Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 09, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » नावे पहावी ठेवून » Archive through August 09, 2007 « Previous Next »

Sayuri
Tuesday, August 07, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच नवीन नाव ऐकलं मुलाचं. श्वेतांक.
काय अर्थ असावा?

Panna
Tuesday, August 07, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमाल पत्रावरुन आठवले, माझ्या ओळखितल्या एका लहान मुलीचे नाव आहे "एलिका". अर्थ काय, तर म्हणे वेलची!! म्हटलं मुलगा झाला तर नाव काय ठेवणार? वेलदोडा??
लवकरच सगळा खडा मसाला तयार होईल बहुतेक!!

Alpana
Wednesday, August 08, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुंजन नाव मुलाचे पण असते...गुज्जु लोक ठेवतात

Ajjuka
Wednesday, August 08, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी...
श्वेतांक पांढरी मांडी! काय पण नाव आहे!
बर ते मयंक नाव ऐकू येतं त्याचा अर्थ काय.
अर्थ काही असो मला आपल ते नाव कायम संस्कृत साहित्यातला मोडका मंचक असं वाटत. तस्मात मंचक मोडल्यावर मयंक होतो अस.. :-)


Dineshvs
Wednesday, August 08, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मयंक म्हणजे मोर. मुलाचे नाव म्हणुन वाईट नाही ते.

Sayuri
Wednesday, August 08, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका! खरंच काहीच्या काहीच नाव आहे मग!

Disha013
Wednesday, August 08, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयंक म्हण्जे चंद्र बहुतेक....

Zakki
Wednesday, August 08, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलांजन हे एक बंगाली नाव ऐकले. माझ्या ओलखीच्या एका बंगाली बाईच्या नवर्‍याचे. काय अर्थ? नीरांजन? हे नाव? मग उदबत्ति, फुलवाती अशी नावे चालतील का?


Sahi
Wednesday, August 08, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन कळालेली नावे
विहान पहाट
अन्शुल्= सकाळ
मला सारख वहाण किन्वा वहान (रहदारीतील) असे वाटत होते...


Arch
Wednesday, August 08, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बघा चार भावंडाची नावं

पूजा, अर्चना, आरती, आणि प्रसाद.


Abhijit
Wednesday, August 08, 2007 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घ्या अजून..

उमंग, तरंग, अनुरंग

मिहीर, मल्लीका, केशव


Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका विद्यार्थ्याचे नाव आणि त्याच्या भावांची नावे
देव, दर्शन, प्रसन्न
बहिण असती तर पूजा किंवा आरतीच असती हमखास!


Ashishmate
Thursday, August 09, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मेहेता रोज "नवीन" नाव वापरतो
ASHish...


Savani
Thursday, August 09, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेम आर्च, माझ्या पण ओळखीत ह्या नावाची भावंडं आहेत. फ़क्त अर्चना नाहीये त्यात.
मध्यंतरी ऐकलेलं एक नाव म्हंजे शिंपली. आता दुसरा मुलगा झाला तर नाव काय शंख ठेवणार की काय कोण जाणे.
ही अशी नाव आत्ता लहान असताना बरीयेत पण मोठेपणी कशी वाटतील? समजा उद्या लग्न पत्रिकेत लिहायचं झालं तर चि.सौ.कां शिंपली... कसलं विनोदी वाटतयं..
माझ्या बहिणीची मैत्रीण होती.. ट्विंकल फ़ाटक.
हल्ली चक्क हिंदी नाव ठेवायची काय फ़ॅशन आलीये? एकाच्या मुलिचे नाव आहे सुहानी. नाव छान आहे. पण सुहानी अत्रे..जरा odd च.


Robeenhood
Thursday, August 09, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयंक म्हनजे मोरच. ते बहुधा श्वेतांग असावे.म्हणजे खूप गोरा.

बोवाजी, नीलांजन हे शनिदेवाचे नाव आहे. शनी वाईट असला तरी तो सूर्यपुत्र आहे...


Tanyabedekar
Thursday, August 09, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बाबांच्या एका मित्राला तीन मुले आहेत. २ मुले आणि एक मुलगी. त्यांची नावे आहेत, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण.. कारण हे की सरकार सन्मान देवो ना देवो, मुले जेव्हा नाव लिहितिल तेव्हा आपोआप मागे ह्या उपाध्या लागतील.
उदा: पद्मश्री/ पद्मभूषण्/ पद्मविभूषण एक्स वाय झी पाटिल


Arch
Thursday, August 09, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंतनु, अरे छानच आहेत नावं. What a thinking!

Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मित्राने struggle च्या काळात ठरवले होते की काही झालं तरी मुलाचं नाव अभिनेता ठेवणार. म्हणजे तरी अभिनेता अमुक तमुक असं म्हणलं जाईल.
पण त्याच्या मुलाच्या सुदैवाने तो जन्मायच्या आत माझा मित्र अभिनेता झाला होता. :-) त्यामुळे मुलाचे नाव आपले साधे सरळ दिविज ठेवले.


Zakki
Thursday, August 09, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, धन्यवाद.

कुणि केतू नावाचे आहेत का इथे?


Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो असा सूर्यमालेतून आवाज आला!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators