|
Slarti
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:23 am: |
| 
|
मलईदांडू = क्रीमरोल गोट्या करणे = राजकारण करणे, धूर्तपणे 'चाली' खेळणे (विरुद्ध group वर कुरघोडी करण्यासाठी) १२० घेणे = वेगाने सूंबाल्या करणे टिळकवर्ष = नापास झालेले वर्ष ("यंदा आमचे टिळकवर्ष!") संदिप = संपूर्ण दिवस पडीक ("तो बोटक्लबवर संदिप असतो / तो बोटक्लबचा संदिप आहे.") विकृत = उच्च दर्जाचे हिडीस = फालतू, भिकार वरीलपैकी बरेचसे शब्द १० वर्षांपूर्वी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रचलित होते (विशेषतः शेवटचे दोन), आता आहेत का ते माहित नाही.
|
Bee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:39 am: |
| 
|
स्लार्टी, माझ्यामते 'सडेतोड' हा प्रतिशब्द होऊ शकेल..
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:10 am: |
| 
|
रॉबिन ठान्कु इथे लिहिल्याबद्दल. छत्रपती रॉबिनने लिहिलेले बरोबर आहे. त्या दोन्ही म्हणी वेगळ्या आहेत. आणि अर्थ देखिल.
|
Imtushar
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:34 am: |
| 
|
killer instinct ला मराठी प्रतिशब्द कदाचित विजिगिषु वृत्ती असेल... जाणकारांनी प्रकाश पाडावा. आणि slarti , तू लिहिलेल्या शब्दांपैकी गोट्या करणे हा शब्द ऐकलाय... (संदीप होणे चे श्रेय कदाचित महान संदीप पाटील ( coep चा, cricket मधला नाही) ला जात असेल! :-)
|
>>>>> विकृत = उच्च दर्जाचे एसेल आरती, अरे व्वा! मला माहीतच नवता हा अर्थ! बर झाल तू सान्गितलास! म्हन्जे "ते" लोक माझ्या नावान खडे फोडत नवते तर! ओऽऽहोऽऽ! मला "उच्च दर्जाचा" म्हणत होते की काय?? (कॉलर ताठ करतो) अरेरे अरेरे, उगाचच मी बिचार्यान्वर माझ्या अज्ञानामुळे गेले कित्येक महिने खार खावुन होतो! मला त्यान्ची माफी मागितलीच पाहिजे! DDD क्षमस्व, या बीबीचा विषय नाही, पण अगदीच रहावल नाही हो! 
|
>>>> कदाचित विजिगिषु वृत्ती असेल नाही, विजिगिषु याचा अर्थ कायमच जिन्कण्याची उमेद / इच्छा बाळगणारा! त्यात "किलीन्ग" म्हणजे काहीही करुन, दुसर्याला सम्पवून जिन्कणे असा अर्थ लागत नाही! तरीही, विजिगिषू हा शब्द बराचसा जवळचा हे असे वाटते रॉबिन, तु बोल रे भो! काय खर नि काय खोट (नाहीतर नेहेमीप्रमाणे झक्कीच आधीच बोलुन घेवुदेत का? DDD
|
Rajya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:24 pm: |
| 
|
KILLER INSTINCT १. कोणतीही दयामाया न दाखवता, काहीही करुन फक्त विजयच मिळविणे २. जीवे मारण्याचा उपजत दुर्गुण
|
Slarti
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:00 pm: |
| 
|
बी, सडेतोड नाही जमत. सडेतोड स्वभाव आणि KI यांच्यात मला तरी काही साधर्म्य आढळत नाही. शिवाय आपण सडेतोड उत्तर असेही म्हणतो, त्यात KI कुठे आहे? विजिगिषु बराच जवळचा शब्द आहे हे पटते. पण काहीतरी उणीव आहे. KI हा शब्द शिकारी प्राण्यांच्या वृत्तीवरून आला आहे असे वाटते, त्यामुळे त्यात योग्य संधी मिळताच ती वाया न जाऊ देता झडप घालण्याचा भावसुद्धा आहे. btw , लिंबू, माझे नाव एस एल आरती नसून स्लार्टी आहे आणि 'ते' लोक जर coep चे असतील तरच कौतुक करत असावेत मी तरी coep च्या जनतेशिवाय ह शब्दप्रयोग दुसर्या कोणाकडून ऐकला नाहीये.
|
Nalini
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:11 pm: |
| 
|
पुणताम्बा गाव शिर्डीजवळ आहे >> पुणतांबा. पुणतांब्यापासुन दोन एक मैलाच्या अंतरावर माझे सासर आहे, गोंडेगाव. रॉबिनहूड, तुम्हाला नांगरणीच्या वेळी सावड घालतात तो प्रकार माहिती आहे का? त्याबद्दलपण लिहा ना.
|
सावड म्हणजे पार्टनरशिप. दोघानी मिळून दोघांचे नांगरायचे..सावड्या म्हणजे पार्तनर... ही द्विपक्षीय सोय असते.. इर्जिक हा सामूहिक प्रकार असतो.
|
अमच्या धुळ्याला प्रत्तेकाची काहितरि सीग्नेचर लाईन आसते. आनि काही टिपीकल धुळ्याचे शब्द....... झीन्गुर म्हणजे सुकडा पोरगा फ़कीर म्हणजे येडा...... कानाख़ाली गणपती काढीण म्हणजे:- कानात मारणे. भीन्नाट गर्दी म्हणजे मोठि गर्दि\ भजी कडे बघते अणि जिलेबीचा भाव वीचारते म्हणजे:- चकाणि मुलगी गण-मण म्हणजे:- बावळट कान मान बल्ल्या म्हणजे:- मुर्ख टोचा चालु असणे म्हणजे प्रेमप्रकरण बैलाला भो म्हणजे:- जाहिर निषेध. फफुटा म्हणजे आईटम पोरगी. डाव ढाई म्हणजे- लव्हर. सुखोई म्हणजे सायकल. कौसमोस तोन्डाचा म्हणजे- लहाणखुरा. दुष्काळी हीरो म्हणजे जास्ती स्टाईलबाज. भटकती आत्मा म्हणजे बाईक वर सदेव भटकत असनारा चाट्या म्हणजे मुलीन्च्या मागे पुढे करनारा. आजुन खुप आहेत.... वरचे आवडले तर सान्गा.... माझे पहीलेच पोस्ट आहे ना भो........ }
|
पाटील बुवा ग्रेट लिखी राहिना ना बापू...
|
पाटिल भो, तु ते नुस्ता माहोल करि टाका, नविन स्टॉक ची वाट पाहत आहोत
|
Gobu
| |
| Sunday, May 27, 2007 - 1:35 pm: |
| 
|
विकृत = उच्च दर्जाचे!!! स्लर्ति,
  म्हन्जे "ते" लोक माझ्या नावान खडे फोडत नवते तर! लिम्ब्या, ग्रेट आहेस ह तु! पाटील, बहोत खुब! आणखी येवुद्या... वाट बघतोय ह आम्ही!
|
hiii..me abhimanyu .... mala madad pahije ... mala konhi sangtya ki marathit kasa lhiwaycha??mala pan marathit lhiwaycha aahe...pan kasa??kavita lhiwaycha aahe mala... software aahe ka hecha sathi??
|
आत्ताच धुळ्याला जाऊन आलो. नवीन स्टॉक बराच आहे. शक्य तेवढा लीहतो............ चुगलभटोरा म्हणजे चुगलखोर... चमण, झम्मण म्हणजे बावळट...... हणुमान होणे म्हणजे तोन्ड सुजणे...... खवड्या म्हणजे पीम्पल झालेला...... कब्रस्थान म्हणजे दात पडलेला....... कम्पाउण्ड म्हणजे दाताना क्लिपा लावलेला...... सन्नाटा चन्द्रमुखी म्हणजे टकल्या....... भन्गोडी गन्जडी म्हनजे दारुड्या......... घष्ट्या म्हणजे माथेफ़ीरुदारुड्या......... भेजड म्हणजे पहीलवाण जो डोक्याचा वापर करत नाहि....... वाळवन्ट म्हणजे मुली नसलेले कॉलेज्/ एरीया........
|
मण्ड्ळी काही कमी जास्ती ज़ाले तर साम्भाळुन घ्या.... हवे तर जाऊण या.......
|
शब्दकोष ? ... माझ्यामते ’शब्दकोश’ बरोबर आहे ...
|
मी कोल्हापूरमध्ये ज्या ओफ़ीसमध्ये काम करायचे तिथले हे शब्द: १. दोन्ही हात नसलेली खुर्ची: ठाकूर खुर्चीचे कुशन खालून फाटले असले तर्: हेलन २. घरी केबल नसणे: रेशन ३. मूड जाणे: "अर्रर्र "होणे पचका होणे: आम्बा पडणे खूप मोठा पोपट होणे: फणस पडणे खूप खूप खूप मोठा पोपट्: आमराईत जाऊन येणे ४. उगीचच भाव खाणे: शिप्पारस करणे (हा शब्द टिपिकल कोल्हापूरचा) ५. सरानी खूप वेळ काम सान्गणे झापणे: केबिनमध्ये घेणे ६. पान्ढरा ड्रेस घातलेली मुलगी: हंसिनी ७. परत परत तीच तीच गोष्ट सान्गणे: ह्याचा बा तोच किंवा इरून फ़िरून गन्गावेस ८. पोटात काही न राहणारा: बी.बी.सी. शिवाय जर कुणीतरी साध्याच प्रश्नाचे उत्तर बरोबर देऊन भाव खायला लागले तर- "बरोब्बर!दोन पैकी दोन गुण!!"
|
Zakasrao
| |
| Monday, June 18, 2007 - 6:04 am: |
| 
|
ऋतु लय भारी शब्द आहेत. मला ठाकुर आणि हेलन विशेष आवडले. शिप्पारस खुप दिवसानी ऐकला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|