|
Farend
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:50 am: |
| 
|
परदेशात जाताना कराव्या लागणार्या अनेक गोष्टींची पहिल्यांदाच जाणार्या अनेकांना धास्ती असते. त्यात आपल्या इंग्रजी बद्दल आत्मविश्वास नसतो (निदान आशियाई एअर लाईन मधील कर्मचार्यांचे इंग्रजी ऐकेपर्यंत ). त्यामुळे कोठे काय करावे लागते यासाठी ही माहिती उपयोगी पडेल असे वाटते. काही तपशिलाच्या चुका असतील त्या जाणकारांनी जरूर सांगाव्यात. आपले घर सोडताना खालील गोष्टी चेक कराव्यात्: १. पासपोर्ट २. तिकीट, हे कधीकधी e-ticket असते, म्हणजे कॉम्प्युटर प्रिन्ट ३. इन्शुरन्स पॉलिसी प्रवासात काही फॉर्म्स भरावे लागतात म्हणून एक पेन बरोबर घ्यावे. नाहीतर सगळे लोक आप आपले फॉर्म भरण्यात मग्न असतात आणि कोणाकडे मागावे हा प्रश्न पडतो. मला पेन विसरलो हे कायम तो इमिग्रेशन फॉर्म पाहिल्यावर आठवते. विमान तळावर मुंबई विमान तळावर वरच्या बाजूला Departure area आहे. तेथे टर्मिनल A व C आहे. तेथे जाण्याच्या थोडे आधी कोणती एअर लाईन कोणत्या टर्मिनल ला आहे ते दाखवलेला एक बोर्ड रस्त्यावर डाव्या बाजूला आहे, त्याप्रमाणे योग्य टर्मिनल वर जावे. तेथे गेट जवळ गाडी थोडा वेळ थांबवता येते व कार्ट (ट्रॉली किंवा ढकलगाडी) तेथे मोफत मिळते. ती घ्यावी. सुरक्षा व्यवस्था खूप कडक असेल तर फक्त प्रवाशांनाच गेट मधून आत जाऊ देतात. नाहीतर सोडायला आलेल्यांना विमान तळाचे तिकीट काढून आत वेगळ्या एरियात जाऊ देतात. आता यापुढे प्रत्येक ठिकाणी पासपोर्ट व तिकीट दाखवायला सांगतात त्यामुळे ते सहज मिळेल (पण सहज हरवणार नाही) असे ठेवावे. चेक इन बॅग साठी सिक्युरिटी चेक आत गेल्यावर एका एक्स रे मशीन मधे चेक इन बॅग ठेवण्यासाठी एक रांग असते तेथे उभे राहावे. मग त्या पट्ट्यावर फक्त चेक इन करायच्या बॅगा ठेवाव्यात. तेथे काम करणारे लोक सहसा मदत करतात उचलायला. येथे त्या मशीन मधून बॅग्स जातात आणि दुसर्या बाजूला ते लोक बॅगांभोवती नायलॉन चे पट्टे लावतात. म्हणजे एका दृष्टीने त्या बॅगा सील झाल्या. आपण बाकी सामान व कार्ट घेऊन त्या बॅगा परत घ्यायला जावे व परत त्या कार्ट वर ठेवाव्यात. चेक इन काउंटर मग आपल्या एअर लाईन च्या काउंटर च्या रांगेमधे जावे. तेथेही आपल्याला एक फॉर्म देतात भरायला. यात साधारण पणे आपली माहिती, फ्लाईट नंबर वगैरे लिहायचे असते. काउंटर वर पोहोचले की पासपोर्ट व तिकीट दाखवावे आणि त्यांनी सांगितले की एक एक करून चेक इन बॅग्स उचलून काउंटर च्या शेजारी वजन करायची जागा असते तेथे ठेवाव्यात. वजन जर बरोबर असेल तर त्याला एक स्टिकर लावतात आणि एक दुसरा माणूस बॅग उचलून आतील पट्ट्यावर ठेवतो. मग आपल्याला आपला सीट नंबर व गेट नंबर सांगतात. येथे त्यांना विनंती केल्यास आणि उपलब्ध असल्यास सीट बदलून मिळते. हा काउंटर सोडायच्या आधी आपल्याकडे खालील गोष्टी आल्यात की नाही याची खात्री करावी: १. पासपोर्ट २. बोर्डिंग पास. अमेरिकेला जाणार्या फ्लाईट्स ना शक्यतो दोन बोर्डिंग पास असतात, कारण मधे हॉल्ट असतोच. पण काही वेळा मुंबईत दोन्ही मिळत नाहीत. तेव्हा विचारून खात्री करून घ्यावी की दुसरा सिंगापूर, सेऊल वगैरे जेथे हॉल्ट असेल तेथे मिळेल. आपल्याकडे एअर लाईन ने दिलेले तिकीट असेल तर जितके बोर्डिंग पास आहेत तितकीच त्याची पाने काढलेली आहेत ना हे बघावे. ३. आपण जितक्या बॅग्स चेक इन केल्या असतील त्यांची रिसीट असलेले स्टिकर, हे सहसा एका बोर्डिंग पास च्या मागे लावून देतात. आता तुमच्याकडे फक्त विमानात बरोबर घेण्याच्या गोष्टी राहतील. वेळ असेल तर तुम्ही पुन्हा थोडा वेळ (आतल्या आत एक वेगळा भाग असतो जेथे सोडायला आलेले लोक थांबतात) सोडायला आलेल्या लोकांबरोबर थांबू शकता. पण विमान सुटायला साधारण दीड तास असताना त्यांचा निरोप घेऊन आत जावे. इमिग्रेशन मग इमिग्रेशन च्या रांगेमधे जावे. येथे कार्ट सोडावी लागते. येथे मी शक्यतो मराठी लोक इमिग्रेशन चेक साठी असलेले पाहिले आहेत. ते आपल्या पासपोर्ट वर शिक्का मारतात. आपण कोठे व कशासाठी चालला आहात हे ही विचारतात. आपला सेक्युरिटी चेक यानंतर खालच्या मजल्यावर जाण्यास आपल्याला सांगतात. खाली गेलात की बसायला बरीच जागा आहे आणि एका बोर्ड वर कोणते विमान कोणत्या गेटवरून सुटेल याची माहिती असते. येथे चहा वगैरे मिळतो. फोन व STD ची सोय आहे. शक्यतो येथून लगेच आपल्या गेटकडे असणार्या सेक्युरिटी चेक कडे जावे. येथे मेटल डिटेक्टर मधून आपल्याला जावे लागते व बॅग एक्स्-रे मशीन मधून पाठवावी लागते. हा चेक झाला की लगेच आपले गेट जवळ असते. गेट वर विमान सुटण्याच्या साधारण ३० मिनीटे आधी बोर्डिंग चालू होते. शक्यतो अपंग व्यक्ती, वयस्क व्यक्ती आणि लहान मुले बरोबर असलेली कुटुम्बे यांना आधी सोडतात. बाकीच्यांना त्यांच्या सीट नंबर प्रमाणे (आधी मागचे, म्हणजे जास्त सीट नंबर वाले) सोडतात. आपला बोर्डिंग पास वरती ठेवावा म्हणजे विमानात कोणत्या बाजूने जायचे ते विमानातील कर्मचारी सांगतात. मधल्या हॉल्ट मधे आपल्याकडे पुढचा बोर्डिंग पास नसेल तर येथे लगेच त्याची चौकशी करावी व तो घेऊन ठेवावा. येथे आपला ब्रेक किती आहे त्यावर काय करायचे हे अवलंबून असते. सिन्गापूर ला ज्यांचा ८ तास ब्रेक आहे त्यांना एक फ्री टूर घेता येते. त्यासाठी उतरल्या उतरल्या लगेच नाव नोंदवावे कारण गर्दी असते. ही टूर घेतलयास सिन्गापूर च्या इमिग्रेशन मधून जावे लागते आणि तेथे आपला पासपोर्ट ठेवून घेतात व एक तात्पुरते व्हिसा सारखे डॉक्युमेन्ट आपल्याला देतात. ते जपून ठेवावे कारण पासपोर्ट परत मिळवायला ते दाखवावे लागते. इतर काही ठिकाणी सुद्धा अशी व्यवस्था असू शकेल. अमेरिकेत उतरायच्या आधी विमान पोहोचायच्या आधी २-३ तास विमानात एक US customs फॉर्म देतात. तो विमानातच भरावा. यात पासपोर्ट, फ्लाईट नंबर वगैरे माहिती भरावी लागते. US इमिग्रेशन विमानातून बाहेर पडल्यावर इमिग्रेशन साठी दोन रांगा असतात. एक व्हिसा घेऊन अमेरिकेत येणार्यांसाठी व दुसरी तेथील नागरिक व ग्रीन कार्ड असणार्यांसाठी. कधी कधी गर्दी प्रमाणे लोक मिक्स करतात. आपण योग्य त्या रांगेत जावे आजकाल व्हिसा घेऊन येणार्यांसाठी एक हाताचे ठसे घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. नक्की डीटेल्स माहीत नाहीत, पण बहुधा त्या एका मशीन वर आपला हात ठेवून त्याचे ठसे घेतले जातात. तेथे मदत करायला कोणीतरी उभे असते असे मी पाहिले आहे. इमिग्रेशन च्या काउंटर ला आपण येथे कोणाकडे व कशासाठी आलात अणि किती दिवस राहणार हे विचारतात आणि आपली सगळी डॉक्युमेन्ट्स चेक करतात. मग पासपोर्ट मधे एक I-94 चे कार्ड घालतात. ते अमेरिकेतील पूर्ण वास्तव्यात जपून ठेवावे. यावर आपली परतीची तारीख असते. इमिग्रेशन नंतर बॅग्स येणार्या पट्ट्याजवळ आपण जातो. येथे बॅगा उतरवून घ्याव्यात. येथे आधीच असिस्टंट घेतलेला नसेल तर कोणाची मदत मिळणे हे त्यावेळेस कोण लोक आहेत त्यावर अवलंबून असते. (असिस्टंट हवा असेल तर बहुधा प्रवासाच्या आधीच तशी विनंती करावी लागते एअर लाईन ला). US कस्टम्स बॅगा घेतल्या की त्या कार्टवर टाकून कस्टम्स च्या दिशेने जावे. तेथे ते अधिकारी आपल्या सामानाविषयी काही प्रश्न विचारतात. काही विमान तळावर हिंदी बोलणारे अधिकारी उपलब्ध असतात. भारतीय प्रवाशांना बहुधा कोणते खाद्यपदार्थ आणले आहेत हेच विचारतात. काही लोकांना बॅगा उघडावयास सांगतात. आयुर्वेदिक औषधांचे प्रिस्क्रिप्शन नसेल तर कधी कधी काढून टाकावयास लावतात. फळे वगैरे आणलेली चालत नाहीत. हे चेकिंग झाले की मग बाहेर येण्याच्या दरवाजातून तुम्ही पब्लिक एरियात येता. येथे तुम्हाला घ्यायला आलेले लोक थांबलेले असतात. ते आपण बाहेर येईपर्यंत आलेले नसतील तर तेथेच बसावे. नियमा नुसार येथे कोणालाही टॅक्सी, शटल वगैरे हवी आहे का म्हणून विचारता येत नाही. त्यामुळे येथे तसा काही त्रास नसतो. पब्लिक फोनही जवळ असतात. पूर्ण प्रवास भर प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी: १. कोणाकडूनही काही घेऊ नये. २. आपली डॉक्युमेन्ट्स जेव्हा चेक केली जात असतील तेव्हा त्यावर कायम लक्ष ठेवावे. ३. तसेच पासपोर्ट, तिकीट आणि बरोबरची बॅग हे कायम आपल्याबरोबरच ठेवावे, अगदी टॉयलेट मधे सुद्धा ही माहिती बर्याच जणांना उपयोगी पडेल अशी आशा करतो. आपला प्रवास सुखाचा होवो!
|
farend फार छान आणि उपयोगी माहिती दिलीत! US इमिग्रेशन्बद्दल आणखी थोडसं.. I-94 चं कार्ड customs च्या फॉर्म बरोबरच भरावं लागतं. त्याच्यी दुसरी बाजु इमिग्रेशन ऑफिसर भरतो / भरते.(एकदा अमेरिकेत आलात की हे सगळ्यात महत्वाचं कार्ड! यावर तुमचं इथलं वास्तव्य किती हे ठरतं! आणि मुख्य म्हणाजे ते कायम तुमच्याजवळ असावं लागतं! अमेरिकन विसाच्या पानाला स्टेपल करावं. इथे (US मधे)जर कधी पासपोर्ट रिन्यु करायला पाठवावा लागला तर हे I-94 काढून स्वत:जवळ ठेवायला विसरु नये.) तुमच्या कुंडलीतल्या ग्रहयोगाप्रमाणे तुम्हाला इमिग्रेशन ऑफिसर लाभतो! काही खडुस जास्त उर्मटपणे बोलतात. तर काही स्वागतसमितीचे सदस्य असल्यासारखे! "तुम्ही काय food items आणलेत" हे आवर्जून विचारतात. कस्टम्स डिक्लरेशनमधे बरेचदा लोक 'काही आणलं नाही' वर खुण करतात. (तिकडे बॅगेतून लोणच्याचा वास दरवळत असतो! ) स्वानुभवावरून सांगते (इतरांचे अनुभव वेगळे असु शकतात) दर वेळी allspice powder, mixed gram flour, indian snacks असे सटरफटर (पण प्रामणिकपणे )शब्द लिहिले फॉर्मवर, अगदी जागा नसताना गिचमिड अक्षरात! मग वेगळ्या लाईनीत पाठवलं पण मजा म्हणजे एकदाही बॅगा उघडायला लावल्या नाहीत! सरळ "फुटा इथून" टाइप चेहेरा करंत " you may go " असे सुमधुर शब्द कानी पडले. फिंगर प्रिंटिंग सध्या तरी दोन्ही index fingers चं होतं. पुढे अख्ख्या पंजाचं करणार असतील तर माहिती नाही. एक फोटु पण काढतात!
|
अमोल, किती उपयुक्त आणि मुद्देसूद माहिती लिहिली आहे.
|
अमोल खरच पहिल्यांदा येनार्यांसाठी ही माहीती अमुल्य आहे. यात एक भर म्हणजे आपण जिथे जातो तेथील पत्ता माहीती पाहीजे. बरेचदा अमेरिकेत आल्यावर ईमीग्रेशन ऑफीसर पत्ता विचारतो.
|
Asami
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:18 pm: |
| 
|
I-94 form सगळ्या,न्ना भरावा लागत नाही. White I-94 व्हिसाधारकांकरता असतो तर green I-94 visa waiver मिळणार्यांकरता असतो.. Resident aliens, US and canadian citizens ह्यांना I-94 भरावा लागत नाही.
|
Karadkar
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:52 pm: |
| 
|
माझ्या एका मैत्रीणीची आई माझ्याबरोबर मुंबईहुन SF ला आल्या होत्या. त्यांनी येताना सगळी माहीती ती आपल्याला फ़ॉर्म मधे लिहावी लागते ती वहीमधे लिहुन आणलेली होति - अगदी विसा नंबर, पास्पोर्ट नंबर. आधी मराठी मधुन आणि मग english मधुन. त्यांचा फ़ॉर्म मी लिहुन दिला पण त्या पुर्ण तयारीनिशी आल्या होत्या. आणि ती वही त्यांनी अगदी जिवापाड सांभाळून आणली होति. मला ही आयडीया आवडली. परत जाताना त्या सगळ्या form ची एकेक प्रत बरोबर घेउन गेल्या - पुढच्यावेळी उपयोगी पडेल म्हणुन. आणि परत आल्या त्या एकट्या आल्या.
|
३. आपण जितक्या बॅग्स चेक इन केल्या असतील त्यांची रिसीट असलेले स्टिकर, हे सहसा एका बोर्डिंग पास च्या मागे लावून देतात. स्टिकर्सवरचा destination airport code बरोबर आहे ह्याचीही खात्री करुन घ्यावी. चुकीच्या कोडमुळे बॅगा इतरत्र गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
|
Dineshvs
| |
| Friday, June 15, 2007 - 2:47 pm: |
| 
|
आणखी एक, जर आपण कट्टर शाकाहारी असाल, तर किमान तीन दिवस आधी एअरलाईनला एशियन व्हेजिटेरियन जेवणाच्या व्यवस्थेची सोय करायला सांगावी. म्हणजे सर्व फ़्लाईट्समधे ती सोय होते. भारतातुन जाताना जर कॅमेरा, लॅपटॉप नेत असाल, तर तसा शेरा पासपोर्टवर मारुन घ्यावा, म्हणजे परत आल्यावर त्याचा त्रास होत नाही. सामान शक्य तितके कमी असावे. आता सगळीकडे सगळे मिळते. त्यामुळे फार काहि न्यायची आणायची गरज नसते. लांबच्या प्रवासात बसुन बसुन पाय सुजतात. त्यामूळे पायाचे व्यायाम करावेत. थोडावेळ उठुन उभे रहावे. मध्यरात्रीच्या फ़्लाईटमधे जेवणाची वेळ फार विचित्र असते. म्हणुन आधी सूचना दिली तर आधी जेवण मिळुन, तुमची झोप डिस्टर्ब होत नाही.
|
Svsameer
| |
| Friday, June 15, 2007 - 8:25 pm: |
| 
|
एशियन व्हेजिटेरियन नाहि.. हिंदु व्हेज किंवा ईंडीयन व्हेज सांगावे.
|
Supermom
| |
| Saturday, June 16, 2007 - 1:10 am: |
| 
|
हो, मला एकदा एशियन व्हेज मधे सीफ़ूड दिले होते चक्क चतुर्थीच्या दिवशी. फ़ळे खाऊन भूक भागवावी लागली.
|
Vhj
| |
| Saturday, June 16, 2007 - 6:42 am: |
| 
|
खुप छान माहिती लिहीली आहे. मला अजुन असे सांगावे वाटते कि विमान प्रवासात न विसरता खुप पाणी प्यावे बसल्या जागी हलका व्यायाम करावा.शक्य असेल तर माॅयश्चरायजेशन क्रीम लावावे.
|
Gobu
| |
| Saturday, June 16, 2007 - 10:29 am: |
| 
|
फ़ार एन्ड, नेहमी सारखेच सुन्दर लिहीलेस ह! उपयुक्त माहीती दिलीस!
|
Miseeka
| |
| Sunday, June 17, 2007 - 6:10 pm: |
| 
|
विमानतळावर Check In Counter वर जो form मिळतो त्याला Departure (Embarkation) card for Indian Nationals म्हणतात. मराठित पारपत्र form मह्न्तात. यातील सगाळि माहिती capital letters मधेच भरायचि आसते.यात आपले passport details आणि आपला भारतातिल address , flight details,purpose of visit हे लिहायचे आसतत.
|
Mahaguru
| |
| Sunday, June 17, 2007 - 7:19 pm: |
| 
|
ही माहिती नविन येणार्या सर्वांना उपयुक्त आहे. मी पहिल्यांदा आलो, त्यावेळी आमच्या कंपनी ने या प्रकारची सर्व माहिती तसेच काही अमेरीकेतील प्रचलित शब्द (उदा. कोल्ड ड्रींक म्हणु नये, सोडा म्हणावे, चष्म्याला ग्लासेस म्हणतात, पाणी मागताना without हा शब्द कळत नाही, no ice असा शब्द प्रयोग करावा इ.) याबद्दल २-३ पानी document पाठवले होते. मी ते सापडले तर इथे लिहतोच. बहुधा ते mastech ने तयार केले होते, आणि नंतर सर्व देशी कंसल्टींग कंपनीने त्यात थोडे फार बदल केले होते. कुणा कडे आहे का ते?
|
Milindaa
| |
| Monday, June 18, 2007 - 5:02 pm: |
| 
|
/hitguj/messages/103388/2993.html?1176891199 या लिंक यासंबंधी पूरक माहिती आहे असे वाटते. मॉड्स जरा हे एकत्र करणार का?
|
you do not need to enter laptop anymore on your passport-i travelled to cape town and sydney last month on two different tripsहल्ली laptop ची entry passport वर करावी लागत नाही
|
For any electronics item after you pass the Imigration section , immediately before you go to ground floor , there is customs certification desk where you can show your items to them & obtain a certificate , which is valid for 3 years. Also many airlines has limitations on baggage like for Check in baggage max 23 kg per bag X 2 bags ( may differ from airline to airline) & for Cabin bag - @ 7-8 kg. Earlier for cabin bags only 1 bag was allowed but now a days LAPTOP has become common , hence its allowed as a 2nd baggage other.
|
Jet Lag : If you look at the earth's map, America is exactly opposite to India. Mhanje India madhe Divas asel tar America madhe adlya divshichi Ratra aste. India to America travel is @ 20-22 hrs.aste. Tyamule when we land in America generally aplya zopeche khobare hote. Americe chya Ratri apan jagato & divasa zop yete. But in 1-2 days you can recover from Jetlag. When you reach in America try to stay according to its conditions.i.e. say if you reach in afternoon & if you are feeling very sleep, even then don't go to sleep & go to bed when there is night. You may sleep for @ 12-16 hrs & once this sleep is done you can recover from Jetlag.
|
Apratim maahiti puralis..I think it will help me a lot.Ajun mi India baaher gelele naahiy...India madhech pravaas suru aahe...but I think this is the one I was looking for.
|
Archanajn
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:25 pm: |
| 
|
माहिति खरच खुप छान आहे. जर एका विमानातुन उतरुन परत दुसरिकडे जायचे आहे, तर अजुन काय कराव लागत याबद्दल कहि माहिति असल्यास क्रुपया पोस्त करावि.
|
Monakshi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 7:38 am: |
| 
|
फारेंड, खूपच छान आणि उपयोगी माहिती दिली आहे. तुमची एवढी detailed माहिती वाचून उगाचच अमेरिकेला जाण्याची इच्छा होत आहे.
|
जर आपल्या प्रवासात आपल्याला विमान बदलावे लागनार असेल तर... म्हणजे connecting flight घ्यायची असेल तर आपल्याला transfers terminal मधुन जावे लागते. वैमानिक कर्मचारी तश्या सुचना देतातच. आपल्या सोबतचे सामान घेउन आपल्याकडे असलेल्या पुढील प्रवसाच्या boarding pass वर terminal/gate number बघुन त्या दिशेने वाटचाल करावी. काही विमानतळावर पुन्हा security check मधुन जवे लागते. पुढील विमानाच्या वेळेच्या किमान ३०-४० मिनीट आधी तरी त्या terminal/gate ला पोहचायला हवे. बर्याचदा आपले check-in baggage आपोआपच पुढील विमानात पोहचवले जाते. ह्या प्रक्रियेला through check-in असे म्हणतात. काही वेळा मात्र आपल्याला आपले check-in baggage ही स्वत:च गोळा करुन पुढील विमानात पुन्हा check-in करावे लागते. आपले through check-in आहे की नाही हे जेथून प्रवास सुरु केला त्या विमानतळावर check-in करतानाच विचारून घ्यावे.
|
Jyeshth
| |
| Tuesday, February 05, 2008 - 8:49 pm: |
| 
|
खरच खूप छान महिति आहे... हे वचुन मझे अमेरिका चे पहिले प्रवास अठ्वितो.. पहिल्यन्दा प्रवस करनर्याला खूपच उप्योगि ठरेल....
|
जेष्ठ पहिला प्रवास कसा झाला लिहा ना
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|