Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 04, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through June 04, 2007 « Previous Next »

Ajjuka
Friday, June 01, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं करूया दोन्ही सिनेमे आणून बघूया. मग कळेल नक्की कुठला ते!! :-)

Mansmi18
Friday, June 01, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला borat म्हणायचे होते.

Slarti
Friday, June 01, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Borat चा विनोद थोडा उग्र आणि आणि अंगावर येणारा आहे हे खरे. अमेरिकी लोक, त्यांच्या प्रवृत्ती, त्यांचे stereotypes वगैरेंची टोकाला जाऊन खिल्ली उडवली आहे.

Chinya1985
Friday, June 01, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोणी shootout at lokhandvala पाहिला का?कसा आहे???

Deepanjali
Friday, June 01, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deepanjali Wall Street मधेही तसंच आहे ना? चार्ली शीन तिला असाच काहीतरी प्लॅन दाखवतो, पण तिचे (आधी) मायकेल डग्लस बरोबर अफेअर असते?
<<<<फ़ारेंड ,
पण अज्जुका म्हणतेय तो बहुदा 'The Apertment' च असावा .
त्यातले scenes आणि स्टोरी चा भागही ' मेट्रो ' मधे बर्‍या पैकी same to same कॉपी केलेत , सर्वात main म्हणजे शर्मन जोशी स्वत : ची ' अपार्टमेंट,' office मधल्या लोकांना extra marrital affairs साठी वापरायला देणे आणि त्यामुळे इतरां पेक्षा भरा भरा progress करणे , त्यालाच आवडणार्‍या मुलीचे त्याच्याच फ़्लॅट मधे बॉस बरोबर येणे etc.. एकदम same to same कॉपी केलय .


Nandini2911
Saturday, June 02, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोणी shootout at lokhandvala पाहिला का?कसा आहे???
>>>

माझ्या बॉसने १९९१ साली पाहिला होता. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधेच. परवाच मीटींगमधे आम्हाला त्यानी "आखो देखा हाल" ऐकवला. आता पिक्चर पाहण्याची मजा येईल. बॉस प्रीमीयरला गेलेला "खास नाही" एवढंच सांगितलं.

Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला जबरदस्त!!! तो boss त्या apartment मधे रहायचा का?

Manuswini
Sunday, June 03, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेजा फ़्राय : एकदा timepass म्हणुन पहायला हरकत नाही. music industry वाले talent search साठी कसे होतकरु गायकांची चेष्टा करतात स्वःताचा चंद म्हणुन आणी त्यात एखादा चिकट पण प्रामाणीक, बावळत कसा मजा आणतो हेच. शनिवार दुपार ठिक गेली.

चीनी कम : ठिक आहे. म्हणजे तर्क लावु नये असा. प्रेमात काहीही होवु शकते मग तुम्ही ३० काय ५० वर्षाच्या माणसावर प्रेम करु शकता.......

de ja vu: काही ठिकाणी बरेच exagerrated आहे. ठिक आहे. story लिहिणे कंटळवाणे असल्याने लिहित नाही.

pharzania: डोळ्यात पाणी आणले. गुजरात दंग्यावर हा based असल्याने खुप मनाला लागले ते पाहुन. नाहक बळी जाणारे जातात नी दंगे मात्र होतातच.


Deepanjali
Sunday, June 03, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shootout at Lokhandwala: चांगला घेतलाय , चित्रपटाला वेग चांगला आहे , action scenes अतिशय realistic आहेत , अजिबात filmy वाटत नाहीत .
सगळे खरोखरच आपल्या समोर घडतय असच वाटते .
अर्थात अति भडक , अति हिंसाक द्रुश्ये as expected भरपूर आहेत , त्यामुळे खरोखरच डोकं गरगरायला लागतं !
Casting जबरदस्त आहे !
विवेक ओबेरॉय , अमृता सिंग : Outstanding!
संजय दत्त : Very good!
तुशार कपुर , अरबाझ खान , रोहित रॉय : Not bad!
सुनिल शेट्टी मात्र नेहेमी प्रमाणे दगड !
अमिताभ अर्थात चांगला वाटला तरीही या सगळ्यांच्या मानाने खूप filmy वाटतो !
अभिषेक ला दोन मिनिटा साठी घेतलय , त्यात थोडी हाणामारी आणि एक दोन मराठी वाक्ये बरी बोलतो .
काही उगीच घेतलेली bar girl item songs नसती तर जास्त चांगला वाटला असता .
तरी ' ए गणपत चल दारु दे ' गाणं लक्षात रहातं !
एकदा पहाण्या सारखा नक्कीच आहे , तरी पण
पूर्ण दोन आडीच तास अतिशय हिंसक scenes असल्यामुळे खूप sensitive लोकांनी अजिबात पाहु नये आणि घरी DVD आणून पाहिलात तर चुकुनही लहान मुलां समोर पाहू नका .



Psg
Monday, June 04, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'चीनी कम' पाहिला. मस्त सिनेमा!! खूप आवडला.
खरं तर ६४ वर्षांचा माणूस ३४ वर्षाच्या बाईच्या प्रेमात पडेल का? आणि तीही त्याच्या??? ... असा विचार केला तर हा पूर्ण सिनेमाच आपण 'अतर्क्य' category त टाकू शकू :-)

तरीही..
सिनेमा खूप आवडला. बल्की- याचा दिग्दर्शक- गेली अनेक वर्ष advertisement industry मधे आहे. त्याची हाताळणी उत्तम आहे. डायलॉग 'जबरदस्त' आहेत. एकएक पंच लाईन्स ऐकून आपण 'गार' पडतो! :-)

तब्बू छान दिसते. पण तिची dialogue delivery मधेच ढेपाळते. personally मला तिच्या जागी सुष्मिता सेन जास्त योग्य वाटली असती. तब्बूचे expressions मात्र मस्त. गंभीर बोलताना मधेच मिष्किलपणा मस्त दाखवते.

जोहरा सेहगल अप्रतिम! :-) स्विनी खाराही छान.

आणि अमिताभ!!!!!!! सलाम आहे या माणसाला. पूर्ण सिनेमाभर याला फ़क्त बघऽऽऽत रहायचं! :-) बल्की ह्या सिनेमाची script तयार करून नुसताच बसला असता जर त्याला अमिताभ मिळाला नसता. अमिताभ शिवाय या रोलला कोणीच न्याय देऊ शकले नसते! किती सहज वावर, सफ़ाईदार अभिनय.. hats off !!

असो! :-)

तर्क बाजूला ठेवा. निव्वळ करमणूक म्हणून बेस्ट सिनेमा. अवश्य पहा.


Nandini2911
Monday, June 04, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला जबरदस्त!!! तो boss त्या apartment मधे रहायचा का?
>>>>
नाही, ते पत्रकार आहेत. हे सगळं cover करायला गेले होते.

Shyamli
Monday, June 04, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण सिनेमाभर याला फ़क्त बघऽऽऽत रहायचं>>>>> :-)

तब्बुला भेटायला जायच असतं तेंव्हा मस्त तयार होउन निघतो तेंव्हा त्या ऑफव्हाईट सुटात कसला दिसतो हा माणुस :-))))))))))))
साठीतला माणुस एवढा छान दिसु शकतो????????
हे सगळे खान, आणि जे ए वगैरे एकदमच चमे :-) याच्यापुढे

संवाद अप्रतीम अगदी वा!!!!! वा! ची बरसात होत होती थेटरमधे
त्याची ती छोटी मैत्रीण एकदम गोडंबी आहे:-)
बाकी आपली मुलं मात्र अस बोलायला लागली तर आपण काय करु हा मोट्ठा प्रश्ण आहे :P

बाकी पुनमला अनुमोदन :-)
ब घा च


Manuswini
Monday, June 04, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, तु म्हणतेस चीनी कम ला अतर्क्य category त टाकुया पण इथेच बघ ना ही श्यामली कशी प्रेमात पडलीय अमिताभला त्या suit मध्ये बघुन

प्रेम काय कधीही,कुठेही,कुणाशीही,कुठल्याही वयात होवु शकते ठेव आता ह्याच्यावर विश्वास.. :-)


श्यामली गम्मत करतेय गं


Disha013
Monday, June 04, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे,तुमच्या पोस्टमुळे चीनी कम बघायची जाम उत्सुकता लागलिये.
शूट आउट at लोखं`डवाला बघण्यालायक आहे. पण दिपांजलीने सांगितल्याप्रमाणे लहान मुळांसमोर अजिबात नको.
सगळ्यांची कामे ठीक ठीक. गाणी जबरदस्ती घुसडलीत. शेवटी चकमक चालु असताना आईला फोन करुन 'मी पुरणपोळी खायला येईन' असे सा.गण्याचा मोह director ने टाळायला हवा होता. आपल्याला उगीचच मग त्या गुंडांची दयाबिया येते मग.

शाकालाका बूम बूम नावाचा एक पिक्चर पाहीला. का पाहिला ते माहीत नाही. बर्यापैकी कथा असुन सादरीकरणाने वाट लावलिये. ती अल्ट्रा मॉडर्न सेलिना आधीच आवडत नाही.पिक्चर बघुन अजुन नावडती झाली.
तिच्याबरोबर कंगना नावाचि मख्ख बाहुली.
बॉबी आणि उपेन ओके ओके.


Sas
Monday, June 04, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'चीनी कम' पाहिला वरील सर्व मतांशी मीही सहमत आहे. सहज अभिनय केलाय सार्‍यांनी. ती लहान मुलगि तर सहिच. कदाचित ती जाणार हे महित असल्याने तिला सारे "तस" बोलु देत असतिल व तिच्याशी तस वागत असतिल ना :-)

एकदा पहाण्यास हरकत नाही, खरच काय दिसतो Big B hmm :-)


Sas
Monday, June 04, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"शुट आउट @ लोखंडवाला" १५-२० मी. वर सोसला नाही खरच खुप भडक मरामार्‍या ई. आहेत सुरवातिपासुन, म्हणुन तो लगेच सोडला. This movie is Not good for Kids.

जुना "बुढ्ढा मिल गया" पाहिला एकदम सही चित्रपट. :-)

Shyamli
Monday, June 04, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु भापो :-)
आहेस कुठे ग सध्या तू?
जर मेल तरी टाक


Manuswini
Monday, June 04, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि, मी ठिक आहे गं मजेत आताच भारतातुन आले.
पुन्हा कर्मभूमीत... तेच ते तेच ते करायला monotnoous life . मेल टाकते थांब तुला.

चीनी कम ची गम्मत सांगते : पुर्ण सिनेमा मी आपली अमिताभचे पुढे कसे निभावणार ह्या चिंतेत बघितला. :-)
बिच्चारा लग्नानंतर निभाव लागेल ना,सगळे झेपु शकेल ना वगैरे वगैरे :-)

कारण आपल्यासाठी कोणीही १० वर्षाने मोठा म्हणजे आदरणीय 'काका','मामा',आजोबा गटात मोडतो मग 'ती' दृष्टी नसते पण ह्या movie ने डोळे उघडले बघ. ऐसा भी होता है और हो सकता है कळले बघ :-) कम्ब्ख्त ये इश्क़ ही ऐसा है वगैरे वगैरे शिकले बाई :-)

हा पण movie बघायला मजा आली जरा.


Sayuri
Monday, June 04, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'चिनी कम' मधली ती लहान मुलगी सोडून बाकी सर्व आवडलं.
परेश रावलचाही अभिनय चांगलाय. (गांधीवादी (?) पिता :-))
गाणं (चिनी कम) मस्तच आहे. वेगळंच असं.


Bee
Tuesday, June 05, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काल रेंच्या 'महानगर' ची डीव्हीडी मिळाली.. ह्या शनवारी मी बघणार आहे.. :-)

आणि आणखी एक खूषखबर म्हणजे माझी आवडती अभिनेत्री दीप्ती नवल तिची आज मला एक मस्त मेल मिळाली.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators