|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:41 am: |
| 
|
काल आमच्या "ह्यांना" मी एक डझन दुध आणि एक लिटर केळी आणायला सांगितली....
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:57 am: |
| 
|
सखे मग तु दुध आणायला कापडी पिशवी आणि केळी आणायला भांडं पण दिल असशील!
|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:40 am: |
| 
|
तेवढच राहिल, पुढच्या वेळेला देईन....
|
Giriraj
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:11 pm: |
| 
|
त्यांना अगदी "हे" समजतेस की काय?
|
Sayuri
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:20 pm: |
| 
|
Incidentlly, word 'aho' ("aho, aikla ka..." madhla aho ) means 'stupid/idiot' in Japanese.

|
Zakki
| |
| Wednesday, June 06, 2007 - 4:12 pm: |
| 
|
हे भारतातल्या बायकांना गेली शंभर वर्षांपासून माहित आहे. म्हणून तर त्या मुद्दाम 'अहो' असेच म्हणतात. मी माझ्या बायकोला सांगीतले, मला अहो म्हणायला नको, पण ती ऐकत नाही!
|
बायकांचा विषय चाललाय आणि यांनी मध्ये तोंड घातले नाही असे होणेच नाही.....
|
Pratyuma
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:54 pm: |
| 
|
अरेरे मी उगाच माझ्या नवर्याला 'अरे-तुरे' करत होते आता चांगल आदरानी 'अहो' म्हणत जाइन
|
Alpana
| |
| Thursday, June 07, 2007 - 4:51 am: |
| 
|
मी सुद्धा मी सुद्धा.. आज पासुनच..पण असाच काही अजी सुनिये चा अर्थ लागतो का बघा न...मी बर्याचदा हिन्दीत बोलते न नवर्याशी.. अर्थात असा काही शब्द नसेन तर मी मराठीत बोलेन..तेवढे मराठी कळते त्याला..आणी जपानी मुळिच कळत नाही
|
Manjud
| |
| Thursday, June 07, 2007 - 5:36 am: |
| 
|
sayuri सही....... then what does "aga" (aga, aiklas ka?) mean in japanese? समस्त पुरुष वर्गाला खुष करण्यासाठी हे विचारत आहे. बहुतेक तुम्हाला हवे असेल तसेच उत्तर मिळेल.......
|
Athak
| |
| Thursday, June 07, 2007 - 8:01 am: |
| 
|
Say the word 'Aga' and there will be an instant and often emotional response. To hundreds of thousands of devotees ????, the Aga is not simply a cooker it is a way of life. Aga owners quite simply adore their cookers and find it difficult to imagine life without them. Google जिन्दाबाद
|
Dakshina
| |
| Thursday, June 07, 2007 - 12:58 pm: |
| 
|
अगम्य वेंधळेपणा....  काहीच कळलं नाही.
|
धमाल लिहीलेय. अल्पना तुझे पुस्तक छापू शकतेस. दीपा गोवारीकरच्या लिखाणाची आठवण झाली. सखे तुझ्या नवर्याने एक डझन दुधाचे कॅन्स नाही का आणले मग? च्यायला हहपुवा. पण माझा विश्वास बसतोय. माझ्या पूर्वीच्या एका कंपनीत एक युजर सारखी येऊन पिडत होती की तिला हवे ते आउटपुट दिसत नाहीये. प्रोग्रॅममधे बग होता म्हणून थोडे थांब असे माझ्या बॉसने तिला सांगितले पण ती सारखी येऊन आमचे डोके खात होती. शेवटी माझा बॉस तिला म्हणाला, मॅडम आपने खाना नही खाया इसलिये आऊटपुट नाही दिख रहा. खाना खाके आईये दिख जायेगा. इकडे आमचे bug resolution झाले. पण आम्ही तिला सांगायच्या आतच बया पळत वर आली आणि म्हणाली आपने बोला तब सच नही लगा था पर मै अभी खाना खाके आयी और देखा तो आऊटपुट सच मे आ गया
|
Disha013
| |
| Thursday, June 07, 2007 - 6:31 pm: |
| 
|
अथक,अहो काय लिहीलं आहे?बायका अगम्य असतात म्हणुन अगं== अगम्य असं आहे का काही? पण post वरुन माझ्या चिमुकल्या बुद्धीला पुसट पुसट लक्षात येतंय की 'अगं' नावाचा कूकर असावा या भुतलावरती.
|
>> अथक,अहो काय लिहीलं आहे? अथक अगं बद्दल विचारायच्या बहाण्याने दिशाने तेवढ्यात तुम्हाला ' अहो ' म्हणून घेतलं बघा सायुरी खूपच मोलाची info दिलीस. सासूबाईंना सांगते आता. त्यांचा आग्रह होता नवर्याला अहो म्हणावं असा. एक भा. नि. प्र. जपानी बायका आदराने नवर्याला ' मूढसान ' किंवा ' मूर्खसान ' म्हणत असतील का बरं?
|
Sayuri
| |
| Friday, June 08, 2007 - 6:15 am: |
| 
|
>>>एक भा. नि. प्र. जपानी बायका आदराने नवर्याला ' मूढसान ' किंवा ' मूर्खसान ' म्हणत असतील का बरं? Lol!!! विषयांतराबद्दल क्षमस्व पण जपानी भाषेतील इतर मजेशीर शब्द आठवले. (क्लासमध्ये त्यावरुन भरपूर खिदळणं व्हायचं.) आपलं मराठी नाव 'उमा'. = जपानीतला अर्थ 'घोडा' 'आई' ला जपानीत 'हाहा' म्हणतात. बाकी मराठी 'सेवा' आणि जपानी 'सेवा' शब्द... अर्थ एकच आहे! असो. खूपच विषयांतर होतेय.
|
Alpana
| |
| Friday, June 08, 2007 - 7:01 am: |
| 
|
सन्घमित्रा, अग असे काही नकोस माझ्या डोक्यात भरवु....माझा नवरा आधीच खुप त्रस्त झालाय, अगदी सकाळी पाण्यासाठी मोटर ऑन केली आणी पाणी आले नाही म्हणुन परत येवुन झोपले तरी तो दोनदा विचारतो मोटर बन्द केलिस ना...आणी तरीही खात्री पटत नाही म्हणुन स्वतः जावुन एकदा बघतो....त्यामुळे मी पुस्तक बिस्तक डोक्यात घेतले तर उगिच जास्त वेन्धळेपणा करायला लागेल अशी त्याची समजुत होइल... हल्ली मी रेग्युलर मायबोलिकर झाल्यापसुन तो पण कधी कधी इथे चक्कर टाकतो... आणी मुख्य म्हणजे त्याचे मराठी बर्यापैकी सुधरले आहे..
|
Athak
| |
| Friday, June 08, 2007 - 7:22 am: |
| 
|
दिशा , त्या कंपनीने योग्य शब्द घेतलाय नाही का संघमित्रा , खरच की , बायको पण इतक्या प्रेमाने अहो का म्हणते हे आता कळल तिला जपानिज माहिती हुश्शार हो अल्पना , नवर्याला जरा मायबोलीपासुन दोन शब्द दूरच ठेव तुझ मराठी बिघडेल परवाचा माझा वेंधळेपणा शॉपमधे कॉउन्टरवर क्रेडिट कार्ड ऐवजी माझे आयडी कार्ड दिले अन ऑफिसच्या गेटवर आयडी कार्ड ऐवजी क्रेडिट कार्डने scan करत होतो
|
Disha013
| |
| Friday, June 08, 2007 - 2:24 pm: |
| 
|
हाहाहा!अजुनेक वेंधळेपणा! आपण फ़क्त नव्-यालाच थोडे ना अहो म्हणतो? सासु,सासरे,दीर, नणंद सगळे सामील त्यात!
|
Nalini
| |
| Friday, June 08, 2007 - 4:07 pm: |
| 
|
आपण फ़क्त नव्-यालाच थोडे ना अहो म्हणतो? सासु,सासरे,दीर, नणंद सगळे सामील त्यात!>> फक्त सासरकडच्यानाच अहो म्हणतात का? काका, काकू, बाबा, आजोबा, आत्या, मामा, मामी हे नाही का होत त्यात सामिल? दिवे घ्यालच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|