| | Dhumketu 
 |  |  |  | Monday, June 11, 2007 - 12:15 pm: |       |  
 | 
 महाराष्ट्रात अ-मराठी कामवाली? ऐ.ते. न.
 म्हणजे आता ह्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची? चांगले तर म्हणता येत नाही कारण ह्याही कामात आता अ-मराठी लोक घुसायला लागले.
 वाईटही म्हणता येत नाही कारण आता हिंदी पिक्चर मधे अ-मराठीही बाया-बापडे दिसतील.
 
 
 | 
| ये गेट कब उघडेंगे???
 
 
 | 
| हे खरच घडले आहे.
 शरद पवारांचे वाक्य
 महाराष्ट्र के कुछ हिस्सोंमे इतना सुखा पडा है के लोगो को खाने को चार घास भी मिलना मुष्किल हो गया है.
 
 बाकी हिंदी भाषिक लोक बुचकळ्यात. मराठी लोक चार प्रकारचे गवत खातात की काय?
 
 
 | 
| | Manjud 
 |  |  |  | Tuesday, June 12, 2007 - 12:08 pm: |       |  
 | 
 dhumketu ,
 
 पोटासाठी काय काय करावे लागते..... निदान ह्या पोट-व्यवसायात तरी मराठी अमराठी आणू नका. आमच्यासारख्या नोकरी करणार्यान्चे किती हाल होतील
 
 वाईटही म्हणता येत नाही कारण आता हिंदी पिक्चर मधे अ-मराठीही बाया-बापडे दिसतील.
 
 तसेही हिन्दी पिक्च्चर मधे अमराठीच लोक असणार ना  majority  मधे?
 
 
 | 
| | Dhumketu 
 |  |  |  | Wednesday, June 13, 2007 - 5:23 am: |       |  
 | 
 मला नोकर माणसे म्हणायची होती..
 
 
 | 
| मै कबसे चिल्ला रहा हुं, तेरेको ऐकु नही आता क्या?????
 
 
 | 
| मुंबईला आणि पुण्याला असतांना अगदी सहज शुद्ध हिंदी तोंडातून निघायची... आता मात्र बेसावध झोपेत लाळ गळावी तशी तोंडातून मराठी गळते... (कारण, घरात परतलो की रूममेट्स आणि मी मराठीशिवाय कुठल्याही भाषेत बोलत नाही. बाहेर मात्र...)
 
 "कहाँ जाना है? ग्रेटर कैलाश?"
 "हो..."
  ) 
 
 | 
| कालचाच किस्सा-अरे वो जोरजोरसे इतनी बार हाका मार रही है
 
 
 | 
| मला माझ्या आॅफ़ीसमधला एक किस्सा आठवला
 
 आमच्या ग्रूपमध्ये एक केरळचा मुलगा होता... जिजेश आम्ही मल्लू म्हणायचो त्याला
 तसा हिन्दी छान बोलायचा तो नी मराठी थोडे थोडे समजायचे..
 
 आणि एक इस्लामपूर चा मुलगा होता..मन्गेश त्याचे हिन्दी असे अगदी छान मराठमोळ्या वाटेने जायचे
 पण तो जिजेश शी हिन्दी बोलण्याची जिवापार कोशिश करायचा..
 
 एकदा आमचे असेच बोलणे चलु होते कस्तुरिम्रुगावरून..
 
 जिजेश ला अर्थातच काही कळेना..
 झाले मन्गेश पुढे सरसावून म्हणाला
 "अरे तुम कस्तुरीम्रुग नहि जानते वोह हरिण होता है न जिसके जिसके बेम्बी मे कस्तुरी होती है और वोह बात वो छोडके सब को पहिलेसे ही पता रेहेती है .. "
 
 हे ऐकून आमची ह. ह. पु. वा. !! आणि जिजेश तर वेडा च झाला....त्याच्या डोक्यावरून विमाने च विमाने
 
 
 | 
| ऋतु
   हा किस्सा कॉपी करून मेल मधे पाठवला तर चालेल का?
 
 
 | 
| हा जी जरूर चालेगा
   
 
 | 
| | Gs1 
 |  |  |  | Tuesday, July 03, 2007 - 8:17 am: |       |  
 | 
 
 राष्ट्रवादी विचारसरणीने काम करणार्या सामाजिक आणि राजकीय नेत्यांची बैठक चालू होती. विषय गंभीर होता आणि जरा तणावपूर्ण वातावरण होते.
 
 उत्तम वक्ता असलेल्या दिल्लीस्थित प्रसिद्ध महिला नेता अगदी तावातावाने आपला मुद्दा मांडत होत्या.
 
 विदर्भातले लोकप्रिय मराठी नेते तो मुद्दा पटून म्हणाले 'इस विषयपर हमे खोली मे जाकर चर्चा करनी चाहिये.'
 
 त्या एकदम तडकून म्हणाल्या 'खोली मे क्यों, यहां क्यों नही ?'
 
 मराठी आणि हिंदी दोन्ही येणारे जे पाच सहा जण होते ते हसून गडाबडा लोळायची वेळ आली.
 
 
 
 | 
| | Monakshi 
 |  |  |  | Tuesday, July 03, 2007 - 8:44 am: |       |  
 | 
 GS1
 
 
         
 अगदी खोलीत जाऊन हसले.
 
 
 | 
| GS1
  ... .... .... ... 
 
 | 
| | Dineshvs 
 |  |  |  | Tuesday, July 03, 2007 - 4:41 pm: |       |  
 | 
 GS1  पांडेजी ने विचार यहाँ मांडे है, असे एक वाक्य राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याच्या नावे खपवले जाते नेहमी.
 
 
 | 
| गोविंद
   >> विचार मांडे है.
 धन्य आहे.
   
 
 | 
| | Zakasrao 
 |  |  |  | Wednesday, July 04, 2007 - 8:27 am: |       |  
 | 
 
  GS दिनेशदा
   .. .. .. ..
 
 
 | 
| | Runi 
 |  |  |  | Thursday, July 05, 2007 - 8:05 pm: |       |  
 | 
 GS1 , दिनेशदा मस्त्च.
 मी पुणे  university  मध्ये असताना, एकदा आम्च्या वर्गात्ला एक मराठी मुलगा दुसर्या बंगाली मुलाला आगीतुन निघुन फुफाट्यात जाणे या म्हणीचा अर्थ हिंदीत समजावुन सांगत होता.
 त्याने त्या बंगाली मुलाला विचारले तुम्को फुफाट पता है ना,  u know  फुफाट  right . तो आग से उसमे जाने का. त्या बंगाल्याच्या चेहर्यावरची एकहि रेष हालली नाही, त्याला काहिच झेपत नव्हते आणि आम्ही सगळे पोट धरुन हसत होतो. शेवटी त्या मराठी मुलाने त्या म्हणीचे  english  मध्ये  From frying pan to Phuphataa  असे भाषांतर केले.
 
 
 | 
| >> u know फुफाट right
 ये हुई ना बात! जय महाराष्ट्र!
 रुनी
   
 
 | 
| फुफाट.....!
 
 रुनी, हसून हसून पोट दुखायला लागले. मस्त.
 
 
 |