| 
   | 
| काही दिवसान्पूर्वीची गोष्ट
 
 मला एक मुलगा पहायला येणार होता.माझ्या मावशीकडे कार्यक्रम ठेवलेला..
 तो मुलगा त्याची आई त्याच्या २ बहिणी असे सगळे साग्रसन्गीत मावशीकडे दाखल झाले..
 
 इकडचे तिकडचे बोलणे झाले..
 
 मग खान्-पान
 मावशीने पोह्यान्च्या चिवड्याच्या बश्या आणल्या..त्यानंतर
 
 मावशी: घ्या ना
 मुलाची आई नी मुलाची बहीण्: नाही नको आज आमचा उपास आहे
 मावशी:अहो पण आज बुधवार आहे
 मुलाची आई नी मुलाची बहीण्: अहो एकादशी चा उपास आहे
 मावशी: अहो पण एकादशी तर कालच होती ना ?(योगायोगाने खरच होतं तिचा म्हणणं!)
 
 इतका मोठा बम्पर आल्याने मुलाच्या आईला आणि बहिणीला सावरून पण घेता येईना
 
 तेवढ्यात मावशी पुढे म्हणाली
 अग बाई खरंच काल च होती ना एकादशी थाम्बा नाही तर असे म्हणून माझी ग्रेट मावशी आत जाऊन केलेन्डर वर पाहून कन्फर्म करून आली..
 
 इकडे तो मुलगा त्याची आई नी बहीण यान्चा चेहरा बघण्यासारखा..
 
 
 
 |  | | Milindaa 
 |  |  |  | Monday, June 25, 2007 - 10:55 am: |       |  
 | 
 यात इब्लीसपणा काय आहे?
   
 
 |  | अहो मिलिन्दा
 माझ्या मावशीच्या अभावित इब्लीसपणामुळे त्या दोघीन्चा पचका झाला ना..
 
 आणि नसेल यात इब्लिसपणा तर खुशाल तुम्ही हे पोस्ट डिलीट करा
   
 
 |  | रुतू मला पण नाही कळले काय (सरळसोट किंवा अभावित) इब्लिसापणा आहे यात?
 >> याच काळात, याच प्रकारच्या इब्लिसपणामध्ये वाघ आडनावाच्या लोकांना फोन करून
 दक्षिणा, याच काळात हे इतक्या खात्रीने कसे काय लिहीलेस?
   कुलकर्ण्यांच्या कुत्र्याचा किस्सा आवडला. सिंहाला ट्राय करायला सांगते.
   
 
 |  | एका मित्राने केलेला इब्लिसपणा...
 
 एक  Landline No.  फ़िरवला...
 "आम्ही  MTNL  मधुन बोलत आहोत... तुमच्या फ़ोनची घंटी वाजते का?
 समोरुन... "हो"
 "अहो तुमचा फ़ोन घंटी नाही तर काय शिटी वाजवणार!!!" मित्र.
 कुलकर्ण्यांच्या कुत्र्याचा किस्सा आवडला
   
 
 
 |  | भलतेच किस्से आहेत ईब्लिसपणाचे जाम हसले..
 आमच्या बाबतीत नकळत झालेला ईब्लिसपणाचा हा किस्सा
 माझ्या नवर्याच्या खडुस  south indian boss  कडे आम्ही पहिल्यांदाच गेलो. मुद्दाम सन्क्रातीला तिळ गुळ द्यायला गेलो होतो. हा मराठी सण आहे तिळ गुळ दिल्यावर गोड बोलतात हे त्याला  "  समजावुन  " सांगितले. तो संक्रातीला मराठी  new year  समजत होता.
 माझ्याशी ओळख झाल्यावर तो नवर्याला म्हणाला  Is she panjaabi?.  आणि थोड्या वेळाने गप्पा मारता मारता परत विचारले  is she pa.njaabi
 नवर्याने परत मी पन्जाबी नाही, NO.. NO.. NO  अस त्रिवार नाही सांगितले पण त्याच्या चेहर्यावरुन त्याचा विश्वास बसल्याचे दिसत नव्हते.
 तेव्हढ्यात त्याची बायको आली,तीला बघितल्यावर माझा मुलगा एकदम म्हणाला  Is she shrilankan?  पुढे (आमचं नशिब चांगल म्हणुन) मराठीत म्हणाला मग ती इतकी काळी कशी काय?
 पण माझ्या लेकाच्या  Is she shrilankan   चा अर्थ त्याला कळला असावा पुढे त्याने परत मी पन्जाबी की मराठी विचारले नाही.
 
 
 |  | | Ksha 
 |  |  |  | Monday, June 25, 2007 - 8:33 pm: |       |  
 | 
 माझी पुण्यात असताना नेहमीची खोड ...
 एकेरी मार्गातून कोणी चुकीच्या दिशेने जात असेल तर मी मुद्दामहून गाडीवरून जाताना गंभीरपणे ओरडायचो ... "अरे पुढे कोपर्यावर पोलिस थांबलाय!"
 
 जाणारा एकतर भेदरून मागे तरी वळायचा नाहीतर अगदी गेलाच तर मनातल्या मनात घाबरत घाबरतच पुढे जायचा.
 तेव्हढंच त्याला "सुखेनैव" चूक करून न दिल्याचं सुख
   
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 4:06 am: |       |  
 | 
 अहो तुमचा फ़ोन घंटी नाही तर काय शिटी वाजवणार!!!" >>>
   Is she shrilankan>>>
  
 
 |  | | Gs1 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 7:38 am: |       |  
 | 
 
 माझ्या एका मित्राचा किस्सा आहे...
 
 एका मित्राच्या लग्नाच्या चार पाच दिवस आधी त्याचा मोबाईल फोन खणाणला. अनोळखी नंबर.
 
 'हॅलो,  xxx xxx  आहेत का ?'
 'बोलतोय'
 
 'मी केसरीमधुन बोलतोय. तुम्ही कुलू मनालीचे बुकिंग केले होते ना ?'
 'हो..'
 
 'साहेब, ती ट्रिप फुल झाली आहे, त्यामुळे तुम्हाला नेता येणार नाही.'
 
 'अहो काही काय बोलताय, अस कस चालेल ?' मित्र एकदम सरकलाच.
 
 'पण साहेब, खरच फुल्ल झाली आहे, तुम्हाला त्याबदल्यात दुसरं कुठलं लोकेशन चालेल का ?'
 
 'नाही नाही, अजिबात चालणार नाही, मी तिकडे तुमच्या ऑफिसला येतो उद्या' मित्राचा आवाज आता चिडून टिपेला पोहोचला होता. आधीच लग्नाची धावपळ त्यात हे टेन्शन.
 
 'पण अहो, कुलू मनालीऐवजी तुम्हाला खूप छान पॅकेज आणि एक्दम बेष्ट लोकेशन देतोय, ऐकुन तर घ्या साहेब.'
 
 'बर कुठे आहे बोला  ? ' किंचित शांत होत मित्र म्हणाला.
 
 'यवतमाळ  ! ' समोरच्याने शांतपणे सांगितले.
 
 'काऽऽऽऽऽऽऽय ?' मित्राच्या डोळ्यासमोर तारे चमकले हे त्याच्या आवाजावरुनच लक्षात येत होते.
 
 'हो साहेब, यवतमाळचं एकदम फस्टक्लास पॅकेज आहे, चालेल ना  ? ' एकदम उत्साहात समोरचा.
 
 'मुळीच नाही, मी उद्या तुमच्या ऑफिसला येतो. मग बोलू.' मित्र म्हणाला. संताप आणि आश्चर्याने त्याच्या तोंडातून पुढे शब्दच फुटेना.
 
 'ठीक आहे साहेब.' केसरीवाला म्हणाला.
 
 नंतर शंका येउन चौकशी केली तर तो केसरीवाला नव्हताच असे मित्राच्या लक्षात आले.
 
 
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 7:55 am: |       |  
 | 
 GS
   अखेर किस्सा लिहिलाच बर झाल.
 
 
 
 |  | >>>नंतर शंका येउन चौकशी केली तर तो केसरीवाला नव्हताच असे मित्राच्या लक्षात आले.
 काहीही झालं तरी शेवटी मायबोलीकरच तो...
 GS  सही रे...
   
 
 
 |  | | Nalini 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 1:23 pm: |       |  
 | 
 GS
   
 
 |  | मुळात मला तर ते केसरीतून बोलतोय म्हटल्यावर केसरी वृत्तपत्रातून बोलतोय असे वाटले होते त्यामुळे केसरीचा अन कुलू मनालीचा संबंधच काय असा प्रश्न पडला होता म्हन्जे माझी वेगळीच करमणूक झाली...
   
 
 |  | | Chyayla 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 4:11 pm: |       |  
 | 
 'हो साहेब, यवतमाळचं एकदम फस्टक्लास पॅकेज आहे, चालेल ना ?
 यवतमाळ...  खो खो खो...
  GS1  खुप दीवसानी ईतका भारी किस्सा ऐकायला मिळाला, कदाचित तो केसरीतुन फ़ोन करणारा मित्र तुम्हीच तर नव्हतात? 
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 5:11 pm: |       |  
 | 
 GS  वीणाताईनी वाचलं तर, खैर नाही रे.
 
 
 |  | | Disha013 
 |  |  |  | Tuesday, June 26, 2007 - 6:54 pm: |       |  
 | 
 GS  सही!
   न्ज्न्ज ज्ब ज्ज ज्न्ज ज्न्ज्न
 
 
 
 |  | | Storvi 
 |  |  |  | Wednesday, June 27, 2007 - 1:25 am: |       |  
 | 
 हुडसाहेब माझीही अशीच करमणुक झाली
  
 
 |  | | Giriraj 
 |  |  |  | Wednesday, June 27, 2007 - 4:44 am: |       |  
 | 
 मग कोण होता तो  xxxxx  इसम?
   
 
 |  | | Giriraj 
 |  |  |  | Wednesday, June 27, 2007 - 4:54 am: |       |  
 | 
 गिरे तो भी टांग उप्पर...
 
 एका मायबोलीकराचा बदला घेण्यासाठी फ़ोन केला..
 'नमस्कार,श्री. xxx  बोलताय का?'
 'हो,बोलतोय'
 'मी  ABN Amro  बॅंकेतून बोलतोय. आपले नाव भाग्यावान विजेत्यांमध्ये आलेय आणि आपल्याला  personal loan  मिळणार आहे. यामुळे आपल्याला  ********  फ़ायदे मिळतिल.....'
 'अहो पण मला  personal loan  नको आहे.'
 'ठिके.. मग आम्ही आपल्याला  ICICI  चे क्रेडिट कार्ड देऊ.'
 वैतागून,'पण मला तेही नकोय'
 'बर्र.. आम्ही आपल्याला  HSBC  चे क्रेडित कार्ड देऊ आणि यामध्ये  ********  फ़ायदे आहेत'
 आता पलिकडच्याचा धीर सुटत चालला होता आणि मी अजून एकदोन कार्ड माथी मारायच्या विचारात होतो.
 पण शेवटी मलाच सस्पेन्स न साहवून मी कोण बोलतोय हे सांगितले.
 तर महाराज म्हणतात ,'मला कळलेच होते तू असणार म्हणून.'
 
   
 
 
 |  | 
 गोविंद, यवतमाळचे पॅकेज
   गिरी हा श्री  xxx  नावाचा मायबोलीकर या पर्सनल लोन वाल्यांचे इतके बोलणे ऐकून घेतो? नाव आणि नंबर सांग. देऊन टाकते मला कॉल आला की.
   बाय द वे, मग आवडले का तिला यवतमाळचे निसर्गसौंदर्य?
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |