Mankya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 2:33 am: |
| 
|
देवदासच नाही तर कुठलाही चित्रपट घ्या, चित्रपटांचा मूळ उद्देश हा मनोरंजन असतो ना ! प्रत्येक वेळी चित्रपटाने ज्यावर तो आधारीत आहे त्या कथानकाला जसे आहे तसे follow करायलाच हवे का ? तस प्रत्येक चित्रपटाआधी तशी सूचना येतेच म्हणा कि कुठल्याही घटना आणि पात्रे यांचा कशाशीही संबंध नाही, असेल तर तो निव्वळ योगयोग. देवदासबद्दल म्हणाल तर ईतर काही निरर्थक चित्रपटांपेक्षा तो नक्कीच भावला. नायिका चक्क साड्या घालतात ( अर्थात हे ही विषयसापेक्ष होत म्हणून त्यांनी साड्या वापरल्या ही गोष्ट निराळी ) अन त्याही साड्यांसारख्याच साड्या म्हणजे मल्लिका घालते तसल्या साड्या नाही हे ही विरळेच. माधुरीनी भुमिका अगदी मस्त साकारलिये. आणि प्रेक्षकांना जर पारोचं प्रेम हे सशक्त वाटत असेल तर त्यांनी ते घ्यावं, आता प्रत्येक गोष्टीत चांगल्या वाईट बाजू असतातच की ... आपण चांगलीच घ्यायची ! म्हणन ईतकच आहे की निखळ मनोरंजन म्हणून पाहिलं जो साधारणतः चित्रपटामागचा उद्देश आहे किंवा असतो तर रंगसंगती, संवाद ( शेरोशायरी ई. ) , नृत्य, Costumes , अप्रतिम संगीत यांनीही नटलेली कलाकृतीही म्हणायला हरकत नाही अस मला वाटतं ! नाहीतरी सध्या जे काही ईम्रान हश्मी भाऊंचे चित्रपट आलेत त्यापेक्षा तरी हा चित्रपट अगदी घरी सगळ्यांबरोबर पाहण्यासारखा आहे अस मला वाटलं बाकी ज्यानी त्यानी ठरवायचं कि काय घ्यायच अन काय नजरेआड करायच .... It depends on person !! माणिक !
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 12, 2007 - 4:10 am: |
| 
|
DJ बेवडादास फ़रेंद डोला रे डोला इन मुन्नाभाइ अज्जुका चां. म. च. बाकिच्यांचे लिहायचे कष्ट वाचवलेस.
|
Giriraj
| |
| Tuesday, June 12, 2007 - 5:34 am: |
| 
|
देवदास आला होता त्याच वर्षीच्या मटा दिवाळी मध्ये त्याची चिरफ़ाड आली होती.. बहुतेक गणेश मतकरी यांनी लिहिले होते... मला SRK हा अभिनेता म्हणून न आवडता एक talented व्यक्ती म्हणून खूप आवदतोइ.. मुळात तो कोणतिही भूमिका कधी करत नाही तर तो तेव्हाही SRK च असतो... त्याची देवदासविषयीची मतेही याच लेखात दिली आहेत. लेखक म्हणतात की सलिभ पेक्षा SRK ला देवदास अधिक कळला होता.
|
चन्द्रमुखी ( माधुरी ) विषयी नाही लिहिले का कोणी ? एवढी वयस्क आणि प्रचंड overweight तवायफ़ नाही का odd वाटली कोणाला ? 
|
Monakshi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:32 am: |
| 
|
गिरिराज, अगदी, अगदी! तुम्हाला अनुमोदन. देवदास पिक्चर कसाही झालेला असला तरी SRK ने त्यात जीव ओतून काम केलंय. मला नाही तो इतका loud वाटला.
|
देवदास मध्ये फ़क्त माधुरी च बरी आहे. शाहरुख अतिशय भडक. दिलीप कुमार चा देवदास त्या मानाने खुपच चान्गला वाटला मला.
|
एवढी वयस्क आणि प्रचंड overweight तवायफ़ नाही का odd वाटली कोणाला ? >>>>मरा हुआ हाथी भी सवा लाखका म्हणतात ना तसे आहे. असू दे बोजड. माधुरी आहे ना ती?
|
Arch
| |
| Tuesday, June 12, 2007 - 3:50 pm: |
| 
|
खर तर दिलीपकुमार इतका तोंडातल्या तोंडात बोलतो त्यामुळे पुष्कळदा तो काय बोलतोय हे खूप लोकांना समजतच नाही. पण दिलीपकुमारला नाव ठेवण म्हणजे त्या एका गोष्टीतल्या राजाच्या कपड्यांना नाव ठेवण्यासारख होईल म्हणून पुष्कळदा लोक काहीच म्हणत नाहीत. मला स्वतःला शहारुख खान फ़ारसा आवडत नाही पण निदान तो काय बोलतो ते तरी समजत.
|
मरा हुआ हाथी भी सवा लाखका म्हणतात ना तसे आहे. असू दे बोजड. माधुरी आहे ना ती? <<<<मग तिला " हत्ती " च म्हणा ! 
|
Asami
| |
| Tuesday, June 12, 2007 - 5:44 pm: |
| 
|
arch मला आठवते त्याप्रमाणे तोंडातल्या तोंडामधे बोलणे हि त्याची नंतर नंतर style बनली. सुरूवातीला तो संस्क्रुत श्लोक म्हटल्यासारखे loud and clear बोलत असे. नंतर मात्र त्याचा full to style bhai झाला.
|
दिलिप कुमार च आभिनय काही movies मधे एकदम जबरदस्त वाटतो , जसे गंगा जमुना , नया दौर , मधु मती आणि एका movie मधे तयचा -ve performance जबरदस्त होता नाव आठवत नाही पण निम्मी आणि मधुबाला होत्या बहुतेक त्यात .. आणि इतर बरेच movies आहेत जे पाहून खरोखर दिलिप कुमार ने जमाना अगाजवला असेल याचे नवल वाटत नाही !! पण ट्रॅजेडी किंग image मधे मात्र बरेचदा over acting करतो असं आपलं माझं मत हिंदी चित्रपटांच्या इतिहासातला मुघल - ए - आझम मधे पण मला दिलिप कुमार नाही आवडला .
|
Asami
| |
| Tuesday, June 12, 2007 - 7:29 pm: |
| 
|
अमर म्हणते आहेस का तु ?
|
Sayuri
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:31 pm: |
| 
|
मुगल्-ए-आजम मध्ये तर दिलिपकुमार सर्वात वाईट वाटलाय. त्य चित्रपटात तो सोडून बाकी सर्वजण त्या त्या भूमिकांना अगदी शोभून दिसतात. 'छुप न सकेगा इश्क हमारा, चारों तरफ़ है उनका नजारा' च्या वेळेला तो असं काही डोळे फडफडवीत वर बघतो की असं वाटतं की तो आंधळा आहे! मधुबाला आणि दिलिप..मला अजिबात न आवडणारी जोडी आहे. कुठे मधु.... असो.
|
Supriyaj
| |
| Wednesday, June 13, 2007 - 12:44 am: |
| 
|
मधुबाला आणि दिलिपकुमार.. एक अप्रतिम chemistry होती दोघांमध्ये.. ज्यानी 'तराना' पाहिला असेल त्याना नक्कीच हे पटेल. बाकी 'मुघल्-ए- आझम' हा सर्वस्वी मधुबालाचाच चित्रपट आहे.
|
दिलीपकुमारच्या समकालीनात थियेटरमधून आलेया नटांचा जास्त भरणा होता. ते स्टेजवर बोलल्यासारखेच एका दिशेने रोखून पाहत व सारखे वरच्या पट्टीत बोलत. आताही नाट्यकलाकार आहेत पण त्याना या दोन वेगवेगळ्या माध्यमांच्या मागणीबद्दल जाण आहे. यांत्रिक हालचाली कृत्रिम अभिनय असे. ही कोंडी फोडली दिलीपकुमारने. त्याच्या अन्डर प्ले मुळे वेगळाच नैसर्गिक परिणाम साधला गेला अर्थात कधी कधी त्याचाही अतिरेक होतोच. सर्वच उत्कृष्ट नटानी कुठे ना कुठे बोअर केलेलेच आहे. याची जबाबदारी दिग्दर्शकावरही येते. संवाद बोलताना शब्दांचे अचूक 'वजन'वापरणे महत्वाचे असते. अमिताभचे बरेच यश तर 'वाचिक' अभिनयातच आहे. नाहीतर आवाज चांगला असूनही सुरेश ओबेरॉय यशस्वी झाला नाही.. दिलिपकुमारचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इम्प्रोव्हायझेशन. दिग्दर्शकाने सांगितल्यानन्तरही नट म्हणून त्यात अधिक व्यापक application तो देतो. उदा. सौदागर मध्ये अनुपम खेर आणि त्याचे एक दृश्य आहे. त्यात अनुपम विचारतो. 'लेकिन वो(राजकुमार त्याचा हाडवैरी) तो तुम्हारा दोस्त है' त्यावर दिलिपकुमारला 'था!' एवढाच डायलॉग होता. प्रत्यक्ष टेकच्या वेळी दिलिपकुमारने आवेगात येऊन 'था! था!!था!!!' असा जबरी डायलॉग टाकला ते पाहून अनुपम देखील थक्क झाला.. (हे खेरनेच एका मुलाखतीत सांगितले आहे.)मला स्वताला चरित्र अभिनेता म्हणून त्याची दुसरी इनिंगच आवडते. खरे तर दिलिपकुमार आणि अमिताभ यानी असुरक्षिततेच्या भावनेतून प्रयोग न केल्याने,त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला नाही ही शोकांतिकाच आहे...
|
वर मी म्हटलेच आहे शक्ती हा माझा आवडता पिक्चर आहे. त्यात दोन तीन प्रसंगात दिलिप फारच जबरी आहे आणि अमिताभही. लहान अमिताभच्या अपहरणाचा अमरिश पुरीचा फोन येतो त्याच्याशी ठामपणे बोलल्यानतर मुलाच्या जीवाच्या शंकेने घेरलेल्या वेळी राखी किचनमधून सहज किसका फोन था वगैरे अधीरतेने विचारते' त्यावेळी तो काही ही न सुचून तिच्या वर उखडतो अन म्हणतो' कमाल करती हो तुम भी शीतल. किसीका फोन आ गया और तुम.. कुछ नही होगा हमारे बेटे को...'असे काहीसे म्हणतो ते दृष्यच पाहण्यासारखे आहे. दुसरं राखीचा मृत्यू झाल्यावर तिचे प्रेत शवागारात ठेवलेले असते तिथे तो जातो आणि मृत राखीचा हात हातात घेतो अन म्हणतो' डाक्टर कुcच नही हुआ है मेरे शीतलको,वो जिंदा है. देखो ना देखो उसके हाथ अभी गरम है.'हे तो लहान बालकासारखे व्याकुळपणे डॉक्टरला म्हनतो ते दृश्य काटा आणते. नन्तर राखीचे अन्त्यदर्शनाच्या वेळी अमिताभ जेलमधून त्या हॉलमध्ये येतो. राखीच्या प्रेताचे मूकपणे दर्शन घेतो अन गुढघ्यात मान घालून जवळ बसलेल्या दिलीपकुमारजवळ बसून केवळ स्पर्शातून त्याचे सांत्वन करतो तेव्हा दिलिपकुमार त्याला जे लूक्स देतो ते द्यायला जिनियसच लागतो... अंगावर काटा अन डोळ्यात पाणी आणणारे दृश्य आहे ते!! या सम्पूर्ण दृश्यात एकही संवाद नाही.. अवश्य पहावा हा चित्रपट....
|
शक्ती मधे दोघांचा अभिनय खर्च उच्च होता .. अभिनयाची जुगलबंदी अफ़लातून होती !! ' मशाल ' मधे पण आवडला मला दिलिप कुमार चा अभिनय . अर्थात नंतर ' ए भाय गाडी रोको ' scene चा मिमिक्री करणार्या लोकांनी joke करून टाकला होता ! पण त्या scene मधले ' ए भाई गाडी रोको , आपके बच्चे जिए भाईसाब ' म्हणताना दिलिप कुमार ने दाखवलेले expressions केवळ उच्च होते ! तो scene फ़क्त दिलिप कुमार किंवा अमिताभ सारखा अभिनेताच करु शकतो .
|
Rajya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 7:23 am: |
| 
|
थोडं विषयाकडे वळुया, देवदास कधी कधी मेला? शरदचंद्र गेल्यावर, के. एल. सैगल वारल्यावर आणि देवदास परत एकदा मेला जेव्हा शाहरुखने तो पडद्यावर साकारला. देवदास हा चित्रपट पाहील्यानंतर ही एकच भावना झाली. त्या श्वानमुखी शाहरुखला अभिनय कशाशी खातात हे तरी कळतं का?
|
Monakshi
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:47 am: |
| 
|
प्लीज, त्याच्याबद्दल इतकं वाईट नका हो बोलू!
|
Rajya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 10:22 am: |
| 
|
मोनाक्षी, काय आवडलं त्या शाहरुखचं तुला काय माहीती? काय तर तो करकचुन ब्रेक मारलेल्या गाडीसारखं हसतो, लहान मुलासारखं बोबडं काय बोलतो, देव जाणे!!
|