो. बरेचदा मी पण ओरडुन ए तुझा password सांग म्हणून पण तीला password प्रकार माहीती आहे.
एकदा ती जाम खुश झाली मी दुपारी बहिणीच्या घरी भेटायला गेले तेव्हा ती मला तीची secret aunty समजते, म्हणजे she can share her secrets with me and has trust that I wont tell anybody ,
धावत धावत आली माझ्या जवळ म्हणाली, मला ना मम्माचा password माहीतीय, मी सांगु.

कान ओढला माझा चक्क म्हणाली सांगु नको हा password कोणाला सांगायचा नसतो(हे सर्व एकुन आमचे discussion ), आणी चक्क बरोबर सांगीतला आणी वर I told chris that I know my mom's password too, chris does not even know his mom's password.
आधी बहिणीला सांगीतले बाई तु तुझा password बदल.


Manuswini
Thursday, March 22, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक गोष्ट मामाचे लग्न झाले तेव्हा, माझा धाकटा भाऊ चार वर्षाचा होता, घरात दुसर्‍या दिवशी पुजेला आलेली सर्व जण मामा, मामीला विचारत मग honeymoon ल कुठे जाणार, हा मामाचा लाडका सतत मामाबरोबर,सकाळ पासुन हा एकच शब्द मामाला लोक विचारत होते. पूजा आटपुन त्याच रात्री जोडी honeymoon ला जाणार होती.
त्यांची तयारी झाल्यावर सोडताना ह्याने हट्ट धरला की हा ही जाणार काकांनी विचारले अरे पण तु कुठे जाणार ते तरी सांग
"हनुमानला", मला 'हनुमानला' जायचेय,
दोन तास nonstop रडत तो हेच वाक्य म्हणत होता. शेवटी मामांनी गपचुप पळ काढला. आधीच बहुतेक त्यांना घाई होती :-)


Farend
Wednesday, April 11, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणी (वय ४ ते ६ साधारण) यातील नुकताच ऐकलेला संवाद. त्यांच्यात नेहमी कसलीतरी चढाओढ सुरू असते. त्या दोघी तेलुगू असल्याने हे इंग्रजीत आहे.

girl 1: my daddy wakes up at 5 o'clock!

girl 2: my daddy wakes up at 100 o'clock!

girl 3: my daddy wakes up at infinite o'clock!

and all three thinking whoever's daddy wakes up at the largest number is the winner!


Disha013
Monday, April 23, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा सहकुटुंब 'mars ' हा चित्रपट बघत बसलो होतो. त्यातले aliens बघुन माझ्या मुलाने विचारले 'हे aliens boy आहेत कि girl ?'


Sayuri
Monday, April 23, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच किस्से आहेत सर्वांचे.
महेश,
>>मम्मा तुला आकाच्यान झालय का ?

ह.ह.पुरेवाट!


Manjud
Monday, April 30, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा माझी भाची (वय वर्षे ३) माझ्या आजुबाजुला खेळत असताना जोरात माझ्या तोंडावर आपटली. त्याच आवेगात माझा एकच जोराचा धपाटा तिच्या पाठीत बसला. तिचा रडून धुमाकूळ आणि माझा तोंडावर हात हे बघुन आईने विचारले "काय झाले?" मी म्हटले "आई पृथा माझ्या तोंडावर आपटली. मला वाटले माझ्या दातातले सीमेंट पडले." त्याच क्षणी माझ्या भाचीचा प्रश्न: "अम्बुजा सीमेन्ट?"

Ajjuka
Tuesday, May 01, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका मित्राच्या मुलीचा किस्सा.. वय वर्षे ४-४.५.
एकदा त्याच्या वडीलांना अचानक लक्षात आले की आपल्या नातीवर प्रचंड संस्कार केले पाहीजेत. तिला रामायण, महाभारत इत्यादी शिकवले पाहिजे. मग ते तिला समोर घेऊन पुस्तकं घेऊन बसले. ती तशीही खेळायला जायला मिळत नाही म्हणून रूसली होती आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, "सांग बरं रामाचा भाऊ कोण?" तिने इकडे तिकडे बघत टीपी करताकरता मधेच उत्तर दिले, "दत्त!" आजोबा भलतेच चिडले. आणि संस्कारांचा क्लास संपला. रात्री मित्राला हा किस्सा कळला तेव्हा त्याने मुलीला विचारले, "तू असं का सांगितलंस?"
"अरे आपल्या पार्ल्यात नाही का दत्त रामानंद अशी सोसायटी. म्हणून रामाचा भाऊ दत्त!"

यावर डोळे फिरवायची वेळ मित्राची होती..


Storvi
Wednesday, May 30, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या शेजार्यांना दोन मुली आणि एक मुलग आहे. थोरली च नाव दहलिया. त्या दोघींमध्ये तीन वर्षांचे अंतर असले तरी दिसायला बर्‍याच सारख्या आहेत. तर माझ्या लेकीला थोरलीचेच नाव लक्षात होते, धाकटीचे नाही. काल त्या दोघी बहिणी बाहेर सयकल चालवत होत्या..
लेक: दोन दाहलिया सायकल चालवतायत:-O
मी मग त्या दोघींची नावं समजावुन सांगितली तिला.
नंतर आम्ही थोड्या वेळाने घरी परत आलो, तेंव्हा तिला परत आठवण झाली त्या episode ची.
लेक: दाहलिया आणि कालिया सायकल चालवत होत्या



Lalu
Friday, June 01, 2007 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi तू काय नाव सांगितलंस ते सांग आधी.:-)

(प्रसंग - आई कलिंगडाच्या फोडी खात आहे. आदल्या दिवशीही मित्रमंडळींकडे पार्टीत कलिंगड ठेवलेले असते. ४ वर्षाचा एक मुलगा येतो...)
मुलगा : कलिंगड खातेस? कुठून आणलंस? काल आकाशच्या घरुन आणलंस का? कसं लागतंय?
आई : नाही, आपल्याच घरातले आहे. का??
मुलगा : काल तिथे सगळ्याना खायला कलिंगड ठेवले होते त्यावर मी जो ज्यूस पीत होतो तो ओतला होता.
आई : असं का केलंस तू?!!
मुलगा : (निरागसपणे) मला वाटले चांगलं लागेल, म्हणून केलं.
आई : मग? तू खाऊन पाहिलंस का? सांगितलंस का कोणाला असं केलंस म्हणून?!
मुलगा : (खट्याळपणे हसत) नाही, कोणाला काही सांगितले नाही. (पळून जातो..)
(आई शांतपणे कलिंगड खात राहते)
(सत्यकथा. भाषांतरीत.)

हा एक साधा प्रसंग, असे बरेच घडतात. सगळे इथे लिहिले तर आम्हाला कोणी घरी बोलावणार नाही. :-)

आजचीच एक गोष्ट, spelling bee मध्ये एक मुलगी बरोबर स्पेलिन्ग सान्गून गेली तर विचारतो, तुम्ही हिला vote करणार आहात का? अती Idol पाहिल्याचे परिणाम.


Bee
Friday, June 01, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, किती दिवसानंतर मायबोलिवर दिसते आहेस?

spelling bee काय प्रकरण आहे.. anything related to me :-)


Kedarjoshi
Friday, June 01, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

spelling bee काय प्रकरण आहे.. anything related to me >>>>

बी,गड्या तु फार हसवतोस.

Lalu
Friday, June 01, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पेलिंग सांगायच्या आधी ते स्पर्धक शब्दाबद्दल फारच प्रश्न विचारतात बुवा! तेवढेच काय ते तुझ्याशी related आहे. ~D

Monakshi
Monday, June 04, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नाच्या अल्बम वरुन एक माझीच गंमत आहे:

मी सुध्दा आईबाबांच्या लग्नाचा अल्बम बघताना रडून गोंधळ घातला होता की माझा फोटो का नाही म्हणून तेव्हा आजोबा म्हणाले की तू आईस्क्रीमच्या रांगेत उभी होतीस तुला किती बोलावले तरी आलीच नाहीस मग काय आम्ही तसेच फोटो काढले. आणि मला चक्क हे पटले.

एक माझ्या बहिणीचा किस्सा:

ती १.५२ वर्षांची असेल, माझ्याकडे बाजीगर ची audio cassatte होती. शाहरुख़ची जबरदस्त पंख़ा असल्यामुळे (अजूनही आहे) ती cassatte मी जीवापेक्षाही जास्त जपत असे. माझ्या दुर्दैवाने एक दिवस ती बाहेर राहिली तर बहिणाबाईंनी त्याच्यातली सगळी टेप ख़ेचून काढून toilet मध्ये टाकून दिली होती आणि चेहेर्यावर छप्पन सशांची व्याकुळता (इति पु.ल.) आणून माझ्याकडे बघत होती.


Zakasrao
Monday, June 04, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती १.५२ वर्षांची असेल,>>>
म्हणजे नेमके किती? अगदी ३ डिजिट पर्यंत मोजले तर चालेल काय?

Monakshi
Monday, June 04, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे गलतीसे मिष्टेक हो गया,

ती दीड किंवा दोन वर्षांची असेल


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators