Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 09, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 09, 2007 « Previous Next »

Mrinmayee
Friday, July 06, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॅटटुई चं ट्रेलर बघायचंय? ही घ्या ऑफिशिअल वेब साईट
http://www.disney.go.com/disneypictures/ratatouille/

Dineshvs
Friday, July 06, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिण्मयी, ट्रेलरही छान आहे. आणि डिस्नेची क्वालिटी, रंग आहा !!!

Robeenhood
Friday, July 06, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही बरे-
Illusionist, Pan's Labyrinth, The Queen, Deja vu , चीनी कम

>>>>
लालू चीनी कम ला बरा म्हणू नकोस. तुझ्या बुद्धीची कींव केली जाईल. इथल्या काही पोस्टवरून इतका वाईट चित्रपट जगाच्या इतिहासात झाला नाही असे माझे मत झाले आहे.

Mansmi18
Friday, July 06, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ट्रेलर पाहिला AKS चा त्यात "रिक्षा" पोलिस च्या गाडीवर चढताना दिसल्या. जर्मनीत रिक्षा असण्याचे काही लॉजिक दिले आहे का?

पण काहीही असो त्या माणसात प्रचंड confidence आहे. केवळ स्वत:च्या fans च्या बळावर असा चित्रपट हिट करणे म्हणजे कमाल आहे.
त्याने already AKS-2 वर काम सुरु केले आहे. आता त्याच्या पुढील प्रत्येक चित्रपटात तो, त्याचा आवाज आणि त्याचे music असणार आहे. (वाचवा!! वाचवा!:-)



Asami
Friday, July 06, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pan's Labyrinth चे special effects नितांत सुंदर आहेत. निव्वळ त्यासाठी तरी movie पहावा.

Aktta
Saturday, July 07, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ek Chalis Ki Last Local.... massta aahe.... nice moves ....
Aktta...

Itgirl
Saturday, July 07, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी, मी नवीनच join झाले आहे,मला पण आवडेल तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला. मला पण चीनी कम बरा वाटला, पण मध्यंतरापर्यंतच... नंतर रटाळ वाटला.. तब्बू मात्र नेहमीप्रमाणेच great .

Aktta
Saturday, July 07, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Guru ....no comments...

Aap Ka Suroor... माझ्या सहंशक्ति चा मला अभीमान आहे......
ते एकपात्री... का काय ते असच असतका???? :-)


एकटा...


Aktta
Sunday, July 08, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीनी कम.... मला कुठेच चीनी कम नाही वाटली..... एकदम फ़क्कड...
एकटा....


Pancha
Sunday, July 08, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Stop! (2004) Hindi - Good
Little Miss Sunshine English - Good
Nana Mama Marathi - Average

आपका सु घुरूर हिन्दी This movie was better than expected, still average. Auto Rickshaws are very much in Germany and other parts of Europe. Bajaj exports them.


Itgirl
Sunday, July 08, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aktta चीनी कम आहे चांगलाच..पण मध्यंतरानंतर परेश रावळ चे काही प्रसंग खटकले...काही संवाद पण...जसे तब्बू वडिलांना विचारते कि कधी वर जाणार...किंवा, अमिताभ style मधली Dialogue बाजी- शेवटचा ती छोटी मुलगी गेल्यानंतरचे प्रसंग...एकूणच अगोदर जाणवलेली वेगळी treatment तशीच टिकवलेली नाही अस वाटल.

Asmaani
Sunday, July 08, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल सरीवर सरी पाहिला. फारसा नाही आवडला. प्राप्त परीस्थितीतून वर येण्यासाठीचा संघर्ष दाखवायचा तर मॉडेलिंग शिवाय इतरही क्षेत्रे उपलब्ध आहेत की! अगदी त्याच चित्रपटात नायिकेची मोठी बहीणही संघर्ष करुनच डॉक्टर झालेली दाखवलीये.
दुसरे म्हणजे वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ( सॉरी पण ह्या bb वरचे आधीचे archives बरेच दिवसांपूर्वी वाचले होते. त्यामुळे नक्की कुणी लिहिलेय ते आठवत नाहीये!) नायिकेचे वडील केवळ एक नाटकी dialog ऐकून तिला माफ करतात आणि nudes कराय्ची परवानगी देतात हे ही पटत नाही. ( त्यावेळी मोहन जोशी च्या चेहेर्‍यावरची भाव पाहून त्याला nudes म्हणजे काय ते कळलेच नाहीये असे वाटते.)


Deepanjali
Sunday, July 08, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi आसमानी ,
सरीवर सरी बद्दल negative मीच लिहिले होते:-)
मला movie चा शेवट आणि कथेतील major characters प्रचंड confused वाटली .
मॉडेलिंग क्षेत्रा बद्दल movie आहे म्हणून खूप उत्सुकता होती पण तो विषय अगदीच वरवर हताळल्या सारखं वाटलं , उगीच over rated आणि खूप भडक वाटला overall movie.
दिग्दर्शन - कथा , पटकथा सगळच poor वाटलं .
सर्व सामान्य घरातल्या मुलीचा या क्षेत्रा मधला संघर्ष हा विषय खूप deep दाखवता आला असता .
सरीवर सरी मधे तिचा मॉडेलिंग मधे career graph अगदीच पटापट चधत जातो ... आणि ते पण मधुरा वेलणकर सारखी बर्‍या पैकी ordinary face, average figure असणारी मुलगी इतकी successful होते हे अतर्क्य वाटते !
अशा field वर चांगला , realistic आणि तरीपण entertaining movie काढायला मधुर भांडारकर सारखा दिग्दर्शक पाहिजे असं माझं मत !
:-)

Dineshvs
Sunday, July 08, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ मीपण लिहिले होते कि सरीवर सरी बद्दल.
आत्ताच लाईफ़ इन अ मेट्रो बघितला. इथे आधी लिहिले आहेच लोकानी, वेगळा विषय, वेगळी ट्रिटमेंट सगळे कबुल. पण त्यातले ताणतणाव केवळ मुंबईत राहिल्यामुळे आहेत, हे पटले नाही. बाकि संवाद वैगरे छानच.

काहि खटकलेल्या गोष्टी.
शायनी आणि शिल्पा, बेस्टच्या विहार लेक ला जाणार्‍या २५ नंबरच्या बसमधे बसतात, आणि चर्चगेटचे तिकिट काढतात. या रुटवरच्या बसेस चर्चगेटला जातात ?

शिल्पा, त्याला आपका किताब म्हणते. तो म्हणतो पढ लेना, अच्छी है. किताब हिंदीत स्त्रीलिंगी ना ?

नफ़िसा ला हॉस्पिटलमधे नेताना जो स्पॉट दाखवलाय, तो आहे बलार्ड पियरचा, तिथे कुठलेच हॉस्पिटल नाही. जवळपासचे म्हणावे तर सेंट जॉर्जेस आहे, पण तिथे जायला वेगळा रस्ता आहे.

सगळे शुटिंग जर कोपर खैराणे स्टेशनचे आहे, तर एका प्रसंगात शीव स्टेशनची पाटी आणि दुसर्‍या प्रसंगात डोंबिवलीची पाटी आहे. का बुवा ?

अर्थात या गोष्टी फक्त मुंबईकराच्याच लक्षात येतील.

पेज थ्री मधला कोंकणा सेनच्या बाबतीतला एक प्रसंग जसाच्या तसा इथे आहे. तिची एक्स्प्रेशन पण तीच. असले उद्योग दार उघडे टाकुन करतात ?

ते तीन गायक कुठल्याही गाण्याला बद्धकोष्ठ झाल्यासारखे तोंड का करतात ? अश्या अर्थाची गाणी आधी कुणी गायली नाहीत का ? त्यावेळी अशी तोंडं केली होती का ? विस्कटलेले केस, काळे कुडते आणि कानात डुल, घातल्याशिवाय तुमची कला सादरच करता येत नाही ?

पण तरिही, सिनेमा एकदा बघण्यासारखा आहे.



Farend
Sunday, July 08, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश हो आता hollywood वाल्यांसारखे आपल्याकडे ही तो "उद्योग" शॉट अत्यंत ठराविक पद्धतीने घेतात. अत्यंत उत्साहाने काहीतरी सांगण्यासाठी वगैरे हीरो किंवा हीरॉइन घरात शिरते (मुख्य दार उघडेच असते), मग आत पहिल्यांदा काहीच आवाज येत नाही. एरव्ही सारखे तो किंवा ती डायरेक्ट हाकही मारत नाहीत, दबकत आत शिरतात. मग कोठेतरी हसण्याचा वगैरे आवाज येतो. मग त्याच्या रोधाने तो किंवा ती तिकडे जातात. तेथेही दार उघडेच असते. मागच्या काही वर्षांत हॉलीवूड किंवा बॉलीवूड मधे चित्रपटांत असंख्य लोकांची लफ़डी अशा पद्धतीने बाहेर काढलेली दिसतात :-), आता त्याचे reusable shots तयार करून फक्त पात्रे बदलून त्याचे फूटेज कोणीही वापरेल असे केले पाहिजे या लोकांनी :-)

आणि अमेरिकेत जेथे आजूबाजूला ४-५ एकर कोणीही राहत किंवा येत जात नाही अशा ठिकाणी दारं उघडी असणे एकवेळ समजू शकते, पण भारतात फ्लॅट्स मधेही? ते ही मुंबईत! हे अचाट आणि अतर्क्य मधेच टाकायला पाहिजे.

मात्र असा एक शॉट Friends मधे एका एपिसोड मधे खूप छान घेतला आहे. Rachel तिच्या घरी ठरलेल्या वेळेपेक्षा लौकर येते आणि तो Barry तशाच शॉट मधे दाखवलेला आहे. आणि तोच तिला विचारतो की तू एव्हढ्यात येणार नव्हतीस? आणि तीच त्याला म्हणते " I'm sorry for coming home early, you carry on " :-)


Pancha
Sunday, July 08, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

just watched Sicko, amazing movie, an eye opener about the healthcare industry in the usa, must watch

Bee
Monday, July 09, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेला बाजार मी फ़ारूख - दिप्तीचा साथ साथ बघितला. ह्या चित्रपटातली गाणी एकदम हिट आहेत. पण ही गाणी ह्या चित्रपटाला आणि त्यातील प्रसंगाला इतकी साजेशी नाहीत.

झीवर मिथून - झरीनाचा 'सितारा' पाहिला. ह्यातील 'ये साये है, ये दुनिया है' ही आशानी गायलेली गझल एकदम अप्रतिम आहे नि 'थोडी सी जमी, थोडा आसमा' हे लता भुपींदरचे गाणेही अप्रतिम आहे. गुलजार साहेबांचा हा चित्रपट मात्र अगदी जेमतेम गटातला आहे. काही खास कथा वगैरे नाही.

इतक्यात माझा चित्रपट (जुनेच) बघण्याचा मूड गेला आहे. नाहीतर सारखी माझी तळमळ चाललेली असते अमूक अमूक चित्रपटाची तबकडी मिळवण्यासाठी. पण काही कळत नाही नक्की का मूड गेला आहे :-) हीहीहीही :-)


Rutu_hirwaa
Monday, July 09, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
हे बरेय
एकीकडून म्हणायचे मूड गेलाय
आणि एकीकडून हसायचे दात काढून..

दीपान्जली
अगदी अगदी
सार्थ काढलीस हं सरीन्ची लायकी

आणि विषय ठीक होता.. फ़ार अगदी मधुर भान्डारकर ने डोके लावावे असा इतका पण वेगळा नव्हता :-)


Maitreyee
Monday, July 09, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सरीवर सरीची सुरुवात बरी वाटली होती. पण नन्तर अत्यन्त ठोकळेबाज होत गेला. इतके एकता कपूर छाप बटबटीत शीन होते!त्या बहिणी कित्येक महिन्यांनी भेटतात तर अगदी obvious पणे ती मॉडेल बहीण राणीच्या की राजकन्येच्या कपड्यात, सिंहासन टाईप काहीतरी सेट वर काम करत असते! ही गरीब बहीण येते तेही टिपिकल गरीब छाप छत्री घेऊन वगैरे! एकीवर अंधार तर दुसरीवर झगझगीत उजेड मारलेला. दोघीजणी दूर दूर उभे राहून भंपक डायलॉगबाजी करतात आणि मग गरीब बहीण निघून जाते! अरे काय हे! असे होईल का प्रत्यक्षात!! नन्तर पण ते दळणाचा डबा पडणे वगैरे मेलोड्रामा सीन्स. त्यात तो मोहन जोशीचा मुलीच्या पोस्टर वरून हात फ़िरवतानाचा तो सीन ज्या प्रकारे घेतलाय, तेही अगदी कै च्या कैच ड्रामा. मला खर तर ते विचित्र च वाटलं! असे यडपतसारखे कुणी बाप करेल का! त्यातही रडत रडत मधेच दोन्ही हातांनी जोजवणे वगैरे अभिनय too muchhh .. अति ड्रामेबाज ठोकळेबाज वाटले मला पुढचे सगळेच!... असो. काही चित्रपटांची उगाच हाईप करतात त्यातलाच हा एक.

Aktta
Monday, July 09, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Itgirl
मला त्या दोघांच communication आवडल......
आनी परेश रावल ने जसा घीसा पीटा डायलोग माराला म्हनुन तीच तस उत्तर होत असा मला वाटत...

>> अमिताभ style मधली Dialogue बाजी-
म्हंजे काय...
एकटा...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators