Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 15, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » गाडी पाहावी विकत घेऊन ! » Archive through June 15, 2007 « Previous Next »

Chhatrapati
Monday, June 11, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The salesman at “Pre-owned” Car Dealership

माझी सात वर्षे जुनी आणि अवलंबून राहण्यास अतिशय योग्य ’होंडा’ काही ईलेक्ट्रीकल गोष्टी बिघडल्यामुळे शेवटी बदलण्याचा विचार मी केला. त्या गाडीवर ३१०००० मैल्स (490K+ Km) झाले आहेत, तरीदेखील अजूनही Sunroof, Cruise, AC सह अनेक गोष्टी अगदी छान चालतात. पण जपानी गाड्य़ा चालवून कधी कधी कंटाळा येतो, असे वाटते की कधी ही गाडी बंद पडेल आणि मला नवीन गाडी घेण्याचे निमित्त्य मिळेल !!

अगदी नवीन कोरी गाडी विकत घेण्याकडे माझा कल नाही. २/३ वर्षे वापरलेली गाडी घ्यावी असा मनसुबा रचून मी नेटवरून बरीच माहिती काढली. Shortlist केलेल्यातली एखादी गाडी ’ती प्रत्यक्ष कशी आहे हे पाहावे’ असे ठरवून मी एका डीलरशीपमध्ये जायचे ठरवले. कुठल्याही pre-owned कार डीलरशीप मध्ये गेलात, तर लगबगीने एखादा सेल्समन तुमच्या दिशेने येताना दिसेल. स्वच्छ नीटनेटका पोशाख घालून, कधी कधी टाय लाऊन, चकचकीत केलेली दाढी, विंचरून बहुतेक वेळा मागे वळवून घट्ट बसवलेले केस, पॉलिश केलेले बूट; इत्यादी. असा त्यांचा पेहेराव असतो. ’Excuse me, may I help you, sir ?' असे विचारून हे लोक तुमच्यावर सौम्य दबाव आणायला सुरूवात करतात. त्यांच्या नोकरीचा हा एक भागच आहे : एखादा मनुष्य त्यांच्या लॉटमध्ये घुसला तर त्याला मोकळ्या हाताने परत जाऊ द्यायचे नाही.

तुमच्या तोंडातून ’हो’ उत्तर मिळण्यासाठी ते तुम्हाला आधी साधे साधे प्रश्न विचारतात. तुम्ही कुठे राहता, कोणत्या देशातून इथे आला आहात, कुठे नोकरी करता, घरी कोण असते ? ’हाय टेक मध्ये नोकरी असेल’ हा केविलवाणा guess ते करून दाखवतात. असे करत करत शेवटी, ’So, what kind of car you are looking for' असे विचारण्यापर्यंत वेळ आली, की सजमावे तुम्ही त्यांच्या कचाट्यात अडकायला सुरूवात झाली. लगबगीने deal close करायला कोणताच मराठी माणुस तयार नसतो. आधी त्याला दहा ठिकाणी जाऊन तीच गाडी पाहून यायची असते. मग आपल्या ऑफ़िसमधल्या एक दोन देशी पंटरना आपले अनुभव सांगून खात्री करायची असते, की ज्या किंमती त्याने dashboard वर पाहिल्या त्या काही फ़ार अवाच्या सव्वा नवत्या. मग त्यातल्या एखाद्या ठिकाणी पुन्हा जाऊन त्यातल्या त्यात मवाळ माणसाकडून घासाघीस करून, ऑफ़िसमधल्या पंटरने घेतली त्यापेक्षा १०० डॉलर्स कमी किंमतीत का होईना, त्याच गाडीचे deal close करण्याची त्याची इच्छा असते, आणि त्यात काही चुकीचे नाही !

डीलरच्या Used car lot वर एका गाडीपाशी रेंगाळल्यावर, ’You know what, I will bring the keys for this baby, let's take it for a spin' हे वाक्य माझ्या कानावर पडले. जर का एखाद्याने ती गाडी चालवायला घेतली, तर नोकरीचा आवश्यक भाग म्हणून हा इसम तुमच्या शेजारी बसून आपल्याला आधी माहीत असलेल्या त्या गाडीबद्दलच्या सगळ्या गोष्टी परत जास्त अलंकारीक पद्धतीने ऐकवतो, इथेही तसेच झाले. अगदी Geo Prizm असो किंवा Chevy Cavaliar असो, ती सुद्धा BMW किंवा Mercedes Benz पेक्षा कशी चांगली आहे, हे पटवून देण्याचाही तो प्रयत्न करतो. गाडी चालवून झाल्यावर, ’So, what do you think ?' हा स्वाभाविक प्रश्न आलाच. मी 'I think it was okay' म्हणालो. त्याने एक किल्ला सर केलेला होता.

गाडीची किंमत कितीही असली तरी हे saleman तुम्हाला ’What monthly payment are you looking at' हा प्रश्न अनेक वेगवेगळ्या सुरात विचारतात. चुकूनसुद्धा ही रक्कम जर तुम्ही सांगून बसलात, तर शिल्लक राहते फ़क्त सोपे गणित. अगदी तेवढ्या रकमेत ते तुम्हाला गाडी बसवून देऊ शकतात. त्यांच्या दृष्टीने हे महिन्याचे हप्ते आपण कितीही वर्षे भरत राहिलो तरी ते आजिबात महत्त्वाचे नसते. तीन वर्षे, चार वर्षे, पाच वर्षे ... कधी कधी सहा वर्षाचे पण गणित त्यांच्या कॉंप्युटरवर असते. काहीही करून ते तुम्हाला महिन्याचा तेवढा हप्ता शक्य आहे हे सिद्ध करूनच दाखवतात ! गाडीची मूळ किंमत किती आहे या प्रश्नाचे उत्तर हे लोक अनेक प्रकारे टाळतात.

गाडीची test ride घेऊन, महिन्याच्या हप्त्याची रक्कम जर आपण सांगितली तर या नंतर त्यांना एखाद्या गाडीसाठी नाही म्हणणे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे ! त्याच्या कडूनच गाडी घेणे १०० % नक्की नसेल तर इतक्या पुढेपर्यंत गोष्ट जाऊच देणे योग्य नाही. एकदा त्याच्याकडची गाडी पाहून गेल्यावर परत त्याच ठिकाणी आपण गाडी घ्यायला कधीच जाणार नाही अशी मनाची ठाम समजूत या माणसांनी केलेली असते. ‘किंमत काय आहे पाहून घरी जाऊन थंड डोक्याने विचार करतो’, असे जर यांना सांगितले, तर आपण मूर्खपणा करतोय असा अविर्भाव यांच्या चेहऱ्यावर दिसतो. या आधीच्या कोणत्याही पायरीवर तुम्ही तुमची नापसंती दाखवलीत, किंवा पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न केलेत, तर हे लोक तुम्हाला त्यांच्या बायकोचे उदाहरण हमखास देतील. मी जेव्हा या सेल्समनला सांगितले की मी तुझ्याकडेच पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळे अजून एक दोन ठिकाणी जाऊन गाड्या पाहणार आहे, तेव्हा त्यानेही मला त्याच्या बायकोचे उदाहरण दिले. ‘She just kept looking for the same car in every dealership and finally found that she liked the first one she saw, but by the time she got back there, the car was gone !’ माझ्यामते हे उदाहरण अगदी सर्वश्रुत असावे ! म्हणजे या salesman च्या बायकोने केला तसा मूर्खपणा मी करू नये असे त्याचे मत होते. त्यांचे आवडते आणखी एक वाक्य म्हणजे ’look, do you want to drive a new car or just keep looking for one ?’ !!! वा रे वा ! क्या लॉजिक है !! :-)

गाडीची मूळ किंमत मी करायचा प्रयत्न केला, तर ’let me talk to my manager’ असे सांगून हा इसम कागदावर काही आकडे लिहिलेले घेऊन परत आला. त्यात अवास्तव जास्त down payment दिल्यावर महिन्याच्या हप्त्याची एक रक्कम बसवलेली होती, तरीपण गाडीच्या मूळ किंमतीचा कुठेही उल्लेख नवताच ! महिन्याच्या हप्त्याची रक्कम मी त्याला जर आधी सांगून ठेवली असती, तर यापुढे ’अजून विचार करतो’ म्हणायला काही कारणच राहिले नसते !!

कंपनीच्या डीलरशीपमध्ये ज्या pre-owned गाड्या विकायला ठेवलेल्या असतात, त्या सर्व गाड्यांना एका ठराविक दर्जाच्या चाचणीतून जावे लागते, तरच त्या डीलरला विकता येतात. तसेच काही जर्मन आणि जपानी कंपन्या कमी माईलेजच्या pre-owned गाड्यांवर warranty देखील देतात. अशाप्रकारे गाडी घेतली, तर त्यात जोखीम खूप कमी असते. पण गाडी त्या अवस्थेत नेण्याकरता कधी कधी डीलरला काही गोष्टींची डागडुजी त्याचे स्वत:चे पैसे घालून करावी लागते, सहाजिकच हे पैसे दुप्पटीने वसूल करण्याची त्याची धडपड असते. जेव्हा हीच गाडी त्याच्याकडे trade-in किंवा lease return या स्वरूपात येते, त्यावेळी त्याची किंमत तो खूपच पाडून ती परत घेतो. त्यामुळे त्याचा margin बराच जास्त असतो. माझ्या अनुभवात असे आलेय, की गाडीची जी किंमत लावलेली असते, त्यापेक्षा सुमारे १२ ते १५ टक्के किंमत खाली आणता येते. पण एखादी pre-owned गाडी जर आपल्याला खरोखरच आवडली असेल, आणि ती घेण्याची तुमची १०० टक्के तयारी असेल, तर हीच दबाव आणण्याची कामगिरी आपल्याला दुप्पट कार्यक्षमतेने करता येते. या प्रकारात ’बोल-बच्चन’ salesman काकुळतीला येवू शकतो, अगदी खात्रीने !!

एका डीलरच्या लॉटवरची एक गाडी मला आवडली आणि त्याची दर्शनीय किंमत ठीक वाटली. मी माझ्या मनात त्याची किंमत १५ टक्क्यानी कमी ठरवली आणि त्यात जर ती मिळाली तर car-search ला तिथेच पूर्णविराम लावण्याचे ठरवले. त्या गाडीची test-ride मी घेतली, आणि खरोखरीच मला ती चांगली वाटली, आवडली. परतल्यावर मला तो म्हणाला की ‘now tell me your numbers’. दर्शनीय किंमतीच्या पंधरा टक्के कमी किंमत मी मागितली आणि मीच त्याला विचारले, ‘I will buy this car right now, right here, if you give me this price’. इतक्या आत्मविश्वासाने विचारल्यावर मात्र त्याच्या लक्षात आले की त्याचे दबाव-तंत्र कमी पडू लागले आहे.


तो मला समजावून देऊ लागला की या किंमतीला ती गाडी विकली जाणार नाही. मी विचार केला, अगदी वाईटात वाईट म्हणजे खरोखरीच हे deal या किंमतीला होणार नाही, पण त्यामुळे माझे काहीही नुकसान होणार नवते, फक्त गाडी हुडकण्यात अजून जास्त वेळ गेला असता. त्यामुळे मी त्याला सांगितलेल्या किंमतीवर हट्ट करून ठाम राहिलो. पुन्हा एकदा त्याच्या मॅनेजरकडे त्याने एक फेरी मारली. हा मॅनेजर समोर एका काचेच्या केबिनमध्येच बसला होता, त्यामुळे बाहेरून मला दिसत होता. घासाघीस करण्याचा हा नित्यक्रम प्रत्येक मॅनेजरलाही चांगलाच माहित असतो, पण आपल्यासमोर तो खूप विचार केल्यासारखे दाखवतो. परत येऊन हा सेल्समन मला म्हणाला की मी त्याला सांगितलेली किंमत फ़ार कमी आहे, आणि मी त्याला ती वाढवून ‘reasonable’ किंमत सांगावी. पण मी साफ नकार दिला आणि उलट त्यालाच सुनावले, ’Do you want to make a deal today or let the customer walk away ?’ असा दबाव त्याच्यावरच आणल्यावर पुन्हा एकदा तो मॅनेजरला भेटून आला. त्याने आता मला थोडी वाढवलेली किंमत दाखवली आणि सांगितले की ही अगदी शेवटची कमीत कमी किंमत आहे, यापेक्षा कमी किंमत म्हणजे ही गाडी त्याला नुसकान करून विकावी लागेल. हे मात्र अगदी साफ खोटे होते. कोणताही डीलर, जो लाखो डॉलर्सची शोरूम उघडून बसलेला असतो, एखादी गाडी तोट्यात विकणे अगदी अशक्य गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सांगितले की जर ही किंमत तुला मान्य नसेल, तर पुढे बोलून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, मला दुसरीकडे गाडी पाहायला जाऊ दे. तुझे मात्र गिऱ्हाईक निघून गेले हे नक्की. हे सांगितल्यावर मात्र तो अगदी निराश झाला आणि त्याने आधी झालेल्या त्याच्या सौद्यांचे तपशील असलेले एक एक कागद काढून मला दाखवू लागला. मला यातून काहीच पैसे मिळणार नाहीत वगैरे गोष्टी मला ऐकवू लागला ! जर दबावाने गोष्ट सफल झाली नाही, तर भावनिक होऊनतरी तुम्ही ती मान्य कराल असा त्याचा प्रयत्न होता. म्हणजे कोणत्या थराला जाऊन हे कमिशन मिळवण्याची त्याची तयारी होती, याचे मला आश्चर्यदेखील वाटले. मी मात्र हट्ट करून शेवटी हा सौदा खरोखरच त्या किंमतीला पार पाडला. या नंतरसुद्धा paper work करताना डीलरने अनेक प्रकारच्या अनावश्यक गोष्टी मला विकण्याचा प्रयत्न केला. एरवी १००० डॉलर्सना असलेले anti-rust coat चे डील तो मला फक्त ५०० मध्ये देणार होता !! Tire guard नावाचे अजून एक जालयंत्र त्याने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यालाही नकार दिला, कारण कंपनीच्या warranty मध्ये या गोष्टी आधीच समाविष्ट होत्या ! Administration and handling नावाची एक फ़ी त्याने सक्तीची असते असे सांगून ती आधीच मी सांगितलेल्या किंमतीमध्ये मिळवली होती. ही फ़ी मात्र काहीही करून त्याने काढण्याचा नकार दिला. मी विचार केला की एखाद्याने गाडीची किंमत ठरवली, तरी त्या नंतरही अनेक प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी डीलर त्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतो. कारण हे सगळे पैसे त्याला मिळणारा नफ़ा असतो. आपल्याला मात्र महिन्याच्या हप्त्यात फ़क्त ५ ते १० डॉलर्सचा फरक पडतो हे तो गणिताने आपल्याला दाखवून देतो !




Giriraj
Monday, June 11, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या लोकांशी घासाघीस करायचा एक प्रकार म्हणजे खूप रस दाखवावा आणि खूप वेळकाढूपणाही करावा... इतका वेळ वाया घालवून जेव्हा आपण नाही म्हणायला लागतो तेव्हा त्याला नक्कीच खाली यावे लागते..

Farend
Monday, June 11, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी अनुभव छत्रपती. आजकाल Edmunds वगैरे मुळे निदान नवीन गाड्यांना एवढी घासाघीस करण्याची वेळ येत नाही.

आणि ३१० K ? मधे सर्वात जास्त अंतर धावलेल्या गाड्यांची एक लिस्ट आमच्या येथील पेपर मधे ( San Jose Mercury ) आली होती, त्यात बहुधा Top 20 मधे हे बसली असती. पहिली बहुधा खूपच जास्त अंतर धावलेली होती, पण बाकी नंबर साधारण याच रेंज मधे होते. आणि ७ वर्षांत 310K तूच 'जमवलेस' की गाडी आणखी काही वर्षे जुनी आहे?

एका कार च्या विक्रीवर डीलर आणि सेल्समन साधारण यांना किती कमिशन मिळते कोणाला माहीत आहे का?


Chhatrapati
Monday, June 11, 2007 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मी as usual, pre-owned विकत घेतली होती. त्यावेळी त्यावर 128K Miles होते. पण तेव्हा वाटले नवते की इतके दिवस ही गाडी न तक्रार करता चालेल असे. ’काही दिवस चालवू, बिघडली की विकू’ या तत्त्वावर घेतली, पण ते ’काही’ दिवस सात वर्षं झाली तरी चालूच आहेत !

पण हे फार नाही, अजून जास्त माईलेज असलेल्या Honda Accords ची एक यादी पाहिल्याचे आठवतंय मला ...



Robeenhood
Tuesday, June 12, 2007 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अनुभव भारतातला दिसत नाही. त्यामुळे भारतात वेगळेच वर्तन ठेवावे लागेल. इथे दुकानदार एक नम्बरी तर 'गिरि'यक सॉरी गिर्‍हाईक दस नम्बरी असा प्रकार असतो. शम्भर साड्या उलगडायला लावून 'इथल्यापेक्षा समोरच्या दुकानात चांगल्या साड्या आहेत हे दुकानदाराला खडसावून सांगून निर्विकारपणे तरातरा चालू पडणार्‍या ललना जिथे आहेत तिथे तुमच्या त्या सेल्समनची काय मात्रा चालणार?

Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, Buyer's Market आणि Seller's Market यातला फरक आहे तो !

BTW: ’ललना’ हा शब्द फारच गोड आहे. काहीही जास्त सांगावे लागत नाही. शब्दातच सगळे ठासून भरले आहे ! मस्त !

Aashi
Tuesday, June 12, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

310K ?बापरे! मी पहिल्यान्दा वाचल तेव्हा 31k वाटले. कोणती गाडी ईतकी चालु शकते?


Ameyadeshpande
Tuesday, June 12, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलंय! एकनएक शब्द पटला.
आणि हो... 310K :-) मी आत्तापर्यंत ऐकलेलं सगळ्यात जास्त मायलेज आहे हे!
मी एका निस्सानच्या डीलर कडे गेलो होतो तेव्हा त्याने मला निस्सानच्या गाड्या किती reliable असतात हे दाखवण्यासाठी एका मॅक्सिमा चा 300K झालेला ओडोमीटर दाखवला होता.


Swati_patel
Wednesday, June 13, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

edmunds.com has articles called sales mans confession. It's worth reading before buying new or used car

Chhatrapati
Thursday, June 14, 2007 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, लिंक पाठवाल काय ?
धन्यवाद !

Sayonara
Thursday, June 14, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपानच्या मानाने इकडे used cars ना किंमत चांगली येते. कितीही miles झाले असले तरीही. माझ्या टोक्योच्या दोन्ही चांगल्या कंडिशनमध्ये चालणार्‍या आणि फारतर ४०००० माईल्स झालेल्या गाड्या आम्ही बाराच्या भावात (एक १५०० ला आणि एक १०००० ला) विकून आलो आहोत कारण लोकांना फार माज आहे तिथे.

Swati_patel
Thursday, June 14, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here it is
http://www.edmunds.com/advice/buying/articles/42962/article.html

Arch
Thursday, June 14, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक १५०० ला आणि एक १०००० ला)>>
सायो, १५०० की १५००० आणि १०००० की १०००?

Chhatrapati
Thursday, June 14, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो, १५००० येन म्हणजे फार कमी किंमत वाटते. १२ चा भाव नाही, १२ शे चा भाव वाटतो :-) आणि १५००० डॉलर्स म्हणजे फार जास्त किंमत वाटते. ४०००० मैल म्हणजे जपानी गाडीच्या दृष्टीने बालपणच. 'पिकतं तिथं विकंत नाही' हे जरी खरे असले, तरी जप्पूलॅंड मध्ये गाडीला फार कमी किंमत मिळते असे दिसते.

Farend
Friday, June 15, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी 'फॉरीन' बद्दल ऐकलेली कथा म्हणजे तेथे नवीन गाडी काही वर्षे वापरून झाली तशीच टाकून देतात :-)

Chhatrapati
Friday, June 15, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Used Cars डीलरशीपमध्ये अजून एक गंमतशीर गोष्ट अनुभवायला मिळते. बरेचदा सेल्समन आपले Visiting Card (Business Card) आपल्याला देतो. त्यावर आधी कोणाचेतरी नाव छापलेले असते, ते खोडून हा इसम त्याचे नाव आपल्यासमोर तिथे लिहून देतो. मलाच हा अनुभव दोन ठिकाणी आला. पहिल्यांदा मला आश्वर्य वाटले आणि हसू आहे, पण दुसऱ्यावेळी मात्र लक्षात आले, की ही नोकरी एकाच जागी अनेक वर्षे करणारे सेल्समन अजून झाले नाहीत.


Sayonara
Friday, June 15, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर लिहिलेल्या किंमती खर्‍या आहेत. १५०० हे जरी कमी वाटत असले तरी BMW च्या शो रुमधे गेलो होतो तेव्हा त्याने किती किंमत सांगितली असेल ह्याचा गेस करा बरं!!!! आणि एक गाडी ७,८ वर्ष जुनी आणि एक चार. पण आहे खरी अशीच परिस्थिती तिथे.

Ameyadeshpande
Friday, June 15, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर ऐकलं आहे की ७-८ जण हाटेलात गेले की ६००-७०० येन बील होउ शकतं. आणि १५०० मधे गाडी??

Chhatrapati
Friday, June 15, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो, अरे मला फार आश्चर्य वाटतेय १५०० येन गाडीच्या किंमतीचे. ही लिंक पाहा. यात असे दिसतेय की १५०० येन म्हणजे फक्त १२.१३० US Dollars. तू सांगतोयस की जप्पूलॅंडमध्ये ७ ते ८ वर्ष जुन्या गाडीचा इतक्या कमी किंमतीमध्ये सौदा होतो ?? :-)

तसे असेल, तर जपानमध्ये ७ वर्षे जुनी गाडी विकत घेऊन ती भारतात बोटीने आणून JNPT ला पैसे चारून, महाराष्ट्रात कुठेही वापरली, तरी परवडेल ! जर बिघडली, तर आपल्याच गावातल्या मेस्त्रीकडे पाठवून परत आणायला गेलोच नाही, तरी चालेल ! :-)


http://finance.yahoo.com/currency/convert?amt=1500&from=JPY&to=USD&submit=Convert


Sayonara
Friday, June 15, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे पण सत्य परिस्थिती आहे. मी वर लिहिल्याप्रमाणे अम्हाला BMW च्या डिलरने त्याच गाडीचे १० डॉलर देऊ म्हणून सांगितलं होतं. ही गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये होती आणि कुठेही ठोकलेली वगैरेही नाही.
अमेय, ६००,७०० येन की ६००००,७००० येन रे? ६००,७०० येनमध्ये एका माणसाचं लंच होतं. रामेन,सोबा वगैरे. इटालियनमध्ये गेलं तर तेही शक्य नाही. खाणं महाग आहे तिथे पण इथल्यापेक्षा शंभर पटींनी चांगली quality . असो, हा ह्या बीबीचा विषय नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators