Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » नावे पहावी ठेवून » Archive through August 07, 2007 « Previous Next »

Lajo
Sunday, August 05, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरीन म्हणजे आरी (शत्रु)चा नाश करणारा... सुदर्शन चक्र
अजुन कही बंगाली नाव... पापिया... अर्थ माहित नाही

सौमी... म्हणताना शौमी म्हणायचे... अर्थ सौम्य, साधी, सरळ....


Deepanjali
Sunday, August 05, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन कही बंगाली नाव... पापिया... अर्थ माहित नाही

<<<< ' पपिहा ' नाव आहे माझ्या एका बंगाली मैत्रीणीचं .
अर्थ नक्की माहित नाही , पन कदाचित ' कोकिळा ' असेल .


Yogesh_damle
Sunday, August 05, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथे एक 'कशिश' आहे. खंत-रुखरुख किंवा 'आतडी पिळवटणे' असल्या अर्थाचं ते abstract noun आहे. ह्या नावाचं काय प्रयोजन माहित नाही...
__________________
डाॅ. नेनेंच्या लेकांची नावं फ़ार्सीतून उचलल्याचं कळतं.. Ryan चा उच्चार 'रयान' असा होतो... अर्थ मलाही माहित नाही.
__________________
२००६च्या 'सवाई' मध्ये मध्ये अमजदजींना साथसंगत करायला एक बंगाली तरूण होता... त्याचं रेशनकार्डावरचं नाव त्याच्यासारखंच अवजड होतं, पण त्या दीडदोनशे पौंडाच्या चिमुकल्याचा परिचय अमजदजींनी 'बुबुई' असा केला... ह्या बंगाल्यांची बेसिक उच्चारात बोंब असते- (ओ भागने का चेष्टा काॅडता हाय... हामारा घार पे भोजन को आना) (पक्षी- जेवण नव्हे, भजनं म्हणायला :-) )

आणि नावं? विवस्वान (बिबोश्शाॅन, टोपणनाव टुकी), सौम्यार्क (शोम्मार्को. ह्याला शोम म्हणतात), सुतपा (शुतोपा झाली, पण म्हणतात रुमकी!!)
__________________

चिनी नावांचे दोन जोक्स-
१) चिनी बाळाचं बारसं कसं करतात? सगळे वडीलधारे जमतात, मंत्रघोषात एक पिढिजात पितळी भांडं देवघराच्या कोपर्‍यात फेकतात. जो आवाज होईल ते नाव!! :-)

२) Chu, Bu आणि Fu ही भावंडं अमेरिकेत व्यापाराला गेली... Chu ने आपलं नाव Chuck ठेवलं, त्याचामुळे Bu ने आपलं नाव Buck ठेवलं...

Fu ने परतीचं विमान धरलं!! :-)


Rani_2007
Sunday, August 05, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, एकडे लक्षच गेले नव्हते. खूपच मजेशीर नावे आहेत.

माझ्या एका वर्गातल्या मुलीचे नाव 'सुझुकि' (मराठीच कुटुंब होते). आमच्या एक शास्त्र शिकवणार्‍या बाई नेहमी तिची नावावरनं फिरकी घेत.

माझ्या इथल्या एका मराठी मैत्रिणिच्या मुलिचे नाव 'लिशा' .... अर्थ काय?

माझ्या एका भारतातल्या भाचिचे नाव 'रिचल'. अर्थ मुलीच्या आईलाही माहित नाहि. ती म्हटली की चांगले (??) वाटले म्हणून ठेवले.


Lalitas
Sunday, August 05, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच एक बंगाली भेटला..... त्याचं नाव होतं तमाल मुखर्जी. त्याने अर्थ सांगितला, कदंब वृक्षाचं पान म्हणजे तमाल! कुणास ठाऊक?

Kedarjoshi
Monday, August 06, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमाल पत्र हे मसाल्यात असत. मसाल्याचा एक प्रकार.

वर राहुल ने चिनी लोकांचे नाव कसे ठेवतात हे विनोदात सांगीतले पण ती पध्दत अस्तित्वात आहे. अमेरिकन नेटीव्ह (लाल भारतीय) लोकांच्या एका जमातीत जन्म झाल्यावर त्या मुला ने कशाला हात लावला कींवा काय त्यावर आदळले ह्यावरुन त्यांची नाव ठरत असत. जसे वॉकींग स्टिक (हे खरे नाव आहे). आपल्या कडे एखाद्या गुंडाल जसे नाव देत हकला शकील, सलीम लंगडा तसे काहीसे. आता ती पध्दत (अन जमात) नष्ट होत चाललेत असे एका मूळ रहीवाशाने सांगीतले.

काल माझ्या मित्राने त्याचा मुलाचे नाव ठेवले समिहान. (वडील सचिन आई मिनल म्हणुन समि). विष्णू चे नाव आहे बहुतेक.


Zakasrao
Monday, August 06, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश
btw चम्या, झम्प्या,बेंबट्या ही टोपण नाव कशी वाटतात. :-)


Alpana
Monday, August 06, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i asked the meaning of Poulami to that girl.. according to her there was some rishi named pulomi after which she was named... the name is actually pulomi or something like that but bcoz she bengoli..it spells poulomi...

Lajo
Monday, August 06, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं दीपांजली पपिहा नाही त्यांच नाव पापिया च आहे...

Ajjuka
Monday, August 06, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पण एका मित्राच्या मुलीचे नाव समीहा आहे. त्याने सांगितला होता अर्थ पण आता लक्षात नाही.

माझ्या एका मामेबहिणीचे नाव समीक्षा आहे. अर्थ माहितीये पण तरी समीक्षा हे नाव ती कन्या आता १६-१७ वर्षाची झाली असली तरी मला रिचवता आलेले नाहीये.

आमच्या UGA च्या theatre department मधे एक बालीचा माणूस होता. डॉक्टरेट करत होता. त्याच्या मुलाचे नाव सदाना आणि मुलीचे नाव जॉर्जिया होते. जॉर्जिया मधे जन्मली म्हणून जॉर्जिया.

दुसरी एक काळू मुलगी होती तिथेच तिचे नाव होते शापूर. मी आपले शापूर हे नाव शापूरजी पालनजी यासंदर्भातच ऐकले होते. मुलीचे नाव जाम ऑड वाटले. तिने सांगितले ते एका मिडल इस्ट मधल्या राजाचे नाव आहे. अगं पण तू तर मुलगी आहेस ना मग राजाचे नाव? असं विचारल्यावर आईने आधीच ठरवले होते त्यामुळे तिने तेच ठेवले मुलगी झाल्यावरही असं ती म्हणाली.



Ksmita
Monday, August 06, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगाली नावे टापुर टुपुर , Pompa ,Pompi, कुनकुन यांचा काय अर्थ असेल ?


Ajjuka
Monday, August 06, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या रूममेटच्या एक्स चे टोपणनाव बुबना होते (बंगाली अर्थातच.. ट्यु आणि असाम्या माफ करा!!)

Karadkar
Monday, August 06, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे नाव पण बंगाली - एका बांग्लादेशी मित्राशिवाय कुणालाही कळले नाही अस्र्थ काय असेल ते

अजुन काही विचित्र नावे - बराक - हा प्राणि Costa Rica चा आहे.
कोपल - उत्तरप्रदेशीय मुलीचे नाव

एका पंजाबी मैत्रीणीचे नाव नवजोत, तिच्य बहीणीचे अमन, चुलत बहीणीचे नवलीन, मामेबहीणीचे जेस्सिका
घरात बरेच पम्मी, बेबी, रोझी, पिंकी ही खरी नावे असलेले प्राणी आहेत.
त्याहुन height म्हणजे मामचे नाव अमर्जीत्सिंग आणि मावशीचे नाव अमर्जीत्कौर (ही सख्खी भावंडे आहेत!!!)
आर्च म्हणते तसला एक प्राणी मला विमानात भेटला होता - नाव सांगितले - मायकल गोपीचंद !!!



Lalitas
Tuesday, August 07, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती हे नांव बंगाल्यांत प्रचलित आहे...
कोपल म्हणजे अंकुर
आणखी एक मुलीचं नाव.. अर्थात बंगालीच... आणिमा! पहिल्यांदा ऐकलं तेव्हा विचित्र वाटलं, नंतर कळलं.... अणिमा म्हणजे अलंकार!


Aashu29
Tuesday, August 07, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pranoti mhanje kay koni sangal ka??????

Yashwant
Tuesday, August 07, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रनव म्हनजे ओम्कार. ओम्काराला जन्म देनारी ती प्रनोती. मला वाटते याचा अर्थ पार्वती असावा.

Swa_26
Tuesday, August 07, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकलेली काही नावे: अनचली, सत्यकाम, सर्वदमन..

Alpana
Tuesday, August 07, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक नाव.... बहुतेक बंगाली.. अबनी, बहुतेक अवनी असेल त्याचे बन्गालीत अबनी झाले असेल, पण इथे हे मुलीचे नाही मुलाचे नाव आहे

Manjud
Tuesday, August 07, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल एका दिवाळी अंकात नायिकेचे नाव वाचले गुंजन.

गुंजन ते असतं. मग ते मुलीचं नाव कसं काय? तसंच मुलीचं नाव श्लोका (तो श्लोक) मला पटत नाही. पंकज ह्या नावाचा अर्थ (ते ) कमळ असा घेतला तर ते मुलाचं नाव कसं? अशी बरीच नावं आहेत....

अजुन एक मला नं आवडणारं नाव " समिधा "




Sunidhee
Tuesday, August 07, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण सारखी नावे ठेवु नयेत..
आमच्या एका दोस्ताच्या बायको आणि मुलीची नावे प्रिया आणि प्रीती अशी होती.. तुम्ही म्हणाल "ह्यात काय विशेष?". पण मग त्याच्या दोस्तांचा घोटाळा व्हायचा ना !! एकजण पहिल्यांदाच त्याच्या घरी गेला होता. तेव्हा मुलगी तिथेच खेळत होती.. त्याला दोघींची नावे माहीत होती. हा दोस्त म्हणायला लागला. "प्रिया ये गं, ये माझ्यापाशी.. तुला खाऊ देतो, ये लवकर माझ्यापाशी". तिकडे नवरा-बायको दोघे अस्वस्थ झाले. मुलगी तर बघेना. मग नवरा बोलला, "प्रिया माझ्या बायकोचे नाव आहे आणि प्रीती मुलीचे". ह्या दोस्ताचा गोंधळ झाला होता "प्रि-प्री" मुळे. लाजले तिघेही.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators