|
mansmi यात आणखी एक कळीचा मुद्दा राहिलाय. एका मुलीचे नावाने अदनानला काही दिवसापासून स्क्रॅप येत होते. अर्थात ती मुलगी बोगसच होती. हीच मंडळी त्याला गंडवत होती. व 'तिनेच' त्याला नव्या मुम्बईच्या पार्टीत बोलावले होते. दुनियेचा अनुभव नसलेला भोळामुलगा फसला आणि प्राणाशी गाठ बसली.(खरे तर तो मायबोलीवर वावरला असता तरी त्याला डुप्लिकेट आय डीची दुनिया कळली असती...)
|
Aashu29
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:29 am: |
| 
|
एकटा, बाकीचे काहितरी sensible बोलत असताना माझी १०० वी पोस्ट वगेरे काय लिहत बसतोस? आम्ही काय करू तुझी १००वी पोस्ट आहे तर? हि घ्या ती लिंक!!http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2297156.cms,
|
Aktta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 12:25 pm: |
| 
|
sensible ती माझी १००रावी पोस्त नाय... या बीबी वरची १००रावी पोष्ट हाय.... आनी हि माझी २९५वी पोष्त हाय... तसदी बद्दल शमस्व.... बाकि इकडे कुठे नमुद केल आहे का कि फ़कस्त sensible लिहायले पाहिजे... एकटा....
|
Ajjuka
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:15 pm: |
| 
|
सूज्ञ माणसांना तसं सांगावं लागत नाही. मायबोलीकर हा सूज्ञ असणे हे मूळ गृहित आहे. कारण जिथे तिथे पिचकार्या मारत फिरायला हा काय पानपट्टीचा स्वर्ग नाही orkut सारखा!! हलके घ्या, जड घ्या दिवे घ्या, अंधार घ्या घ्या, घेऊ नका तुमचा प्रश्न आहे!
|
Farend
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:01 pm: |
| 
|
मी Orkut वर बर्याच दिवसांपूर्वी प्रोफाईल वगैरे टाकली, पण कित्येक दिवस पुढे काय करायचे कळत नाही मायबोलीकरांची कम्युनिटी सापडली, जवळ जवळ सर्व मायबोलीकरांचे (तेथील) प्रोफाईल बघितले, पण तेथेही येथे लिहितो त्यापेक्षा वेगळे काय लिहिणार? मग माझ्या जुन्या कंपनीच्या कम्युनिटी शोधल्या तर त्यात जवळजवळ सात आठ हजार मेम्बर्स निघाले. आता एक एक करून त्यात लोक शोधायचे म्हणजे जन्म जाईल. नशीब मी किती चांगला आहे वगैरे स्क्रॅपबुक पोस्ट कोणी अजून तेथे टाकली नाही , पण मायबोलीवरचे सोडून इतर माझे मित्र मैत्रिणी फारसे कोणी तेथे सापडले नाहीत अजूनतरी. कदाचित आपण ज्यांच्याशी फोनवर आणि ईमेलवर फारसे बोलत नाही असे पूर्वीचे मित्र मैत्रिणी भेटले तर त्यांच्याशी बोलत राहायला बरे आहे... ते ही अमराठी नाहीतर मायबोली आहेच. तशा Cricket , Movies आणि लेखक वगैरे बद्दलच्या कम्युनिटीज आहेत, कदाचित तेथे जाऊन बघायला पाहिजे. पण एकूणच येथे करतो त्यापेक्षा वेगळे काय करणार कळत नाही. एक मात्र फायदा झाला, बर्याच मायबोलीकरांच्या मराठीतून लिहिल्या जाणार्या ब्लॉग्स च्या लिंक्स तेथे सापडल्या, त्या येथे माहीत नव्हत्या. बाकी लोक काय करतात (इतरांना अचाट मेसेज पाठवणारे सोडून )?
|
Disha013
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:55 pm: |
| 
|
आशु, अरे एकट्या, post का मोजत बसतोस? ते पण प्रत्येक BB वरच्या वेगवेगळ्या? कमाल आहे! लई टाईम मिळतो वाट्टं हापिसात. फ़रेन्ड,अगदी हाच प्रश्ण मलाही पडतो. तिथं करु काय? मायबोलीवर बरयं सगळं कसं systematic ! बाकी ती ३,४,मुले अल्पवयीन होती. म्हण्जे खोटे वय देवुन ऑरकुटाची मेंबर झाल्ती वाट्टं.
|
Aktta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:45 pm: |
| 
|
नाय म्या सूज्ञ तरी भी दिवा घेनार आनी बाकी काय हाय ते समद घेनार...काही प्रोब्लेम कुनाला.... वाटल मये mention करावस केल म्या... पुढे भी करल.... काय फ़रक पडतो आहे.... घरी गेल्या वर लय येळ असतो माया पाशी ok समपवा हा विषय.... एक लाइन काय लीहीली चार चार जनी ओरडायला तयार.... येव्हधा sensible विषय चालु असतांना... त्या अतीशुद्र comment कडे र्दुल्कश करायच, सूज्ञ आहात ना तुम्ही... so now onword topic is ओर्कुट वर करायच काय...
|
Aktta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:59 pm: |
| 
|
तर ओर्कुट वर कारायच काय..... मी स्वताच profile upadate करतो... आनी ज्यांनी कोनी profile update केल आहे त्याच्या वर comment मारायची... जे माझ्या frnd लिष्टात आहेत त्यांच्या.... नाय तर बोलाल तुमच्या scrap book मीच लिहितो म्हनुन... बाकी वायफ़ळ time pass पन chatiig मधे जी मजा येते ती ओर्कुट मधे नाय..... एकटा.... (ओर्कुट वर मी ह्या नावाने नाही आहे )
|
http://www.loksatta.com/daily/20070823/mum09.htm या दुर्दैवी तरुणाच्या प्रकरणाची ही अजुन एक बाजूही वाचा!
|
Monakshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:31 am: |
| 
|
लिंबुभाव, अहो ते पान वाचता येत नाहीये, काहीतरी अगम्य भाषेतले फॉन्ट येताहेत. तुम्हाला शक्य असेल तर स्कॅन करुन मला email कराल काय???
|
Zakasrao
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:15 am: |
| 
|
मोना घे तुझ्यासाठी. दिसत नसेल तर ओप्य करुन घे आनि मोठ करुन वाच.

|
Monakshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:16 am: |
| 
|
झ, मोठं करुनसुध्दा नाही वाचता येत आहे. अक्षरं दिसतंच नाहीयेत.
|
Zakasrao
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:51 am: |
| 
|
तुझा मेल ID दे बघु
|
Monakshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:57 am: |
| 
|
पाठवलाय. मिळाला का बघ?
|
mala pan koni mail karel ka???? ASHish....
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2300319.cms त्या प्रकरणाची ही पण बाजु..
|
Monakshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 9:40 am: |
| 
|
खरंच लोपा, हॉरिबल आहे हे सगळं. कधी सुधरणार ही लोकं देव जाणे.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 23, 2007 - 12:00 pm: |
| 
|
बर्याच ठिकाणचं वाचलं या प्रकाराबद्दल... १७ वर्षाच्या अदनानला एवढी महागडी गाडी फिरवायला मिळते ह्यातच घरातले अती लाड आणि दुर्लक्ष दिसत नाही का? १७ वर्षाचं वय म्हणजे एकतर लायसन्स तरी खोटा किंवा बिना लायसन्स. हे आईबापाला चालतं. (क्या बात है!! आम्हाला १८ पूर्ण होईतो गियरच्या स्कूटरला हात न लावू देणारे आमचे आईबाप फारच मागास की काय!!) आणि मेडिया गळे काढतंय या मुलाच्या मृत्यूबद्दल (अशी वेळ वैर्यावरही येऊ नये हे खरंच पण..) त्यांना हे दिसतच नाही का? की तसं लिहिलं तर घोळ होतील त्यांचे? झालं ते भयंकर झालं आणि खुन्यांना शिक्षा व्हायला हवीच हे खरं पण अदनान च्या कम्युनिटीज मधे म्हणे एकसे एक पोर्न, विकृती पोसणार्या कम्युनिटीज आहेत. किंवा त्याच्या मित्रांच्या यादीतही म्हणे अश्या संशयास्पद किंवा आपण तुपण ढुंकूनही बघणार नाही अश्या प्रोफाईल्स आहेत. म्हणजे थोडक्यात 'थ्रिल' साठी त्याने एवढा मोठा धोकाच पदरात घेतला. टीनेजर म्हणजे मुळात सारासार विचार कमी, त्यातून घरात फक्त पैशाने लाड आणि बाकी दुर्लक्ष यामुळे त्याला चांगल्यावाईटाची समजच नव्हती आणि म्हणून असल्या माणसांशी मैत्री केली त्याने. अर्थात बाकीच्या मुलांचे घरातले संस्कार पण काय दिव्य होते हे कळतंच आहे. तो भट आहे त्याचे वडील म्हणतात, "my son is innocent! he is just a kid!" भले.. म्हणजे १८-१९ वयाला खून करूनही बाळ innocent
|
अनुमोदन अज्जुका अजून कुठल्यातरी वृत्तपत्रात त्यांचा त्या दिवसातला क्रम दिला आहे. शनिवारी संध्याकाळी भेटले, रात्रीपर्यंत TP केला, मग ठरवले लोणावळ्याला जाऊया ( ! ), अर्धे गेले, मग ते सोडून परत आले. मग सकाळी अलिबागला गेले वगैरे. सगळच अनिर्बंध. बाकी भट म्हणतात ते बरोबर नाही का? कायद्याने अजून तो सज्ञान नाही
|
Disha013
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:17 pm: |
| 
|
कमाल अस्ते अशा आईवडीलांची पण. मुलगा कुठे जातोय,कुणाला भेटतोय, computer वर नक्की काय करतो, जराही लक्ष नसावे?गाड्या,पैसा दिला की झाले. ऑर्कुटचे इथे निम्मित्त आहे फ़क्त. ऑर्कुट काय किंवा इतरही एखादी साइट असती तरी सगळाच दोष साइटचा नाही. भारतात लायसन्स नसताना गाडी चालवने किरकोळ गुन्हा आहे. लाच दिली की झालं. किती सोप्पं! आणि ते भट अजुन असेही म्हणतात की त्यांच्या मुलाचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये त्यात. केवळ मित्रांमुळे अडकलय त्यांचं बाळ त्याच्यात. त्यातल्या एकाची वैयक्तीक माहिती अशी की वडील नाहीत,आई दुबैत, कॉल सेंटरमधली नोकरी त्याने गमावलेली. म्हणुन त्याला पैसे हवे होते म्हणे. ते घेवुन तो दुबईला जाणार होता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|