|
बाप रे... पण समजा, बीला असं कुणी "प्रगल्भ विचार" वालं भेटलंच तर...
|
Disha013
| |
| Monday, April 23, 2007 - 3:26 pm: |
| 
|
धन्यवाद झ. काका! ख्रिश्चन्ला मराठीत किरिस्ताव म्हणतात तर! मटकी .. तू अशक्य आहेस म्हण्जे नक्कि काय आहे? RB ,एक प्रश्न,मेंढीच का?दुसरा प्राणी का नाही? तुम्हाला माहीत असेलच
|
Zakki
| |
| Monday, April 23, 2007 - 4:16 pm: |
| 
|
सगळे पत्त्याचे खेळ जुगाराचे नसतात पण तसे करता येतात! पैसे लावणारा माणूस काय वाट्टेल त्याचा जुगार करू शकतो! खरे तर बी, तू पत्ते, पत्ते असे म्हणू सुद्धा नकोस. एखादे वेळी तुला एकदम मोह होईल की बघू तरी कसे असतात नि कसे खेळतात. की खल्लास! तू एकदम प्रगल्भ!
|
Mansmi18
| |
| Monday, April 23, 2007 - 4:41 pm: |
| 
|
"अर्जुन" चित्रपटात अन्नुभाई(म्हणजे परेश रावळ) याच्या अड्ड्यावर ते मटक्याचे नम्बर काढताना दाखवले आहेत. त्यातले सत्ता नव्वा मेन्ढी हे नम्बर चान्गलेच लक्षत राहिले.(त्या पिच्चरपासून सत्त्याला लन्गडा म्हणतात हे कळले. ज्ञान्सम्पादन कधी व कुठे होइल ते सान्गता येत नाही).
|
मटका हा एक सांस्क्रुतिक ठेवा आहे. संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान काही विशिष्ट पान टपर्यांच्या बाहेर एक बेचैनी दाटुन आलेली असते. सकाळी कामावर जाताना २५ पैसे ते १ रुपया पर्यंत विविध आकड्यांवर पैसे लावलेले असतात. आधी ओपन आणि मग एक्-दीड तासाने क्लोज डिक्लेअर होतो. चेहर्यावरील सर्व पॉसिबल भाव एकाच ठिकाणी बघायचे असतील तर मटक्याची टपरी ही अतिशय उपयुक्त जागा आहे (अरे कोणि होतकरु लेखक आहे का.. त्याला ही चांगली टिप आहे) कल्याण आणि मुंबई ही अनेक कामगारांच्या त्याच त्याच रूटीन जीवनातील एकमेव बदलणारी घटना असते. ता.क.: बी साठी. मुंबई आणि कल्याण हे मटक्यातील २ प्रमुख गट. होतकरु लेखकांसाठी: मटक्याची टपरी ओळखणे सोप्पे आहे. ज्या पानटपरीमध्ये साधा चुना सुद्धा मिळत नाही (सिगारेट तर सोडुनच द्या) आणि तरिही बर्याच लोकांची गर्दी कायम असते, ती टपरी हमखास मटक्याची असते.
|
"आता मटका फारसा राहीला नाही." अरेरे.. मला एकदम "कृष्णाकाठी कुन्डल आता उरले नाही" ची आठवण झाली.
|
Storvi
| |
| Monday, April 23, 2007 - 8:01 pm: |
| 
|
किरिस्ताव लोकांच्यात असे म्हणतात की "The Lord is our Shepheard" तर त्यांचे पादरी pun intended जे दांडुक हातात धरतात त्या ला Shepheard's staff असेही म्हणतात... याचे बरेच references आहेत (असे म्हटले की ते देण्याची गरज भासत नाही)
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 6:53 am: |
| 
|
हे घ्या पुणेरी लोकांचा पाटी लावण्यामागचा द्रुश्टिकोन.
|
Slarti
| |
| Monday, May 28, 2007 - 1:58 pm: |
| 
|
छान लेख आहे. उत्तरांमधला रोखठोकपणा (अपुणेर्यांसाठी तुसडेपणा) बघून गहिवरून आले ("ने मजसी ने..." ई.ई.). अमेरिकी midwest मध्ये भारतीय midwest चा मझा नाही.
|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 5:23 am: |
| 
|
मंडळी एक मेल आलि होती. त्यात लेखकाच नाव नाहि पण पुणेरी नमुना म्हणुन ह्या BB वर टाकतोय. ती. बाबा आणि सौ . आईस, बंड्याचा शि. सा.न.वि.वि. मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते. पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई? इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे . त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत ; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते. मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात. इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात. रिक्षात १२- १५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात. आई, पुणेकर फार लठ्ठ होऊ लागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात. बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते. त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात. बाबा, येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत. एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात . मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा "लेन' या शब्दावर खूप राग आहे . "लेनची शिस्त पाळा' असा फलक वाचला , की ते हटकून ती सूचना धुडकावतात . बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले . कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन ! (ता .क. - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन) तुमचा लाडका बंड्या
|
Monakshi
| |
| Friday, June 01, 2007 - 7:00 am: |
| 
|
झकासराव, एकदाम झकास! हे रिक्शाचं बाकी ख़रं म्हणालात. एकदा आम्ही नळस्टॉपला उतरलो आणि कर्वे नगरला जायचं होतं तर एकही रिक्शावाला तयार होईना वर सांगायचे की सिंहगड रोडला जायचं असेल तर सांगा. शेवटी मग आम्ही तेवढं अंतर चालत गेलो.
|
hiiii me abhimanyu... mala madad pahije..konhi mala sangtya ki mmarathit kasa lhiwaycha???i mean hw do i write a poem in devnagri??mala kavita pan lhiwaycha aahe....
|
Gobu
| |
| Friday, June 01, 2007 - 6:07 pm: |
| 
|
अभि, या पोस्ट खाली एक सन्देश आहे add your message here त्याच्या खाली "देवनागरी" या बटनाला क्लीक कर... एक नवीन खिडकी उघडेल... मग डाव्या हाताला काही लिहीले की उजव्या हाताच्या कॉलममध्ये देवनागरीत दिसेल लिहुन झाले की "कॉपी मैसेज"वर क्लीक कर... ओके?
|
तान्या, अगदी खरे बोललास बघ. मे पाच सहा वर्षे मिरजेत रहात होतो तेव्हा मटका आणी मटकेवाले यन्चे अगदी जवळून निरिक्शण करण्याची सन्धी मिळाली. खरेच एखाद्या लेखकाला भरपुर मसाला मिळेल. गेली सहा वर्शे न्यूयॉर्क च्या वॉल स्ट्रीट वर फाड फाड इन्ग्रजी बोलणार्या ट्रेडर लोकान्शी कामानिमित्त सम्बन्ध आला आणी हा द्रुष्टान्त झाला की मानवी नमुने इकडून तिकडून सारखेच.
|
पुणेरी BB वर मटका शिक्षण चालु आहे नी ते ही फुकटात?? :-) चालु द्या, तेव्ढीच पुण्याई करायचा विचार दिसतोय!
|

|
Ksha
| |
| Monday, June 18, 2007 - 10:09 pm: |
| 
|
हल्लीची लोकं उगाचच वेळ वाया घालवतात. आधी copy करा, मग वेगळी file save करून परत तोच विनोद पोस्ट करा. छे छे छे!! त्यापेक्षा सरळ विनोदाच्या बीबीची लिंक द्यायची ना!
|
Dakshina
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:14 am: |
| 
|
क्ष, अगदी कमाल आहे तुमची....   
|
क्ष!हे आधी कुठे आहे हे खरच माहिती नव्हत....मेल मधुन आले म्हणुन इथे पोस्टले.
|
Prj4945
| |
| Friday, June 22, 2007 - 5:21 am: |
| 
|
mala ase vatate ki bahutek punekar manorugn asatat tyamule ashya patya fakt punyat disatat. punekarani rag manu naye.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|