|
Farend
| |
| Tuesday, August 21, 2007 - 1:20 am: |
| 
|
शाह रूख खान च्या अभिनया बद्दल सर्वात मोठी कॉंप्लिमेंट आजकाल ऐकू येते ती "तो शाह रूख वाटत नाही" ही. स्वदेस बद्दल ही हेच ऐकले होते
|
संघमित्रा आता बघावाच लागेल.. तु इतके छान लिहिलेस तर (तीथे शहरुखच ठिके अनिल कपुर चुकुनही नाही)
|
Farend
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:53 am: |
| 
|
अरे हो ते विसरलोच. संघमित्रा तुझा डिटेल रिव्यू वाचून आता बघावासा वाटतो. स्वदेस च्या पठडीतील रोल असेल तर नक्कीच. मलाही शाह रुख त्याच रोल मधे जास्त आवडला होता. केदार मी ही त्याचे कपाळावर येणारे केस, क क क किरण आणि हीरो रुपी व्हिलन चे रोल होते तेव्हा चुकूनही फिरकत नव्हतो (तीन तीन खून करून ही 'मुझको गलत न समझना मै नही बादल आवारा' हे जरा पटायला अवघड होते ), पण त्याने जरा नीट भांग पाडून नीट रोल करायला लागल्यापासून आवडू लागला, KKHH , मै हूॅ ना आणि सर्वात स्वदेस.
|
Aashu29
| |
| Tuesday, August 21, 2007 - 11:11 am: |
| 
|
(तीन तीन खून करून ही 'मुझको गलत न समझना मै नही बादल आवारा' हे जरा पटायला अवघड होते ), hahahaha
|
Zakki
| |
| Tuesday, August 21, 2007 - 1:32 pm: |
| 
|
मी ऐकले की शहारुख खान आता राजकारणात उतरणार आहे. त्याची तयारी! मुसलमान म्हंटला की तो अतिरेकी हा गैरसमज दूर करण्यासाठी. एक नवीन सिनेमा पण काढणार आहे तो. आजच्याच टाईम्स मधे वाचले. त्याने पाहिले की सिनेमात गांधीगिरी केली की लोकांना पटते. म्हणून.
|
टाईम्स मधे यावर शोभा डे चा चांगला लेख आहे.
|
Tiu
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:38 pm: |
| 
|
तीजा तेरा रंग था मै तो, जिया तेरे ढंग से मै तो, तु ही था मौला, तु ही आन, मौला मेरे, ले ले मेरी जान... जितका छान सिनेमा आहे तितकंच छान गाणं आहे... too good
|
Mbhure
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:11 pm: |
| 
|
अपनेः बरा आहे पण सिनेमा जरा लांबला आहे. शेवट अगदी गोड नसता तरी चालला असता. In fact जास्त योग्य वाटला असत. जमल्यास बघावा. नकाबः OK रोजच्या Family "Drama" पेक्षा जरा हटके आहे. कुठचा तरी कोपर्यातला हॉलीवूड सिनेमा, अब्बास - मस्तानने नेहमीप्रमाणे रिफाईन करुन पडद्यावर आणला आहे.
|
Tiu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:11 pm: |
| 
|
'अपने' पुर्ण बघितला नाही...त्यात सनी देओल ची match असते ज्यात तो त्याच्या भावाचा बदला घेतो...तिथ पर्यंत बघितला... त्यानंतर काय होतं?
|
Maitreyee
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:28 pm: |
| 
|
चक दे पाहिला! मस्त आहे, आवडला! तो कोन director आहे तो शाहरुख ला ओळखत च नव्हता की काय असे वाटले हो, नाहीतर शाहरुख चे हातखंडा एमोशनल शीन, ड्रामेबाज डायलॉग्स हे सर्व करायला बराच स्कोप असून मोह आवरला कसा anyways पण मज्जा आली चक दे.. पाहताना. शाहरुख ला आणि विशेषत्: त्या मुलींना १०० मार्क!
|
Asami
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:17 pm: |
| 
|
ज्या Dot The I वरून नकाब घेतला आहे तो award winning movie आहे.
|
Farend
| |
| Friday, August 24, 2007 - 8:50 pm: |
| 
|
परवाच ' Die Hard with a Vengeance ' पाहिला. त्यात सारखे ते 'न बोले तुम न मैने कुछ कहा' चे म्युजिक वाजत होते. त्यांनी त्या गाण्यावरून घेतले असेलही किंवा दोन्हींची मूळ ट्यून एकच असेल. कोणाला माहीत आहे का?
|
Slarti
| |
| Friday, August 24, 2007 - 9:18 pm: |
| 
|
>>> त्यांनी त्या गाण्यावरून घेतले असेलही नाही रे... यावेळी नाही हे अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळचे गाणे आहे 'When Johnny comes marching home'. इथले standard ब्यांडगीत आहे. हीच धून The ants go marching one by one या बालगीतासाठीसुद्धा वापरतात.
|
Farend
| |
| Friday, August 24, 2007 - 10:05 pm: |
| 
|
थॅंक्स Slarti . मलाही तीच शंका होती.
|
Farend
| |
| Friday, August 24, 2007 - 10:07 pm: |
| 
|
आणि हा चित्रपट पाहिल्यावर Friends मधला तो बॉक्स मधे Joey लपतो आणि Chandler म्हणतो " Oh my God! You almost gave me a heart attack! " तो ही संवाद जास्त कळला. आधीही तो जबरी मजेदार वाटायचा, पण तो मूळ या चित्रपटात आहे, आणि ते दोघे बर्याच वेळा या चित्रपटांचा उल्लेख करतात.
|
Sashal
| |
| Friday, August 24, 2007 - 10:11 pm: |
| 
|
Die Hard with a Vengeance >> हा तो tower मधल्या मारामारीचाच Die Hard ना? मला नीट आठवत नाहीये, पण आता ह्या friends च्या reference साठी परत बघते म्हणजे कळेल ..
|
Farend
| |
| Friday, August 24, 2007 - 11:17 pm: |
| 
|
तीन्ही मी एकापाठोपाठ बघितले त्यामुळे 'हिम्मतवाला', 'जस्टिस चौधरी','मवाली', आणि 'तोहफ़ा' एकदम बघायचे आणि कोणत्या चित्रपटात कोणते माकड उड्या असलेले गाणे आहे हे आठवायचे असे काहीसे झाले आहे. Tower मधे मारामारी? या भागात न्यू यॉर्क मधील कथा आहे, खाणीत व बोटीवर क्लायमॅक्स आहे. पहिल्यात त्या Nakatomi बिल्डिंग वर आणि दुसर्यात LAX airport वर. आता चौथा पाहायचा आहे.
|
Sashal
| |
| Friday, August 24, 2007 - 11:37 pm: |
| 
|
Oh okay! This helps .. मी action movies मध्ये फ़ारशी interested नाहीये त्यामुळे माझं ज्ञान हे अज्ञान असल्यासारखंच आहे .. मला फ़क्त दोनच भाग आहेत असं वाटत होतं पहिला, LAX airport चा आणी दुसरा Nakatomi building चा ज्यालाच मी tower मधली मारामारी म्हणत होते ..
|
Dineshvs
| |
| Saturday, August 25, 2007 - 3:42 am: |
| 
|
गेल्या रविवारी स्टार वर एक छान सिनेमा दाखवला. न्यु झीलंड मधे हरवलेले ( स्लेज ओढणारे ) कुत्रे असा मुख्य विषय होता. यात मुद्दाम करुन घेतलेला अभिनय नव्हता, तरिपण त्या सगळ्याच कुत्र्यांचा अभिनय लाजबाब होता. त्यांचे प्रेम, अगतिकता, चतुराई सगळेच सुंदर. चित्रीकरणही सुंदर. नाव तेवढे बघायचे राहिले.
|
Zakasrao
| |
| Saturday, August 25, 2007 - 4:07 am: |
| 
|
दिनेशदा त्याच नाव बहुतेक below eight अस होत. मी सध्या जमेल तेव्हडे बॉंड पट बघतोय movies वर.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|