Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 30, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 30, 2007 « Previous Next »

Pancha
Sunday, July 22, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक धमाल विनोदी चित्रपट पाहीला. Nuvvu Naaku Nachchav, telugu आहे english subitles आहेत nice movie

त्याचे नंतरचे सगळे मूवी मी बघायचे सोडले त्याची overacting बघुन.
- तुला त्याचे आधिचे म्हणायचे आहे का?


Manuswini
Sunday, July 22, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आधीचे म्हणायचे होते. :-)

Mahaguru
Monday, July 23, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टनर : हा चित्रपट पाहण्याच्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवुनच चित्रपट पहावा -
ह्या चित्रपटाचा आणि मराठीतील 'पार्टनर' ह्या साहित्याचा काडिचाही संबंध नाही. ह्या चित्रपट डेव्हिड धवन चा असल्यामुळे उगाचच चित्रपट कथा, निर्मिती मुल्ये, समाज प्रबोधन logic , दोन scene मधली connectivity असल्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ व शक्ती वाया घालवु नये. ह्यातील गाणी खुप चांगली असुन ती आपल्याला पुढे कधी मधी सारेगमपा मधे म्हणायला उपयोगी पडतील ही समजुत डोक्यातुन काढुन टाका. DVD बघत असाल तर FF बटन वापरुन गाणे संपवावे.
बाकी (काही राहिलेच असेल आणि तुमचा निर्धार पक्का असेल तर) चित्रपट ओके /timepass आहे. दोन scene चा संदर्भ लावत बसु नये. आहे तो scene एकदम enjoy करा. डायलॉग (बहुतेक सलमान ने लिहली असावीत) काही काही ठिकाणी मजेदार आहेत. एका मागोमाग पंचेस आहेत. पुष्कळ ठिकाणी पानचट जोक्स टाकले आहेत. (म्हणजे मुलांना घेवुन बघण्यालयक नाही. अर्थात मुले किती समजुतदार आहेत त्यावर आहे. आजकाल उगाच गे ह्या नावाखाली काहीही बरगळले की क्लासिक जोक होतो हा हिंदी चित्रपट सृष्टीतिल नविन सिद्धांत असावा ) गाविंदाचा रोल secondary आहे पण तोच भाव खावुन जातो. इतका मोटा असुन पण dance steps चांगल्या करतो. कतरीना मस्त दिसते.
चित्रपट संपेपर्यन्त पडद्यावर आहे तो scene enjoy करावा आणि the end आल्यावर सगले विसरुन आपापल्या कामाला लागावे.
थोडक्यात हा चित्रपटाकडुन उगाच ऑस्कर वगैरेची अपेक्षा न ठेवता पडद्यावरचा 'भास्कर'चा विनोद enjoy करावा. २ तास हसुन करमणुक करुन घ्यवी.


Lopamudraa
Tuesday, July 24, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टनर : हा चित्रपट पाहण्याच्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवुनच चित्रपट पहावा ->>>
मराठीतील 'पार्टनर' ह्या साहित्याचा काडिचाही संबंध नाही.>>>>
DVD बघत असाल तर FF बटन वापरुन गाणे संपवावे.>. डेव्हिड धवन चा असल्यामुळे उगाचच चित्रपट कथा, निर्मिती मुल्ये, समाज प्रबोधन logic , दोन scene मधली connectivity असल्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ व शक्ती वाया घालवु नये. ह्यातील गाणी खुप चांगली असुन ती आपल्याला पुढे कधी मधी सारेगमपा मधे >>>चित्रपटाकडुन उगाच ऑस्कर वगैरेची अपेक्षा न ठेवता >>>.
महागुरु, ... एकतर डेविड धवनचा चा सिनेमा वर त्यात गोविंदा आणि सलमान.(करेला उपरसे निम चढा)
अहो सिनेमाला जाणारे partner आणि oscar चा विचार करुन कशला जातील हो..?


Pancha
Wednesday, July 25, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टनर बघितला, गोविंदा चा अभिनय आणि काही तुरळक dialog सोडुन इतर सर्व बकवास. the most illogical movie, try it at home, dont waste your time and money to watch it in theater Hitch चा poor remake आहे.

Deepanjali
Wednesday, July 25, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टनर बर्‍यापैकी Will smith च्या 'Hitch' वरून उचलला आहे .
काही आचरटपणा सोडला तर tp आहे , काही काही संवाद एकदम मस्त जमलेत ,Govinda rocks!!
कत्रिना एकदम चिकनी दिसते , लारा अत्यंत फ़डतुस !
:-)

Swaneel
Wednesday, July 25, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली


पार्टनर हा सिनेमा हिच वरुनच घेतला आहे.


Disha013
Wednesday, July 25, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपका सुरुर बघितला एकेदाचा. संयमाची परिक्षा. प्रत्येक फ़्रेम मध्ये हिमेसचे (टोपीसकट) दर्शन. तो न त्याच्या रंगीबेरंगी टोप्या हंसिका बाईचा अभिनय हिमेसच्या तोडीस तोड. हे दोघे भेटले की background ला गायत्रीमंत्र सुरु होतो!!

मल्लीका एकदम त्याला मदत कशी काय करते ते समजायला मार्ग नाही.
या हिमेशला त्याच्या नाकाची जाम काळजी घ्यावी लागत असणार.(विमा उतरवलाच असणार नाकाचा)


Sayuri
Wednesday, July 25, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म सूरूर चा सूड म्हणून हिमेशची सुपारी घेतली बहुतेक. :-)सकाळ मध्ये वाचलं का..
http://www.esakal.com/esakal/07252007/Tajyabatmya347691DC35.htm

Alpana
Thursday, July 26, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिन तास हिमेश ला बघायचा विचार सहनच होत नाही...पण माझा ऑटोवाला म्हणत होता की आम्ही ५-६ वेळा पहिला.. बहुतेक ऑटोवाल्यांनी, पण कशामुळे ते मात्र नाही सांगितले त्याने

Kedarjoshi
Thursday, July 26, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक जबरी किस्सा माझ्या मित्राने मला आत्ताच सांगीतला.

हनिमुन प्रा. लि हा पिक्चर ची DVD त्याचा बायकोला पाहीजे होती. तीने त्या गुज्जु दुकानदाराला विचारले. तो थोडा म्हातारा होता. व हनिमुन पिक्चर च्या DVDs अजुन आल्या न्हवत्या त्याला बहुतेक अशा नावाचा पिक्चर आहे हेच माहीती न्हवते.

ती - हनिमुन प्रा. लि की DVD देना.
तो - क्या. हम ऐसे पिक्चर नही रखते, दुसरे दुकान मे देखो.



Chinya1985
Thursday, July 26, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज नकाब बघितला. चांगला आहे. एकदा बघण्यासारखा आहे. पण २ तास पण चालत नाही पिक्चर. एक गाण सही आहे. बाकी हिरो मुद्दाम पटवायला जातो आणि हिरॉईन पहिल्या भेटीतच प्रेमात पडते हे पटत नाही.

Shyamli
Friday, July 27, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल यात्रा बघितला
रेखा, दिप्ती नवल, नाना
रेखा, दिप्ती नवल, नाना नेहमीप्रमाणेच perfect.

ज्यांना serious movies बघायला आवडतात त्यांनी बघायला हरकत नाही

लोखंडवाला बघवत नाही अजिबात :-(
मेट्रो>>> हं!


Aktta
Friday, July 27, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bheja fry... its ringing .... must see.... hahahahaha :-)
एकटा....

Aktta
Saturday, July 28, 2007 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Partner pan time pass ahe gani pan time pass ahe....... i like sony de nakhare
"change the topic... change the topic " :-)
एकटा....

Shyamli
Sunday, July 29, 2007 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनी कम बद्दल अजुन माहिती :-)
मुळ movie कन्नड आहे, ब-याच गाण्यांच्या चाली जशाच्या तशा घेतल्या आहेत.

"जाने दो ना" च मुळ गाण ऐकायला यापेक्षा फाsssरच मस्त :-)
हे गाण ऐकल्यापासुन परत एकदा कन्नड गाण्यांच्या प्रेमात पडायला झालं :-)


Robeenhood
Sunday, July 29, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीनी कम चे संगीत इलय राजाने दिले आहे. बहुधा दाक्षिणात्य संगीत कार रेहमान, क्रीम, राजा हिन्दीत येताना बर्‍याचदा मूळ चाली वापरतात. अर्थात त्या त्यांच्याच असल्याने चोरीचा प्रश्नच नाही. हृदयनाथ मंगेशकरानी ही प्रार्थना आणि धनवान मध्ये असे केले होते,.

दाक्षिणात्य चित्रपटसंगीतात orchestration शान्त असल्याने हिन्दीच्या ढणढणाटाच्या पार्श्वभूमीवर कळत नसले तरी ऐकायला फार बरे वाटते. महालक्ष्मी अय्यर आणि एस पी बाल. चे एक ड्युएट मी नेहमी ऐकतो दिशान्तवर. चित्रपटच काय पण भाषाही मला माहीत नाही. पण फारच सुरेख...


Chinya1985
Sunday, July 29, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज 'शुभमंगल सावधान' बघितला. ठीक आहे. पण एक कळत नाही की त्या हिरॉईनला घटस्फ़ोट घे अस म्हणनारी रीमा लागु लगेच ५ मिनीटांनी डॉक्टरला 'मला मुल आणि सुप्रिया' दोघेही हवेत वगैरे कस काय म्हणायला लागते???मला हे कळत नाही की या आपल्या चित्रपटांच्या हीरॉईन्स बरोबर गरोदर असतानाच कशा काय पडतात??

Rutu_hirwaa
Monday, July 30, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली
अग छान माहिती दिलीस ना..
चित्रपट यथातथा पण गोड गाणी आहेत
माझ्या मते ३ च गाणी आहेत.
ए मग ती कन्नड गाणी कुठे मिळतील ग??


Gajanandesai
Monday, July 30, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, Bombay , दिल से, रोजा, साथिया वगैरे चित्रपटांची गाणी शब्द वगळता जशीच्या तशी हिंदीत आली आहेत. माझा एक कलीग मल्लू आहे आणि त्याच्याकडे हा सगळा संग्रह आहे. हापिसातल्या पीसीवर. :-)
इलय राजा म्हणजे एआरचा गुरू!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators