|
Ajjuka
| |
| Monday, July 02, 2007 - 1:20 pm: |
| 
|
इथले बरेचसे ऑर्कुटवर आहेत किंवा याहू नावाच्या पुरातन चॅट वर तर आहेतच. सगळ्यांना विशेषतः मुलींना रोज सत्राशे साठ लोक approach करत असतात. त्यातले ९०% महान विनोदी असतात. ते इथे शेअर करण्यासाठी हा बीबी. एक प्रचंड लोकप्रिय पहिला मेसेज.. ma nm is .... im nu hr. pls gv me ur fraandship दुसरा एक आजच मला मेल वर आलाय. मराठीत भाषांतर करून लिहितेय. मी अमुक अमुक, बंगलोरमधे रहाणारा बंगाली. ३६ विवाहित. माझ्या मैत्रीच्या हाताचा स्वीकार कर. मी नेहमीच 'लेडी' सारखे वागवीन. तू मला काहीही सांगू, विचारू शकतेस. प्लीज माझी मैत्रिण होशील का? अशी भिक मागून मैत्री होते होय रे टोण्या... एवढंच डोक्यात आलं माझ्या. असे अजून खूप मेसेजेस आहेत... तुमच्याकडेही असतील. ते इथे सांगूया
|
Farend
| |
| Monday, July 02, 2007 - 5:40 pm: |
| 
|
fraandship LOL 'लेडी' सारखे वागवीन पूर्वीच्या हिन्दी चित्रपटांत व्हिलन हीरॉइन ला 'मेरे संग शादी कर, रानी बनके रहेगी' वगैरे म्हणायचा ते आठवले.
|
Ajjuka
| |
| Tuesday, July 03, 2007 - 3:50 am: |
| 
|
फरेंड.. नुकतेच ऑर्कुटवर एक महाभाग approach कर्ते झाले.. पहिला मेसेज हाय! उत्तर हाय? दु.म. - I अमुक अमुक. १२३४५६७८९ ma ph no. need frenship. pls accept ur fren. यानंतर माझ्याकडून अर्थातच शांतता मग.. ति.मे. - wht happnd चौ.मे. - pls give ur frenshp. whn u ll call me मी हसून हसून मेले. सगळे मेसेज डिलीटून स्क्रॅपबुकची सफाई केली. बर... माझ्याशिवाय कोणीच लिहित नाहीयेत. इसक मतलब? जगातले सगळे मूर्ख मलाच फक्त भेटायला येतात की काय?
|
>>>>> जगातले सगळे मूर्ख मलाच फक्त भेटायला येतात की काय?     नाही, माझ्यासारखे काही दीडशहाणे पण येतात की तुला भेटायला! अग अशी चिकटु लोक असतातच! याहू वर कोणत्याही रूम वर गेल की अननोन युजरकडुन मेसेज येतो, अन पहिल वाक्य अस्त, male here च्यामारी, आम्ही चॅट करायला जातो ते काय फक्त male/female बघुन की काय?????? टाळक असल सटकत की बस्स! मूड असेल तर मी पण उत्तर देतो "म्हसोब्या हिअर"!
|
Bee
| |
| Tuesday, July 03, 2007 - 6:39 am: |
| 
|
ह्या orcut चा मला काही अनुभव नाही पण कधीमधी जर मी याहू वर चॅट करायला गेलो तर मला बरेचदा अनोळखी लोकांचा पहिला संदेश येतो तो असा ---- asl pl... सुरवातीला मला समजल नाही. मग मीही तोच प्रश्न केला asl pl . त्याच्या उत्तरावून मला मग ह्या asl चा अर्थ कळला
|
Ajjuka
| |
| Tuesday, July 03, 2007 - 7:04 am: |
| 
|
आत्ताच माझ्या स्क्रॅपबुकात मेसेज आलाय... 'मला तुझ्या मिठीत, विसावयाचे आहे, .... ....' इत्यादी इत्यादी ईईईईईईईईईईईई लिंब्या, अगदी अगदी!! आणि दीडशहाणे भेटले तुझ्यासारखे तर परवडतात... हे असले मंद चीपो वैताग येतो. तसंच तुला आठवतंय का एका ज्योतिषी प्राण्याबद्दल मी सांगितलं होतं तुला ते? ती तर इश्टोरी लय भारी हे!!
|
Monakshi
| |
| Tuesday, July 03, 2007 - 7:12 am: |
| 
|
काय अर्थ आहे त्याचा??
|
asl pl = एज, सेक्स लोकेशन ची माहिती द्या असा अर्थ हे! अरेच्च्या?? इथे इन्ग्लिश मधे सेक्स अस टाइप केल तर प्रीव्ह्यू मधे तीन लाल गोळे कसे काय आले????? अज्जुका, हो तू सान्गितलेल मागे त्या ज्योतिषाबद्दल! माझ ऑर्कुट बॅन झालय, त्यामुळे मी काय तुला तिकडे भेटणार नाही!
|
मी खर्रर्र सान्गु अगदी खरं मी आधी त्या आॅर्कुट नामक प्रकाराची चाहती होते पण एकंदरीतच तिथले ते तिर्हाईत लोकान्चे स्क्रॅप्स ते अनवाॅण्टेड मेल्स,त्या भलभलत्या रिक्वेस्ट्स आणि सगळे काही उघड्यावर म्हणजे पब्लिक... मला खूप बोअर झाले एक दिवस...सरळ उठून अकाउण्ट डिलीटला..
|
Manjud
| |
| Tuesday, July 03, 2007 - 10:28 am: |
| 
|
मला वाटतं पूर्वी pen friend नामक प्रकार होता त्याचे हे latest किंवा electronic version म्हणता येईल. माझी एक pen friend होती मॉरीशसची. सुरुवातीला तिने २-४ पत्रं पाठवली पण नंतर अचानक तिचा भाऊच पत्रं पाठवायला लागला. बाकी तेव्हा आपल्याला फॉरेनहून पत्रं येतं ह्याचं फार अप्रूप होतं तेव्हा..........
|
Dakshina
| |
| Tuesday, July 03, 2007 - 11:53 am: |
| 
|
सगळ्यात जास्त चिड येते ती तिथल्या लोकांच्या खोटेपणाची. स्वतःचा फोटो लावायच्या ऐवाजी Actor किंवा Actoress चा फोटो लावतात. सगळं पुब्लिकली चालतं तिकडे. मी पण आधी Orkut ची fan होते पण आता अगदी कधी कधीच जाते. पुर्वी जेव्हा मला अनोळखी लोक add करायचे तेव्हा मी त्यांचा Profile वाचून त्यांना add करत असे. सुदैवाने मला त्यातूनही खूप चांगल्या मित्र - मैत्रिणी मिळाल्या. पण मधे वर्तमानपत्रात Orkut बद्दल जी काही वाचले तेव्हापासून कानला खडा लावला आणि अनोळखी लोकांना अगदी डोळे झाकून Deny करायला लागले. आधी Orkut वर यायला कुणाचंतरी invitation लागे, अता तर म्हणे ते पण लागत नाही. फोटो वेगळा, profile खोटं आणि सगळ्यांच्या scrapbook मध्ये मुक्तसंचार करायला मिळणार म्हणजे काय? काही लोक इतके विघ्नसंतोषी असतात की बास. मला तर एका मुलाने एकदा scrap मध्ये इतक गलिच्छं काहीतरी लिहिलं होतं की मी खुप upset झाले होते. असं करून या लोकांना काय मिळतं देव जाणे. अज्जुका म्हणते ते खरं आहे. मैत्रीची भीक मागून मैत्री होत नाही. व्हायची तेव्हा आपोआप होते. खरंतरर Orkut हे म्हणलं तर एक फ़ार चांगलं व्यासपीठ आहे. पण त्याचा जस्तीत जास्त दुरुपयोगच लोक करतात. अर्थात तिथे सगळेच लोक वाईट आहेत असं नाही. खूप लोक चांगले पण आहेत. पण ओल्याबरोबर सुकं पण जळतंच ना...
|
Zakasrao
| |
| Tuesday, July 03, 2007 - 12:31 pm: |
| 
|
काय अनुभव आहेत! लिम्ब्या मग तुला कधी तिकडुन म्हैस हिअर असा रि. आला नाहि का? मी तर मायबोली सोडून बाकी कोणाला सहसा मित्र बनवत नाही. असे असले तरी फ़ार कमी आहेत लोक्स. एकाने माझ्या प्रोफ़ाइला विजिट दिली. मग मला ते कोणी कोणी प्रोफ़ाइल पाहुन गेल त्यात दिसल. मग मी हि जावुन त्याचा प्रोफ़ाइल वाचुन आलो. तर ह्या बाबाचा दुसर्या दिवशी scrap क्या मै जान सकता हु कि आपने मेरे प्रोफ़ाइल को क्यो विजिट किया? मग मी हि त्याला तसाच scrap टाकला तर मग ह्याची बोलती बंद. मला अजुन तर वाइट अनुभव आला नाहि. उलट एक चांगला मित्र भेटला अज्जुकामुळे. दक्षिणा ते फ़ोटो वै. काही लोक वेगळाच लावतात ते ठिक आहे सिक्युरिटी म्हणून पण खोटा प्रोफ़ाइल बनवुन पिडणारे कमी नाहित. मला वाटत की असा अनुभव मुलीना जास्त येत असेल. अज्जुके तु लिहि ना तो कोणी माणुस आहे वैतागलेल्या चेहर्याचा फ़ोटो लावलाय त्याविषयी.
|
Bsk
| |
| Tuesday, July 03, 2007 - 1:30 pm: |
| 
|
ऑर्कुट ह्म्म... माझे शाळेतले आणि कॉलेजेस मधले सगळे मैत्र-मैत्रिणी मला इथेच भेटले.. सुरवातीला काय प्रकार आहे कळायचे नाही तेव्हा कुणालाही ऍड करायचे.. परंतू लवकरच अक्कल आली, आणि strangers ना कधीच ऍड केलं नाही.. परंतू profile मधे स्पष्ट लिहीलेले असले तरी येणार्या frnds reqsts पाहील्या , आणि (s)craps वाचले की डोकं फिरते.. ऑर्कुट का लोकप्रिय आहे,तर कुणालाही कुणाचेहि profile, scrapbook पाहता येते.. दुरुपयोग ही होतो.. पण शेवटी ते आपल्या हातात आहे.. unkwn लोकांना reply केलाच नाही,तर ते पण कंटाळून जातात! सो, हा best उपाय आहे! काही रिप्लाय करायच्या फंदात पडायचे नाही...( मी ३ वर्ष ऑर्कुट्वर असल्याने फारच अनुभव-समृद्ध आहे! ) अनुभव करतेच share एकेक... बाकी, अज्जुका... ते मिठी-बिठी प्रकरण मलाही आलंय.. what crap??
|
Mahaguru
| |
| Tuesday, July 03, 2007 - 2:10 pm: |
| 
|
आत्ताच प्रति-ओर्कुट बद्दल वाचले http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2170347
|
Svsameer
| |
| Tuesday, July 03, 2007 - 2:21 pm: |
| 
|
what crap?? >> bsk ते ऑर्कुटवर असल्याने what scrap असं लिहिणं जास्त संयुक्तीक नाही का? 
|
'मला तुझ्या मिठीत, विसावयाचे आहे>>>>> मी ३ वर्ष ऑर्कुट्वर असल्याने फारच अनुभव-समृद्ध आहे> बापरे भाग्यश्री ३ वर्षे. त्या ऑर्कुट वर येन्याचे अनेकदा मी टाळले पण नंतर माझ्या ऐका मैत्रीनीने गळच घातल्यामुळे तिकडे आलो. पण अपुनको कुछ पट्यानही वो. तसही तिकडे मी कधी जास्त येत नाही. कारण सर्व उघड्यावर. chat हा प्रकार करन्यापेक्षा मायबोलीवर v&C केलेले बरे. लिंब्या भो तु काय जगदिश्वरा सारखा जगदव्यापी आहेस का? ऑर्कूट, मायबोली, याहु, जी मेल. वर त्या मोठ्या पोस्टस. मानल बॉ. बर ते काम गिम करतोस की नाही. ~ड
|
Mandarnk
| |
| Tuesday, July 03, 2007 - 4:15 pm: |
| 
|
भुरट्या पोरांकडून पाठवला जाणारा अजून एक कॉमन मेसेज: am just bored .. opened orkut .. searched for new buddies .. saw lots of communities .. photos.. searched till i found a cute girl ... she was a simple .. good luking girl .. ............... i coulnt continue searching .. i just couldnt stop .. it ws beyond my control .. my eyes forgot to wink .. my heart topped beating .. i m impressed .. how do i make her my friend .. shall i send her a friend req .. before that i ll message her .. yeah thats a good idea.. here i proceed with lots of questions in my mind.. wil she accept ?? will she like me ... or will she atleast reply ... now its upto her to reply ... i can feel a smile on her face .. yes she wants to reply .. i know for sure... will you be my friend??
|
Farend
| |
| Tuesday, July 03, 2007 - 4:18 pm: |
| 
|
अज्जुका, मुंबईत एक मिठी (नदी) आहे ना? त्यात विसाव म्हणावं
|
अमोल लै भारी. मिठी नदी. तिचा विसरच पडला. तिचाही नालाच झाला आहे वाटत.
|
Disha013
| |
| Tuesday, July 03, 2007 - 6:34 pm: |
| 
|
फ़रेन्ड, काय भारी अनुभव आहेत! आर्कुट,याहू या साईटवरती अखिल भारतिय येडझाप नमुने असतात ना. त्याचा तो परिणाम. आणि ते प्रतिऑर्कुट अशा गधड्यांच्या काय कामाचे मग?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|